कट्यार पुन्हा काळजात घुसली

Submitted by नितीनचंद्र on 18 October, 2015 - 02:47

पुरुषोत्तम दारव्हेकर लिखीत आणि पं. जितेंद्र अभिषेकी यांच संगीत असलेली संगीत नाटक कट्यार एक अजरामर नाटक आहे. डॉ. वसंतराव देशपांडे, नुकतेच निवर्तलेले पं. पदमाकर कुलकर्णी तसेच नव्या पिढीतील तीन दमदार गायक डॉ रविंद्र घांगुर्डे, चारुदत्त आफ़ळे आणि वसंतराव देशपांडे यांचा वारसा घेऊन आलेले राहुल देशपांडे यांनी खासाहेबांची भुमिका करुन हे नाटक पुन्हा पुन्हा रंगमंचावर आणले. या नाटकाला प्रत्येक पिढीचा वारसा आणि नविन पिढीतल्या चाहत्यांचा उत्साह हे नाटक नव्याने सादर करायला भाग पाडतो आहे.

जसे विविध गद्य नाटकातले कलाकार एकदा नटसम्राट करायला मिळाले म्हणजे नट म्हणुन एक मानाचा शिरपेच मिळतो या भावनेने ही भुमिका करतात तसे संगीत नाट्यप्रकारात अनेक नाटकांपैकी हे एक नाटक करायला मिळाले म्हणजे सुध्दा शिरपेच अशीच भावना किमान या नव्या पिढीच्या गायकांमध्ये असावी.

वसंतरावांच्या गायकीने वेड लावलेले अनेक गायक/श्रोते महाराष्ट्रात आहेत. ज्यांनी स्वत: वसंतराव देशपांडे यांच्या कडुन संगीताचे धडे घेतलेले पं. पदमाकर कुलकर्णी आणि त्यांचे शिष्य डॉ. रविंद्र घांगुर्डे यांना वसंतरावांनी गाजवलेली खासाहेबांची भुमिका करायचे मनात येणे नवल नाही. राहुल तर हीच सर्व गाणी ऐकत आणि कट्यार निर्मीतीच्या कथा ऐकत लहानाचा मोठा झाला असेल. आपल्या वडीलांकडुन किर्तनाचे धडे घेतलेला आणि किर्तन करणारा चारुदत्तला ही भुमिका करण्याची प्रेरणा कशी मिळाली हे त्यांच्याकडुन कधी काळी ऐकायला आवडेल.

मागच्याच वर्षी पंडीत पदमाकरजी हयात असताना मी त्यांना तुमच्या कडुन कट्यार बद्दल ऐकायचे आहे असे सांगताच पंडीतजी खुलले होते. हे सर्व व्हिडीओ रेकॉर्ड करण्याचा माझा मानस तसाच विरला. खर तर मला प्रत्येक खासाहेबांकडुन कट्यार चे काय गारुड आहे हे जाणण्याचा संकल्प होता पैकी पंडीत पदमाकरजींच्या जाण्याने ह्यातला काही भाग रेकॉर्डवर येण्याआधीच पुसला गेला.

पंडितजींच्या जाण्याने झालेला विरस सुबोध भावेंच्या नव्या सिनेमाच्या घोषणेने कमी झाला आहे. एखाद्या कथेला नाटकात नेपथ्याच्या मर्यादा येतात. राजे- रजवाडे असलेल्या कालवधीतली ही कथा राजगायकाचा महाल आणि छोट्या सदाशिवा बरोबर एका जुन्या शिव मंदीरात पंडीतजींचा रियाझ या दोनच सेटवर अडकुन पडते. किंबहुना नाटक म्हणुनच लिहायला घेतले असेल तर दारव्हेकरांना ते प्रसंग त्या मर्यादेतच लिहावे लागले असतील.

कट्यार च्या कथेवर येऊ घातलेल्या सिनेमाचे पहिले गाणे येऊन थडकल्यावर " सुर निरागस हो" हे गाणे आणि त्याचे चित्रीकरण नाट्यरुपांतरामुळे असलेल्या मर्यादा संपवुन एका नव्या भव्य आकृतीबंधात बांधले जाईल यात शंकाच नाही.

एक पिढी होती ज्यात जुन्या कथा चित्रपटात बांधुन त्याच्या भव्यतेसहीत पडद्यावर साकारत. हे निर्माते फ़क्त हिंदीतच सिनेमे करत. जुन्या पिढीत मुगले आझम असुदे किंवा त्यांचा कित्ता गिरवणारा संजय लीला भन्साळी यांचा सिनेमा असुदेत. केलेला खर्च आणि उत्पन्न याचा मेळ घालण्यासाठी मराठी माध्यम अपुरे पडत असावे. यातुन एक काळ असा गेला ज्यात मराठी सिनेमा नव्या कल्पना नसलेल्या निर्मीतीच्या गर्तेत अनेक वर्ष अडकल्याने आपली हिंमत आणि वारसा आणि प्रेक्षक वर्ग ही हरवुन बसला होता.

नजीकच्या मराठी सिनेमात अनेक प्रयोग झाल्यामुळे आणि लोकांना भावल्यामुळे मला मराठी सिनेमा करायचा आहे असे अमिरखान सारखे निर्माते तर रजनिकांत सारखे सुपरस्टार जाहीर रित्या म्हणुन लागले आहेत. ही नादी मराठी सिनेमाला सुवर्णकाळ येईल की काय अश्या काळाची आहे. या पार्श्वभुमीवर कोर्ट या मराठी सिनेमाला कोणत्याही प्रसिध्द स्टार कास्ट शिवाय ऑस्कर पुरस्काराला नॉमिनेशन होणे हा सुध्दा एक चांगला योग मानायला हरकत नाही.

कट्यारची कथा आता भव्य स्वरुपात पडद्यावर झळकेल ज्यात सचिन पिळगावकर खासाहेबांची तर पंडीतजींची भुमिका शंकर महादेवन रंगवणार आहेत. या सिनेमातले सेट डिझाइन रवी जाधव यांचे आहे तसेच आर्ट डायरेक्टर म्हणुन सुध्दा काम करत आहेत. रवी जाधव यांच्या सेट डिझाइनची झलक " सुर निरागस हो" या राजवड्यातल्या गणेश उत्सवाच्या भागाचे चित्रकरणासहीत चाहत्यांच्या समोर आल्याने कट्यारला काही नविन अ‍ॅगलमधे नुसते ऐकायला नाही तर पहायला मिळणार ही एक आनंदाची गोष्ट आहे.

शंकर महादेवनला या निमीत्ताने मराठी सिनेमात पहाणे आणि ऐकणे सुध्दा आगळाच आनंद देईल. मध्यंतरी राहुल देशपांडे आणि शंकर महादेवन यांनी काही गायन एकत्रीत केल्याचे दुरदर्शनवर केल्याचे पाहिले होते. त्यामागे असा काही संकल्प असेल याची कल्पना आली नव्हती.
या चित्रपटाला शंकर- एहसान -लॉय यांचे संगीत आहे. या त्रिकुटाने काही सिनेमांना हटके संगीत दिले होते. चाहत्यांना हवी असलेली नाट्य संगीताची तहान या सिनेमाच्या संगीताने भागवली जाते की संगीत नाटकाचे सिनेमात रुपांतर होताना काही वेगळ्या संगीत संकल्पना पुढे येतात हे पहाण्याचे बाकी आहे.

सुबोध भावे पुन्हा नाटकाप्रमाणे कविराज बाके बिहारींचीच भुमिका रंगवणार असे वाटत होते पण टीझर त्यांना सदाशीवाच्या रुपात आणतोय तर कविराज बाके बिहारी बहुतेक दुसराच प्रसिध्द नट रंगवणार असे दिसत आहे. उमेची भुमीका मृण्मयी देशपांडे तर खासाहेबांच्या मुलीची भुमिका अमृता खाडीलकर करणार असे दिसत आहे. गायकांची नावे या प्रमोत आलेली नाहीत. सचिन पिळगावकर गात असले तरी खासाहेबांची गायकी दुसराच पार्श्वगायकाला करावी लागणार यात शंका नाही. गायकांच्या यादीत फ़क्त शंकरचे नाव आत्ता दिसते आहे. प्रत्यक्षात ही गाणी राहुल की अजुन कोणी हे समजायला सिनेमाच प्रदर्शीत होण्याची वाट पहावी लागणार आहे.

download (1).jpg

सुबोध भावे यांनी कट्यारचे नाट्यप्रयोग केले आहेत ज्यात राहुल देशपांडे खासाहेब भुमीका करतात. या पार्श्वभुमीवर आणि दुरदर्शनवरची ती जुगलबंदी ऐकल्यावर एका गोष्ट जी कथेच्या मुळ रुपात बदल करुन येईल असे वाटते ती म्हणजे खासाहेब आणि पंडीतजींची दसरा दरबारातली जुगलबंदी. असे घडले तर कथेच्या मुळ स्वरुपात नसलेली एक गोष्ट जी चित्रपट पहाण्याला एक कारण मिळवुन देईल.

असे प्रयोग चित्रपट पुन्हा निर्माण करताना करावेच लागतात. संजय लीला भन्साळींचा देवदास पुन्हा पहाताना " डोला रे डोला रे " या गाण्यात माधुरी आणि ऐश्वर्या यांना एका फ़्रेम मधे आणण्याचा प्रयोग करावा लागला होता तोच प्रयत्न या निमीत्ताने होईल अशी एक आशा माझ्या मनात आहे. अन्यथा खासाहेब आणि पंडीतजी यांचा सामना झाला आणि पंडीतजी न गाताचा उठुन गेले ही मुळची कथा काहीशी चाहत्यांच्या अपेक्शा अपुर्ण ठेवणारी होती.
images.jpg

कथेत बदल होणार म्हणजे नाट्य प्रयोगाचे अस्तित्व अबाधीत ठेऊन नविन गाणी येणार हे " सुर निरागस हो" या निमीत्ताने जाणवले. यातुन कट्यारचे वैभव वाढणार अशी आशा बाळगायला हरकत नाही. मराठी प्रेक्शकांनी जसा बालगंधर्व हा सिनेमा डोक्यावर घेतला तसा नव्या स्वरुपातली नाट्य प्रयोग चित्रपटाच्या स्वरुपात मराठी सिनेमाला उंची मिळवुन देऊन एक नवा इतिहास घडवतो का हे समजायला फ़ारसा अवधी राहीलेला नाही. दिवाळीतच हा सिनेमा रिलीझ होऊन दिवाळीचा आनंद अनेक पटीने वाढवायला आपल्या समोर येतो आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाक़ी एक आहे की आता संगीत नाटकांवर आधारित चित्रपटांची भूछत्र उगवू नयेत...सकस चित्रपट त्यातल्या त्यात आले तर चांगलेच...पण दर्जेदार निर्मात्यांनी त्यात उतरुन त्याला न्याय देऊन दाखवायला हवे.

.

>>बाक़ी एक आहे की आता संगीत नाटकांवर आधारित चित्रपटांची भूछत्र उगवू नयेत...सकस चित्रपट त्यातल्या त्यात आले तर चांगलेच...पण दर्जेदार निर्मात्यांनी त्यात उतरुन त्याला न्याय देऊन दाखवायला हवे.

नानाचा नटसम्राट येतोय जानेवारीत... ट्रेलर दाखवला होता

सगळ्यांना धन्यवाद,

कट्यार प्रेमी म्हणुन मी या कलाकृतीकडे पहातोय. सिनेमाकरण करताना कथेत काही बदल, नविन पदे/ गाणी अपेक्षीत होती. मुख्य म्हणजे नाटकातल्या नेपथ्याची लिमीटेशन लक्षात घेऊन कथानकाचा भाग असलेले पण येऊ न शकेलेले प्रसंग सिनेमात येणे अपेक्षीत होते. ते बहुदा आलेले दिसत आहे.

मला अजुन सिनेमा पहायला वेळ झाला नाही. रविवारी पाहीन म्हणतो.

न कळलेल कोड म्हणजे पुण्यात बारा तारखेला कट्यार च्या राहुलजी खासाहेब असलेल्या नाटकाचा प्रयोग होता. ह्याचे कारण नाटकाचे अस्तित्व संपु नये हे होते की पुणे करांचा पु.ल. म्हणतात तसा जाज्वल्य अभिमान ?

नाटकाचे अस्तित्व कधी संपेल असे वाटत नाही. पण १२ तारखेला प्रयोग ठेवणे हे फारसे रुचले नाही.

आम्ही आत्ताच प्रिमियरला जाऊन आलो...सचिन,पुष्कर श्रोत्री,सुबोध भावे टीम होती....आम्हाला वाटल अमृता,मृण्मयीपैकी कोणी असतील...पण त्या दुसरीकडे गेलेल्या प्रमो.साठी....काल पहिला शो पाहीला तरी परत छान फीलिंग होत...क्रेडिट गोज टू म्युझिक...

नटसम्राट गद्यनाटक आहे.मी संगीत नाटकांबद्दल बोल्लोय @प्रवीणपा

प्रचंड आवडला चित्रपट Happy अगदी स्वर कट्यार काळजात घुसली Happy

मूळ नाटक न पाहिल्याने तुलना न करता सिनेमा पाह्ता आला. संगीत श्रवणीय आहे. पण बहुतेक सर्व गाणी एक एकच कड्व्याची आहेत.अजून कडवी घालून पुर्ण तीन तासाचा सिनेमा केला असता तरी चाललं असतं. कव्वाली आणि शेवटचे गाणे चित्रपटाचा highlight आहे>>>>>+१०००० Happy

>>गाण्यांचे पुर्ण चित्रीकरण झाले असावे आणि मग सिडीमधे ती बोनस म्हणून मिळतील.. अशी वेडी आशा आहे मला.<<

सहमत. पण ते सुबोध भावेच्या विजन वर अवलंबुन आहे...

मी सुरत पिया.. चा व्हीडीओ बघितला. गाणे पूर्ण आहे पण त्याचा विस्तार केलेला नाही. त्यातले प्रत्येक कडवे वेगवेगळ्या तालात आहे. आणखी एक म्हणजे बिगरी को मेरे कोन बनावे मधल्या री चा उच्चार हा वसंतरावांचा खास होता ( डी आणि री च्या मधलाच ) इथे जरा वेगळा केलाय.

कव्वाली मला खास वाटली नाही. ( अग्निपथ मधली जास्त छान होती. ) मुसलमान म्हणजे कव्वाली हे समीकरण फारच ढोबळ झाले. एखादी रीवायत असती तर जास्त छान झाले असते ( कुणी श्रुती साडोलीकरांची रीवायत, रंगीन पालना हौसेनं केला, माझा झुलनार निघून गेला.. ऐकलीय का ? )

Kapoche +१
Pan tari rukh rukh watatey ki apan kahi tari sundar misanar ahot.pan pahila gelel tar kantala yeil he hi kharech

सचिनचे द्रुत लयीतले आलाप घेतानाचे हातवारे दुर्लक्ष केले तर १४ वर्ष सतत हरुन खचलेला आणि नंतर बायकोच्या कपटाने का होइना मिळालेल्या विजयाने उन्मत्त झालेला खांसाहेब आणि शेवटच्या दृश्यात सदाशिवच्या काळजाला हात घालणार्‍या गाण्याने आतुन्,बाहेरुन ढवळुन निघालेला खांसाहेब एकदम परफेक्ट उभे केलेत.

या चित्रपटात विशेष कौतुक आहे ते सुबोध भावेच, क्लायमॅक्सच्या दृश्यात एक मोठी तान घेताना त्याच्या गळ्याची शीर जणु तो स्वतः लाइव्ह गातोय अस वाटाव इतकी ताणलेली आहे, याला म्हणतात भुमिकेचा अभ्यास, नैतर अनेक शास्त्रीय बेस असलेल्या गाण्याच्या चित्रीकरणात प्लेबॅकचा आलाप संपला तरी पडद्यावर आ वासलेला/ली नायक्/नायिका असतात

प्रचंड आवडला चित्रपट . अगदी स्वर कट्यार काळजात घुसली >>> +१०००

मूळ नाटक न पाहिल्याने तुलना न करता सिनेमा पाह्ता आला. संगीत श्रवणीय आहे. >>>+१०००
संगीत नाटक खरच न झेपणार काहीतरी आहे. म्हणून कायम टाळल. चित्रपट पण घरच्यांच्या आग्रहामुळे पाहिला. पण इतका छान चित्रपट कुठला वाटला नाही याआधी

अवनी मज्जा आहे बाई ! आमच्याकडे उसगावात लागलाच नाही कट्यार !
सध्या यु ट्यूब वर चे कट्यार चे गाणे पाहून समाधान मानावे लागत आहे .

आमच्याकडे उसगावात लागलाच नाही कट्यार ! >>> स्वराली - ममं किंवा इतर संस्थांकडे चेक करा स्थानिक. अमेरिकेत अनेक ठिकाणी शोज झाले आहेत आणि अजूनही होत आहेत. कॅलिफोर्निया आणि न्यू जर्सी हे हुकमी तर आहेतच पण इतर ठिकाणीही आहेत. मी असेही वाचले की प्रॉपर रिलीजही करणार आहेत ("theatrical release")

आम्ही काल न्यूजर्सीतला पहिला शो पाहिला. खूप आवडला. अर्थात संगीत हेच सिनेमाचं मुख्य बलस्थान आहे , ओरिजिनल गाण्यांव्यतिरिक्त शंकर एहसान लॉय नी अ‍ॅड केलेली २-३ गाणी पण अप्रतिम. "दिल की तपिश" आणि कव्वाली पण जबरदस्त! सर्वांचा अभिनय, कास्टिंग पण चपखल !! अगदी साक्षी तन्वर चा लहानसा रोल पण मस्त जमलाय. पटकथेबाबत काही गोष्टी खटकल्या.
************ स्पॉयलर अ‍ॅलर्ट***********
जसे १४ वर्षात खाँसाहेब जिंकत नहीत ते ठीक पण लोकाश्रयही अजिबात का नाही मिळत ? दरबारात राजा आणि इतके इतर रसिक त्यांनाही दाद देतातच तर मग त्यातून काहीच आर्थिक लाभ अथवा फॅन फॉलोइंग कसे नाही मिळत ? टॉप नं १ आणि नं २ सर्व / बहुतेक बाबतीत तुल्यबळ दाखवले असते तर जास्त लॉजिकल झाले असते. सदाशिव १४ वर्षे का गाय्ब झाला ? त्याचा खाँसाहेबांबद्दल सुडाची भावना ते गुरु म्हणून अतीव आदर हा प्रवास नीट दिसत नाही.
****************************************
असे काही लॉजिकल प्रश्न पडत असले तरी ते सोडून देता आले , कारण ओव्हरऑल सिनेमा जमून आलाय ! खूप मजा आली बघायला. काल तिथे लोक पण अगदी उत्साही रसिक होते, डाय्लॉग्ज आणि गाण्यातल्या जागांना भरभरऊन दाद येत होती. मला तरी मुळात शास्त्रीय संगीताचं ज्ञान नाही पण ऐकायला आवडतं. ज्यांना पंडीतजी अन खाँसाहेबाची घराणी, वेगवेगळी गायकी इ. चे मायन्यूट डीटेल्स कळत असतील त्यांना अजून जास्त अप्रिशियेट करता आले असेल.

जसे १४ वर्षात खाँसाहेब जिंकत नहीत ते ठीक पण लोकाश्रयही अजिबात का नाही मिळत ? दरबारात राजा आणि इतके इतर रसिक त्यांनाही दाद देतातच तर मग त्यातून काहीच आर्थिक लाभ अथवा फॅन फॉलोइंग कसे नाही मिळत ? >> मूळात राजघराण्याचं राजगायकाचं पद मिळवणं हेच एक ध्येय आणि त्यासाठीची इर्ष्या हाच गाभा असल्याने बाकी दाखवलं नसेल.

मराठी सिनेमा हेटर आहे मी. ( थॅंक्स टु, लक्ष्मीकांत, भरत जाधव आणि बोअर कथानकं.) मी श्वास आणि वळु सोडता कित्येक वर्षात मराठी सिनेमा पाहिला नव्हता. मात्रा सर्फिंग करताना ABP माझा वर सुबोध आणि सचिनची मुलाखत पाहुन या सिनेमाबद्द्ल उत्सुकता निर्माण झाली.

क्लासिकल संगीत फार कळत नाही, विशेषशी आवडही नाही, पण हा सिनेमा...... कथा, गाणी, कास्टींग, अ‍ॅक्टींग सगळंच अप्रतिम. राजकवीचे विद्या आणि कलेवरचे संवाद काय सुंदर होते.
सचिनसाठी या सिनेमाला पास दिला असता, पण सुबोधला मुलाखतीत ऐकल्यावर धीर करुन पाहिला सिनेमा. सचिनने सुद्धा फार छान काम केलं आहे ( गाताना अती हातवारे वगैरे केले आहेत, पण गाण्यात आपण इतकं गुंगुन जातो कि त्या गोष्टीचा डोळ्याना फार त्रास होत नाही. ) माझ्या एका माबो मित्राची कमेंट - सचिन इतका अहंकारी आहे कि त्याला खानसाहेबांची अ‍ॅक्टींग करावीच लागली नाही. नॅचरल होता तो स्क्रीनवर. Lol

एकुणात काय तर आता मी मराठी सिनेमा पहायला सुरुवात करणार आहे. Happy

पुढचा नंबर 'परतु' चा. Happy

"कट्यार" बघायला शेवटी मुहूर्त लाभला Happy संगीत नाटक कट्यार मनात घट्ट रुजलेले असले तरी हा चित्रपट नवीन कलाकृती म्हणून खूप आवडला. शंकर, राहुल आणि महेश या तिघांना एकत्र आणून अशी कलाकृती घडवल्याबद्दल सुबोध भावेचे कौतुक वाटले. सचिनचे काम हा माझ्यासाठी अगदीच सरप्राईज एलिमेंट होता. कधी नव्हे तो त्याचा अभिनय आवडला :). अमृता खानविलकर आणि साक्षी तन्वर अगदी मस्त. खरंतर सुबोध आणि मृण्मयीचा अभिनय फार आवडला नाही, पण चित्रपटाच्याओव्हरॉल ईंपॅक्टमध्ये त्यामुळे काही फरक पडला नाही.

Pages