कट्यार पुन्हा काळजात घुसली

Submitted by नितीनचंद्र on 18 October, 2015 - 02:47

पुरुषोत्तम दारव्हेकर लिखीत आणि पं. जितेंद्र अभिषेकी यांच संगीत असलेली संगीत नाटक कट्यार एक अजरामर नाटक आहे. डॉ. वसंतराव देशपांडे, नुकतेच निवर्तलेले पं. पदमाकर कुलकर्णी तसेच नव्या पिढीतील तीन दमदार गायक डॉ रविंद्र घांगुर्डे, चारुदत्त आफ़ळे आणि वसंतराव देशपांडे यांचा वारसा घेऊन आलेले राहुल देशपांडे यांनी खासाहेबांची भुमिका करुन हे नाटक पुन्हा पुन्हा रंगमंचावर आणले. या नाटकाला प्रत्येक पिढीचा वारसा आणि नविन पिढीतल्या चाहत्यांचा उत्साह हे नाटक नव्याने सादर करायला भाग पाडतो आहे.

जसे विविध गद्य नाटकातले कलाकार एकदा नटसम्राट करायला मिळाले म्हणजे नट म्हणुन एक मानाचा शिरपेच मिळतो या भावनेने ही भुमिका करतात तसे संगीत नाट्यप्रकारात अनेक नाटकांपैकी हे एक नाटक करायला मिळाले म्हणजे सुध्दा शिरपेच अशीच भावना किमान या नव्या पिढीच्या गायकांमध्ये असावी.

वसंतरावांच्या गायकीने वेड लावलेले अनेक गायक/श्रोते महाराष्ट्रात आहेत. ज्यांनी स्वत: वसंतराव देशपांडे यांच्या कडुन संगीताचे धडे घेतलेले पं. पदमाकर कुलकर्णी आणि त्यांचे शिष्य डॉ. रविंद्र घांगुर्डे यांना वसंतरावांनी गाजवलेली खासाहेबांची भुमिका करायचे मनात येणे नवल नाही. राहुल तर हीच सर्व गाणी ऐकत आणि कट्यार निर्मीतीच्या कथा ऐकत लहानाचा मोठा झाला असेल. आपल्या वडीलांकडुन किर्तनाचे धडे घेतलेला आणि किर्तन करणारा चारुदत्तला ही भुमिका करण्याची प्रेरणा कशी मिळाली हे त्यांच्याकडुन कधी काळी ऐकायला आवडेल.

मागच्याच वर्षी पंडीत पदमाकरजी हयात असताना मी त्यांना तुमच्या कडुन कट्यार बद्दल ऐकायचे आहे असे सांगताच पंडीतजी खुलले होते. हे सर्व व्हिडीओ रेकॉर्ड करण्याचा माझा मानस तसाच विरला. खर तर मला प्रत्येक खासाहेबांकडुन कट्यार चे काय गारुड आहे हे जाणण्याचा संकल्प होता पैकी पंडीत पदमाकरजींच्या जाण्याने ह्यातला काही भाग रेकॉर्डवर येण्याआधीच पुसला गेला.

पंडितजींच्या जाण्याने झालेला विरस सुबोध भावेंच्या नव्या सिनेमाच्या घोषणेने कमी झाला आहे. एखाद्या कथेला नाटकात नेपथ्याच्या मर्यादा येतात. राजे- रजवाडे असलेल्या कालवधीतली ही कथा राजगायकाचा महाल आणि छोट्या सदाशिवा बरोबर एका जुन्या शिव मंदीरात पंडीतजींचा रियाझ या दोनच सेटवर अडकुन पडते. किंबहुना नाटक म्हणुनच लिहायला घेतले असेल तर दारव्हेकरांना ते प्रसंग त्या मर्यादेतच लिहावे लागले असतील.

कट्यार च्या कथेवर येऊ घातलेल्या सिनेमाचे पहिले गाणे येऊन थडकल्यावर " सुर निरागस हो" हे गाणे आणि त्याचे चित्रीकरण नाट्यरुपांतरामुळे असलेल्या मर्यादा संपवुन एका नव्या भव्य आकृतीबंधात बांधले जाईल यात शंकाच नाही.

एक पिढी होती ज्यात जुन्या कथा चित्रपटात बांधुन त्याच्या भव्यतेसहीत पडद्यावर साकारत. हे निर्माते फ़क्त हिंदीतच सिनेमे करत. जुन्या पिढीत मुगले आझम असुदे किंवा त्यांचा कित्ता गिरवणारा संजय लीला भन्साळी यांचा सिनेमा असुदेत. केलेला खर्च आणि उत्पन्न याचा मेळ घालण्यासाठी मराठी माध्यम अपुरे पडत असावे. यातुन एक काळ असा गेला ज्यात मराठी सिनेमा नव्या कल्पना नसलेल्या निर्मीतीच्या गर्तेत अनेक वर्ष अडकल्याने आपली हिंमत आणि वारसा आणि प्रेक्षक वर्ग ही हरवुन बसला होता.

नजीकच्या मराठी सिनेमात अनेक प्रयोग झाल्यामुळे आणि लोकांना भावल्यामुळे मला मराठी सिनेमा करायचा आहे असे अमिरखान सारखे निर्माते तर रजनिकांत सारखे सुपरस्टार जाहीर रित्या म्हणुन लागले आहेत. ही नादी मराठी सिनेमाला सुवर्णकाळ येईल की काय अश्या काळाची आहे. या पार्श्वभुमीवर कोर्ट या मराठी सिनेमाला कोणत्याही प्रसिध्द स्टार कास्ट शिवाय ऑस्कर पुरस्काराला नॉमिनेशन होणे हा सुध्दा एक चांगला योग मानायला हरकत नाही.

कट्यारची कथा आता भव्य स्वरुपात पडद्यावर झळकेल ज्यात सचिन पिळगावकर खासाहेबांची तर पंडीतजींची भुमिका शंकर महादेवन रंगवणार आहेत. या सिनेमातले सेट डिझाइन रवी जाधव यांचे आहे तसेच आर्ट डायरेक्टर म्हणुन सुध्दा काम करत आहेत. रवी जाधव यांच्या सेट डिझाइनची झलक " सुर निरागस हो" या राजवड्यातल्या गणेश उत्सवाच्या भागाचे चित्रकरणासहीत चाहत्यांच्या समोर आल्याने कट्यारला काही नविन अ‍ॅगलमधे नुसते ऐकायला नाही तर पहायला मिळणार ही एक आनंदाची गोष्ट आहे.

शंकर महादेवनला या निमीत्ताने मराठी सिनेमात पहाणे आणि ऐकणे सुध्दा आगळाच आनंद देईल. मध्यंतरी राहुल देशपांडे आणि शंकर महादेवन यांनी काही गायन एकत्रीत केल्याचे दुरदर्शनवर केल्याचे पाहिले होते. त्यामागे असा काही संकल्प असेल याची कल्पना आली नव्हती.
या चित्रपटाला शंकर- एहसान -लॉय यांचे संगीत आहे. या त्रिकुटाने काही सिनेमांना हटके संगीत दिले होते. चाहत्यांना हवी असलेली नाट्य संगीताची तहान या सिनेमाच्या संगीताने भागवली जाते की संगीत नाटकाचे सिनेमात रुपांतर होताना काही वेगळ्या संगीत संकल्पना पुढे येतात हे पहाण्याचे बाकी आहे.

सुबोध भावे पुन्हा नाटकाप्रमाणे कविराज बाके बिहारींचीच भुमिका रंगवणार असे वाटत होते पण टीझर त्यांना सदाशीवाच्या रुपात आणतोय तर कविराज बाके बिहारी बहुतेक दुसराच प्रसिध्द नट रंगवणार असे दिसत आहे. उमेची भुमीका मृण्मयी देशपांडे तर खासाहेबांच्या मुलीची भुमिका अमृता खाडीलकर करणार असे दिसत आहे. गायकांची नावे या प्रमोत आलेली नाहीत. सचिन पिळगावकर गात असले तरी खासाहेबांची गायकी दुसराच पार्श्वगायकाला करावी लागणार यात शंका नाही. गायकांच्या यादीत फ़क्त शंकरचे नाव आत्ता दिसते आहे. प्रत्यक्षात ही गाणी राहुल की अजुन कोणी हे समजायला सिनेमाच प्रदर्शीत होण्याची वाट पहावी लागणार आहे.

download (1).jpg

सुबोध भावे यांनी कट्यारचे नाट्यप्रयोग केले आहेत ज्यात राहुल देशपांडे खासाहेब भुमीका करतात. या पार्श्वभुमीवर आणि दुरदर्शनवरची ती जुगलबंदी ऐकल्यावर एका गोष्ट जी कथेच्या मुळ रुपात बदल करुन येईल असे वाटते ती म्हणजे खासाहेब आणि पंडीतजींची दसरा दरबारातली जुगलबंदी. असे घडले तर कथेच्या मुळ स्वरुपात नसलेली एक गोष्ट जी चित्रपट पहाण्याला एक कारण मिळवुन देईल.

असे प्रयोग चित्रपट पुन्हा निर्माण करताना करावेच लागतात. संजय लीला भन्साळींचा देवदास पुन्हा पहाताना " डोला रे डोला रे " या गाण्यात माधुरी आणि ऐश्वर्या यांना एका फ़्रेम मधे आणण्याचा प्रयोग करावा लागला होता तोच प्रयत्न या निमीत्ताने होईल अशी एक आशा माझ्या मनात आहे. अन्यथा खासाहेब आणि पंडीतजी यांचा सामना झाला आणि पंडीतजी न गाताचा उठुन गेले ही मुळची कथा काहीशी चाहत्यांच्या अपेक्शा अपुर्ण ठेवणारी होती.
images.jpg

कथेत बदल होणार म्हणजे नाट्य प्रयोगाचे अस्तित्व अबाधीत ठेऊन नविन गाणी येणार हे " सुर निरागस हो" या निमीत्ताने जाणवले. यातुन कट्यारचे वैभव वाढणार अशी आशा बाळगायला हरकत नाही. मराठी प्रेक्शकांनी जसा बालगंधर्व हा सिनेमा डोक्यावर घेतला तसा नव्या स्वरुपातली नाट्य प्रयोग चित्रपटाच्या स्वरुपात मराठी सिनेमाला उंची मिळवुन देऊन एक नवा इतिहास घडवतो का हे समजायला फ़ारसा अवधी राहीलेला नाही. दिवाळीतच हा सिनेमा रिलीझ होऊन दिवाळीचा आनंद अनेक पटीने वाढवायला आपल्या समोर येतो आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मूळ कथा चांगली, नाटक सूंदर, उत्तम संगीत! ही पार्श्वभूमी असल्यानंतर चित्रपट चांगला व्हावा अशी अपेक्षा आहे.

ट्रेलर आणि गाणी पहाता सचिन खां साहेब म्हणून पटत नाही.

बघु या!

याचे ढायरेक्टर कोण हाईत ?<< सुबोध भावे.

गाणी: मंदार चोळकर, समीर सामंत, मंगेश कांगणे आणि प्रकाश कापडीया (यातले निलिमाचे बंधु कोण ते मात्र माहित नाही)

सचिन बघवत नाही, पण राहुल "ऐकवतो" त्यामुळे त्याच्यासाठी का होइन पिक्चर बघणार>> +१

"शनिवारवाडा पाडून त्या जागी मॉल बांधणार" असं करण्याऐवजी "शनिवारवाडा पुन्हा बांधून त्याचे वैभव या काळाला पण दाखवून देणार" असे पॉझिटीव्ह अ‍ॅटिट्युड नी करावे असे वाटते.>> +१

चांगले लिहीले आहे. फक्त अपेक्षाभंग होऊ नये ही सदिच्छा. Happy

आफळेबुवांनी साकारलेले खानसाहेबही चांगलेच आहेत. नव्याला उगीच नावं ठेवायची म्हणून ठेवू नका.

आफळेबुवांनी साकारलेले खानसाहेबही चांगलेच आहेत. नव्याला उगीच नावं ठेवायची म्हणून ठेवू नका. कोण तो ? आफळे बुवांना नाव ठेवतोय ? मला तरी अशी एकही कमेंट आढळ्ली नाही. चु.भु.दे.घे.

.

मटाचा रिव्ह्यू वाचून सिनेमा चांगला बनला आहे असं वाटतंय. प्रत्यक्ष पाहून ठरवावे आता
>> अर्थातच. थोडे फार इकडे तिकडे होणारच कारण माध्यमात बदल आहे. खरी भीती महागुरुंपासून आहे. पण ते एवढे 'भीतीदायक ' नाहीत असे दिसते.
अर्थात रिव्य्हू ही हातचे राखून लिहिले असण्याची शक्यता आहे.

मी ओरीजनल नाटक पाहिलं नाही पण या सिनेमाचे प्रमोज आणि गाणीं आवडली आहेत , उत्सुकता नक्की आहे !
सचिन कसा अ‍ॅक्टिंग करणार माहित नाही पण गाण्यांमधे तरी मिसफिट वाटला नाहीये अजुन तरी , सिनेमा पाहिल्याशिवाय सचिनबद्दल काही कॉमेंट करणार नाही , let's see if he can surprise us !
अर्थात उर्दु बोलणारच कॅरॅक्टर होतं तर इरफान खान, नासिरुद्दिन शाह वगैरे दिग्गज लोकांना बघायला आवडलं असतं या रोल मधे एवढं वाटून गेलं खरं !
इतर कलाकार चांगले वाटतायेत ट्रेलर मधे !

उर्दु बोलणारच कॅरॅक्टर होतं तर इरफान खान, नासिरुद्दिन शाह वगैरे दिग्गज लोकांना बघायला आवडलं असतं या रोल मधे एवढं वाटून गेलं खरं !>>
भुमिपुत्रांना प्राधान्य दिले असेल. Happy

with all due respect to his career so far.. महागुरु आता " मी माझ्याजीराव माझे " झालेत .

उर्दु बोलणारच कॅरॅक्टर होतं तर <<< महागुरू डोक्यात वगैरे जातात हे खरं असलं तरी त्यांचं उर्दू खरंच चांगलं आहे.

उर्दु बोलणारच कॅरॅक्टर होतं तर इरफान खान, नासिरुद्दिन शाह वगैरे दिग्गज लोकांना बघायला आवडलं असतं या रोल मधे एवढं वाटून गेलं खरं !>>
भुमिपुत्रांना प्राधान्य दिले असेल.
<<
केपी,
हो, तसेच असेल बहुदा Happy
तरीही शं़कर एहसान लॉय ला म्युझिक रिक्रिएट करण्या साठी आहे , अर्जित सिंग गायला आहे , तर अजुन बॉलिवुड उसने घेतले असते तर असं वाट्लं !
कव्वालीसाठी रेहमान आणला असता तर अजुन मजा आली असती, असो 'जर तर 'करण्यात अर्थ नाही Happy

उर्दु बोलणारच कॅरॅक्टर होतं तर <<< महागुरू डोक्यात वगैरे जातात हे खरं असलं तरी त्यांचं उर्दू खरंच चांगलं आहे.
<<
ओके, मग माझ्या होप्स अजुन मावळल्या नाहीत Happy

माझं उर्दू खूप छान आहे कारण ते मला मीनाकुमारींनी लहानपणी शिकवलं आहे , आणि माझी उर्दू स्पीकिंग कॅरॅक्टर करायची फार्फार इच्चा होती असं त्यानी सांगितलय बुवा प्रमोशनमध्ये. असेलही. अर्थात हिंदीत काम केलेले असल्याने तेवढा लहजा सांभाळला असेलच बहुधा....

डीजे!! Happy हा सिनेमा बघण्यापेक्षा मला तरी <<शं़कर एहसान लॉय ला म्युझिक रिक्रिएट करण्या साठी आहे , अर्जित सिंग गायला आ<<>> यामुळे तो ऐकण्यात जास्त रस आहे.

राहुल देशपांडे नाटकात काम करतो तर सिनेमात का नाहीये? कॅमेरा खुपच क्लोजप देऊन अँक्टींगवर केंन्द्रीत होईल म्हणुन नसावा काय? नाटकात गायनावर वेळ मारुन नेता येते असे असावे का? सिनेमात त्याचा सहभाग नाहीये का? मला तरी तीच एक मोठी उणीव भासत आहे. आत्ता बघीतले तर त्याचा कुठेच उल्लेखही दिसत नाहीये.

सिनेमातही राहुलच हवा होता.:अरेरे: नाटकातल्या काही त्रुटी सोडल्या तर राहुलने खासान्हेबान्चे काम उत्तमच केले आहे. सचिन नको होता, पण....

सिनेमात त्याचा सहभाग नाहीये का? मला तरी तीच एक मोठी उणीव भासत आहे. आत्ता बघीतले तर त्याचा कुठेच उल्लेखही दिसत नाहीये.>>> ओ दादा, गाणी म्हटलीत की त्यानं दिल की तपिश त्याचंच तर आहे.

Pages