क्लूलेस-११

Submitted by श्रद्धा on 16 October, 2015 - 09:43

हा वीकेंड क्लूलेस वीकेंड..

आज रात्री क्लूलेस ११ची लिंक लाइव्ह होईल.
http://www.klueless.in/klueless/

सूचना नेहमीच्याच...
१. सोपे क्लू देऊ नका. क्लूलेसची खरी मजा त्या त्या लेव्हलला स्वतः विचार करून सोडवण्यात आहे. सोपे क्लू मिळाल्यावर तुम्ही पुढे पुढे जाता, पण कुठल्याच लेव्हलचं डिझाईन, त्यात खुबीने लपवलेले क्लू हे काहीच तुम्ही अप्रिशिएट करू शकत नाही.

२. उत्तर चुकलं तर विचारांची दिशा थोडी बदलून पहा. तुम्ही कितीहीवेळा उत्तर टाकू शकता. खूप वेळ लेव्हलशी झगडल्यावर योग्य उत्तरावर बदलणारे पान दिसले की, अशक्य आनंद होतो.

३. पुढे गेलेल्यांनी इथे क्लू देताना तारतम्य बाळगा.

४. त्यांचा ऑफिशियल ब्लॉग नक्की पाहत रहा, तिथेदेखील क्लू मिळतात.

५. सगळ्यांत महत्त्वाचं, हॉऑफे वगैरे लक्ष्य ठेवण्यापेक्षाही खेळाचा आनंद घ्या.

बेस्टॉफलक!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धनि, क्लूज तीन चार ठिकाणपैकी कुठेही असतात. पेजनेम, पेजसोर्स (इथे ऑल दॅट मॅटर्स हीअर अशी खूण असतेच), इमेज टायटल, पुढच्या लेव्हलला जाण्यासाठी एक तर पेजनेम बदलावं लागत्तं, किंवा उत्तरासाठी टेक्स्ट बॉक्स दिलेला असतो किंवा कुठंतरी क्लिक् करावकं लागतं.

पहिल्यांदाच खेळत असलास तर रूल्स नीट वाचून बघ.

वैधानिक सूचना: हा गेम फार अ‍ॅडीक्टीव्ह आहे.

हो पहिल्यांदाच खेळतोय. पण काही कळात नाहीये. की खाली टेक्स्ट बॉक्स आहे लेव्हल २ ला पण मी हाऊ आय मेट युर मदर चा जास्ती विचार करतोय की काय

मग?

मी पहिल्याच लेव्हलला अडकलीये. काय करायचंय ते कळालंय पण कुठं अक्रयचं ते कळेना. नेट स्पीड स्लो झाल्याने पेज पूर्ण लो़ड होत नाहीये का?

ब**** ***र पण नाही ! पण त्याच्या जवळ काही आहे का ? आणि सोर्स क्लु म्हणजे काय ?

इमेजच्या बाहेर क्लिक केलं की जे ओप्शन्स येतात त्यात एक ओप्शन असतो...व्ह्यु पेज सोर्स-- तो क्लिक केला की एक पेज उघडेल...त्यात खाली दोन ग्रीन लाइन्स मध्ये असतो तो क्लु!

At 3rd!

Pages