पाने आणि फुले

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

मला फुलांईतकीच किंबहुना त्यापेक्षा थोडी अधिक झाडांची पाने आवडतात. जास्वंदाचे फुल तर आवडते पण त्याहुन अधिक जांस्वदांचे कातरलेले काळपट हिरवे पान बघायला फार छान वाटते. कातरलेली पाने साध्या पानापेक्षा जास्त लक्ष वेधून घेतात. दारासमोरची रांगोळी जर गुलाबाचे फुल असेल तर खाली कातरलेली तीन पाने आखली, हिरवा रंग भरला की रांगोळी अजूनच खुलते.

गुलाब आणि जास्वंद ही दोन झाडे अशी आहेत की पाने आणि फुले दोन्ही गोष्टींचे सौंदर्य त्यांना लाभले आहे.

आपण ज्याला आपट्याची पाने समजतो ती कचनार तिचा गुलाबी रंग बघून डोळे लगेच निवतात पण असे वाटते ती पाने त्या फुलांना मॅच करत नाही.

सोनकीच्या पानांचा रंग कसला गहीरा गोड आहे. थोडासा पोपटी, पिवळा आणि हिरव्या रंगांचे मिश्रण वाटते.

अळूच्या पानावरचे पाण्याचे थेंब मोत्यासारखे वाटतात पण पान बघायला इतके काही खास नाही (अळूवडी प्रिय असली तरी!!!!)

बदामाची पाने जरा आकारानी ढब्बाळी असतात. दाट सावली देतात पण पिकून गळून पडली की अंगणात विखुरलेला तो मरुम रंगाच केर काढावाच वाटत नाही.

अमलताश म्हंटले की पिवळ्या फुलांचे झुंबर डोळ्यासमोर उभे राहते. पण इतकी सुंदर फुले देणार्‍या झाडाची पाने दिसायला अगदी सुमार असतात.

चाफ्याची पाने कधी चाफ्याच्या फुलासमवे असतात तर कधी चाफा निष्पर्ण होऊन फुललेला असतो. जाड पाने, वजनानेही जड असलेली. तोडली की देठातून लगेच दुध ओघळायला लागते. एखाद्या फांदीना डोळा आला की इतकी लुसलुशीत पाने इतकी मोठी होतील असे वाटत नाही.

कुसुंबीची पाने!! निळ्याभोर आकाशाखाली चिंचोळ्या अंगकाठीची कुसुंबी वाढायला लागली की तिची कुसुंबी पाने आकाशाला अधिक सौंदर्य प्राप्त करुन देतात. चकचक चकाकत राहतात.

करदडीची पाने! ही पाने सत्यनारायणाच्या पुजेला अथवा इतर कुठल्याही पुजेला चौरंगाच्या चार पायाला लावली की एकदम पुजा पुर्तीची भावना मनात येते.

शेवंतीची पाने ... पौष संपला की लगेच सगळे फुलझाड विरक्त होऊन जाते. मग तिच्याकडे बघावेसेही वाटत नाही.

नागलीची पाने - नखानी थोडे कुरतडले की लगेच एक छानसा गंध आपल्याला देणारी. कलशात पाच एकत्रित करुन ठेवली की लगेच मुर्तीमंत होऊन जाणारी. कलश जर चकचकीत तांब्याचा असेल तर अजूनच सुंदर रुप धारण करणारी.

आणखी एक पान जे मला फक्त बालपणीच सापडले होते. आम्ही जिथे बागेत फिरायला जायचो तिथे एक खूप जुनी मोठा व्यास असलेली विहिर होती. विहिरीला लोखंडी गोलसर कमान होती. त्या कमानीवर एक चंदेरी पानांची वेल भरगच्च होऊन चढली होती. तिची पाने कोवळी जुनी राठ कुठलीही पाने नेहमी दुमडलेली असायची. ती हातानी ताठ केली की एक सुंदर रंग असलेले पान समोर यायचे...

आमच्या घरी उन्हाळ्यात मोगरा फुलायचा तेंव्हा त्याची पाने भर उन्हात तजेलदार वाटायची. दोन पानांच्या खोपटीत एखादे फुल उमलले की पानासहीत फुल तोडायची कधी हिम्मत होत नसायची कारण अजून कळ्या त्याच खोपटीत सुगंध भरुन वाढत असतात. कळ्या तोडणे म्हणजे फार मोठे पाप वाटायचे!!!

विदर्भात हनुमान जयंतीचा उत्सव किती मोठ्या प्रमाणात साजरा होतो!! अबब!!! सकाळी पाचलाच मारुतीची गाणी सुरू होतात. मारुतीच्या प्रत्येक पारावर रुईच्या पानांची राम राम नाव लिहिलेली माळ विकायला हारवाले बसलेले असतात. कपाळावर छानस शेंदुर लावलेल असत. आमच्याघरी मी रुईची फुले, पाने आणि त्याचे कुयरीच्या आकाराचे फळ मीच आणायचो. अकोल्यात रुईची झाडे किती आहेत!!! रुईची पाने तोडली की त्यातून दुधाचे चिकट थेंब टपटपत आणि हाताला जणू फेवीकॉल लावला असे वाटे.

असो...कांदा, मुळा, भाजी, अवघी विठाई माझी!! पानांबद्दल हे असे लिहित जाता पानेच्या पाने भरुन जातील आणि तुम्हाला किती स्क्रॉल करावे लागेल माहिती आहे! अंगणात फाटकाच्या बाजूला स्वागताला दोन उंचच उंच अशोक उभे असतात तेवढे!!!!

-- बी

विषय: 
प्रकार: 

विकीवर एक "पान" सापडले Happy

https://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%BE

आणि माहिती आहे मागे मी ईंडोनेशियाला गेलो होतो. तेंव्हा द्रोणात जे काही खाल्ले होते त्यात गुंजाचीच फुले होती कारण तिथे मी गुंजाच्या बिया कितीतरी ठिकठिकाणी विखुरलेल्या पाहिल्या आहेत इतकी झाडे.

ही नावे बघा कशी रोमॅन्टिक आहेतः

अंग्रेजी Coral Bead
हिन्दी गुंजा, चौंटली, घुंघुची, रत्ती
संस्कृत सफेद केउच्चटा, कृष्णला, रक्तकाकचिंची
बंगाली श्वेत कुच, लाल कुच
मराठी गुंजा
गुजराती धोलीचणोरी, राती, चणोरी
तेलगू गुलुविदे
फारसी चश्मेखरुस
अरबी हबसुफेद

बी साहेब, तुमचे अंदाज चुक आहेत,

करंजाची पाने मोठी असतात. तुमच्या जास्वंदीपेक्षा लहान आणि त्याच्या बियाही मोठ्या असतात, चॉकलेटी आवरणाच्या असतात.

तुम्ही ज्या लाल बीया म्हणताय त्या गुंजेच्या असाव्यात. त्यांची पाने गुलमोहरा सारखी असतात. तुम्ही गुलमोहोर, आवळा, चिंच, बाभुळ या सगळ्यांछी पाने सारखीच असतात असे म्हणु शकता. अर्थात ती एकमेकांसारखी अजिआत नाहीयेत पण झाडांची जास्त माहिती नसणा-याला ती सारखी वाटू शकतात.

तुम्ही जी लिण्क दिलियेत तो वेल प्रकारातला गुंज आहे. अजुन एक प्रकार चा गुंज असतो ज्याचे गुलमोहरासार खे/इतके उंच झाड असते. मुंबईत भरपुर आहेत ही झाडे. माझ्या ऑफिसातही आहे एक झाड . मी नंतर फोटो टाकेन.

धन्यवाद बाईसाहेब Happy

मी इथे करंज गुगाळल तर ह्या ईमेजेस दिसल्यात. अशी तर कैक झाडे आणि फुले आढळतात. वालाची फुले पण अशीच असतात दिसायला.

हे करंजाचा विकीच पानं - https://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9C

आणि ह्या इमेजेसः https://www.google.com.sg/search?q=%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9C&...

अजुन एक प्रकार चा गुंज असतो ज्याचे गुलमोहरासार खे/इतके उंच झाड असते. मुंबईत भरपुर आहेत ही झाडे. माझ्या ऑफिसातही आहे एक झाड . मी नंतर फोटो टाकेन.>>

कुसुमगुंजा का? जी. ए. कुलकर्णी ह्यांच्या एका पुस्तकाचे नाव आहे ना कुसुमगुंजा.

लाल बीयांना खाली काळे चट्टे असलेल्या गुजांंचे नाव काहीतरी वेगळे आहे.

मी माबोवर 'गुंजा' हा शब्द शोधला तर शून्य पाने आलीत Sad

गुगलवर शोधताना बोटॅनिकल नावाने शोधलेले आणि इंग्रजीत लिहिलेले शोधलेले जास्त बरे. हिंदी आणि अन्य भाषिक साहित्य पुर्णपणे ख-या माहितीवर आधारलेले नाहीय. आणि तसेही विकिपिडीया म्हणजे एन्सायक्लोपिडिया नाही. तिथे तुम्ही मी कोणीही माहिती अपडेट करु शकतो आणि त्यामुळॅच तिथे जितकी बरोबर माहिती आहे तितकीच ती चुकीचीही माहिती असु शकते. या विभागात रस आसेल तर बोटॅनिकल नाव शोधा अणि वेगवेगळ्या ठिकाणा वरुन माहिती शोधुन आपले मत बनवा.

रतनगुंज - Adenanthera pavonina

गुंज - Abrus precatorius

ही माहिती नि ग वर शशांक पुरंद-यानी दिली. गुंज असे लिहुन सर्च करा, नक्की मिळेल.

छान लिहिल आहे!
सगळी हिरवी असली तरी पानां च्याकडे लक्ष जातेच जाते.
बी-माझ्या कडे असणारी (मीच काढलेली) पानांची प्रचित्रे इथे दिली तर चालतील का?

मस्त लिखाण. मलाही झाडांची पाने बघायला आवडतात. हिरवाच रंग पण अनंत छटा त्या रंगाच्या. काही पानांना कडांवर सुरेख नक्षी असते. माझ्याकडे आहेत काही फोटो. सायन किल्ल्यावर वेगवेगळ्या प्रकारची खूप झाडे आहेत. तिथे ही पानांचे प्रकार लक्ष वेधून घेतात.

बी, छान लिहिलंयस.
मला पाना, फुलांबरोबर झाडाचं खोड बघायलाही खूप आवडतं. किती विविध प्रकारचे टेक्श्चर असतं खोडांचंही. अगदी गुळगुळीत पासून ते वेगवेगळ्या प्रकारचं ओबडधोबड, झाडाच्या वयाप्रमाणे वेगवेगळं. जसं मी लक्ष देऊन पहायला सुरुवात केली तसं मला त्यातलं सौंदर्य, वेगळेपण जास्त लक्षात यायला लागलं.

साधना, या गुंजेच्या बीयांचा उपयोग काय?
विषारी असतात ना त्या?
कसल्या लाल भडक आहेत. पहिल्यांदाच पाहिल्या.'त्याचेडोळे गुंजेसरखे लाल भडक होते' हे वाक्य अनेकदा वाचनात आलंय . त्याचा अर्थ अगदीच अनुभवला आज

साधना, भारी!

रीया, कारण माहीत नाही पण पूर्वी आमच्या घरी कुंकवाच्या करंड्यात गुंजा ठेवलेल्या असत. या बिया पूर्णतः लाल रंगाच्या नसतात तर (डोळ्याच्या बुबुळासारखा) काही गोलाकार भाग काळ्या रंगाचा असतो.

रिया, वर मी फोटो टाकलाय तो Adenanthera pavonina चा. याचे भरपुर उपयोग आहेत - खालचे विकिवरुन साभार.

गजानन, काळी टोके असलेली वेल गुण्ज - Abrus precatorius

This tree is useful for nitrogen fixation, and it is often cultivated for forage, as an ornamental garden plant or urban tree, and as a medicinal plant. For example, the young leaves can be cooked and eaten. The raw seeds are toxic, but may be eaten when cooked.

Adenanthera pavonina seeds have long been a symbol of love in China, and its name in Chinese is xiang si dou (Chinese: 相思豆), or "mutual love bean". The beauty of the seeds has led to them being used as beads for jewellery. Renowned botanist Edred Corner states that in India, the seeds have been used as units of weight for fine measures, of gold for instance, throughout recorded history because the seeds are known to be almost identical weights to each other. [4] Indeed, the Malay name for the tree, saga,[5] has been traced to the Arabic for 'goldsmith'. The small, yellowish flower grows in dense drooping rat-tail flower heads, almost like catkins. The curved hanging pods, with a bulge opposite each seed, split open into two twisted halves to reveal the hard, scarlet seeds. This tree is used for making soap,[6] and a red dye can be obtained from the wood. The wood, which is extremely hard, is also used in boat-building, making furniture and for firewood.

The tree is fast-growing, with an attractive, spreading canopy that makes it suitable as a shade tree, and for ornamental purposes in large gardens or parks. However, it is also known for producing lots of litter in the form of leaves, twigs and especially seed pods which crack open while still on the branch, so releasing their seeds, before themselves falling to the ground.

In traditional medicine, a decoction of the young leaves and bark of Adenanthera pavonina is used to treat diarrhoea.[7] Also, the ground seeds are used to treat inflammation.[8] Preliminary scientific studies appear to support these traditional uses. In vitro studies show that Adenanthera pavonina leaf extract has antibacterial activity against the intestinal pathogen Campylobacter jejuni.[9] Also, high doses of seed extract have an anti-inflammatory effect in studies in rats and mice.[10]

साधना, अच्छा. Happy माहितीबद्दल धन्यवाद..

seeds have long been a symbol of love in China, and its name in Chinese is xiang si dou (Chinese: 相思豆), or "mutual love bean". <<< म्हणून त्यांना कुंकवाच्या डबीत ठेवत की काय कोण जाणे! Proud

वॉव! किती आवडत्या विषयावरचा लेख आणि इतरांनीही टाकलेले खूप छान फोटो पण मला जास्त आठवतात ते वेगवेगळे पानांचे वास . कागदी लिंबू , झेंडूंची पाने अशी बऱ्याच झाडांची पाने चुरगळून त्यांचा वास मेमरीत ठेवायला मला लहानपणी आवडायचं .

बी छान लिहील आहात. केळीच पान, दिंडा जेवणासाठी वापरतात. तुळस, शमी, बेल, दुर्वा व अजून अशी काही पाने पुजेकरीता वापरतात.

नारळ, ताडाच्या झावळ्या सुंदर तर असतातच पण छपरासाठीही त्यांचा उपयोग होतो.

अजुनही खुप खुप आठवल तुमच्या लेखामुळे.

Pages