पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -४

Submitted by संपदा on 12 October, 2015 - 03:41

पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मृदुला, आपल्या नेहेमीच्या कैरी/लिंबाच्या लोणच्यात एक महत्त्वाचा फरक आहे. या फळांत पानांपेक्षा कमी प्रमाणात पाणी असतं + आपल्याकडचं कोरडं वातावरण + वापरलेलं तेल + भरपूर मीठ. यामुळे इथे लोणची वर्षानुवर्षे टिकतात.
बेसीलमध्ये त्यामानानी पाणी जास्त असतं म्हणून त्याला टिकवायला वेगळी पद्धत लागेल. वरच्या पोस्टींत सांगीतल्या प्रमाणे करून पाहायला हवं. मलाही त्यादिवशी रु.१०/- मध्ये भरपूर बेजिल मिळालीय.

मृदुला बेझील पेस्तो फ्रीज करताना तेल आणि चीज घालू नको. ऐनवेळी क्युब्ज डिफ्रॉस्ट करायचे आणि तेल मिक्स करायच.

भारतात कोणी बेसिल ऐवजी तुळस वापरून पाहिली आहे का? चव अर्थातच थोडी स्ट्राँग असेल पण कुतुहल म्हणून विचारत आहे ..

I bought jwari Rava through big basket. Photo is not getting uploaded. It's a bit finer than broken wheat but coarse than normal upma rava. Today used it in dosa after soaking over night. Found some more recipes on Internet.

Big basket suggested Barley now, do we maharshtrian use barley? How? What's it called in Marathi? Any idea.

Tulsi doesn't taste good instead of basil for items like pizza or pasta; Though it belongs to same family. Tulsi taste and smell immediately reminded me of kadha ☺

राजसी ज्वारीचा रवा म्हणजे अगदी फाईन रवा नाही ना?जर मोठा रवा किंवा कण्यासारख दिसत असेल तर ज्वारीच्या कण्या /नुच्च करता येईल.
उकळत्या पाण्यात घालून ज्वारीच्या कण्या शिजवून घ्या. कन्सिस्टंसी खीरीसारखी. थोड मीठ घालुन घ्या. ब्रेकफास्टला ताक मिक्स करून खाण्यासाठी मस्त लागेल.
इथे कॉर्न च ग्रिट थोड पातळ शिजवून असच खायला मस्त लागत.

Ok. Thanks Seema Happy will definitely try this new recipe. How much cooking time in boiling water? Sorry! For the basic query.

Never heard of Jav. (Heard Jawas - as in chutney) Now, any idea how to use / cook / eat it? Thanks! Bharat Mayekar for marathi name Happy

What is maize? ( after purchase of jwari Rava, big basket is suggesting me products always heard in Economics but never @ home)

राजसी,
बार्ली(पर्ल बार्ली) मी बरीच वर्ष वापरत आहे. भाता प्रमाणे कुकरमधे शिकवलेली बार्ली वापरुन मी बार्ली केल सूप करते. किंवा चिकन नुडल सूप रेसीपीत एग नुडल ऐवजी शिजवलेली बार्ली वापरते. अजून एक म्हणजे बार्ली बेक नावाचा भाज्या/चिकन घालून वन डीश मील प्रकार आमच्याकडे बर्‍याचदा केला जातो.
भारतीय पद्धतीचे लंच हवे असेल तर बार्लीचे डोसे केले जातात.

गाजराची कोशिंबीर नट अलर्जी पब्लिकसाठी करायची असेल तर काय घालायचं? इतर वेळी मी दाण्याचं कूट, टॉमेटो, कोथिंबीर आणि खिसलेले गाजर, मीठ इ. मिश्रणात वरून फोडणी देते हिरव्या मिरचीची. संध्याकाळीच करायची आहे. जास्त ग्रोसरी करायला लागेल असे पर्याय शक्यतो नको आहेत Proud
सरळ नट्स न घालता बाकी नेहमीची करावी असं वाटतंय पण इथे सुगृहिणींकडे काही वेगळी ट्राइड अँड ट्रस्टेड रेसिपी असेल तर प्रयत्न करेन.

वेका,
मी किसलेले गाजर, बारीक चिरलेली कोथिंबीर, मिरची उभी चिरुन, जीरे पावडर, मीठ आणि थोडीशी साखर एकत्र करुन त्यावर लिंबू पिळते. फोडणी चालत असेल तर वरुन फोडणीत मिरची .

वेका मी गाजराची कोशिंबीर मुगाची डाळ (भिजवून) घालुन करते. गाजर, मुगाची डाळ,आणि भरपुर ओल खोबर (म्हणजे जवळ जवळ १/४ गाजराच्या किसाच्या.) मिक्स कराय्च . लिंबू पिळायचा. जिर्‍याची पावडर ,कोथिंबीर्,साखर मीठ घालायचे.
वाढण्यापुर्वी लाल सुकी मिरची,कडिपत्ता (भरपूर),हिंग घालून फोडणी करायची. तयार कोशिंबीरीत कालवून घ्यायची. सुरेख कोशिंबीर तयार होते. (आंध्रा स्टाईल आहे ही)

आता रेसीपी लिहिल्यावर लक्षात आलं, इथे साहिल शहांनी पण लिहिलेली यासारखी रेसीपी. पटकन लिंक सापडेना. साहिल द्याल का लिंकवाचत असाल तर.

राजसी, अगं रवा कितपत फाईन आहे माहित नाही . त्यामुळ मला वेळ नाही सांगता येणार. पण खीरीसारख करुन बघशील?. आपल्या गव्हाच्या खीरीपेक्षा थोडी पातळ कंसिस्टंसी.
मक्याचा रवा म्हणजे ग्रिट. तुला नेट वर अगदी व्यवस्थित रेसीपी सापडेल. ग्रिट टाकलस तर.

भिजवलेली मुगाची डाळ + गाजर + खोबरं + कोथिंबीर . मी नेहमी अशीच करते. नट्स घालून कधी केली नाही.

सांडगी मिरची फोडणीत घातल्यास एकदम शाही कोशिंबीर Happy

नट्स नका हो घालू: Wink
त्यापेक्षा किसलेल्या गाजरात, बारीक चिरलेला लसुण (एखादी पाकळी) घालून वरुन किंचित हळ्द-तिखट-मोहरी-हिंगाची फोडणी द्या. मीठ-साखर-लिंबु घाला.

मूगडाळ - लिंबू-हिरवी मिरची फोडणी घालून मस्त होते गाजराची कोशिंबीर. अतिलाडाचे पाहुणे असतील तर थोड्या मनुका/ट्रे जो रैझिन्स घाल ("बिचारी" कोशिंबीर एकदम शाही कोशिंबीर गटात जाते.).

दाण्याचं कूट नसेल घालायचं तर फोडणी तडतडली की १-२ चमचे तीळ घाल आणि गॅस बंद करून लगेच फोडणी कोशिंबीरीत ओत. मस्त चव येते.

Thanks Swati2, Seema and Bharat Mayekar. Definitely going to buy barley. Used Jwari Rava in ragi dosa.

ओके थँक्स. बरेच प्रकार सुचवले आहेत. नट्स लिहिलं कारण मग दाणे नाही तर कुणी बदाम आणि इतर नटांना मध्ये आणेल Proud . मुगडाळ फक्त भिजवून न शिजवता खाल्ली नाही आहे कधी पण इंटरेस्टिंग वाटतेय.

पुन्हा एकदा आभार. Happy

वेका, टु बी ऑनेस्ट, मला ती भिजवलेली तरी कच्ची मुगडाळ घातलेली कोशिंबीर अ-जि-बा-त आवडत नाही Happy भिजवलेली हडाळ चांगली लागते तसी मुडाळ लागत नाही असं माझं स्प आणि प्रा मत आहे.

दाणे वगैरे काहीही न घालता पण मस्त लागते गाजराची कोशिंबीर. तसेही गाजरांना एक नटी टेस्ट असते Wink लिंबा ऐवजी पाहिजे तर थोडे ग्रीक योगर्ट घाल. त्यानी मस्त मिळून येईल आणि चव पण मस्त लागेल. (स्ट्रॉबेरी वगैरे फ्लेवर चे नको घालूस Proud )

स्टफ्ड टोमेटो ची पाकृ माहितीये का? मी भाजी विषयात शोधलं पण नाही सापडलं. लवकर मिळाली तर IST रात्रीच्या जेवणात करायचीये.

Pages