दादरी हत्याप्रकरण, धर्मीय राजकारण आणि शांततेचे आवाहन !

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 October, 2015 - 17:24

दादरी हत्या प्रकरण ..
रोज चार बातम्या असतातच..
रोज काहीतरी घडतेय, रोज कोणीतरी कोणालातरी भडकवतेय, रोज कोणीतरी मुक्ताफळे उधळतेय..
या आजच्या चार बातम्या..

१) दादरी येथील घटना ताजी असतानाच उत्तरप्रदेशमधील मैनपुरी जिल्ह्यात गोहत्येच्या संशयावरून दोन तरुणांना संतप्त जमावाने बेदम मारहाण केली.
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/riot-in-ups-mainpuri-cops-...

२) दादरीसारख्या घटना घडवल्या जात आहेत. नजीकच्या काळात दंगली वा छोटेसे युद्धही घडवले जाईल. हे सगळे केंद्रातील सत्ता राखण्यासाठी चालू आहे.
- ईति राज ठाकरे
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan/raj-thack...

३) बहिणीशी नाते आणि पत्नीशी नाते यात जसा फरक असतो तसाच फरक बकर्‍याचे मांस आणि गाईच्या मासांत असतो
ईति - केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह
(नेमके काय म्हणायचे आहे Uhoh )
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/state-news-beef-versus-mut...

४) भारताचा धर्मांध पाकिस्तान होऊ देऊ नका
ईति - पाकिस्तानी कवयित्री फहमिदा रियाझ
..................

असो,
गोहत्या आणि बीफ खाण्यावर बंदी हे योग्य की अयोग्य याबाबत आपल्यात मतभिन्नता असेल, मात्र या मागे खेळल्या जाणार्‍या राजकारणापासून सर्वांनीच सावध राहा. अन्यथा तुमचा तवा तापवून त्यावर आपापली राजकीय पोळी शेकली जाईल.

मी काही स्वत:ला शांततेचा मसीहा नाही समजत, पण या पार्श्वभूमीवर शांततेचे आवाहन जरूर करू इच्छितो.
या सर्व घटनांकडे डोळसपणे आणि तटस्थ नजरेनेच बघा. चुकीच्या पद्धतीने व्यक्त होऊ नका, प्रक्षोभक प्रतिक्रिया देऊ नका, कुणाच्या प्रभावाखाली येऊ नका. जर यामागे राजकारण असलेच तर त्याला तुमच्या समंजसपणानेच निकामी होऊ द्या !

ईथेही तसेच व्यक्त व्हाल अशी आशा करतो.

__/\__

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रशासक ती पोस्ट उडवतील ह्याबद्दल ती पोस्ट लिहिणारे आणि वाचणारे बरेच पॉझिटिव्ह दिसत आहेत. त्यामुळे मलाही असे वाटू लागले आहे की कदाचित ती पोस्ट उडेल.

पण ती पोस्ट हे एक मत आहे. ते मत चुकलेले, चुकीच्या माहितीवर आधारीत किंवा हेतूपुरस्पर लिहिलेले मत असू शकते. पण अशी हेतूपुरस्पर लिहिलेली मते कोणती नव्हती आजवर?

भाजप सरकारमध्ये येणारच नाही असे गृहीत धरून सुरू असलेला गचाळ कारभार पाहून कोणी सोशल मिडियावर इतके विखारी का बोलत नव्हते? अचानक मे २०१४ नंतर सोशल मिडियावर हा विखार का आला? इतरत्रही का आला?

ह्याचे कारण असे आहे की सोशल मिडिया किंवा इतर सर्व माध्यमे राहोत बाजूला, प्रत्यक्ष आयुष्यात विरोधकांची वाताहात झालेली आहे. ती सावरण्याच्या पलीकडे गेलेली आहे. ती वाताहात सांगता येत नसल्यामुळे अनेक इश्यूज अत्यंत भडकपणे मांडले जात आहेत. एका शेतकर्‍याने केजरीवालांच्यादेखत फास लावून घेतला. एका निर्भयाने नरकयातना सोसल्या. एक दाभोळकर मरताना सहज मेले पण मेल्यावर जबाबदारी नव्या सरकारवर टाकण्यात आली.

हे सगळेच विषय जितके हृदयद्रावक आणि संवेदनशील आहेत तितकेच त्यांचे भांडवल करण्याचे प्रमाणही अचानक वाढलेले आहे कारण तसे करण्याव्यतिरिक्त खरोखरच हातात काहीही राहिलेले नाही.

जनमत असे नकारात्मक प्रचारातून तयार करता येत नाही हे 'पक्के बिझिनेसमन' असलेल्या मोदींना माहीत सल्यामुळे ते सावकाश आणि राजकीयदृष्ट्या मुत्सद्दी प्रतिक्रिया देतात. भले खालचे काहीही बोलोत. भले विरोधक काहीही बोलोत.

देशात कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरी आपल्याला प्रत्यक्षात काहीच फरक पडत नाही हे सामान्य माणसाला समजण्याआधीच असा भडिमार केला जात आहे की भाजप सरकार आले म्हणजे प्रचंड अपेक्षाभंगास तयार व्हा.

हे एक हत्यार आहे जे विरोधकांच्या दुर्दैवाने त्यांच्याकडे असलेले एकमेव हत्यार आहे. विशेष लक्ष देण्याची गरज नाही. आजवर माणसे मेली नाहीत असे नाही. आज मेलेला माणूस कमी महत्त्वाचा किंवा मरण्याच्या पात्रतेचा होता असेही नाही. फक्त 'कोणत्या बाबीकडे कसे बघावे' हे दाखवण्यासाठी जी अहमअहमिका लागलेली आहे ती दोन्ही बाजूंचा बुरखा फाडणारीच आहे.

बाळाजीपंतांनी जी पोस्ट कॉपी पेस्ट केली त्यातील 'मोदी आजही इतरत्र जाऊन आपली प्रतिमा सुधारू पाहत आहेत जेणेकरून भारताकडे अधिक गुंतवणूक वळेल' वगैरे अर्थाच्या वाक्याशी मी तरी सहमत आहे. हे आजवरच्या कोणत्याही सरकारने इतक्या ठळकपणे केलेले नाही. इतक्या ठळकपणे तर नाहीच की त्याची विरोधकांकडून थट्टा सुरू व्हावी.

व्हॉट्स अ‍ॅपवर खूप मेसेजेस येत आहेत. असे मेसेजेस येथे देऊ नयेत हे बरोबर आहेच. पण येथे जे लिहिले जात आहे ते व्हॉट्स अ‍ॅपवर येणार्‍या मेसेजेसच्या तुलनेत अजिबात कमी नाही आहे, फक्त ते विरुद्ध बाजूने आहे.

इथे जेव्हा असे विरुद्ध बाजूने लिहिले जाते तेव्हा वर दिसलेले बरेच तथाकथित न्याय्य बोलणारे आय डी प्रत्यक्ष मैदानात उतरलेले दिसत नाहीत हा मजेशीर प्रकार आहे.

आपण सगळे मोदी आणि मोदीविरोध ह्यातून गेल्या दोन वर्षांत बाहेर पडू शकलो नाही ह्यातून सत्तेसाठी हपापण्याची वृत्ती प्रकर्षाने समोर येते.

मला काय म्हणायचं आहे ते मी स्पष्ट लिहिलं आहे.. त्या वाक्याचा अर्थ कुठल्याही अँगलमधून तुम्ही काढलाय तसा होत नाही..

>>

चुकलं, माझ चुकल बर. सोर्री. तुम्ही म्हणालात की केंद्राचा संबंध आहे म्हणून विचारात पडलो. ह्या हत्या होताहेत आणि त्यात केंद्रात कम्युनल सरकार आहे म्हणून जास्ती होत आहेत अश्या विचाराने ह्या सगळ्या मंडळींनी राजीनामे दिलेत न ... म्हणून गैरसमज झाला माझा आणि मी तसे लिहिले.

सोर्री बर्का.

अल्ले चोला, वातलत मानुश. सगल्या लोकात बान्दने लावुन दिली आनी आता म्हन्तो शान्त बशा. ऑ!

रश्मी Proud

खरे तर हा धागा शांततेच्या आवाहनाच्या विचारातूनच निघालेला.
मी न्यूज हंट या मोबाईल अ‍ॅपवर न्यूज वाचून त्यातील निवडक व्हॉटसपग्रूपवर शेअर करतो.
त्यादिवशी बहुतांश न्यूज अश्याच होत्या, ते बघून व्यथित कम बोर झालो, आणि हे देशभरात काय चालूय म्हणून वैताग प्रकट केला.
पण ग्रूप मेंबर मात्र कट्टर विरुद्ध सेक्युलर असे दोन ग्रूप बनवून भांडायला लागले.
म्हणून मला वाटले की अश्या निव्वळ न्यूज शेअर झाल्या तर लोकं भांडणारच, सोबत आपले विचार मांडत शांततेचे आवाहनही केले पाहिजे, आणि बस्स म्हणून हा धागा लिहायला घेतला.

नव्हता केला.. कारण आधीच दोन ग्रूपवर नुसत्या बातम्यांनी वादावादी सुरू झालेली .. एकाच्या अ‍ॅडमिनने मला पर्सनलला येऊन विनंती केली की अमुक तमुक मेंबर धड नाहीयेत, उगाच निमित्त मिळून सुरू होतील ..

पगारे आणि त्यांच्या मित्रमंडळींसाठी खुशखबर; उगाच लपुन-छपुन जागता पहारा देण्याऐवजी सरकारला डायरेक्ट जाब विचारण्याची सोय... त्वरा करा, हि सुवर्णसंधी सोडु नका (आणि इथे फालतु धागे काढुन आम्हाला पकवु नका)... Proud Light 1

^O^

ऋन्मेश शांततेचे आवाहन कुणाला करावे हे समजून घे ज्यांची वृत्तीच सर्वत्र गोंधळ माजवून समाजात दुही माजवण्याची असेल अश्या लोकांना शांततेचे आवाहन करणे उपयोगाचे ठरत नाही. हे काहींच्या प्रतिसादावरून तुला कळून चुकले असेल अशी आशा आहे.

>>पहार्याची सख्त गरज आहे सध्या..<<

पण पगारे, तुम्ही पहारा चुकिच्या ठिकाणी देत आहात. आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी - यातला प्रकार... Happy

काल परवा तस्लिमा नसरीनची काही विधाने टीव्हीवर दाखवित होते, काय होती ती?
>>

असले प्रश्न विचारायचे नसतात! त्या बाई तमाम सेक्युलर लोकांना दुटप्पी म्हणतात … ह्याला काही अर्थ?

ओह, सापडले...... हे ते, पण लिन्क नै मिळते... आय अ‍ॅग्री वुईथ तस्लिमा नसरीन
>>>>> अनिरुद्ध_वैद्य | 19 October, 2015 - 15:15 नवीन
फारच प्रक्टिकल बोलतात बाई …

http://timesofindia.indiatimes.com/india/Indian-writers-guilty-of-double...

http://timesofindia.indiatimes.com/india/Indian-writers-guilty-of-double...

Most secular people are pro-Muslims and anti-Hindu. They protest against the acts of Hindu fundamentalists and defend the heinous acts of Muslim fundamentalists.

माझी इथली तिसरी पिढी असली तरी मूळची बिहारची आहे. दादरीचा बिहार निवडणुकीशी संबंध आहे. पण भागवतकाकांमुळ भाजओअजप निवडनुक हरली.

दिल्लीतील केरळ हाऊसमध्ये गोमांस दिल्याच्या कथित घटनेने आता राजकीय वादाचे वळण घेतले असून केरळ हाऊसच्या मेनूमध्ये म्हशीच्या मांसाचा वापर केलेल्या पदार्थाचा आज समावेश होता. दरम्यान, गोमांस दिले जात असल्याची खोटी तक्रार करणारा हिंदू सेनाप्रमुख विष्णू गुप्ता आला आज दिल्ली पोलिसांनी अटक केली. दरम्यान छापा टाकला ही चूक असल्याचे केंद्र सरकारने मान्य न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा केरळ सरकारने बुधवारी दिला

बाकि या सरकार ने सगळ्यावर बन्दी आणली आणि डांन्संबारं चालू केला. हे काहू नाका ते नको, हे बोलु नका ते नको,उइथ बसू नका, तिथे नको, इथे चालू नका, तिथे पळू नका, हे लिहू नका, ते वाचू नका. शाळेत हे नको, ते नको, इतिहास मधे हे नको ते नको. कपडा हे कनो ते नको.

पण डान्सबार चालू. अशानं सौंस्क्रुतीला धक्का नाही लागत का ? त्या रक्शकांच्या बायका काय म्हणत असतील ?

pege.jpg

वलच्या पोस्टमुळ कुनाच्या धार्मिक भावन दुखावल्या तर त्याचा केण्द्र सरकाशी सम्बंध नाही. तो लाज्य सलकालचा विशय आहे.

फटाके वाजवन्याच्या अर्जावर न्यायालयने सरकारला नोटिस काढलि तेव्हां सरकारने बंदी घालायला नकार दिला. लोकांच्या भावना लक्शात घेऊन सरकार अशी बंदी घालणार नाही अस सरकारनम कोर्टाल ठनकावुन सांगितलं. त्यामुळ कोर्टान हा सरकारचा विशय असल्यानं बंदी घालायला नकार दिला. हे कसं झालं ?
आजच्या सकाळ पेप्रात बातमी आहे.

अगर आपने बिहार में बीजेपी को नहीं जिताया तो मालदीव भारत पर अटैक कर देगा- अमित शाह का अगला संभावित बयान

Pages