दादरी हत्या प्रकरण ..
रोज चार बातम्या असतातच..
रोज काहीतरी घडतेय, रोज कोणीतरी कोणालातरी भडकवतेय, रोज कोणीतरी मुक्ताफळे उधळतेय..
या आजच्या चार बातम्या..
१) दादरी येथील घटना ताजी असतानाच उत्तरप्रदेशमधील मैनपुरी जिल्ह्यात गोहत्येच्या संशयावरून दोन तरुणांना संतप्त जमावाने बेदम मारहाण केली.
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/riot-in-ups-mainpuri-cops-...
२) दादरीसारख्या घटना घडवल्या जात आहेत. नजीकच्या काळात दंगली वा छोटेसे युद्धही घडवले जाईल. हे सगळे केंद्रातील सत्ता राखण्यासाठी चालू आहे.
- ईति राज ठाकरे
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan/raj-thack...
३) बहिणीशी नाते आणि पत्नीशी नाते यात जसा फरक असतो तसाच फरक बकर्याचे मांस आणि गाईच्या मासांत असतो
ईति - केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह
(नेमके काय म्हणायचे आहे
)
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/state-news-beef-versus-mut...
४) भारताचा धर्मांध पाकिस्तान होऊ देऊ नका
ईति - पाकिस्तानी कवयित्री फहमिदा रियाझ
..................
असो,
गोहत्या आणि बीफ खाण्यावर बंदी हे योग्य की अयोग्य याबाबत आपल्यात मतभिन्नता असेल, मात्र या मागे खेळल्या जाणार्या राजकारणापासून सर्वांनीच सावध राहा. अन्यथा तुमचा तवा तापवून त्यावर आपापली राजकीय पोळी शेकली जाईल.
मी काही स्वत:ला शांततेचा मसीहा नाही समजत, पण या पार्श्वभूमीवर शांततेचे आवाहन जरूर करू इच्छितो.
या सर्व घटनांकडे डोळसपणे आणि तटस्थ नजरेनेच बघा. चुकीच्या पद्धतीने व्यक्त होऊ नका, प्रक्षोभक प्रतिक्रिया देऊ नका, कुणाच्या प्रभावाखाली येऊ नका. जर यामागे राजकारण असलेच तर त्याला तुमच्या समंजसपणानेच निकामी होऊ द्या !
ईथेही तसेच व्यक्त व्हाल अशी आशा करतो.
__/\__
खरेतर बीफचा मुद्दा एवढा
खरेतर बीफचा मुद्दा एवढा हायलाईट करून त्यावरून पार मनुष्य मरेपर्यंत गदारोळ करायची काहीच गरज नाहीये.
हिंदू हिताचा विचार करणारे अनेक लोक बरेचवेळा लॉजिकल विचार का करत नाहीत तेच कळत नाही.
साधी गोष्ट आहे, जर प्राणी उपयुक्त असेल तर मारू नये, नसेल तर ज्यांना त्याचा उपयोग होणार असेल त्यांना द्यावा. उगाचच भावनेच्या आहारी जाण्यात काय मतलब आहे ?
शेतकरी आधीच आत्महत्या करत आहेत. जर निरूपयोगी जनावरे सांभाळावी लागली तर त्याचा अजुन अतिरिक्त खर्च होणार शेतकर्यांना.
ज्यांना त्याचा उपयोग होणार असेल त्यांना द्यावा
याचा अर्थ लगेच खाटकाला द्यावे असा नाही. काही संस्था गोपालन करत असतील त्यांना सुद्धा देता येऊ शकतील.
भारत हा जगाला बिफ पुरवण्यात
भारत हा जगाला बिफ पुरवण्यात दुसर्या क्रमांकावर आहे.स्वताच्या हाताने आर्थिक नुकसान सरकारने करू नये असे वाटते.
महेश , तुम्हाला
महेश ,
तुम्हाला अनुमोदन..
सिव्हील सर्विसेस चे क्लासेस करताना सुद्धा आमच्या सरांनी हा मुद्दा चर्चिला होता..
उपयुक्त नसलेल्या प्राण्यांचे करावे काय याबाबत बरीच मतभिन्नता होती..
जिथे स्वत:ला धड खायला नै तिथ अश्या प्राण्यांना कस पोसणार ? मग विकुन टाकणे किंवा रस्त्यावर सोडून देणे असे पाऊल लोक उचलतात.. आता कॅटल च्या संख्येबाबत भारत जगात पहिला आहे.. समजा बीफ प्रोव्हाईड करणारी इंडस्ट्री बंद झाली तर ह्या एवढ्या गुराढोरांच निभणार कसं ?
तसही इथ प्रत्येक गोष्टीला लोकांच्या धर्मभावना भडकतात.. बर जे ह्यांच्या हत्येविषयी इतका गदारोळ माजवतात ते सढळ हाताने त्यांना पोसण्यासाथी काही पाऊल उचलतानाही दिसत नाहि कधी.. याला काय म्हणाव मग ?
वरच्या पोस्टमधिल माहिती कितपत
वरच्या पोस्टमधिल माहिती कितपत खरी आहे याचा शहनिशा केला आहे का?
राहुल यादव संदर्भात http://timesofindia.indiatimes.com/city/noida/Rahul-Yadav-was-shot-by-co... ही बातमी दिसतेय. जर अखलाखच्या हत्येच्या आधीच राहुल यादव इस्पितळात होता तर त्यावेळी मारहाणीची पोलिसांमध्ये तक्रार का केली नव्हती हा एक प्रश्न तसेच जर तो दवाखान्यात मृत्युशी लढत होता (अखलाखच्या हत्येच्या आधीच) तर हत्येच्या दुसर्या दिवशी झालेल्या पोलिसांशी झटापटीत त्याला गोळी कशी काय लागली?
अखलाखच्या पाकिस्तान दौर्याबद्दल.. अखलाखच्या पासपोर्टावर १९८८ ला पाकिस्तानात गेल्याची नोंद आहे. त्यानंतर कधीही तो तिथे गेला नाही.
दादरीतील घटनांच्या प्रत्यक्ष
दादरीतील घटनांच्या प्रत्यक्ष साक्षीदार लोकांनीच सगळा घटनाक्रम सांगीतला. >> हे वाक्य आहे तिच्या पोश्टीतले. त्यामुळे शहानिशा कशी कशी गेली ये तिथेच स्पष्ट होते हेमावैम.
त्यानंतर कधीही तो तिथे गेला नाही.>> सगळे तिकडे जाऊन येतात त्यांची नोंद पासपोर्टवर असते? एतेन.
असो. चुकाच काढायच्या तर टाईम्समधल्या कमेंट बंद केलेल्या या बातमी सारख्या अवश्य काढता येतील. या पोस्टमुळे एक वेगळा अॅन्गल समजला म्हणुन इथे टाकली.
In above case all political
In above case all political parties are trying their best to polarize their core voters. But BJP will get the most advantage as other votes are divided into congress, SP, BSP, AAP bla bla. The returning of Sahitya Akadami Awards is just a farce I don't think govt or public will give any attention to these writers. In fact like most of the common people, I come to know about most of the writers when they returned their award :-).
साक्षीदार, घटनाक्रम आणि पोस्ट
साक्षीदार, घटनाक्रम आणि पोस्ट यालाच तर राजकारण म्हणतात नाही का?
अल्पनाजी, या अशा पोस्ट्सचा
अल्पनाजी, या अशा पोस्ट्सचा महापूर आता फेबु/वॉअॅ वर येतो आहे/येत राहिल.
मुळात बाळाजीपंतानी ज्या बातमीचा दुवा दिला आहे , त्याची शहानिशा न करता, अखलाजची हत्या हे हिंदूविरोधी षडयंत्र म्हणुन लोंकांचा बुद्धीभेद करण्याचे आणि समाजात अफवा पस्रवुन दुही निर्माण करंण्याचा घृणास्पद प्रकार बाळाजीपंतानी केला आहे. प्रशासकांनी तात्काळ ही पोस्ट उडवावी आणि बाळाजीपंताना तंबी द्यावी की त्यांनी अशा अफवा पसरवणार्या पोस्ट टाकु नयेत.
अर्थात ज्या देशाच्या पंतप्रधानानेच या घटनेबाबत कानावर हात ठेवलेत त्याच्या अंधभक्तांकडुन आणखी काय अपेक्षा ठेवावी?
त्यानंतर कधीही तो तिथे गेला
त्यानंतर कधीही तो तिथे गेला नाही.>> सगळे तिकडे जाऊन येतात त्यांची नोंद पासपोर्टवर असते? एतेन. >> मग तो जाऊन आला हे कशावरुन?? उद्या समजा मी एखाद्या नक्षलवादी कँपमधे जऊन प्रशिक्षण घेऊन आलो असं एखाद्या बाळ्याला वाटलं मग ते खर मानायचं काय??
दादरीतील घटनांच्या प्रत्यक्ष
दादरीतील घटनांच्या प्रत्यक्ष साक्षीदार लोकांनीच सगळा घटनाक्रम सांगीतला. >> तुम्ही नक्की वाचता ना पोस्ट? की माझी पोस्ट दिसली की उडी मारायची हे ठरलेलं आहे? हे वाक्य नाही समजलं का? मराठीतच आहे.
या पोस्टमुळे एक वेगळा अॅन्गल समजला म्हणुन इथे टाकली.>> हे वाक्यही वाचा. मराठीतच आहे.
बाकी तुमच्याशी किंवा इतरांशी वाद घालण्यात रस नाही.
प्रशासकांना वाटल्यास ते उडवायला समर्थ आहेत (पोस्ट माबोवरच असल्याने
)
दादरीतील घटनांच्या प्रत्यक्ष
दादरीतील घटनांच्या प्रत्यक्ष साक्षीदार लोकांनीच सगळा घटनाक्रम सांगीतला.>>> जर असं असेल तर ज्या वेळी त्या कोणा राहुल यादवला मारहाण केली अखलाखनी त्यावेळी त्यावेळी पोलिसात तक्रार केल्याची नोंद का नाही. दवाखान्यात मृत्युशी झंज देतोय तो असं लिहिलंय, तर मग दवाखान्यात अॅडमिट करून घेताना पण पोलिसात तक्रार नाही केली कोणी? त्या टाइम्सच्या बातमी शिवाय इतर बहूतांशी वर्तमानपत्रांमध्ये दुसर्यादिवशीची बातमी आली होती.
त्या राहुल यादवला गोळी (घटनेच्या दुसर्या दिवशी) लागली आणि तो दवाखान्यात असूनही सगळेजण फक्त अखलाखला सहानुभुती देत आहेत आणि राहुल यादवला राज्य सरकारने काहीही मदत केली नाही असं त्या गावातलेच लोक म्हणत आहेत.
असो.. तुमच्याशी अजून काहीही चर्चा करायची इच्छा नाहीये.
असो.. तुमच्याशी अजून काहीही
असो.. तुमच्याशी अजून काहीही चर्चा करायची इच्छा नाहीये. >> धन्यवाद
दादरीतील घटनांच्या प्रत्यक्ष
दादरीतील घटनांच्या प्रत्यक्ष साक्षीदार लोकांनीच सगळा घटनाक्रम सांगीतला. >>३-४ महिन्यांपूर्वी दादरी गावातीलच राहूल यादव या माणसाच्या घरातून अखलखने एक वासरू चोरलं होतं. जेव्हा त्याने वासराचा शोध चालू केला त्यावेळी त्याला अखलखच्या घराच्या मागील बाजूस वासराचे कापलेले पाय सापडले. म्हणून तो अखलखला जाब विचारंण्यासाठी गेला. त्यावेळी त्यादोघांमधे बाचाबाची झाली. अखलखचा धाकटा मुलगा दानीश याने त्यावेळी राहूल यादवला मारले. त्यामुळे राहूल यादवला इस्पीतळात दाखल करावे लागले. अजुनही तो इस्पीतळातच मृत्युशी झुंज देत आहे.
राहूल यादव बरोबर झालेली घटना जेव्हा पूर्ण गावात पसरली त्यावेळी लोक रागावले आणि अखलखला यासगळ्याचा जाब विचारायला गेले. त्यासगळ्या जमावाच्या मारहाणीत अखलख मृत्यु पावला.
>> राहुल यादवला झालेल्या मारहाणीची पोलीस कंप्लेंट वगैरे असेलच ना?? आणि 'पाक' मधुन आल्यावर तो मशिदीत सभा घेत असे असं त्याच द्दुव्यातील बातमीत म्हटलंय. त्यात 'प्रक्षोभक' भाशण'
वगैरे काही म्हटलंय का?? तुम्ही त्या दुव्यातील बातमी नीट वाचली नाहिये आणि 'मायबोली'वर डकवताय.
आणि बातम्यांची लिंक द्यावी
आणि बातम्यांची लिंक द्यावी असे माबो प्रशासनीचे धोरण आहे असे तुम्हीच ईतरांना सांगता, मग आता लिंक सोडुन बातमी का टायपलीत पंत?? आपुलकी म्हणावी का जहर??
विठ्ठल, ती पोस्ट आहे
विठ्ठल, ती पोस्ट आहे मैत्रिणीने लिहीलेली. बातमी नव्हे. बातमीची फक्त लिंक आहे. वाचत चला हो जरा. अवघडे.
बाकी तुमच्याशी हेमाशेपो.
समाजात दुही पसरविण्याच्या
समाजात दुही पसरविण्याच्या लबाड उद्देशाने टाकलेल्या पोस्टींचा जाहिर निषेध.
वासरु तीन महिन्यापुर्वी हरवले होते तर त्याची एफ आय आर ला नोंद आहे का ? वासराचा पाय मिळाला तेंव्हा त्याचा इन्सिडेन्स रिपोर्ट आहे का ?
पासपोर्टवर नोंद नसताना तो अनेकदा पाकिस्तानात गेला हे कसे समजले म्हणे ?
प्रत्यक्षदर्शीनी हे नेमके कुणाला सांगितले म्हणे ? बाळ्याला ? तेही मराठीत का ?
पन्त एक शन्का आहे. अखलाखचा
पन्त एक शन्का आहे. अखलाखचा मोठा मुलगा हवाई दलात ( एअरफोर्स) मध्ये काम करतो. देशाची तिन्ही दले किती महत्वपूर्ण आहेत हे सान्गायला नको. आणी सर्वात अतीशय महत्वाचे ( माझ्या दृष्टीने जास्तच महत्वाचे) म्हणजे गोव्याचे भूतपूर्व चीफ मिनीस्टर श्री मनोहर पर्रीकर हे आता सन्रक्षण मन्त्री आहेत. जे अतीशय प्रामाणीक आणी कडक मानले जातात. त्यानी नारायण राणे सारख्या माणसाला पण नाही जुमानले हे तुम्हाला माहीत असेलच. मग त्यान्च्या कानावर अशा गोष्टी जाणार नाहीत का की अखलाख हा आय एस आय शी सम्पर्क साधुन आहे. बघा नीट विचार करा. ही पोस्ट तुमच्या मैत्रिणीला फिरत फिरत आली असणार. मी फेसबुक वा वॉट्स अप वापरत नाही त्यामुळे मला काही माहीत नाही. पण जे वाटले ते लिहीले.
रश्मीशी सहमत. वॉअॅ मध्ये
रश्मीशी सहमत. वॉअॅ मध्ये आले म्हणुन आपण ते पुढे ढकलु नये. आधी शहानिशा करावी. आज सर्वात जास्त वाट लावताहेत ते फेबु आनि वॉअॅ वर आलेले असले ढकले संदेश, ज्यांची काहीही शहानिशा न करता लोक अॅक्शन घेतात.
बाकी हार्दिक पटेल काय करतोय सध्या???? अखलख प्रकरण सुरू झाल्यावर त्याचा प्राईम टाईम संपला काय?
मुळात बाळाजीपंतानी ज्या
मुळात बाळाजीपंतानी ज्या बातमीचा दुवा दिला आहे , त्याची शहानिशा न करता, अखलाजची हत्या हे हिंदूविरोधी षडयंत्र म्हणुन लोंकांचा बुद्धीभेद करण्याचे आणि समाजात अफवा पस्रवुन दुही निर्माण करंण्याचा घृणास्पद प्रकार बाळाजीपंतानी केला आहे. प्रशासकांनी तात्काळ ही पोस्ट उडवावी आणि बाळाजीपंताना तंबी द्यावी की त्यांनी अशा अफवा पसरवणार्या पोस्ट टाकु नयेत.
>>
मलातरी पोष्टीचा उद्देश्य सेक्युलर आणि समाजवादी साहित्यिक घेत असलेल्या 'सिलेक्टिव आउटरेज' ह्या मुद्यावर लक्ष वेधणे हा आहे असे वाटते. अर्थात त्या पोष्टीत अखलखबाबत काही चुकीच्या गोष्टी सांगितल्यात हे दिसून येत आहे. पंतांना माहिती मिळाली, ती त्यांनी इथे टाकली, आणि टाकतांना हेही लिहिले की ह्यात चुकीचे असेल तर प्रशासकांनी काढून टाकावी.
पण त्यावरून अफवा पसरवणे, दुही माजवणे आदी आरोप करणे म्हणजे कळस झालाय.
त्यात तुमचे आणि मोगा या आयडीचे ह्या आयडीस बाळ्या वगैरे संबोधणे, तुमचे काही भांडण आहे का?
रश्मीशी सहमत.
रश्मीशी सहमत.
वैद्यसाहेब, तुम्ही माबोवर
वैद्यसाहेब, तुम्ही माबोवर नविन आहात काय? हे दोन्ही आयडी पुनरपी मरणं पुनरापी जननं या कॅटेगरीतले आहेत. प्रशासक आज मारतात आणि दोन तासात हे परत उगवतत. मोगांना भरपुर अनुभव आहे यात, बाळाजीपंत त्यामानाने काळजी घेतात स्वतःची.
साधनाताई, हो. दीडच वर्ष
साधनाताई,
हो. दीडच वर्ष झाले.
बाळाजीपंत,
त्या पोस्टीचा काही भाग नक्कीच वादग्रस्त आहे. राहुल यादव पोलिसांची गोळी लागून जखमी झाला अस पेपरात छापून आलाय. त्यामुळे जमावाचा हल्ला करण्याचा जोकाही कार्यकारण भाव दिलाय तो चुकीचा वाटतो. पण सिलेक्टीव्ह आउटरेज ह्या मुद्द्यावर मी सहमत आहे.
आपण वादग्रस्त भाग संपादित करावा.
अनिरुद्ध, आपल्या विनंतीवरुन
अनिरुद्ध, आपल्या विनंतीवरुन काही भाग संपादित केला आहे.
वादग्रस्त लिऊन मग स्म्पादित
वादग्रस्त लिऊन मग स्म्पादित करणे हा बालूचा जुना छंद आहे.
बाळाजीपंत यांनी उद्धृत
बाळाजीपंत यांनी उद्धृत केलेल्या पोस्टीतील चुका किंवा खरे तर वस्तुस्थितीचा जाणून बुजून केलेला विपर्यास इतर अनेकांनी दाखवून दिला आहेच, मी पुनरुक्ती टाळेन. (देवळातून लाऊड स्पीकर वर जाहीर केले हेही खोटे? )
पण त्या मजकूरातील एक कांगावाखोर सूर म्हणजे ह्या घटनेला हिंदु वि मुस्लीम असे घाऊक स्वरूप देण्याचा प्रयत्न.
उदा > हिंदूंचे जिथे चुकले तिथे चुकले हे म्हणण्यास मला कमीपणा वाटत नाही.
हिंदुंचे चुकले असे कोणीही म्हणत नाहिये, तो जमाव हिंदुंचे प्रतिनिधित्व करत नव्हता. त्या जमावाने केलेल्या कृत्याचा निषेध म्हणजे हिंदुंचा निषेध नव्हे. त्याचा निषेध करून पुरस्कार परत करणारे बहुसंख्य लोक हिंदुच आहेत.
( आता ते खरे हिंदु नव्हेत, आम्हीच काय ते ट्रेड मार्क धारक हिंदु असा लेखिकेचा दावा असेल तर प्रश्न मिटला).
त्यांनी पुरस्कार परत करावेत का यावर मतभेद असतील, पण त्या जमावाच्या कृत्याचा निषेध करणारे हिंदु विरोधी हा ओरडा हास्यास्पद आहे.
बिचारे नमो छान छान डिझायनर कपडे घालून देशोदेशी फिरून भारताची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न करत आहेत तर एकदोन किरकोळ हत्या झाल्या तर गजहब का ? असाच सूर दिसतो.
दादरी घटनेशी केंद्र सरकारचा संबंध नाही हा नमोंचा युक्तीवादही कातडी बचावू आहे. टेक्निकली कायदा सुव्यवस्था राज्याचा विषय आहे हे खरे पण राज्यांमध्ये होणार्या सर्व खुनांवर पंप्र नी भाष्य करावे असे कुणी अपेक्शा करत नाही. बीफ सारख्या भाजापाला प्रिय वेज इस्शू ( Wedge Issue) वर झालेली ही हिंसक घतना होती आणी हे चूक आहे असे आपल्या अनुयायांना ठणकावून सांगणे अपेक्षित होते. साध्वे प्राची, गिरिराज सिंंग यांनाही शिम्गावर न घेउ शकणारे नवाझ शरीफ शी काय भाम्डणार ?
संपादीत केलेय हे फार चांगले
संपादीत केलेय हे फार चांगले केलेत पंत. धन्यवाद.
त्यात तुमचे आणि मोगा या आयडीचे ह्या आयडीस बाळ्या वगैरे संबोधणे, तुमचे काही भांडण आहे का? >> वैद्य, मी बाळाजीपंताना 'बाळ्या' असे म्हटलेले नाही. आणि भांडण असले तरच बाळ्या वगैरे संबोधायचे का?? मंदार-जोशींनी काढलेल्या 'गप्पागोष्टी' धाग्यावर बरेच जण पंतांना 'बाळ्या' म्हणतांत ते काय भांडण आहे म्हणुन कां?
देशातल्या प्रत्येक घटनेस
देशातल्या प्रत्येक घटनेस धर्माचा दाखला देऊन मोदी सरकार सत्तेत आल्यापासून अल्पसंख्यांक लोकांवर कसे संघटीत हल्ले केले जात आहे हे ओरडणारे लोक ह्यांचा विरोधातला सूर म्हणजे घटनेला हिंदु वि मुस्लीम असे घाऊक स्वरूप देण्याचा प्रयत्न असे का वाटते?
गेल्यावर्षी काही चोरांनी चर्चमध्ये चोऱ्या केल्या तेव्हाही हाच रंग देऊन मोदींच्या काळात असे हल्ले वाढून ते कसे कम्युनल आहेत हे दाखवण्याचा प्रचंड प्रयत्न झाला. त्यानंतर जेव्हा चोरीचे प्रयत्न होते हे सिद्ध झाले तेव्हा एकाही धुरीणाने येउन आधीच्या वक्तव्याबद्दल काही दिलगिरी व्यक्त केली नाही.
ज्या दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी किंवा अखलख ह्यांच्या हत्या झाल्या त्यातल्या तीनतर भाजपेतर राज्यात झाल्यात. तेव्हा त्या सरकारांबाबत एकही अवाक्षर न काढता सरळ मोदींच्या कालकिर्दीत सामाजिक सलोखा संपुष्टात येत आहे असे म्हणत पुरस्कार परत करणे ह्यामुळे देशाची बदनामी तर होतेच शिवाय ज्याच्यावर हल्ला होतो तो बळी ठरून धर्माचा आधार घेतला गेल्यावर आपोआपच हल्लेकरी लोकांचा धर्म म्हणजे हिंदू धर्म आरोपी ठरतो.
तेव्हा घाउक प्रयत्न अथवा कांगावखोर सूर लेखिकेचा नाही तर तसले आरोप करत गोंधळ घालणाऱ्या लोकांचा आहे असे वाटते.
तेव्हा घाउक प्रयत्न अथवा
तेव्हा घाउक प्रयत्न अथवा कांगावखोर सूर लेखिकेचा नाही >> कांगावाखोर सूर नसता तर लेखिकेनं फक्त अखलख, गोध्रामधली बोगी आणि रझा अकादमीचाच फक्त उल्लेख केला नसता.. तिथेही सिलेक्टिव्ह आउटरेजच आहे.. ते शेवटचं 'मी हिंदूत्ववादी नाही' वगैरे वाक्य कांगावा दिसू नये यासाठी टाकली आहेत.. आणि हे सगळं करताना नमोंची तरफदारीही केलेलीच आहे.. केंद्र सरकारचा यात काय संबंध असं बरेच जण विचारतायत.. जेव्हा केंद्रीय सांस्कृतिक मंत्री उघड उघड असल्या घटनेचं समर्थन करतो तेव्हा केंद्र सरकारचा संबंध नक्कीच येतो. केंद्र सरकार असल्या गोष्टींना थारा देत नाही हे जर दाखवून द्यायचे असेल तर त्यांनी शर्मांविरूध्द कारवाई करून दाखवावी...
मनीष, कांगावाखोर सूर नसता तर
मनीष,
कांगावाखोर सूर नसता तर लेखिकेनं फक्त अखलख, गोध्रामधली बोगी आणि रझा अकादमीचाच फक्त उल्लेख केला नसता.. तिथेही सिलेक्टिव्ह आउटरेजच आहे
>>
हे कांगावा करण असत होय? अहो ही कुंपणावरच्या पण हिंदुत्ववादी कट्टर होऊ घातलेल्या लोकांची वाक्ये आहेत.
केंद्र सरकारचा यात काय संबंध असं बरेच जण विचारतायत.. जेव्हा केंद्रीय सांस्कृतिक मंत्री उघड उघड असल्या घटनेचं समर्थन करतो तेव्हा केंद्र सरकारचा संबंध नक्कीच येतो.
>>
तुम्हाला अस म्हणायचं आहे का की केंद्रातील भाजपच्या सांस्कृतिक मंत्र्याच्या आदेशाहुन ही हत्या झाली? हा तसे असते तर केंद्राचा संबंध हत्येशी असेल हे मीपण मानतो.
पण तसे नसेल तर केंद्राशी हत्येचा संबंध कसा हे कोण्या मंत्र्याच्या वक्तव्याहून ठरवणे आत्यंतिक होईल. अर्थात भाजपचे मुखदुर्बळ मंत्री सरकारला गोत्यात आणतील हे भविश्य होतेच
कलबुर्गी, अखलख ह्यांच्या हत्या कोन्ग्रेस आणि समाजवादी पक्ष ह्यांचा सरकारात झाल्या. त्यांना न धोपटता सरळ मोदींच्या कारकिर्दीत हे हल्ले झाले म्हणून अल्पसंख्यांक आणि कथित विचारवंत भीतीमध्ये जगत आहेत अशी उगाच बागुलबुवी प्रतिमा उभी करून तिला धोपटण ह्याला मी तरी कांगावेखोरपणाच म्हणेल.
असो.
तुम्हाला अस म्हणायचं आहे का
तुम्हाला अस म्हणायचं आहे का की केंद्रातील भाजपच्या सांस्कृतिक मंत्र्याच्या आदेशाहुन ही हत्या झाली? >> मला काय म्हणायचं आहे ते मी स्पष्ट लिहिलं आहे.. त्या वाक्याचा अर्थ कुठल्याही अँगलमधून तुम्ही काढलाय तसा होत नाही..
Pages