दादरी हत्या प्रकरण ..
रोज चार बातम्या असतातच..
रोज काहीतरी घडतेय, रोज कोणीतरी कोणालातरी भडकवतेय, रोज कोणीतरी मुक्ताफळे उधळतेय..
या आजच्या चार बातम्या..
१) दादरी येथील घटना ताजी असतानाच उत्तरप्रदेशमधील मैनपुरी जिल्ह्यात गोहत्येच्या संशयावरून दोन तरुणांना संतप्त जमावाने बेदम मारहाण केली.
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/riot-in-ups-mainpuri-cops-...
२) दादरीसारख्या घटना घडवल्या जात आहेत. नजीकच्या काळात दंगली वा छोटेसे युद्धही घडवले जाईल. हे सगळे केंद्रातील सत्ता राखण्यासाठी चालू आहे.
- ईति राज ठाकरे
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan/raj-thack...
३) बहिणीशी नाते आणि पत्नीशी नाते यात जसा फरक असतो तसाच फरक बकर्याचे मांस आणि गाईच्या मासांत असतो
ईति - केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह
(नेमके काय म्हणायचे आहे
)
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/state-news-beef-versus-mut...
४) भारताचा धर्मांध पाकिस्तान होऊ देऊ नका
ईति - पाकिस्तानी कवयित्री फहमिदा रियाझ
..................
असो,
गोहत्या आणि बीफ खाण्यावर बंदी हे योग्य की अयोग्य याबाबत आपल्यात मतभिन्नता असेल, मात्र या मागे खेळल्या जाणार्या राजकारणापासून सर्वांनीच सावध राहा. अन्यथा तुमचा तवा तापवून त्यावर आपापली राजकीय पोळी शेकली जाईल.
मी काही स्वत:ला शांततेचा मसीहा नाही समजत, पण या पार्श्वभूमीवर शांततेचे आवाहन जरूर करू इच्छितो.
या सर्व घटनांकडे डोळसपणे आणि तटस्थ नजरेनेच बघा. चुकीच्या पद्धतीने व्यक्त होऊ नका, प्रक्षोभक प्रतिक्रिया देऊ नका, कुणाच्या प्रभावाखाली येऊ नका. जर यामागे राजकारण असलेच तर त्याला तुमच्या समंजसपणानेच निकामी होऊ द्या !
ईथेही तसेच व्यक्त व्हाल अशी आशा करतो.
__/\__
<<गोहत्या आणि बीफ खाण्यावर
<<गोहत्या आणि बीफ खाण्यावर बंदी हे योग्य की अयोग्य याबाबत आपल्यात मतभिन्नता असेल, मात्र या मागे खेळल्या जाणार्या राजकारणापासून सर्वांनीच सावध राहा. अन्यथा तुमचा तवा तापवून त्यावर आपापली राजकीय पोळी शेकली जाईल.>>
------ अगदी सहमत...
एक विश्वास होता त्या दिलेल्या आश्वासनात. आज ? 
लोकान्नीच हा विषय सम्पवायला हवा... लोकान्ना ईच्छा नसेल तर विषयातली हवा निघुन जाईल. सर्वान्गिण विकासावर लक्ष द्या म्हणा.
मला हवाय "सबका साथ, सबका विकास.... "
एका जनावरापायी माणसांच्या
एका जनावरापायी माणसांच्या हत्या हे विचित्र आहे.राज ठाकरेचे वक्तव्य योग्य वाटतेय.
>>>या सर्व घटनांकडे डोळसपणे
>>>या सर्व घटनांकडे डोळसपणे आणि तटस्थ नजरेनेच बघा. चुकीच्या पद्धतीने व्यक्त होऊ नका, प्रक्षोभक प्रतिक्रिया देऊ नका, कुणाच्या प्रभावाखाली येऊ नका<<< +१
>>>>गोहत्या आणि बीफ खाण्यावर
>>>>गोहत्या आणि बीफ खाण्यावर बंदी हे योग्य की अयोग्य याबाबत आपल्यात मतभिन्नता असेल, मात्र या मागे खेळल्या जाणार्या राजकारणापासून सर्वांनीच सावध राहा.<<<<
संपूर्ण सहमत. सगळेच झालेल्या दुर्दैवी घटनेतून पोळी शेकुन घेतायत.
>>>>हे सगळे केंद्रातील सत्ता राखण्यासाठी चालू आहे.<<<<
हे मात्र कसे? असे नाही केले तर सरकार कसे काय पडेल, आणि केले तर कसे काय टिकुन राहील, काही कळाले नाही.
>>>>>लोकान्नीच हा विषय सम्पवायला हवा... लोकान्ना ईच्छा नसेल तर विषयातली हवा निघुन जाईल.<<<<<<
एकदम सहमत. याला धार्मिक वळण द्यायचा प्रयत्न हाणुन पाडणे लोकांच्याच हातात आहे.
४) भारताचा धर्मांध पाकिस्तान
४) भारताचा धर्मांध पाकिस्तान होऊ देऊ नका
ईति - पाकिस्तानी कवयित्री फहमिदा रियाझ
..................
अनेक +११११११११११११११११११११११११
<<या सर्व घटनांकडे डोळसपणे
<<या सर्व घटनांकडे डोळसपणे आणि तटस्थ नजरेनेच बघा. चुकीच्या पद्धतीने व्यक्त होऊ नका, प्रक्षोभक प्रतिक्रिया देऊ नका, कुणाच्या प्रभावाखाली येऊ नका. जर यामागे राजकारण असलेच तर त्याला तुमच्या समंजसपणानेच निकामी होऊ द्या !>>
संपूर्ण सहमत.
ऋन्मेऽऽष, संपूर्ण
ऋन्मेऽऽष,
संपूर्ण सहमत.
फेसबुक्,वॉट्सऐप वर पण टाक.
सहमत! अन्यथा तुमचा तवा तापवून
सहमत!
अन्यथा तुमचा तवा तापवून त्यावर आपापली राजकीय पोळी शेकली जाईल.
<<
राज्यसरकार व स्थानिक पोलिसांनी दिलेला आदेश धुडकावुन, तापलेल्या तव्यावर स्वत:च्या पक्षाची, राजकीय पोळी शेकण्याच्या उद्देश्याने पोहचलेले काही पक्षाचे प्रमुख नेते.
श्री. राहुल गांधी- कॉंग्रेज उपाध्यक्ष
श्री. असादुद्दीन ओवैसी- एआयएमआयएमचे पक्षप्रमुख
श्री. अरविंद केजरीवल- आम आदमी पार्टी संयोजक, संस्थापक. यांच्या बद्दल तर काय म्हणावे, ह्यांनी तर या तापलेल्या तव्यावर स्वत:च्या पक्षाची, राजकीय पोळी शेकण्यासाठी दादरी घटनेवर एक जाहीरात देखिल बनविली आहे.
ईथे मायबोलिपासून सुरवात करा.
ईथे मायबोलिपासून सुरवात करा. इथेच कित्येक धाग्यानवर राजकारण या विषयावर शाब्दिक अणुयुद्ध सुरु असते. चर्चा करा,दोष दाखवा, मार्ग सुचवा पण आपला तो बाब्या म्हणत थेट अणू युद्ध कशाला? बाब्या कोणाचाहि असला तरी तो फटका मारताना भेदभाव करत नाही, मग तुम्ही भेदभाव करून काय फायदा?
अच्छे दिन च्या जाहीराती
अच्छे दिन च्या जाहीराती पेक्षा ही अकेंची जाहीरात खुप चांगली आहे.
काल आमच्या कॉलेजच्या व्हॉ अॅ
काल आमच्या कॉलेजच्या व्हॉ अॅ ग्रूपवर काही कट्टर बीफ बॅनचा उदो उदो आणि त्या संदर्भात झालेल्या हत्यांचे समर्थन करत होते.
त्यामुळे एका मुस्लिम मुलाने 'हवं तर गायी राहू दे पण बैल आणि म्हशींचे मांस खाण्यात तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ' असे विचारले.
लगेच त्याला टाँटस सुरू झाले. भारताच्या काँस्टिट्यूशनमध्ये म्हणे बीफ बॅन आहे. (असं काही नाहीये ते सोडा)
नवर्याने अगदी ऋन्मेष सारखाच मेसेज टाकला होता-
dont come under influence of this devide and rule policy.
respect human life first ,then constitution ,then religion'
आणि तो विषय संपवला.
कॉलेजात असताना गळ्यात गळा घालून फिरलेले, एका डब्यात जेवलेले मित्र जर आज कुणी काय खावे या मुद्द्यावर भांडून एकमेकांशी पंगे घेत आहेत तर ज्यांनी पिढ्यानपिढ्या वैरभाव बाळगलाय ते काय करत असतील आणि करू शकतील!
प्रसाद, खूप छान आहे ती
प्रसाद, खूप छान आहे ती जाहिरात!
इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
अशाच जाहिराती आणि असेच विचार सर्वत्र पोहोचले पाहिजेत.
केजरीवालांचा ऑडिओ चांगला
केजरीवालांचा ऑडिओ चांगला वाटला. सौम्य आणि मध्यमवर्गीय वापरतात तश्या टोनमधून साधलेला संवाद असल्यामुळे आपलासा वाटला. त्यातून ते स्वतःच्या पक्षाची जाहिरात करत असले तरी करूदेत, पण निदान संदेश चांगला देत आहेत. देशातील बेअक्कल नागरिकांना तो संदेश रुचणार नाही हे दुर्दैव! गाय मरो, डुक्कर मरो, मुसलमान मरो नाहीतर हिंदू मरो, आमचा पक्ष सत्तेत आल्याशी कारण!
धन्यवाद सातीजी. फक्त त्या
धन्यवाद सातीजी.
फक्त त्या जाहीरातीत केजरिवालांनी जे फायद्या तोट्याचे गणित मांडलेय ते न मांडता, ती जाहिरात केली असती तर आणखी छान झाले असते.
प्रसाद, दादरीमध्ये जाऊन आ वं
प्रसाद,
दादरीमध्ये जाऊन आ वं पंप्र त्या मुस्लिम कुटुंबाच्या बाजूने उभे राहिले असते आणि स्वतःची राजकीय पोळी शेकून घेतली असती तरी आम्हाला आवडलं असतं.
अरे हो, असल्या छोट्या-मोठ्या घटनांची दखल घेण्याची अपेक्षा पंप्रंकडून करणं योग्य नाही. गजेंद्रसिंगचा अपघाती मृत्यू ही एक आणीबाणीची घटना असल्याने खूप तातडीने दखल घेतली होती त्यांनी.
ती जाहिरात मीसुद्धा ऐकली नव्हती. धन्यवाद प्रसाद.
आपची ती जाहिरात चांगलीच
आपची ती जाहिरात चांगलीच आहे.
भलेही त्यात आपचा फायदा असेलही, त्यात कसलाही भडकावुपणा नाही, की कुठली एक बाजु घेण्याचा / अथवा कुठली बाजु कमी जास्त करण्याचा प्रयत्नही नाही.
त्यात केलेले आव्हान, विचार करण्यास लावते.
प्रसाद जाहिरात दिल्याबद्ल
प्रसाद जाहिरात दिल्याबद्ल धन्यवाद
अगदी या प्रकारचं भाषण
अगदी या प्रकारचं भाषण आपल्याला पंतप्रधानांकडून आणि ते ही पंप्र कधी बोलणार, कधी बोलणार याची जनतेकडून विचारणा होण्याअगोदर अपेक्षित होतं.
तर ते काय बोलले 'एकमेकांशी नव्हे गरिबीशी लढा'
अरे इथे गरिबी काय नी कसलं काय!
मुस्लिमांना जगायचं तर ओवैसी, आयसिस अश्याच लोकांच्या नादाला लागले पाहिजे असा विचार देण्याचे महान काम आज भारतात होत आहे
>>>>अगदी या प्रकारचं भाषण
>>>>अगदी या प्रकारचं भाषण आपल्याला पंतप्रधानांकडून आणि ते ही पंप्र कधी बोलणार, कधी बोलणार याची जनतेकडून विचारणा होण्याअगोदर अपेक्षित होतं.<<<<<
+१.
.दादरी घटना झाली/केली, ती
.दादरी घटना झाली/केली, ती सर्वथा चुकीची,असमर्थनीय आहे.
पण त्यावेळी काश्मिरी पण्डितांचे निर्घृण कत्तल ,स्थलांतर आठवले.
ह्यावरून (बहुधा फाळणी ह्या
ह्यावरून (बहुधा फाळणी ह्या विषयावरील एका पुस्तकात) वाचलेली एक कथा आठवली. पाकिस्तानात एका सरदारजीने आपल्या घराच्या अंगणात एक बकरे 'झटका' पद्धतीने कापले, 'हलाल' पद्धतीने कापले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या पाकिस्तानी जमावाने त्याला बदडले व न्यायालयात खटला दाखल केला. न्यायालयाने त्या सरदारजीला ह्यापुढे बकरे अश्या पद्धतीने कापायचे असल्यास घराच्या आतमध्ये कापावे असा आदेश दिला. त्यानंतर तेथील नागरिक त्याला आणि त्याच्या घरच्या मंडळींना त्रास देत राहिले.
असंतुष्ट, कंटक प्रवृत्तीचे आणि कट्टरवादी सगळीकडे असतातच. वर ऋन्मेष ह्यांनी 'डोळसपणे वागा' लिहिले आहे ते त्यामुळेच पटते.
म्हणूनच त्या पाकिस्तानी बाई
म्हणूनच त्या पाकिस्तानी बाई भारताचा धर्मांध पाकिस्तान करू नका म्हणाल्या असतील.
हे मात्र कसे? असे नाही केले
हे मात्र कसे? असे नाही केले तर सरकार कसे काय पडेल, आणि केले तर कसे काय टिकुन राहील, काही कळाले नाही.
>>
हा प्रश्न आपण राज ठाकरे यांनाच विचारणे योग्य
कारण मी ते इथे एक बातमी म्हणून दिलेय की कसे आता आपल्या राजकीय पोळ्या शेकल्या जातील.
यात दोन प्रकार येतात, एक जे तेढ वाढवून पोळी शेकतात.
तर दुसरे यात होरपळलेल्यांना खोटी सहानुभूती दाखवत पोळी शेकतात.
पहिला प्रकार घातक आणि दुसरा तुलनेत सौम्य असला तरी दोघांनाही हा वणवा भडकलेला राहणेच सोयीचे असते.
पाकिस्तानी कवयित्रींचे विधान या सर्वात फार मार्मिक वाटले.
लोकशाही आहे, आपल्या जीवनावश्यक मूलभूत गरजा ओळखा आणि बहुमताने त्याचीच मागणी करा. सत्तेत येण्यासाठी वा टिकून राहण्यासाठी सरकार ते पुर्ण करणारच. पण धर्माशी निगडीत मुद्दा/मागणी प्रायोरीटीवर घेत सरकारकडे अपेक्षेने पाहिले तर त्यांचे विधान खरे होण्याकडे वाटचाल सुरू समजा.
तेच तर. अशा घटनांना प्रतिसाद
तेच तर.
अशा घटनांना प्रतिसाद देताना साधारणपणे लोक आपल्या आवडीच्या पक्षाबद्दल बचावाची भूमिका तर नावडत्या पक्षावर खापर मारता येइल का हे बघतात. आणि हेच नेमके राजकारण्यांना फावते.
लोकशाही म्हणजे प्रत्येकाने कुठल्यातरी एका पक्षाला वाहुन घेतल्यासारखे वागणे असे काहिसे समीकरण झाल्यासारखे वाटतेय.
खरय, पन्तप्रधानानी आधी यावर
खरय, पन्तप्रधानानी आधी यावर मत देऊन काहीतरी कडक भूमिका घ्यायला हवी होती. आजकाल अपेक्षाभन्गच जास्त व्हायला लागलाय. सो कॉल्ड साधु-साध्वीन्चा पण अनावश्यक सहभाग हल्लीच्या राजकारणात वाढलाय. सत्ता मिळाली की सगळे मदाने धुन्द होतात.
आजकाल लोकाना कसलीच भिती उरलेली नाहीये. प्रत्यक्ष दिसत नसले तरी एक अदृष्य शक्ती आपल्यावर नजर ठेवुन आहे, आणी तीच आपल्या पापाचा घडा भरण्याची वाट बघत आहे याची कोणाला जाणिवच उरलेली नाहीये.
bharatat secularism ahe he
bharatat secularism ahe he tar manya karyla have nidan sanvidhananusar ani hi goshta manya keli tr baki sarva goshti apoap chotya hotat he dadri prakarn ahe tasech agodr gujrat madhe godhra prakarn pn hote ani kashmir madhil panditancha mudda pn ahech jya veli he mudde sutatil tya veli baki pn sutat jatil asa vatate
भूतकाळात झालेला गुंता
भूतकाळात झालेला गुंता आपल्याला लगेच सोडवता येणार नाही.
पण म्हणून, मागे बसलेल्या गाठी सुटल्या तरच आजची गाठ सुटेल, आणी जो पर्यंत मागच्या गाठी सुटत नाहीत तोपर्यंत आम्ही अजून गाठी मारत राहू हा अप्रोच ठेवावा,
की मागचा गुंता पूरे झाला, मी अजून एक गाठ पडू देणार नाही, जमलंच तर थोडा गुंता सोडावयाचा प्रयत्न करेन असं म्हणायचे हा प्रश्न आहे .
वरच्या प्रतिसादात पहिला अप्रोच जाणवतो आहे .
पंप्र मोदींनी या विषयावर
पंप्र मोदींनी या विषयावर सुरुवातीला मौनच पाळणे पसंत केले. शेवटी राष्ट्रपतींनी सांगितले त्याला मम म्हणून मोकळे झाले. म्हणे "दोघे मिळून गरीबीशी लढा !". बीफ वरून अशी खुनाखुनी योग्य नाही असे आपल्याच अनुयायांना खडसवून सांगायला कदाचित सत्तावन्न इंच छाती लागत असावी. फेसबूक वाल्यांनी जाहीर कार्यक्रमात विचारायला हवे होते की तुम्ही आम्हाला भारतात बोलावतय खरे पण आम्ही बीफ खातो म्हणून मारून तर नाही ना टाकणार?
गजेंद्र सिंग च्या अपघाती मृत्यू बद्दल ट्वीट केले तसे अखलाखच्या बद्दलही करायला हवे होते.
तरुण विजय व चंदन मित्र हे भाजपा समर्थक फर्डे इंग्रजी स्तंभलेखक तर टोन डीफ आहेत कि काय अशी शंका यावी. त्या दोघानीही आपापल्या लेखात "बीफ च्या केवळ संशयावरून" "खात्री न करता" अखलाखची हत्या झाली यबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. जणू खरोखर बीफ असते तर हत्या करायला हरकत नव्हती.
>>जणू खरोखर बीफ असते तर हत्या
>>जणू खरोखर बीफ असते तर हत्या करायला हरकत नव्हती.<<
ए क्लासिक केस आॅफ नो ट्रु स्काॅट्समन फॅलसी...
हो, पंतप्रधानांची याबाबत ठाम
हो, पंतप्रधानांची याबाबत ठाम भुमिका अपेक्षित होती. त्यांच्या उशीरा आलेल्या प्रतिक्रियेवर माझा एक मित्र म्हणाला, देर आये दुरुस्त आये. पण त्या देरीने ते निव्वळ एक पळवाट शोधणारे पॉलिटीकल स्टेटमेंट बनून उरले. या काही गोष्टी त्यांच्या कंट्रोलच्या बाहेर आहेत हेच यातून अधोरेखित होते, आणि ही चिंतेची बाब आहे.
Pages