कथा (भाग ३)

Submitted by अँन्ड्रोमेडा on 1 October, 2015 - 01:05

आज अमावस्या सुर्य मावळताच जंगलाने एकदम भेसूर रूप धारण केलं होतं . एक वेगळाच अपशकुन असल्यासारख वातावरण झालं होतं . त्या तशा वातावरणात एक आकृती हळूहळू निघाली होती . वारा वाहायचा थांबला होता आणि ती भयाण शांतता काळजाचा थरकाप उडवत होती .
====================================

"काय मग मॅडम काय मग कशी झाली म्हैशीची सवारी ? फार मजा आली असेल ना ." - सुरभि

"मग काय फार मजा आली . अशी सवारी कधी केली नाही ." - निशा

"ए चल ना मग आपण पण जाऊया मलाही करायची आहे अशी सवारी ."

छे काय पण इच्छा म्हणे म्हैशीवर बसायचं आहे .
" कुठे जायचं ? "

" कुठे काय तू काल गेली होतीस तिथेच . आता तुला रस्ता असेल ना लक्षात . "

" अग पण तिकडे कशाला ? "

" अग ती म्हैस तिकडेच असेल ना ."

" अग गावात काय तेवढीच एक म्हैस आहे का ? "

" मग ओळखते का तु दुस-या कुठल्या म्हैशीला जी आपल्याला मारणार नाही . "

" नाही . "

" चल तर मग आपण जाऊ तिकडे . "

" अग पण आईने सांगितलं आहे अनोळखी जागी जाऊ नये . "

" अगं पण तू तर कालच जाऊन आली ना मग जागा अनोळखी कशी ? "

" ठीक आहे तू काही ऐकणार नाही , आपण जाऊया तिकडे . "

त्या शेतात पोहोचल्या तिकडे आसपास कोणीही नव्हतं आणि ती म्हैसही नव्हती . शेवटी थोडं इकडे तिकडे फिरून झाल्यावर त्यांनी माघारी जायचं ठरवलं . इतक्यात त्यांना शेजारी गवतात काहीतरी हालचाल जाणवली . काही स्पष्ट दिसत नव्हतं . पण तो परवाचाच कुत्रा असावा अशी निशाची खात्री झाली , मग काय दोघींनीही मागे वळून न बघता घराच्या दिशेने धूम ठोकली .
====================================

" तू पोळ्या करते ? तुला येतात बनवायला ? " - सुरभि

" अग नाही गं मला अजिबात interest नाही पण आई ऐकतच नाही . " - निशा

" मग तू का करतेस सरळ सांगायचं ना मला जमत नाही आहेत . मी नाही करत म्हणून . "

" अगं पण काय करायचं आमच्या घरात दोन लाटणी आहेत ना . "

" म्हणजे त्याचं काय मधेच ? "

" अगं म्हणजे आई एक लाटण माझ्या हातात देते आणि दुसरं तिच्या हातात असत . "

" मग तुम्ही त्यानी टिप-या खेळता ? "

" ए बावळट लाटण्याणी कुणी टिप-या खेळत का ? टिप-या टिप-या असतात आणि लाटण लाटण . "

" माहित आहे . "

" तर मग अस का बोलली ? "

" काय ? "

" लाटण्यान टिप-या खेळता म्हणून ? "

" मी कुठं बोलले तस ? "

" अगं तूच तर बोलली ना तुम्ही टिप-या खेळता का ? "

" अगं म्हणजे मला अस म्हणायचं होतं .. पण मला काय म्हणायचं होत ? बर ते जाऊदे तू सांग तुम्ही दोघी दोन लाटणी घेऊन काय करता ? "

" अग एका लाटण्याने मी पोळ्या लाटण्याचा प्रयत्न करते आणि दुसरं लाटण हातात घेऊन आई उभी असते . "

" कशाला ? "

" अग मी सांगते आहे ना तू नको बोलू मधे मधे . तर बघ पोळी लाटताना एक लाटण माझ्या हातात असत आणि जर मी कंटाळा केला तर दोन्ही लाटणी माझ्या पाशीच असतात . "
" कशी ? "

" एक हातात आणि दुसरं पाठीत . "

" अय्या !! "

" अग अय्या काय पाठीत बसत ना लाटणं . लागत का नाही ? "

" मला कस माहीत ? "

" तू अस कर ये एकदा आमच्या घरी आईला सांगते एक लाटणं तुझ्याही पाठीत ठेऊन द्यायला . मग सांग लागत का नाही . "

" हे गं काय ? लोक जेवायला बोलावतात , खेळायला बोलावतात मैत्रीणींना आणि तू मार खायला बोलावते आहेस मला . "

" हो खायला आणि खेळायलाच बोलावते आहे . घर घर ... भातुकली खेळायचं. खोटा खोटा स्वयंपाक करतात तसा खराखुरा स्वयंपाक करायचा आणि खायलाही ... व्यवस्थित झाला स्वयंपाक , तर जेवण नाहीतर मार . "

" असू दे मी नाही येत . पण मला सांग इतक्यात कशाला शिकायचा आहे स्वयंपाक ? "

" अगं हो पण आई म्हणते आतापासून सुरूवात केली तर पुढे सगळं चांगलं होईल. नाहीतर लग्नानंतर काय आई येणार आहे का स्वयंपाक करायला ? "

" कायपण एवढ्यातच कशाला अगदी लग्नापर्यंत पोहोचायच ? "

" अग म्हणजे काय तू नाही करणार लग्न ? "

" अग तस नाही पण एवढ्यातच . तू करणार आहेस का आताच लग्न ? "

" हो मी करणार आहे लग्न . "

" कधी आत्ताच ? "

" अगदी आत्ताच अस काही नाही पण करेन . "

" अग काय ? आत्ताच ठरवलं आहेस की काय कुणाशी करायचं लग्न ते ? "

" हो . "

" काय हो ? "

" ठरवलं आहे . "

" काय ठरवलं आहे ? "

" कुणाशी करायचं लग्न . "

" कुणाशी करणार आहेस ? "

" अद्वेत बरोबर . "

" अद्वेत ? लिहून दाखव बर नाव . "

" त्यात काय हे बघ ... अद्वेत . "

" ए बावळट अस नाही काही .... अद्वैत .. अस लिहितात . "

" नाही माझचं बरोबर आहे . "

" नाही माझच बरोबर आहे . "

" राहू दे आपण त्यालाच विचारू मग तर ठिक आहे . "

" हो ठिक आहे . "

" बर पण मला एक सांग लग्न त्याच्याबरोबर का ? "

" अग त्यांची द्राक्षांची बाग आहे ना आणि मला द्राक्षे फार आवडतात ना . "

" ए यडपट द्राक्षं काय विकत मिळत नाहीत का बाजारात ? "

" अय्या हो की मी विचारच केला नव्हता . पण बघ ना अशी झाडावर चढून खायला किती छान वाटतील ना द्राक्षं . "

" झाडावर चढून ? द्राक्षाच्या ? तू गेली होती का त्या बागेत ? आणि त्या झाडावर चढली होती का ? आणि तिथून खाली जमिनीवर पडली होतीस का ? आणि तुझ्या डोक्याला मार वगैरे लागला होता का ? म्हणे झाडावर चढून . "

" अग अगदी झाडावर चढून नाही म्हणत . मला माहित आहे ते . असे वेलच असतात आणि अशी ती द्राक्षं लागलेली असतात . वॉव किती मस्त वाटतात . डायरेक्ट वेलावरची तोडून खायला किती मजा येईल ना . मस्त . "

" हो खा खा . "

तेव्हढ्यात मंजू तिथे आली .

" अग काय गं काय चालल आहे दोघींच . "

" द्राक्षे खातोय . "

" द्राक्षे कुठुन आणली ? "

" अद्वेतच्या बागेतून . "

" अग पण तुम्ही गेला कधी आणि आला कधी ? "

" हे काय आत्ताच . "

" पण आत्ता असतात द्राक्षं ? "

" हो . काय सुरभि होती ना ? "

" हो हो . "

" आंबट होती ना ? "

" गोड होती आणि तुला सगळी आंबट
लागली ना ? "

" मी टिप-या घेऊन येऊ ? "

" जाऊ दे पोट भरलय माझं आणि आता भूक पण नाही . चला काकू येते मी . पोळ्या झाल्या का तुमच्या ? "

" सुरभि .... "

" काय चाललय या मुलींच काय मधेच पळत सुटल्यात दोघी . छे जाऊदे त्यांच चालू दे आपल काम आवराव . "

... क्रमशः

भाग १
भाग २
भाग ४

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users