कथा (भाग १)

Submitted by अँन्ड्रोमेडा on 3 September, 2015 - 02:39

पुर्वरंग :

तो झपाझप पावलं उचलत होता . लांबचा पल्ला गाठायचा होता त्याला .वाटेत होत निबिड रान . दिवस मावळायच्या आत त्याला ते रान पार करायचं होत . रानातून जाताना त्याचा जीव कातावून गेला होता . या भितीच्या धक्क्यात त्याच्या पायाची गती वाढली होती व तो अधिक त्वरेनं पावलं उचलत होता . रान लवकर संपाव
असं त्याला वाटत होत . पण रस्ता काही संपेना.रान एव्हाना पार व्हायला हवं होत . पण अजून काही तसं झालं नहूत.

तो चालतच होता . हळूहळू दिवस मावळायला लागला . आता त्याच्या ध्यानात आलं होतं की कुठंतरी आपण चुकीची पायवाट पकडली आणि आता आपण या जंगलात कुठे आहोत हेच त्याला उमजेनासं झालं होतं . आता रात्र याच जंगलात काढल्यावाचून पर्याय नहूता . कारण दिशाच समजत नसताना चालत राहिलो तर आपण या जंगलात फारच आत जाऊन हरवून बसू असे त्याला वाटत होते . रात्रतर या जंगलातच काढायची पण कशी . या जंगलात तर बरीच श्वापदं असावी असा त्याचा कयास होता . जमीनीवर थांबलो तर उध्याची सकाळ नाही बघता येणार या विचारात त्यानं सोबतच्या कु-हाडीन काही लाकड तोडून मचान बनवली . सोबत आणलेली भाकरी त्यानं अंधार पडायच्या आत खाऊन घेतली व तो मचानावर जाऊन बसला .

आता अंधार पडू लागला होता . हि रात्र कशी काढायची याच विचारात होता तो . इतक्यात त्याला दुरवर उजेड वाटला . निट काही दिसत नसलं तरी झोपडी असेल व तिथून
तो उजेड येत असावा असा कयास त्याने बांधला . आता काय करावं असा प्रश्नही त्याला पडला होता . कारण
मचानावरुन तर तो उजेड किंवा दिवा त्याला दिसत होता पण खाली उतरुन चालायला सुरूवात केल्यावर तो दिसेल
की नाही याची खात्री नहूती व आता जर तिकडे जाताना आपण वाट चुकलो तर ही जागाही सापडणार नाही व
ती झोपडीही . काही वेळ मनाची चलबिचल झाल्यावर त्यानं मचानावरच राहण्याचा निर्णय घेतला . त्यानं ठरविलं सकाळ झाल्यावर आता दिसणाऱ्या दिव्याच्या दिशेनं जायचं . ती झोपडी सापडली की तिथं पुढच्या रस्त्याची चौकशी करायची व मग आपला रस्ता पकडायचा . रात्रभर येणाऱ्या वेगवेगळ्या प्राण्यांचे आवाज ऐकून तो घाबरला होता . रात्रभर जागाच होता तो पहाटे कधीतरी त्याला झोप लागली .

त्याला जाग आली तोपर्यंत दिवस बराच वर आला होता . त्यानं काल दिसत असलेल्या दिव्याच्या दिशेनं पाहिलं तर तो दिवा कुठं दिसत नहूता व झोपडीसारख काही दिसत नहूतं . पण त्या दिव्याच्या दिशेनं अंदाजानेच जायचं त्यानं ठरवलं व तो तडक त्या दिशेनं चालू लागला .किमान त्याच्या मते तरी तो योग्य मार्गावर होता . पण बराच वेळ चालूनही त्याला कुठंही झोपडी नाही सापडली .आता वेळही बराच झाला होता व त्याला आता भुकेची जाणीव होऊ लागली होती .एवढं निबिड वन पण
त्याला खायचा असं काही मिळत नहूतं .

नाही म्हणायला बोराची झुडूप तेव्हडी होती आणि त्यालाही हिरवी बोर होती . त्यामुळे पोट काही भरत नहूतं पण त्याचे दात तेव्हडे आंबट झाले होते . त्यामुळे ती बोरही त्याला खाऊशी वाटत नहूती . आता जर काय खाल्ल नाही तर आपलं काही खरं नाही या विचारात असतानाच त्याला एक मेलेला ससा दिसला .इतर वेळी त्याने विचार केला असता कि ससा कसा काय मेला पण आता भुकेमुळे त्याने कसलाही विचार न करता थोडी लाकड जमवून तो ससा भाजून खाल्ला .आता त्याला थोडी हुशारी वाटत होती . आता तो बाहेर पडण्याचा विचार करु लागला .

त्याला आता खात्री झाली होती की या जंगलात आपण फार आत आलो आहोत आणि हे जंगल फार मोठे आहे पण जर आपण कोणत्याही एकाच दिशेनं सतत चालत राहिलो तर या जंगलातून बाहेर पडू याची त्याला खात्री होती . त्याला आता सुचलं कि पूर्व बाजूला फार दूर जंगल नाही . म्हणून आता आधी पूर्व दिशा शोधायची व मग त्या दिशेने चालायला सुरूवात करायची असे त्याने मनाशीच योजले . पोट भरल्यामुळेच आता त्याच डोक थोडं फार काम देऊ लागलं होतं .

आता या जंगलात सुर्योदय किंवा सुर्यास्त तर दिसू शकत नहूता पण एक तळच अस ठिकाण होतं जिथं त्याला बरचस मोकळं आकाश दिसणार होतं व तिथं सुर्याचा प्रवास पाहून तो दिशा ठरवणार होता . आता तो उत्साहानं सकाळ होण्याची वाट पाहू लागला . रात्र सरली दिवस उगवला . तो तळ्याच्या काठी जाऊन बसला . त्याने काही वेळ सुर्याच होणार मार्गक्रमण पाहिलं व पूर्व दिशा ठरवून त्यानं चालायला सुरुवात केली .

दोन दिवस झाले तो चालतच होता . आता त्याच्यातले त्राण संपत आले होते पोटात काही नसल्यामुळे इतर काही सुचत नहूतं . आता काही खाल्ल्या शिवाय पर्याय नाही हे लक्षात आल्यावर त्यानं काहीतरी खायला मिळते आहे का ते पहायला सुरुवात केली . बराच शोध घेतल्यावर त्याला थोडी कंदमुळ सापडली . पण ती शिजवण्याइतका वेळही त्याच्याकडे नहूता म्हणून त्यानं ती कच्चीच खायला सुरुवात केली .

त्याच्या पोटाला थोडासा आधार तर आला होता पण आता काहीतरी चांगलं पोषक व भरपूर आहाराची गरज असल्यामुळे त्याने त्या दिशेनं प्रयत्न चालू ठेवले व त्याला त्यात यशही मिळत होत . पण या पोटाची भुक भागवण्याच्या नादात त्याला जंगलातून बाहेर जाण्यापासुन मात्र अडवून ठेवलं होत .

.....त्याच काय झालं हा प्रश्न तुम्हाला पडला असेल .त्याच तुम्हाला उत्तर नक्की मिळेल .पण आता कथा दुस-या ठिकाणी दुस-या पात्रांसोबत पुढे जाते आहे. पुढे त्याच काय झाल याचही उत्तर मिळेल .तोपर्यंत वाचकांनी धीर धरावा ...

खरी सुरुवात

मंजू आणि सुयश एक सुखी जोडप होत . त्यांचा संसार सुखा समाधानान चालला होता . त्यांच्या संसारात सुखाची आणखी भर पडली . त्यांच्या संसार वेलीवर एक नवी कळी उमलली होती . तिला पाहून दोघांनाही आभाळ ठेंगण झालं होतं . तिचा जन्म रात्री झाला होता म्हणून तिचं नाव ठेवलं होतं निशा . त्यांच्या आयुष्यात हिच रात्र नविन सुख घेऊन आली होती . तिला खेळवता खेळवता दोघांना दिवस पुरत नसे . असेच दिवस चालले होते . तिचे ते बोबडे बोल , तिचं ते दुडूदुडू चालन सारच फार छान होत .एखाद्या स्वप्नातच आहोत आपण असं त्यांना वाटत होतं .

आज निशा शाळेला निघाली होती .ती आपल्या आठवणीने किती रडेल आणि किती दंगा करेल याने मंजूचा जीव तुटत होता . पण झालं वेगळच निशाला शाळा फार आवडली . ती कधी रडली नाही शाळेत जायला . तिचा शाळेत जायचा उत्साह फार असायचा . त्यामुळे मंजूचा मात्र पळापळ करावी लागे . शाळेतून माघारी आल्यावर निशान मारलेल्या मिठीत मंजूचा दिवसभराचा थकवा अगदी दूर व्हायचा . निशा जन्मतःच हुशार होती व कोणतीही गोष्ट पटकन शिकायची . तिला कामाचीही भारी हौस .उगाचच काहीतरी भांडं घेऊन आईसारख त्याला घासण्याचा प्रयत्न करायची . त्यातुन ते भांडं काही स्वच्छ व्हायचं नाही . ते मंजूलाच स्वच्छ करावं लागे पण त्यामुळं आजुबाजुच्या बायका कौतुक करायच्या , मंजू लेक लवकर कामाला हातभार लावू लागली हो . त्या बोलण्यानं मंजूला फार सुखावायच .

सहल

निशा जसजशी पुढच्या वर्गात जात होती तसा मंजूचा अभ्यासही वाढत चालला . कारण तिला काही शिकवण किंवा तिचा अभ्यास घेणं फारसं सोपं नहूतं . आधी मंजूला बरीच मेहनत करावी लागत होती . अभ्यास करावा लागत होता . पण ती पूर्ण क्षमतेनुसार प्रयत्न करायची . तिला अनेक वेळा असही वाटून गेलं कि आपण जर इतका अभ्यास स्वतः शाळेत असताना केला असता तर आपण बोर्डात नंबर काढला असता . अस तर सुखी जीवन चालल होत त्यांच .

निशाला सायकल चालवायची भारी हौस . सुरभि निशाची फार गट्टी होती . सुरभि ही शेजारीच राहत होती . त्यामुळं त्या दोघींच चांगलं जमत होतं . तिच्या इतरही मैत्रीणी असल्या तरी सुरभि सोबत तीचं फारच चांगलं जमे . शाळेत दोघीं सोबतच असायच्या . एकदा त्यांच्या शाळेची सहल जाणार होती व त्यासाठी निशा आईकडे जाण्याची परवानगी मागत होती . इतक्या लहान मुलांना कुठं सहलीला नेणार आहेत व त्यांना काय कळणार आहे असा विचार मंजू करत होती .तो तिला कळलं की वेशीजवळच्या बागेतच जाणार आहे सहल .तेव्हा तिनं परवानगी दिली . सकाळी जाऊन संध्याकाळी येणार होते सगळे .सोबत डबा नेणार होते .

तो एकच दिवस पण मंजूला फार काळजी लागून राहिली होती . पण निशा घरी आली आणि तिच्या सहलीच्या अनुभवांची टकळी जी सुरु झाली ती काही दोन दिवस थांबली नाही . मंजूलाही समजत नहूतं हे लोक गेले काही तासच सहलीला आणि यांचे अनुभव मात्र किती दिवस झाले सांगून संपतच नाहीत . नंतर दरवर्षी निशा सहलीला जात होती व त्या सहलीच्या अनुभवात अनेक महिने जात होते .

सायकल

निशाला सायकलच भारी वेड . लहानपणी तिची तीन चाकांची सायकल घेऊन ती फार दूर पर्यत जात होती .इकडे मंजूचा जीव मात्र टांगणीला लागत असे व तिला नेहमी वाटे कि कुठून दुर्बुद्धी झाली आणि हिला सायकल घेऊन दिली .

थोडी मोठी झाल्यानंतर तिला दोन चाकी सायकल दिली . त्यानंतर तर तिला सीमाच उरल्या नव्हत्या . ती लांब लांब सायकल घेऊन जात असे . आणि हो महत्त्वाच इतकी सायकल चालवूनही तिच सायकलवरून पडन काही थांबत नव्हतं .सायकल खाली आणि त्यावर निशा अशापेक्षा निशा खाली आणि सायकल तिच्या अंगावर पडलेली किंवा सायकल आणि निशा दोघीही एकमेकींशेजारी पडलेल्या असच जास्त व्हायचं .तिला लागायचं फार नाही पण आज जरा जास्तच झालं होत .

निशा हळुहळु डोळे उघडत होती .तिला थोड धुसर धुसर दिसत होत . थोडा वेळ झाल्यावर तिला जरा स्पष्ट दिसू लागलं होत . शेजारी बरीच माणसं जमली होती आणि काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती . कोण कुणाला काय सांगतय ते समजायला अवघड जात होत . तिच्या तोंडातून अस्पष्ट शब्द बाहेर पडले ... पाणी आणि कोणीतरी एक पाण्याची बाटली तिच्या तोंडात कोंबली , चांगला तिला ठसका लागेपर्यंत .

मग थोड्या वेळाने तरतरी वाटल्यावर तिनं पाहिलं लोक आपापसात बोलत आहेत आणि आपल्याकडे कुणाच लक्ष नाही . हे पाहून तिनं आपली सायकल उचलली आणि तिच्यावर बसण्याचा प्रयत्न करु लागली तेव्हा तिला कळलं सायकल बरीच वाईट स्थितीत आहे व तिला चालवतच घरी नेण्याशिवाय पर्याय नाही . मागे वळून कुणाच लक्ष नाही हे पहात ती हळुहळु तिथून सटकली . घरी जाण्यापूर्वी वाटेत सुरभिच घर होत तिथं ती गेली . तिनं सुरभिला बाहेर बोलावून घेतलं . तिला पाठीमागचा दरवाजा उघडायला सांगितला . मग पाठीमागच्या दरवाजाने तिच्या घरी जाऊन निशा थोडी फ्रेश झाली व हळूच तिथून बाहेर पडली . आता तिने तिचा मोर्चा आपल्या घराकडे वळवला .

आईला काय आणि कस सांगायचं याचा विचार करत करत शेवटी कशीबशी ती घरी पोहोचली . कसबस तिनं घरात एक पाऊल ठेवलं तोच आईनं तिला पाहिलं . थोडीफार सावरली असली तरीही तिला पाहून आईला धक्काच बसला . आईनं इतक्या प्रश्नांचा मारा केला की तिला ती उत्तरही देऊ देत नव्हती . शेवटी आई थांबल्यावर निशान झाला प्रकार सांगायला सुरुवात केली आणि आपल्याला काही नाही झालं तर सायकल उभी केली होती तिला गाडीनी धडक दिली अस सांगितलं .आई फार काही नाही फक्त दोन एक तास बोलून शांत झाली .
पुढे ती सायकल दुरूस्तीला गेली , ती काही परत आलीच नाही .

....क्रमशः

कथा पुढे सुरु आहे. पुढिल भाग लवकरच.

भाग २
भाग ३
भाग ४

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

कथा लेखन सोपे आहे पण संपादन अवघड वाटते आहे . प्रयत्न करेन योग्य स्वरूपात कथा सादर करण्याचा .