रंगरेषांच्या देशा - तुझे रूप चित्ती राहो

Submitted by अल्पना on 26 September, 2015 - 14:32

New Doc 5_1.jpg

खरं तर गणेशोत्सवातील या उपक्रमासाठी एक अ‍ॅक्रॅलिक कलर्स वापरून कॅनव्हास वर चित्र रंगवायचं ठरवलं होतं. विषय पण दुसराच निवडला होता. पण ते रंगवायला काही सवड होईना.
इथल्या गणपतीच्या चित्रांच्या एंट्र्या पाहून मला पण गणपती रंगवायची इच्छा झाली. एखादं अमुर्त शैलीतलं चित्र रंगवायचं ठरवलं, पण ते सुरु करायच्या आधी काल सहजच स्केचबुकमध्ये पेन्सिलनी हा गणपती (रफ म्हणून) चितारला. मामींच्या गणपतीकडे बघून मेंदी डिझाइन नी हे बाप्पा रंगवून बघूया असं ठरवलं. नुकताच घेतलेला एक १० रंगांचा जेलपेनचा सेट काढून बसले आणि मेंदीऐवजी झेनटॅन्गल्स आणि डुडलींग करायला लागले. Happy
नुसत्या जेलपेन्सनी तितकी मजा आली नाही म्हणून नंतर १-२ हायलायटर्स आणि स्केच पेन्स पण वापरलेत.

कागद - ए-४ साइझ साध्या स्केचबुकचा
रंग - कॅमलिन टोरा ०.७ एमएम जेलपेन, हाय लायटर्स आणि १-२ स्केच पेन्स

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान Happy

Mast Happy