लागणारे जिन्नस:
मूळ कृती इतकेच सर्व जिन्नसांचे प्रमाण:
ही मूळ कृतीची लिंक .
http://www.maayboli.com/node/55511
बदललेले घटकः
३ कप गाजराचा किस= ३ कप मोदकाचे पीठ
१ कप चणाडाळ = १ कप आंब्याचा रस
प्रथम आंब्याचा रस गॅसवर आटवत ठेवावा. तो आटला की त्यात खोबरं आणि साखर घालुन मोदकांना करतो तसे सारण करुन घ्यावे.
तीन कप पाण्यात दोन चमचे तूप घालुन ते उकळले की त्यात मोदक पीठ घालुन ढवळावे आणि चांगल्या दोन तीन वाफा आणाव्यात. आणि उकड काढावी. थोडी थंड झाली की चांगली मळून घ्यावी.
एक छोटा गोळा घेऊन चित्रात दाखवल्यप्रमाणे त्याच्या वाट्या कराव्यात आणि मोदकपात्रात त्या दहा पंधरा मिनीटे वाफवाव्यात.
त्या गार झाल्यावर त्यात पुरण भरावे. कॅनपीज खाण्यासाठी तयार आहेत.
१)
From mayboli
२)
From mayboli
१) ह्या वर्षी पाकृ स्पर्धेला कमी आहे प्रतिसाद. मला ही फार काही सुचत नव्हत पण एक तरी प्रवेशिका वाढेल म्हणून केली ही डिश. तेवढाच गणेशोत्सवात माझा सहभाग.
२) आंबा, नारळ आणि तांदुळ हे तिन्ही एकमेकाना पूरक असल्याने चव छानच लागत होती. ह्यात आंब्या ऐवजी अननस किंवा सफरचंद ही छान लागेल असं वाटतयं
३) मोदक बंद करताना थोडं तरी नाक रहातच जिथे पुरण भरता येत नाही. तसं ह्यात झालं नाही. शिगोशिग भरता आलं पुरण.
३) वाटीला मुरड घालणे जमले नाही तर फोर्क च्या सहायाने डिझाईन करु शकता.
४) ज्यांना मोदकाच्या कळ्या काढणे जमत नाही त्यांच्या साठी छान आहे हे.
५) दुसर्या फोटोत मध्ये जे अर्धे दिसतायत ते कचोरी सारखे केले आणि वाफवल्यानंतर सुरीने मधोमध कापून दोन भाग केले.
६) थोड्या उकडीमध्ये हळद, तिखट, मीठ घातले आणि वाफवल्यानंतर त्यात नारळ, मिरची, मीठ कोथींबीर असे सारण भरुन नमकीन कॅनपीज तयार केल्या.
७) अगदी थोडी उकड उरली होती त्याचेच सजावटीसाठी दिवे केले. ( स्मित)
८) हा पदार्थ स्पर्धेच्या नियमांत बसेल अशी आशा करते.
खूप छान आहे कल्पना. दिसतायतही
खूप छान आहे कल्पना. दिसतायतही छानच! लागतीलही छान.
धन्यवाद सर्वांना परत एकदा.
धन्यवाद सर्वांना परत एकदा.
चनस , मुरड घालताना , कडेवरची अगदी थोड़ी उकड चिमटीत धरायची आणि अगदी थोड़या तिरक्या पोझिशन मध्ये परत प्रेस करायची. परत पहिल्या मुरडीच्या जवळ तीच अॅक्शन रिपीट करायची . हे करताना दोन मुरडीतल अंतर सारख असल आणि मुरड जवळ जवळ घातली की छान दिसते.
मैत्रैयी, कॅनपी करताना आपल्याला जो साईज अपेक्षित आहे त्यापेक्षा थोडी आवळ ठेवावी कारण वाफवल्यानंतर त्या थोड्या उमलल्या सारख्या होतात.
फारच सुंदर दिसत आहेत. पटकन
फारच सुंदर दिसत आहेत. पटकन उचलून तोंडात टाकाव्या असं वाटतं आहे
कॅनपीज ए वन! फोटो आण
कॅनपीज ए वन! फोटो आण अदलाबदली, दोन्ही फार आवडलं.
छान. दिसायला हि सुंदर.
छान. दिसायला हि सुंदर.
अप्रतिम..शेवटच्या फोटोतल्या
अप्रतिम..शेवटच्या फोटोतल्या प्रेझेंटेशनला १०० मार्क.. त्या दिव्यांमुळे विशेष.
धन्यवाद सर्वांना परत एकदा.
धन्यवाद सर्वांना परत एकदा.
अतृप्त, आपण कलेचे एवढे जाणकार आहात तुम्हाला सजावट आवडली खूप छान वाटलं
सह्हीच आहे हा प्रकार. काय
सह्हीच आहे हा प्रकार. काय सुंदर आणि आकर्षक दिसत आहेत या कॅनपीज. खरंच पटकन सगळ्याच संपवाव्याश्या वाटताहेत. सजावटही अतिशय सुरेख झालेय. त्या दोन दिव्यांमुळे चार चाँद लागलेत सजावटीला.
अक्षर सुबक दिसते तसे सुबक,
अक्षर सुबक दिसते तसे सुबक, सुंदर अन सुटसुटीत दिसताहेत. सोबत दिवे मांडायची आयड्या भारीच
आयडीया भारी आहे हेमाताई. खुप
आयडीया भारी आहे हेमाताई. खुप सुंदर.
मोदकाच्या उकडीच्या कॅनपी करणे
मोदकाच्या उकडीच्या कॅनपी करणे हीच खर तर अभिनव कल्पना आहे आणि तीच अधोरेखित व्हायला हवी. नव्या मुलींना याचा खूप उपयोग होऊ शकतो
+१००००००
अगदी बरोबर हेमा, माझ्या घरात मोदक म्हटले की दुर पळतात नको म्हणत. तेच स्वीट कॅनपीज म्हणुन वरची डिश दिली तर धावत येतील. आणि एकदा ही बेस आयडीया आली की यात खुप वरिएशन्स पण करता येईल. उकडीच्या कॅनपीज ही तुझी आयडीया खुप अभिनव आहे.
...
...
मामी,. ऋन्मेष, जागु, साधना
मामी,. ऋन्मेष, जागु, साधना प्रतिद्सादासठी खूप खूप आभार.
मायबोली संयोजकः मायबोली
मायबोली संयोजकः
मायबोली गणेशोत्सव २०१४ अंतर्गत यंदा 'अशी ही अदलाबदली' ही पाककृती स्पर्धा तसेच 'तेचबूक' ही विनोदी लेखनस्पर्धा अश्या दोन स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या. या दोन्ही स्पर्धांना मायबोलीकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. दोन्ही स्पर्धांना मिळालेल्या उदंड प्रतिसादांमुळे यंदा आलेल्या प्रवेशिकांमधून सर्वाधिक मत मिळवण्यार्या पहिल्या तीन प्रवेशिका विजेत्या म्हणून घोषित कराव्यात असा निर्णय संयोजक मंडळाने घेतलेला आहे. स्पर्धांचे विजेते अर्थातच मायबोलीकरांकडून झालेल्या मतदानानुसार निवडले आहेत.
तर विजेते आहेत -
अशी ही अदलाबदली - पाककृती स्पर्धा
१) पहिला क्रमांक - मनीमोहोर - पाककृती क्र.१ गाजर आणि चणा डाळ वडी मँगो कोकोनट कॅनपीज
ही पाकृ पहिल्या क्रमांकाने विजयी करणार्या सर्वांना मनापासून धन्यवाद.
फारच टेंप्टिंग. मस्तं कल्पना
फारच टेंप्टिंग. मस्तं कल्पना आहे.
फार सुंदर आणि कल्पक पाकृ आहे
फार सुंदर आणि कल्पक पाकृ आहे . फोटो आणि सजावटीचे दिवे छान दिसतायत .
Pages