देवाला राग !

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 September, 2015 - 13:34

कर चमत्कार
होऊ दे अंध:कार
येऊ दे प्रलय
माजू दे हाहाकार
मावळू दे सुर्याला
विझव घराघरातला दिवा
उसळव सुनामीच्या लाटा
होऊ दे भूकंप
दाखवून दे तुझे अस्तित्व
आहेस तू चराचरात
निसर्गाला सामावून
तू आहेस या जगात
मगच मी तुझ्यावर विश्वास ठेवेन.

धर्मभेद जातपात, सारे प्राणीमात्र एकजात
दाखव तुझ्यासाठी हे सारे समान
होऊ दे हाडामांसाचा एकच गोळा

कर असे एकदा तरी
मी नक्कीच तुझ्यावर विश्वास ठेवेन

पण मग काही जणांचा विश्वास तू तोडशील

म्हणून जेव्हा सारे काही संपले असेल
जेव्हा कुठलीही आशा नसेल
तेव्हा कर पुन्हा एक निर्मिती
एक जग नव्याने उभार

कारण आमचे अस्तित्व मिटले
तर तुझे सुद्धा नाहीसे होईल
आम्ही जगलो तरच तू जगशील
नाहीतर उरल्यासुरल्या दगडांसारखा
तू ही एक दगड म्हणून उरशील

- कवी ऋन्मेऽऽष
.........................

कधी कधी माझ्यातला नास्तिक असा बाहेर पडतो,
ज्याच्यावर विश्वास नाही त्याच्यावरच चिडतो

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझाही +०.९ Happy

उचकवले तरी काही हरकत नाही, पण नवीन आलेल्या प्रतिसादांमध्ये मी आधी हौसेने कवितेबद्दल व्यक्त केलेले मत शोधतो. तर ते देखील चांगले वाईट जमलेय काहीतरी टाका. कारण माझ्यासाठी धाग्याचा मूळ हेतू हा चर्चा नसून कविता हाच होता.

ऋन्मेषा - आवडली कविता.

आजच्या काळाततरी एकंदरीत असे वातते की

आस्तिक म्हणजे देव देवता ज्या स्वरुपात सांगितल्या गेल्या आहेत त्यांना त्याच स्वरुपात मानणारा त्यांना घाबरून असणारा व्रत वैकल्ये पूजा पाठ करून देवासमोर झोळी पसरणारा. आणि हे न करणारा तो नास्तिक

देवाचे त्याहूनही जास्त स्पष्ट करायचे तर परमेश्वराचे अस्तित्व मानणारा तो आस्तिक आणि ते न मानणारा तो नास्तिक ही साधी व्याख्या आहे असे मला वाटते. आणि ह्या व्याख्येने समाजाने नास्तिक समजलेले अनेक जण आस्तिक असतील.

स्वतःला नास्तिक म्हणवणे ही मोठीच फॅशन आहे सध्या ...

>> हे मात्र तितकस खर नाही , ती फॅशन साधारण १०-१५ वर्षापूर्वी होती .

आज तर "मी प्रतिबालाजीला गेले होते" , किंवा " मी श्रावण पाळतो " हे "इन" आहे Happy

हा हा.. हो खरेय.. अस्तिकतेचेही फॅड असतेच..
10-12 वर्षांपूर्वी मी शिर्डीला जायचो, मंगळवार पाळायचो, दर मंगळवारी न् चुकता मित्रांबरोबर मंदीराच्या कट्ट्यावर जमायचो. अर्थात विभागताल्या मुलीही तिथे जमायचे एक आकर्षण असायचे ती गोष्ट वेगळी. पण सांगायचा मुद्दा हा की फॅड म्हणून आस्तिकता मी सुद्धा निभावलीय. त्यामुळे मुळातच माझ्यात असलेली नास्तिकता हे फॅड नाही याचीही कल्पना आहेच.

Pages