देवाला राग !

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 September, 2015 - 13:34

कर चमत्कार
होऊ दे अंध:कार
येऊ दे प्रलय
माजू दे हाहाकार
मावळू दे सुर्याला
विझव घराघरातला दिवा
उसळव सुनामीच्या लाटा
होऊ दे भूकंप
दाखवून दे तुझे अस्तित्व
आहेस तू चराचरात
निसर्गाला सामावून
तू आहेस या जगात
मगच मी तुझ्यावर विश्वास ठेवेन.

धर्मभेद जातपात, सारे प्राणीमात्र एकजात
दाखव तुझ्यासाठी हे सारे समान
होऊ दे हाडामांसाचा एकच गोळा

कर असे एकदा तरी
मी नक्कीच तुझ्यावर विश्वास ठेवेन

पण मग काही जणांचा विश्वास तू तोडशील

म्हणून जेव्हा सारे काही संपले असेल
जेव्हा कुठलीही आशा नसेल
तेव्हा कर पुन्हा एक निर्मिती
एक जग नव्याने उभार

कारण आमचे अस्तित्व मिटले
तर तुझे सुद्धा नाहीसे होईल
आम्ही जगलो तरच तू जगशील
नाहीतर उरल्यासुरल्या दगडांसारखा
तू ही एक दगड म्हणून उरशील

- कवी ऋन्मेऽऽष
.........................

कधी कधी माझ्यातला नास्तिक असा बाहेर पडतो,
ज्याच्यावर विश्वास नाही त्याच्यावरच चिडतो

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिम्बा, हो शक्यय, असेल. मला नाही जमत कविता हा प्रकार. अपघातानेच त्यात व्यक्त झालो. बरं वाटलं स्वताला म्हणून इथे टाकलं. टाकून मात्र नक्कीच बरं वाटलं. तुम्हाला शेवटच्या दोन ओळी बेटर वाटल्याबद्दल धन्यवाद Happy

ऋन्मेष. मला वाटलं कही तरी लेख वगैरे असेल गणेसोत्सवाच्या बदललेल्या रुपावर. पण पहाते तर तुझी कविता चक्क. पहिलीच काय रे माबो वरची?
कवित्ता असल्यामुळे पटकन झाली वाचुन. पण छान जमली आहे आवडली. विशेष करुन शेवटचे चरण.

कर चमत्कार
होऊ दे अंध:कार
येऊ दे प्रलय
माजू दे हाहाकार
मावळू दे सुर्याला
विझव घराघरातला दिवा
उसळव सुनामीच्या लाटा
होऊ दे भूकंप
दाखवून दे तुझे अस्तित्व
आहेस तू चराचरात
निसर्गाला सामावून
तू आहेस या जगात
मगच मी तुझ्यावर विश्वास ठेवेन.

>>>>>>>>>>>>

अरे ऋन्म्या तो देव आहे दानव नाही. तुला चिडता येते, त्याला असे चिडुन कसे चालेल. पण कधी तरी
१०० मिलियन वर्षातना एकदा तो चिडतच असेल, तु त्याला आठवण नको करुन देउस!

सध्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थिती बद्दलची चीड कविते मधून व्यक्त होत आहे असे वाटते.
देवाला उद्देशून "तुझ्या वेगवेगळ्या नावाखाली आम्ही समस्त मानव जाती ने जो काही उच्छाद मांडला आहे तो एकदा संपवून दाखव मग च मी तुझ्यावर विश्वास ठेवीन" आणि जर हे थांबले नाही तर आम्ही शिल्लक राहणार नाही असे कवी ला म्हणायचे असावे. छान आहे.

धन्यवाद पतिसादांचे

निलिमा, देवाला चिडता येत नाही. किंवा चिडला तरी संहार करू शकत नाही... बदलत्या काळानुसार देवही गांधीवादी झाला आहे का.. की फक्त दोन शिंगे आणि दहा डोकी असलेल्या राक्षसांनाच तो अवतार घेऊन मारतो..

पूर्ण कविता आवडली...
कधी कधी माझ्यातला नास्तिक असा बाहेर पडतो,
ज्याच्यावर विश्वास नाही त्याच्यावरच चिडतो >> हे ही आवडले Happy

नास्तिक आणि आस्तिक दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजु असतात.
एकाला कशावर विश्वास ठेवावा हे कळत नाही आणि दुस~याला कशावर विश्वास ठेवु नये हे कळत नाही.

स्वतःला नास्तिक म्हणवणे ही मोठीच फॅशन आहे सध्या ...

देवासोबत भांडतोस म्हण्जे देवाला मानतोस आणि जर मानतोस तर नास्तिक कसा रे तू?

ऋन्मेष कविता वाचुन नाना पाटेकरांचा चित्रपट 'अंकुश' आठवला.त्यातल्या एका गाण्यात अशाच भावना व्यक्त केल्या गेल्यात.

उपरवाला क्या मागेगा हमसे कोही जबाब
भारी पडेगा कहना,सुनना उसको अरे जनाब
जवाब हम मांगेगे हिसाब हम मांगेगे

हे मी लिहिले तेव्हा त्या आधी व्हॉटसप ग्रूपवर आमची काही चर्चा चालू होती त्यानुसार मनात विचार आलेले. ते संदर्भ इथे दिले नसल्याने माझे विचार नेमके काय आहे या चर्चेत न पडता आपापल्या श्रद्धेने कवितेचा अर्थ लावा. तुम्ही आस्तिक असाल तर तुम्हाला कवितेचा अर्थ तसाच लागू दे, नास्तिक असेल तर नेमका त्याविरुद्ध.

तरी माझे म्हणाल तर देवाला मानत नाही कारण तो आहे हे कोणी मला सिद्ध करून दाखवले नाही.
तसेच देव मानणार्‍यांशी भांडायलाही जात नाही, कारण तो नाहीयेच मुळी हे मी देखील सिद्ध करू शकत नाही.

बाकी देवावर काही लिहिणे म्हणजे देवाचे अस्तित्व मानणे असे होत नाही.
कारण कित्येक कविता कल्पनेवरच होतात.

मी जिवंत निसर्गा चे रोज आभार मानते त्याच्या प्रती कॄतज्ञता प्रगट करते.
मी आस्तिक की नास्तिक?
>>>>>

भावनिक Happy
जो मी सुद्धा आहेच

आस्तिक अथवा नास्तिक या स्वतः स्वतःलाच बहाल करण्याच्या पदव्या आहेत.
>>>
असे काही नाही. मला लहानपणापासून मंदिरात जायचा वैताग. कोणालातरी देव मानून त्याच्याकडे काही मागायचे म्हणजे माझा स्वाभिमान (की अहंकार?) देखील दुखवायचा. माझ्या या स्वभावाला घरच्यांनी नास्तिक हे नाव दिले, जेव्हा मला नास्तिक या शब्दाचा अर्थही माहीत नव्हता.
लोकांच्या परिचयाचा शब्द म्हणून नास्तिक ईतकेच, मला त्याच्या व्याख्येत घुसायची गरज वाटत नाही. अन्यथा माझ्यासाठी देव असल्यास चांगले आहे आणि नसल्यासही काही दु:ख नाही. फक्त मी तुझ्या वाटेला जात नाही, तू माझ्या वाटेला येऊ नकोस Happy

कविता छानच.

कारण आमचे अस्तित्व मिटले
तर तुझे सुद्धा नाहीसे होईल
आम्ही जगलो तरच तू जगशील
नाहीतर उरल्यासुरल्या दगडांसारखा
तू ही एक दगड म्हणून उरशील>>

हेच फार आवडले.

कारण आमचे अस्तित्व मिटले
तर तुझे सुद्धा नाहीसे होईल
आम्ही जगलो तरच तू जगशील
नाहीतर उरल्यासुरल्या दगडांसारखा
तू ही एक दगड म्हणून उरशील>>

देवाचे अस्तित्व कधीच मिटत नसते. माणूस असो किंवा नसो. देव परमनंट आहे.

असंच नाव दिलं?
आपण देवळात जात नाही वा सकाळी देवाला नमस्कार करत नाही हे पाहुन सुद्धा लोक आपल्यालाच विचारतात, "तू नास्तिक आहेस का?"
असो, लोक काहीही म्हणोत जो पर्यंत आपण स्वतःला दोन्हीपैकी एक म्हणवुन घेत नाही, तो पर्यंत त्याचा काय फरक पडतो.

देवाला च्या नावाने परमनंट व्यवसाय.

मंदीरःएक ऐसी एटीएम मशिन,
जिसमे पैसा सब डालते है!
लेकिन निकालते सिर्फ................है!

बाळाजीपंत,
भर गणेशोत्सवात आणि ते देखील नेमके ईदच्या मुहुर्तावर Happy

माणूस असो किंवा नसो. देव परमनंट आहे.
>>
म्हणजे आपल्यामते देव माणसांचाच नाही तर सर्वच प्राणीमात्रांचा आहे आणि माणसांमध्येही सर्वजातीधर्मीयांचा एकच आहे.
आक्षेप घेत नाहीये, बस्स कन्फर्म करतोय Happy

देवाशी पंगा ?

सीट बेल्ट लावलेले म्हणे अपघातात वाचतात ! आणी न लावलेले मरतात !
ईथे भुकंपात झालेल्या जमिनदोस्त इमारतीत ४-६ महिन्याच तान्ह न खरचटताही बाहेर येत.

२२ वर्ष उन्हा पावसात राबुन उभा डोंगर पोखरणार्या दशरथ मांझीला 'देव' आता मला मदत करेल असा विचार शिवला नाही. त्याने स्वतःच्या हिमतीवर लोकांच्या ट्क्का टोमण्याला न जुमानता राब राब राबुन २२ वर्षांनंतर ५५ किमी चा रस्ता ४० किमी ने छोटा केला.

देवाला आता येऊन त्याच अस्तित्व सिद्ध कर म्हणण्यापेक्षा स्वतःच अस्तित्व सिद्ध करा !

जो देव सगळ्यांचा आहे तर मी त्याच्यावर विश्वास ठेवो न ठेवो, त्याला माझीही काळजी घ्यावी लागेलच Happy

Pages