"रंगरेषांच्या देशा - श्रावण मासी हर्ष मानसी"

Submitted by अश्विनी के on 21 September, 2015 - 01:15

पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदिचे आले
माझ्या भाळावर थेंबाचे फुलपाखरू झाले
मातीच्या गंधाने भरला गगनाचा गाभारा
श्रावणात घन निळा बरसला.......

SHRAVAN 1.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अफाट सुंदर!

झोका घेताना शरीराला आलेला बाक आणि झोक्याचा जाणवणारा वेग - लाजवाब!

फोटोग्राफीत पॅनींग करतात. तू तर चित्रातून तो इफेक्ट आणला आहेस. Happy

ओ एम जी....... अमेझिंग!!!!!!!!! दोन तीन रंगांतच केव्हढा इफेक्ट साधलायेस...
अश्वी.. वॉव, तुझा हा गुण कस्काय लपून राहीला होता माझ्यापास्नं अजून पर्यन्त!!!! Happy

धन्यवाद Happy

वर्षूताई, अगं मायबोलीवरच्या जलरंग कार्यशाळेत लुडबुड केली होती की मी.

आहा!!!
अश्वे, अप्रतिम!!!
बोलतय ते चित्र चक्क.. फारच सुंदर!

छान Happy

अगगगग... ! काय सुरेख काढलयस!
रेषांमधलं फारसे कळत नाही पण सम्पुर्ण चित्रभरुन एक लय जाणवतेय. ... झोका घेत उजवीकडून डावीकडे जातांना 'तिच्या पाठीमागे ती गती दाखवणार्या स्ट्रोक्स आणि समोरून येणार्या श्रावणसरी अंगावर झेलतांनाचे उजवीकडे जाणारे स्ट्रोक्स एकच आहेत हे हे … इतकं अफलातून जमलय कि तिच्या पायांच्या ठिकाणी जिथे या रेषा क्रॉस व्हाव्या अस वाटत ना तिथेच नजर खिळून रहाते!
काय जादू केलीस नेमकी? Happy

मस्त लय पकडलीय.:स्मित: छान काढलय चित्र. एखादी मदमस्त पन्जाबीण सरसोके खेतमे झुला झूल रही है, ऐसा लग रहा है. ( पन्जाबी ड्रेस तस्साच वाटला म्हणून)

मस्त ! जबरीच काढले आहेस. आवडले.

पण एक प्रश्न - दोन्ही ब्लरी का काढलेस? ( झोका घेणारी तरूणी आणि बॅकग्राउंड)

केदार, झोक्याची आंदोलन गती, झोक्यामुळे वाऱ्याची तिच्यापुरती वाढणारी गती, आजूबाजूच्या हिरव्या निसर्गाला प्राप्त झालेली गती (प्रत्येक गवताच्या पात्याची सळसळ, पानांची हालचाल वगैरे), पावसाच्या सरींवर सरी येवून आसमंतात निर्माण झालेली हालचाल, झोक्यामुळे तिच्या शरिराला आणि वस्त्रांना मिळालेली लय.... ह्या सगळ्या बाह्यरूपात दिसणाऱ्या गतींशी मेळ खाणारे तिचे तरूण मन..... ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम आहे तो. श्रावणाचा उचंबळ आहे तो. सगळ्यालाच गती आहे तर ते ब्लर असणार.

झोका घेत असल्यामुळे येणारी लय मस्त जाणवतेय चित्रात!!!!
अन श्रावणातला तो हळदुला हिरवा रंग सही चितारलाय !!!!!

व्वा! खूप सुंदर.. कमीत कमी रंगांमध्ये कसला भारी इफेक्ट दिला आहे ..+१११

Pages