मायबोली गणेशोत्सव २०१५ - पाककृती स्पर्धा - 'अशी ही अदलाबदली' - मुदतवाढ!!

Submitted by संयोजक on 10 September, 2015 - 22:51

FoodCollageWithText&Logo.jpg

नमस्कार!

मायबोलीच्या गणेशोत्सवाचे प्रमुख आकर्षण असते पाककला स्पर्धा! अनेक चतुर कल्पना लढवत संयोजक मंडळ ही स्पर्धा अधिकाधिक आव्हानात्मक करण्याचा प्रयत्न करत असते आणि पाककलेत पारंगत असलेले खवय्ये मायबोलीकरही भरघोस प्रतिसाद देऊन 'हम भी कुछ कम नहीं' हेच दाखवून देत असतात. गणेशोत्सवाला खर्‍या अर्थाने लज्जत व रंगत चढते ती याच उपक्रमाने! तर यंदाही आम्ही ही परंपरा पुढे नेत तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक आगळीवेगळी पाककला स्पर्धा! 'अशी ही अदलाबदली'!!

अनेकदा असं होतं की एखादी पाककृती वाचल्यावर त्यातले जिन्नस आपल्याला सहजी उपलब्ध नसतात किंवा पथ्याला अनुकूल नसतात किंवा बच्चेकंपनीला आवडणारे नसतात. अर्थातच आपण विचार करू लागतो की, याऐवजी दुसरं काही वापरलं तर चालेल का? तर हो! आम्ही दिलेल्या काही निवडक पाककृतीत जे 'मुख्य घटक' दिले असतील त्या जागी तुम्हाला दुसरे "बदली घटक" वापरून त्या पदार्थाचा नवा प्रकार सादर करायचा आहे. यासाठी खालील नियम काळजीपूर्वक वाचा व काही प्रश्न असतील तर जरूर विचारा!

स्पर्धेचे नियम :

१) स्पर्धेकरिता ठरावीक कालांतराने मूळ पाककृती व त्या पाककृतीमधील बदलायचे घटक प्रसिद्ध करण्यात येतील. (प्रत्येक पाककृतीमध्ये १, २ किंवा जास्तीत जास्त ३ घटक बदलण्यास सांगितले असेल.)

२) बदलण्याकरिता देण्यात आलेला प्रत्येक घटक बदलून त्याजागी नवीन घटक घालणे अनिवार्य आहे. उदा. ३ घटक बदलण्यास सांगितले असतील तर केवळ १ किंवा २ घटक बदलून चालणार नाही. तिन्ही घटक बदलणे अनिवार्य असेल.

३) बदलण्यास सांगितलेल्या घटकांऐवजी तुम्ही कुठले घटक घातले आहेत याची पाककृतीच्या सुरुवातीस ठळक अक्षरांत नोंद असणे आवश्यक आहे.

४) पाककृतीतील इतर कुठलेही घटक वगळता येणार नाहीत.

५) बदललेला घटक मूळ घटकाऐवजी पाककृतीत मुख्य घटक म्हणून आणि सजावटीत वापरू शकता. फक्त सजावटीकरिता वापरता येणार नाही. बदलून कोणता पदार्थ घालावा यावर काहीही बंधन नाही. तसेच बदलून घालायचा पदार्थ कच्चा, चिरून, सोलून, वाळवून, कशाही प्रकारे शिजवून, भाजून, उकडून, गार करून,तळून, बेक करून, क्रश करून, वाटून, लाटून कसाही वापरू शकता.
६) नवीन पदार्थाच्या चवीवर बंधन नाही. म्हणजेच मूळ पाककृती गोड असेल व त्यात बदलायचा घटक म्हणूनब गूळ / साखर दिला असेल तर तुम्ही गुळाच्या जागी तिखट घालून तिखट पदार्थ बनवू शकता व मूळ पाकृ तिखट असेल तर तुम्ही तिला गोड करू शकता. चवीसाठी वापरण्यात येणार्या पदार्थांवर उदा.मीठ, तिखट, मसाले, मिरची, लसूण, आलं, साखर, मध, गूळ वगैरे वर आणि पाण्याच्या वापरावर प्रमाणांचं बंधन नाही. हे पदार्थ तुम्ही बदली घटकांव्यतिरक्तही वापरू शकता! तयार पदार्थाचा आकार बदलल्यास हरकत नाही, उदा. वड्यांऐवजी मोदक इ.ब थोडक्यात, तुमची कल्पकता वापरून मूळ घटक बदलून तुम्ही काहीही बनवू शकता!!
७) सामिष पदार्थ वापरता येणार नाहीत. पाककृती संपूर्ण शाकाहारी असवी. अंडेही नको. जिलेटिनचा वापर नसावा.

८) तयार पदार्थाचे प्रकाशचित्र अनिवार्य आहे. कृतीची (पायर्‍यांसहीत) प्रकाशचित्रे द्यायला हरकत नाही.

९) एक सदस्य जास्तीत जास्त दोन प्रवेशिका देऊ शकतो. एकाच पाककृतीत वेगवेगळे बदली घटक वापरून दोन वेगळ्या पाककृती बनवल्यास त्या दोन प्रवेशिका म्हणून धरण्यात येतील. विजेतेनिवड मतदान पद्धतीने होणार असल्याने एकाच स्पर्धकाच्या दोन्ही प्रवेशिका निवडून आल्यास हरकत घेता येणार नाही.

१०) एका प्रवेशिकेत एकच पाककृती असावी.

११) स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 'मायबोली गणेशोत्सव २०१५' या ग्रुपचे सदस्यत्व घेणे आवश्यक आहे. (ह्यासाठी मायबोली सदस्यत्त्व आवश्यक आहे.) हा ग्रूप गणेशचतुर्थीच्या दिवशी (म्हणजेच १७ सप्टेंबर २०१५, भारतीय प्रमाणवेळ) खुला होईल.

१२) आपली प्रवेशिका 'मायबोली गणेशोत्सव २०१५' ह्या ग्रूपमध्ये गणेशचतुर्थीच्या दिवसापासून (म्हणजेच १७ सप्टेंबर २०१५, भारतीय प्रमाण वेळ) २९ सप्टेंबर २०१५, अमेरिकेची पश्चिम किनार्‍यावरची प्रमाणवेळ पर्यंत प्रकाशित करावी.

१३) मायबोलीवर वा इतरत्र पूर्व प्रकाशित पाककृती येथे देता येणार नाही.

१४) धाग्याचे शीर्षक <अशी ही अदलाबदली>-<मूळ पाककृतीचे नांव>असे असावे. नवीन पाककृतीचे नाव मजकुरात सुरुवातीस लिहावे.

१५) नियम क्रमांक ९ मध्ये नमूद केल्याप्रमाणे विजेत्यांची निवड मतदानपद्धतीने केली जाईल. मतदान करण्याकरता मायबोली सदस्यत्व आवश्यक आहे

पाककृती क्रमांक १ : 'अशी ही अदलाबदली' - पाककृती क्र.१ : गाजर आणि चणा डाळ वडी

पाककॄती क्रमांक २ : 'अशी ही अदलाबदली' - पाककृती क्र.२ : ब्रह्मघोटाळ्याचे पराठे

पाककॄती क्रमांक ३ : 'अशी ही अदलाबदली' - पाककृती क्र.३ : मद्रासी सांबार कांद्यांची कलेजी

पाककॄती क्रमांक ४ : 'अशी ही अदलाबदली' - पाककृती क्र.४ : स्पायसी सॅलड स्टॅक

पाककॄती क्रमांक ५ 'अशी ही अदलाबदली' - पाककृती क्र.५ - ओटसचे मोदक

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद संयोजक Happy

अजुन जरा क्लॅरिफाय करा प्लिज..

१. वरच्या बललेल्या नियम ५ नुसार..." बदलून कोणता पदार्थ घालावा यावर काहीही बंधन नाही. तसेच बदलून घालायचा पदार्थ कच्चा, चिरून, सोलून, वाळवून, कशाही प्रकारे शिजवून, भाजून, उकडून, गार करून,तळून, बेक करून, क्रश करून, वाटून, लाटून कसाही वापरू शकता". ... याच अर्थ.. बदलेला पदार्थ कुठल्याही फॉर्म मधे चालेल... पण मुळ कृती ज्या पद्धतीने केली आहे तशीच करयची का.. म्हणजे उकडलेली असल्यास उकडुन??? किसलेल्या गाजरा ऐवजी मी बेक्ड पोटॅटो घालु शकते पण वडी/लाडु मात्र शिजवुन केले पाहिजेत??? बेक करुन / तळून चालणार नाही...

२. नियम ६ नुसार... "तयार पदार्थाचा आकार बदलल्यास हरकत नाही, उदा. वड्यांऐवजी मोदक इ."... इथले मोदक सारण भरलेले आहेत त्याऐवजी मी सगळे एकत्र कालवुनच पेढा बनवला तर चलेल का किंवा पराठ्याची कणिक सगळं एकत्र न मळता स्ट्फ्ड पुर्‍या करुन बेक केल्या तर चालतिल का?

"तुमची कल्पकता वापरून मूळ घटक बदलून तुम्ही काहीही बनवू शकता"... असं म्हणता... तर फक्त २-३ घटक बदलण्या शिवाय कुठलेच रिस्ट्रिक्शन नको ना?

चुभुदेघे _/\_ Happy

संयोजक,
बदली पदार्थाचे प्रमाण बदलले तर चालेल ना. क्षमा असावी अगोदरच हे कुठे लिहिण्यात आल असेल तर.
तसच क्रुती मध्ये दिलेल्या इतर पदार्थांच प्रमाण बदलल तर चालेल ना?

सीमा, संयोजकांनी याआधीच्या पानावर, काल पुन्हा एकदा सांगितले आहे.

संयोजक | 24 September, 2015 - 11:35

पहिल्या पाककृतीवर यावर चर्चा झाली आहे. प्रमाणाचा नियम लिहीला नसला तरी ते गृहीत आहे. समजा उद्या बटाटेवड्यात बटाटा हाच घटक बदलायचा ठरलं, तर तो जिन्नस साधारण त्याच प्रमाणात घ्यावा लागेल ना? थोडं मागेपुढे चालू शकतं पण वाटीचं प्रमाण चमच्यात करू नका असं सांगितलं आहे.

लाजो, मलाही हे प्रश्न आहेत पण मला वाटते नव्या नियमानुसार मुळ घटक आणि बदललेले घटक घेऊन पदार्थ बनवा, मग तो कसाही असला तरी चालेल. म्हणजे मुळ जर वेज पराठा असेल तर तुम्ही त्याचे बदललेले रुप म्हणुन अ‍ॅपल पाय बेक करुन बनवा पण त्यातले घटक मात्र मुळ रेसिपितले हवेत आणि शक्य तितक्या त्याच प्रमाणात हवेत. म्हणजे २ बटाटे सांगितलेत तर त्याचे तिन करु शकतो किंवा दिड करु शकतो पण २ च्या जागी २ किलो वापरता नाही येणार. Happy तसेच १ वाटी गुळाच्या जागी १ चमचा तिखट वापरु शकतो किंवा उलट. कारण हा प्रश्न चवीशी निगडित होतो.

पण मूळ पाककृतीत तीन कप गाजराचा कीस घेतला असेल तर मी ३ नैवेद्याच्या वाट्या गाकी घेऊ शकते ना?
माझ्या घरी तीन कपाच्या प्रमाणात केलेला पदार्थ खपणारच नाही. पुढचे तीन दिवस खावा लागेल.

प्रमाण म्हणजे इथे गुणोत्तर; मूळ पाककृतीतील मापे नव्हे- असा अर्थ मी लावलाय. एका प्रवेशिकेत तसेच केलेले आहे. मुळात प्रयोग करायचेत म्हटल्यावर कमी क्वांटिटी घेऊनच केलेलं बरं.

Hi sanyojak,

Tumache Uttar nakki kuthalya prashnala? Ki sagalya post la?

Additional be pa / be so chalanar aahe Ka?

Please lavkar uttar dyal Ka?

Pages