खवा - पाव किलो
सुक खोबर - पाव किलो ( खोबर्याच्या वाटीची साल पूर्ण काढून घ्या. हे काम आऊटसोर्स केल तरी चालेल )
पिठी साखर - अर्धा किलो किंवा तुम्हाला किती गोड हव ह्यावर अवलंबून आहे.
ड्राय फ्रुटस (काजू, बदाम, पिस्ता) पावडर - १ मोठी वाटी
वेलची पावडर - ४ टि. स्पून
जायफळ पावडर - २ टी. स्पून
खसखस - २ टे.स्पून
बारीक रवा - २ वाटी
मैदा - १ वाटी
तूप - २ टे.स्पून पिठात घालण्यासाठी तसेच तळायला लागेल तसे
१. सुक्या खोबर्याची पाठ खरवडून पांढरी शुभ्र करा. त्याचे छोटे तुकडे करून मिक्सरमध्ये पावडर करून घ्या.
२. सुक खोबर मंद गॅसवर भाजून घ्या.
३. खसखस भाजून घ्या. करपवू नका.
४. खवा मंद गॅसवर भाजून घ्या.
५. खवा थंड झाल्यावर त्यात भाजलेल भाजलेल सुक खोबर,खसखस, पिठी साखर, ड्रायफ्रुट पावडर, वेलची - जायफळ पावडर मिक्स करा. हे झाल सारण तयार.
६. रव्याच्या बरोबरीने पाणी घालून १० मि. तसेच ठेवा. नंतर त्यात मैदा, २ टे. स्पून तूप गरम करून किंवा थंड कसेही घाला. दोन्ही पद्धतीने केल्या छान झाल्या. सगळ मिक्स करून मळून घ्या. आणि १/२ तास झाकून ठेवा. अर्ध्या तासाने पिठाचा गोळा असा दिसेल.
७. छोटे गोळे करून पुरी लाटा त्यात खव्याच सारण भरून करंजी बनवा. ओल्या रूमालाखाली करंजी झाकून ठेवा. १०-१२ झाल्या कि तळायला घ्या. तुमच्याकडे मॅन पॉवर जास्त असेल तर करंज्या ओल्या रुमालाखाली झाकून ठेवायची गरज नाही. ह्या कामासाठी कमीत कमी तीन माणस हवीत नाहीतर एकटीने करा.
८. कढईत तूप गरम करून गॅस स्लो फ्लेमवर ठेवा आणि करंज्या तळून घ्या.
ह्या पांढर्या शुभ्र दिसतात आणि तोंडात टाकल्या कि विरघळतात.
ह्या करंजीत मणुका घालू नका, कारण चावायचे कष्ट करायचे नाही आहेत.
छानच।
छानच।
मस्त रेसिपी आहे आरती.
मस्त रेसिपी आहे आरती.
खव्याचे सारण करण्यापेक्षा मावा बरफी बाजारातून आणली आणि कुस्करून घातली तरी मस्त लागते. त्रास कमी.
मैदा अजिबात न घेता व भिजवलेला रवा ग्राइंडरमध्ये कुटून मग त्याला मथलेल्या तुपाचे सारण लावून पारी करते मी त्यामुळे पापुद्रे छान सुटतात.
फोटो छान दिसतायत करंजीचे
छानच! आली दिवाळी!! मी या
छानच!

आली दिवाळी!!
मी या रविवारीच करणार
मस्तच! सातीतै.. विपुत माझ्या
मस्तच!

सातीतै.. विपुत माझ्या घरचा पत्ता देवु ना पार्सल करायला ?
आशिका, त्या कानवल्यांसाठी
आशिका, त्या कानवल्यांसाठी पत्ता मेल करु का.

धन्यवाद दिनेशदा, साती, आशिका, चनस.
फक्त रव्याच्या ह्या शनिवारी ट्राय करेन.
चनस, आधी इथे फोटो
चनस, आधी इथे फोटो टाकते.

आवडल्या तर ऑर्डर कर.
आरती मस्त आहेत करन्ज्या.
आरती मस्त आहेत करन्ज्या.
आरती, पत्ता काय तु खायलाच ये
आरती, पत्ता काय तु खायलाच ये दिवाळीला.
मस्त!
मस्त!
मस्त! करंजी... मग ती ओल्या
मस्त! करंजी... मग ती ओल्या नारळाची असो वा सुक्या खोबर्याची असो...खूप आवडते.
मस्तच आरती..
मस्तच आरती..
खुपच छान. एकदम तोम्पासु
खुपच छान.
एकदम तोम्पासु
छानच आहे. खटाटोप आहे पण तो
छानच आहे.
खटाटोप आहे पण तो कमी करता येईल, इथे पांढरे शुभ्र किसलेले सुके खोबरे मिळते, वरची बर्फीची आयडिया मस्त, आशिका. नाहीतर पेढे टाकेन.
मुहूर्त कधी लागेल सांगू शकत नाही, इतक्या लवकर नाही लागणार ;),
.
मला वाटते घरी भाजून घेतलेला
मला वाटते घरी भाजून घेतलेला खवा जास्त खमंग लागेल
मलाही असंच वाटतं! ताज्या
मलाही असंच वाटतं! ताज्या खव्याच्या करंज्या अगदी आहाहा लागतील !
( मी एक गोडखाऊ )
आशिका, धन्यवाद नक्की येईन.
आशिका, धन्यवाद नक्की येईन.

( मी एक गोडखाऊ ) <<<< + १
धन्यवाद सर्वांना.
आरती मस्त दिसतात करंज्या
आरती मस्त दिसतात करंज्या . या सारणाच्या साट्याच्या पण छान होतात .तुला खूप आवड दिसते करून पाहण्याची .
प्रभाकाकू धन्यवाद. तुला खूप
प्रभाकाकू धन्यवाद.
तुला खूप आवड दिसते करून पाहण्याची . <<<< आवड रोज गोड खाण्याची आहे आणि इथे स्वतः केल्याशिवाय काही मिळणार नाही अशी परीस्थिती आहे.
शेवटी रवीवारऐवजी काल
शेवटी रवीवारऐवजी काल केल्या.

रंग इतका पांढरा नाही झाला, पण आमच्यासारख्या शिकाऊ गड्यांना चालतंय!
या प्रकाराने पारीचं पीठ मात्रं अगदी मऊ लुसलुशीत, आणि करंज्या खरेच तोंडात विरघळतायत.
भारीच ! साती तुझ्याही करंज्या
भारीच !
साती तुझ्याही करंज्या मस्त दिसतायंत.
सगळे मिळून तुप किती लागत असेल
सगळे मिळून तुप किती लागत असेल एवढ्या प्रमाणासाठी? तळायचे पण तुपातच आहे ना!
मी पाच टी स्पून घरचं तूप
मी पाच टी स्पून घरचं तूप पारीत घातलं.
मी वनस्पतीच वापरले.)
एवढ्या प्रमाणाच्या करंज्या तळायला पाव कि पेक्षा जास्त तूप लागले.
(तेवढं परवडणार नसल्याने
खवा करंज्या तोंपासु. पण त्या
खवा करंज्या तोंपासु.
पण त्या फारच पांढर्याफटक दिसत असल्याने कच्च्या राहील्यात असे वाटतेय. 
वॉव..मस्तं दिसताहेत करंज्या.
वॉव..मस्तं दिसताहेत करंज्या. खरंच तोंडात टाकल्याबरोबर विरघळतील अशा वाटणार्या. सणासुदीच्या काळात अगदी समयोचित पाककृती.
सातीच्या करंज्या पण मस्तं.
साती, मस्त फोटो आणि करंज्या
साती, मस्त फोटो आणि करंज्या बनवून स्वत: खाऊन प्रतिसाद दिल्याबद्दल खूप धन्यवाद.

पांढर्याफटक दिसत असल्याने कच्च्या राहील्यात असे वाटतेय. <<<< कांपो, कच्च्या नाही राहत. तूप गरम करून स्लो फ्लेमवर तळायच्या. खूप पेशन्स लागतात तळायला.
स्वत: खाऊन >>>>
स्वत: खाऊन >>>>

मस्त.
मस्त.
आम्ही मोदक आणि करंज्याकरतो
आम्ही मोदक आणि करंज्याकरतो रव्याची पारी वापरून पण मैदा नाही वापरत.
माझ्या आवडत्या करंज्या आहेत आरती.
रव्यात बरोबरीने पाणी घालायचं
रव्यात बरोबरीने पाणी घालायचं म्हणजे नक्की काय करायचं? रवा भिजेपर्यंत पाणी घालायचं कि २ वाटी रव्याला २ वाट्या पाणी घालायचं?