खव्याच्या करंज्या

Submitted by आरती. on 9 September, 2015 - 04:29
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

karanji_0.jpg

खवा - पाव किलो
सुक खोबर - पाव किलो ( खोबर्‍याच्या वाटीची साल पूर्ण काढून घ्या. हे काम आऊटसोर्स केल तरी चालेल Wink )
पिठी साखर - अर्धा किलो किंवा तुम्हाला किती गोड हव ह्यावर अवलंबून आहे.
ड्राय फ्रुटस (काजू, बदाम, पिस्ता) पावडर - १ मोठी वाटी
वेलची पावडर - ४ टि. स्पून
जायफळ पावडर - २ टी. स्पून
खसखस - २ टे.स्पून
बारीक रवा - २ वाटी
मैदा - १ वाटी
तूप - २ टे.स्पून पिठात घालण्यासाठी तसेच तळायला लागेल तसे

क्रमवार पाककृती: 

१. सुक्या खोबर्‍याची पाठ खरवडून पांढरी शुभ्र करा. त्याचे छोटे तुकडे करून मिक्सरमध्ये पावडर करून घ्या.
२. सुक खोबर मंद गॅसवर भाजून घ्या.
coconut powder.jpg

३. खसखस भाजून घ्या. करपवू नका.

४. खवा मंद गॅसवर भाजून घ्या.
khava.jpg

५. खवा थंड झाल्यावर त्यात भाजलेल भाजलेल सुक खोबर,खसखस, पिठी साखर, ड्रायफ्रुट पावडर, वेलची - जायफळ पावडर मिक्स करा. हे झाल सारण तयार.
puran.jpg

६. रव्याच्या बरोबरीने पाणी घालून १० मि. तसेच ठेवा. नंतर त्यात मैदा, २ टे. स्पून तूप गरम करून किंवा थंड कसेही घाला. दोन्ही पद्धतीने केल्या छान झाल्या. Happy सगळ मिक्स करून मळून घ्या. आणि १/२ तास झाकून ठेवा. अर्ध्या तासाने पिठाचा गोळा असा दिसेल.

rava maida gola.jpg

७. छोटे गोळे करून पुरी लाटा त्यात खव्याच सारण भरून करंजी बनवा. ओल्या रूमालाखाली करंजी झाकून ठेवा. १०-१२ झाल्या कि तळायला घ्या. तुमच्याकडे मॅन पॉवर जास्त असेल तर करंज्या ओल्या रुमालाखाली झाकून ठेवायची गरज नाही. Wink ह्या कामासाठी कमीत कमी तीन माणस हवीत नाहीतर एकटीने करा. Happy

८. कढईत तूप गरम करून गॅस स्लो फ्लेमवर ठेवा आणि करंज्या तळून घ्या.

वाढणी/प्रमाण: 
गोड खाणार्‍यांना कितीही द्या कमीच होतात.
अधिक टिपा: 

ह्या पांढर्‍या शुभ्र दिसतात आणि तोंडात टाकल्या कि विरघळतात.
ह्या करंजीत मणुका घालू नका, कारण चावायचे कष्ट करायचे नाही आहेत. Proud

माहितीचा स्रोत: 
खव्याचे सारण शेजारच्या पंजाबी आंटी आणि पारीची कृती आईची.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त रेसिपी आहे आरती.

खव्याचे सारण करण्यापेक्षा मावा बरफी बाजारातून आणली आणि कुस्करून घातली तरी मस्त लागते. त्रास कमी.

मैदा अजिबात न घेता व भिजवलेला रवा ग्राइंडरमध्ये कुटून मग त्याला मथलेल्या तुपाचे सारण लावून पारी करते मी त्यामुळे पापुद्रे छान सुटतात.

फोटो छान दिसतायत करंजीचे

आशिका, त्या कानवल्यांसाठी पत्ता मेल करु का. Wink Happy
धन्यवाद दिनेशदा, साती, आशिका, चनस.
फक्त रव्याच्या ह्या शनिवारी ट्राय करेन.

छानच आहे.

खटाटोप आहे पण तो कमी करता येईल, इथे पांढरे शुभ्र किसलेले सुके खोबरे मिळते, वरची बर्फीची आयडिया मस्त, आशिका. नाहीतर पेढे टाकेन.

मुहूर्त कधी लागेल सांगू शकत नाही, इतक्या लवकर नाही लागणार ;), Lol .

आरती मस्त दिसतात करंज्या . या सारणाच्या साट्याच्या पण छान होतात .तुला खूप आवड दिसते करून पाहण्याची .

प्रभाकाकू धन्यवाद.
तुला खूप आवड दिसते करून पाहण्याची . <<<< आवड रोज गोड खाण्याची आहे आणि इथे स्वतः केल्याशिवाय काही मिळणार नाही अशी परीस्थिती आहे. Happy

शेवटी रवीवारऐवजी काल केल्या.
रंग इतका पांढरा नाही झाला, पण आमच्यासारख्या शिकाऊ गड्यांना चालतंय!
Happy

या प्रकाराने पारीचं पीठ मात्रं अगदी मऊ लुसलुशीत, आणि करंज्या खरेच तोंडात विरघळतायत.

image_47.jpg

मी पाच टी स्पून घरचं तूप पारीत घातलं.
एवढ्या प्रमाणाच्या करंज्या तळायला पाव कि पेक्षा जास्त तूप लागले.
(तेवढं परवडणार नसल्याने Wink मी वनस्पतीच वापरले.)

वॉव..मस्तं दिसताहेत करंज्या. खरंच तोंडात टाकल्याबरोबर विरघळतील अशा वाटणार्‍या. सणासुदीच्या काळात अगदी समयोचित पाककृती.
सातीच्या करंज्या पण मस्तं.

साती, मस्त फोटो आणि करंज्या बनवून स्वत: खाऊन प्रतिसाद दिल्याबद्दल खूप धन्यवाद. Happy
पांढर्‍याफटक दिसत असल्याने कच्च्या राहील्यात असे वाटतेय. <<<< कांपो, कच्च्या नाही राहत. तूप गरम करून स्लो फ्लेमवर तळायच्या. खूप पेशन्स लागतात तळायला. Proud

मस्त.

रव्यात बरोबरीने पाणी घालायचं म्हणजे नक्की काय करायचं? रवा भिजेपर्यंत पाणी घालायचं कि २ वाटी रव्याला २ वाट्या पाणी घालायचं?