"मटा संवाद पुस्तक परिक्षण...अभिनंदन प्रकाशन.. अविनाश कुंभार...चित्रचौर्य आणि माझी हेरगिरी"
या हेरगिरीची सुरवात झाली माझ्या भावाच्या किशोरच्या फ़ेसबूक पोस्टमुळे. त्याने मटा संवाद मधल्या परिक्षणाचा फ़ोटो टाकून त्याला टॅग केलं आणि या प्रकरणाने माझं लक्षं वेधलं.
झालं असं होतं की "निवद" नावाच्या पुस्तकात ज्यांचं मुखपृष्ठकार म्हणून नाव आहे त्या अविनाश कुंभारांनी माझ्या भावाचं किशोरचं चित्रं वापरलं होतं. ही गोष्टं भावाला संवाद वाचल्यावर कळली त्यामुळे त्याने तशी फ़ेसबूक पोस्ट टाकली व आम्ही दोघे याच्या मुळाशी जायचं ठरवून कामाला लागलो.
प्रकाशकांना फ़ोन करुन त्या चित्रकाराचा नंबर मिळवला. त्या चित्रकाराशी बोलण्यापुर्वी मोबाईलवर कॉल रेकॉर्ड नावाचं ऍप डाऊनलोड करुन ट्रायल रन घेतली. मग सुरवतीला त्याला मी जे जे स्कूलची पास आऊट असल्याचं सांगून त्याच्या "त्या" चित्राचं कौतूक केलं. कौतूक सोहळा आटोपल्यावर त्याला उगाचच थोडे टेक्नीकल प्रश्न विचारले - जसं चित्राचं माध्यम इ. इ. आणि तिथे इतका वेळ कौतूकाने हरभऱ्याच्या झाडावर चढलेला तो गडबडला. सरळ शरणागती पत्करत त्याने "मी कार्टुनिस्ट आहे, मी खरतर हे कधी केलं नाही अशी कबूली देऊन टाकली" अर्थात त्यामुळे काही तो त्या चित्राचा मालक नाही हे ठरत नव्हतं पण माणूस खोटा असेल तेव्हाच असा "अचानक कल्पना नसताना" केलेला हल्ला पटकन परतवू शकत नाही आणि त्यामुळे पकडला जातो. त्या भागाच्या खोलात जात नाही पण भावाने त्याला केलेल्या फोनवर चित्रकाराने त्याने चित्रं "उचललं" असल्याची कबूली दिली.
तो त्याच्या वर्तुळातल्यांच्या मदतीने आणि मी माझ्यापरीने हे धसास लावून धरत होते.
जरा त्या कार्टुनिस्टचा शोध घेत हेरगिरी करताना कळलं की तो जो कोणी चित्रकार कार्टूनिस्ट आहे त्याच्या आणि माझ्या फ़ेसबूक फ़्रेन्ड्लिस्ट्मधे एक नाव कॉमन आहे. तो पत्ता वापरायची वेळ आली नाही म्हणा.
या प्रकरणात चिनूक्सची सर्वात आधी मदत घेतली आणि लिगल नोटीस देण्याच्या दृष्टीने माबोकर मुग्धानंद व - उजू अशा वकील मैत्रिणींशीही सल्लामसलत केली. सहज म्हणून कट्ट्यावर "अभिनंदन प्रकाशन" बद्दल विचारणा केली आणि दुनिया छोटी है चा प्रत्यय देत राम ने सांगितलं "कवे, अभिंनदन प्रकाशनचा जोशी माझा सख्खा मावसभाऊ आहे" मग काय टाकलं थोडं ओझं त्याच्या खांद्यावर - हर एक फ़्रेन्ड जरुरी होता है म्हणतात ते काय उगाच wink emoticon (तो मनात हर एक फ़्रेन्ड कमिना होता है म्हणत बसला असेल पण तेव्हढं चालतं मैत्रीत :P) मग रामची आणि चिन्मयची मात्रा योग्यवेळी आणि योग्यठिकाणी लागू पडून एकादिवसात सगळा प्रश्नच सुटला.
भावाला त्या चित्रकाराच्या मित्राने फोन करुन आमच्या खालील दोन्ही मागण्या मान्य असल्याचं सांगितलं
१. नुकसान भरपाई द्यावी
२. पुस्तकावर करेक्शन स्लीप लावून त्यात "मुखपृष्ठाकरता वापरलेलं धनगराचं व्यक्तीचित्र हे किशोर गोविलकर यांच आहे" असा त्यावर स्पष्टं उल्लेख असावा
त्यानुसार, करेक्शन स्लिप लावलेली एक प्रत भावाच्या हातात पोस्टाने आली आहे. जिचा फ़ोटो मी इथे सोबत जोडला आहे. आणि नुकसानभरपाई म्हणून मागण्यात आलेल्या मानधनापैकी निम्मी रक्कम त्याच्या खात्यात जमा झाली आहे.
माझा डिटेक्टिव्हमोड अजूनही चालू आहेच. मुंबईतल्या बूकशॉप्समधे अजूनही हे पुस्तक आलेलं नाहीये. मी एक कॉपी सांगून ठेवली आहे. त्यावरही करेक्शन स्लीप्स लावल्या आहेत की फ़क्तं भावाला पाठवून दिलेल्या कॉपीवर बोळवण केलेय हे मी शोधत रहाणार आहेच
यासगळ्यात जो पुढे जाण्यासाठी एक सपोर्ट लागतो तो मला सगळ्याच मित्रं मैत्रिणींकडून मिळाला म्हणून हे अपडेट मी इथे देत आहे.
भाऊ आणि माझ्यातर्फ़े चिनूक्स आणि राम यांचे स्पेशल आभार.
हा झाला चित्रकला चोरीचा प्रकार. पण काही वर्षांपुर्वी आपल्या मायबोलीवरुन माझ्या, शशांक पुरोहितांच्या व कर्णिकांच्या काही बालकविता एका वेगळ्या वेबसाईट्वर आम्हाला न विचारता आणि अर्थातच क्रेडीटही न देता टाकल्या होत्या. त्यासंदर्भात त्यावेळी त्या वेबसाईटवाल्याच्या हे लक्षात आणून दिल्यावर त्याने आधी त्या कविता त्याच्याच आहेत, त्याच्या मित्रांच्याच आहेत असा आव आणला. मी पुरावा आहे माझ्याकडे असं सांगितल्यावर मग त्याने "मग असतील तुमच्या, मी प्रसिद्ध करुन तुम्हाला मोठं करतोय" असा कांगावा केला. मग परत परत मागे लागल्यावर त्याने त्या एकदाच्या कटकट नको म्हणून कायमच्या त्याच्या पेजवरुन काढून टाकल्या (शेवटपर्यंत लेकाचा ज्याचं क्रेडीट त्याला द्यायला काही तयार झाला नाही ) असो. पण त्यावेळी मला ओळख ना पाळख असतानाही "कांचन कराई" या ब्लॉगरने खूप मदत केली. पुरावे कसे सेव्ह करावेत, इमेलची भाषा कशी ठेवावी इ. चे खूप छान मार्गदर्शन केले. तिच्या सजेशन नुसार मी कॅचफाईल्स वगैरे सेव्ह करुन ठेवल्या, जेणेकरुन त्याने पब्लीश केलेल्या डेट्सच्या आधी माझ्या माबोवर्/ब्लॉगवर पब्लीश केलेल्या डेट्स आहेत हे सप्रमाण सिद्ध करु शकेन. माझ्या कविता काही फार उच्च होत्या असा माझा समज तेव्हाही नव्हता आणि आताही नाही, पण तरी चोरी करणार्याला तसच सोडून द्यायच? पटलं नव्हतं म्हणुन तेव्हा तो खटाटोप केला होता.
भावाच्या केसमधे मला त्या अनुभवाचाही उपयोग झाला. किमान पाठपुरावा केला तर आपण न्याय मिळवूही शकू असा आत्मविश्वास त्या पहील्या अनुभवाने दिला होता. ज्याला जोड चिनूक्स, मुग्धानंद, उजू, राम यासगळ्यांची मिळाली आणि प्रश्नाच्या मुळापर्यंत गेल्याचं प्रचंड समाधान मिळालं
हे ते मुखपृष्ठ. यातील धनगराचं व्यक्तीचित्रं किशोरचं आहे
करेक्शन नोट लावून किशोरला पोस्टाने पाठवून दिलेल्या पुस्तकाच्या कॉपीमधलं हे करेक्शन नोट असलेलं पान
धन्यवाद !
खालिल प्रमाणे सेटिंग केल्यावर
खालिल प्रमाणे सेटिंग केल्यावर कोणालाही तुमच्या blog वरचा मजकूर copy करता येत नाही.
>>
गंभीरपणे नमुद करता, या प्रमाणे फक्त "माऊस ने क्लिक करुन" कॉपी करता येणे बंद करता येते.
असे करुनही ईतर अनेक मार्गांनी एखाद्याला जर कॉपी करायचेच असेल तर ते करता येतेच.
सगळ्यात शेवटी, याहीपेक्षा जास्त सुरक्षा ठेवली तरी, एखाद्या कडे अगदीच तसे काही भक्कम कारण असेल कॉपी करण्यासाठी, तर तो स्क्रिनशॉट घेऊन स्वतः ते टाईप करुच शकतो.
धडपडीला यश मिळणे अभिनंदनीय
धडपडीला यश मिळणे अभिनंदनीय आहे.
व्हेरी गूड, आणि मायबोली
व्हेरी गूड, आणि मायबोली मित्रांचे सहकार्य झाले हे त्यापेक्षा छान.
ग्रेट. शेवटपर्यंत नेलंत
ग्रेट. शेवटपर्यंत नेलंत म्हणून कौतुक आणि अभिनंदन.
वा! अभिनंदन!
वा! अभिनंदन!
वा वा वा! कविता, इथे लिहिलेस
वा वा वा!
कविता, इथे लिहिलेस बरे केलेस. आम्हालाही आनंद वाटला वाचताना.
स्पॉक, तुमचा प्रतिसाद आवडला.
स्पॉक,
तुमचा प्रतिसाद आवडला. एका टिंबात ब्रह्म्हांडाचे ज्ञान भरलेले आहे हे तुम्ही दा़खवून दिलेत. धन्यवाद.
असेच प्रतिसाद लिहीत रहा.
आपला नम्र चाहता.
झक्की
इथे येऊन वाचून प्रतिसाद
इथे येऊन वाचून प्रतिसाद देणार्या सगळ्यांचेच आभार.
@मामी, ते एक कोडच आहे. कदाचित त्याचा ब्लॉग्/फेसबूक अल्बम/ वेबसाईट (वेबसाईट वर हे पर्टिक्युलर चित्रं आहे का मी ही चेक नाही केलय) थोडक्यात स्कॅन इमेज जी त्याने अपलोड केलेय जालावर त्यातून त्याला हे चित्रं सेव्ह अॅज करुन मिळालय.
किशोरपण आता जरा अल्बम प्रायव्हसी आणि इतर गोष्टी चेक करतो आहेच.
अर्थात आपल्या दृष्टीआड काही घडणारच नाही सुरक्षा बाळगली की असा भाबडा विश्वास नाहीये मला. पण आपणही थोडं सुरक्षेच्या दृष्टीने सावध राहू आणि लक्षात आली चोरी तर फाईट करु असं किमान मी ठरवलय सध्या.
कविन, मागे लागून प्रकरण तडीला
कविन, मागे लागून प्रकरण तडीला नेल्याबद्दल अभिनंदन.
झक्की काहीही कळले नाही......
झक्की
काहीही कळले नाही......
त्या टिंबाच्या लगेच नंतर एक
त्या टिंबाच्या लगेच नंतर एक व्यवस्थित प्रतिसाद दिलेला आहे. तो दिसला नाही तुम्हाला झक्की?
तुम्हाला नक्की (नक्की - झक्की!) काय म्हणायचे आहे ते कळले नाही.
कविन, चित्र भारीच आहे!
कविन, चित्र भारीच आहे!
पण अश्या चोरी करण्यावर सुद्धा
पण अश्या चोरी करण्यावर सुद्धा कायदे आले पाहिजेत जसे ईंटरनेट हॅरेस्मेंट/स्टाकींग्/बुलिंग वर आहेत तसे.
चित्रं अप्रतिम!
चित्रं अप्रतिम!
मस्तच.. मला तर परवानगीशिवाय
मस्तच..
मला तर परवानगीशिवाय कुणी आपल्या पोस्ट शेअर केलेल्यासुद्धा आवडत नै..
एका वाक्यात विचारायला पन काय बाधत लोकांच कळत नै..
बापरे, मला हे कळत नाही,
बापरे, मला हे कळत नाही, बिनधास्त पणे चित्र पुस्तकाचं मुखपृष्ठ म्हणून वापरायची हिंमतच कशी झाली??
बिनधास्त मुखपृष्ठ : अविनाश कुंभार असं लिहून मोकळे????
तुझं आणि तुझ्या भावाचं अभिनंदन! चित्र फारच सुंदर आहे...
या सर्व प्रकारात प्रकाशक इतके
या सर्व प्रकारात प्रकाशक इतके निर्दोष आहेत का? एखाद्या चित्राची मूळ प्रत न वापरता वा बघता ते मुखपृष्ठासाठी प्रिन्टिंगला घेतात का?
ग्रेट कविता. सर्वांचेच
ग्रेट कविता. सर्वांचेच अभिनंदन.
भावाचे चित्र अप्रतिम.
ओरिजिनल चित्रही लावा.
ओरिजिनल चित्रही लावा.
ग्रेट जॉब कविन
ग्रेट जॉब कविन
अभिनन्दन कविन! तुम्हा दोघाना
अभिनन्दन कविन! तुम्हा दोघाना ह्यात यश मिळाले ह्याचा आनन्द झाला. खुशाल दुसर्या कुणाची कलाकृती/विचार आपल्या नावावर खपवण्याची इछ्छा असणे ही वृत्ती अनाकलनीय आहे. प्रकाशकान्च्या जबाबदारीबाबत टण्या +१.
चिकाटीने पाठपुरावा करून
चिकाटीने पाठपुरावा करून प्रकरण तडीला नेल्याबद्दल है शाब्बास कवे! आता पुढच्या घडामोडी तुमच्या मनाप्रमाणे पूर्ण होवोत अश्या शुभेच्छा!
फेसबूकवर 'अस्मितागिरी' हा शब्द वापरला आहेस, पण हे प्रकरण चांगलेच गंभीर आहे. पदवीदान समारंभासाठी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीचा बोर्ड वापरल्यासारखे वाटते.
मंजूडे : D अगं हे सगळं चालू
मंजूडे : D
अगं हे सगळं चालू असताना मी घरी अपडेट्स द्यायला लागले की सानिका म्हणायची "आई अस्मिता झालेय" . म्हणून तिथे तो शब्दं वापरलेला.
लहान मुलांचीच सिरीयल आहे ती म्हणून सानू आवडीने बघते ती.
आमच्याकडे पण पण अगदी गालावर
आमच्याकडे पण पण अगदी गालावर हात ठेवून ती सिरीयल बघायची असते. पण ८:३० टिव्ही बंद होतो तिच्यासाठी.
मागे लागून प्रकरण तडीला
मागे लागून प्रकरण तडीला नेल्याबद्दल अभिनंदन >> +१
इथे लिहिल्याबद्दल धन्यवाद
अभिनंदन कविता!!! चित्र खरोखर
अभिनंदन कविता!!! चित्र खरोखर सुरेख आहे.
व्वा, छानच. फेसबुकवर हे
व्वा, छानच. फेसबुकवर हे प्रकरण पाहिले/वाचले होते.
नेटाने धसास लावलेत त्याबद्दल अभिनंदन, तसच केलेल्या मदतिबद्दल इतरांचेही कौतुक.
शाब्बास कवे!
शाब्बास कवे!
है शाब्बास!
है शाब्बास!
कविन, चित्रं अप्रतिम
कविन, चित्रं अप्रतिम आहे.
या सर्व प्रकारात प्रकाशक इतके निर्दोष आहेत का? एखाद्या चित्राची मूळ प्रत न वापरता वा बघता ते मुखपृष्ठासाठी प्रिन्टिंगला घेतात का? >>>> टण्या + १
ती करेक्शन नोट लावली असली तरीही ....
मुखपृष्ठ : अविनाश कुंभार, कोल्हापूर
असं दिसत आहे जे चुकीचं आहे.
मुखपृष्ठ : किशोर गोविलकर
मुखपृष्ठ मांडणी : अविनाश कुंभार
अशी खरी तर करेक्शन नोट हवी. ती नोट आधीच्या मुखपृष्ठ च्या ओळीवरच चिकटवायला हवी. शिवाय सोबत प्रकाशकाची दिलगिरीही हवी. मेजर झोल घातला गेलाय पण प्रकाशक आणि चोर थोडक्यात सुटलाय.
Pages