साहित्य-कला चोरी आणि त्यासंदर्भात केलेला पाठपुरावा - एक छोटा व्यक्तीगत अनुभव

Submitted by कविन on 9 September, 2015 - 04:25

"मटा संवाद पुस्तक परिक्षण...अभिनंदन प्रकाशन.. अविनाश कुंभार...चित्रचौर्य आणि माझी हेरगिरी"

या हेरगिरीची सुरवात झाली माझ्या भावाच्या किशोरच्या फ़ेसबूक पोस्टमुळे. त्याने मटा संवाद मधल्या परिक्षणाचा फ़ोटो टाकून त्याला टॅग केलं आणि या प्रकरणाने माझं लक्षं वेधलं.

झालं असं होतं की "निवद" नावाच्या पुस्तकात ज्यांचं मुखपृष्ठकार म्हणून नाव आहे त्या अविनाश कुंभारांनी माझ्या भावाचं किशोरचं चित्रं वापरलं होतं. ही गोष्टं भावाला संवाद वाचल्यावर कळली त्यामुळे त्याने तशी फ़ेसबूक पोस्ट टाकली व आम्ही दोघे याच्या मुळाशी जायचं ठरवून कामाला लागलो.
प्रकाशकांना फ़ोन करुन त्या चित्रकाराचा नंबर मिळवला. त्या चित्रकाराशी बोलण्यापुर्वी मोबाईलवर कॉल रेकॉर्ड नावाचं ऍप डाऊनलोड करुन ट्रायल रन घेतली. मग सुरवतीला त्याला मी जे जे स्कूलची पास आऊट असल्याचं सांगून त्याच्या "त्या" चित्राचं कौतूक केलं. कौतूक सोहळा आटोपल्यावर त्याला उगाचच थोडे टेक्नीकल प्रश्न विचारले - जसं चित्राचं माध्यम इ. इ. आणि तिथे इतका वेळ कौतूकाने हरभऱ्याच्या झाडावर चढलेला तो गडबडला. सरळ शरणागती पत्करत त्याने "मी कार्टुनिस्ट आहे, मी खरतर हे कधी केलं नाही अशी कबूली देऊन टाकली" अर्थात त्यामुळे काही तो त्या चित्राचा मालक नाही हे ठरत नव्हतं पण माणूस खोटा असेल तेव्हाच असा "अचानक कल्पना नसताना" केलेला हल्ला पटकन परतवू शकत नाही आणि त्यामुळे पकडला जातो. त्या भागाच्या खोलात जात नाही पण भावाने त्याला केलेल्या फोनवर चित्रकाराने त्याने चित्रं "उचललं" असल्याची कबूली दिली.

तो त्याच्या वर्तुळातल्यांच्या मदतीने आणि मी माझ्यापरीने हे धसास लावून धरत होते.

जरा त्या कार्टुनिस्टचा शोध घेत हेरगिरी करताना कळलं की तो जो कोणी चित्रकार कार्टूनिस्ट आहे त्याच्या आणि माझ्या फ़ेसबूक फ़्रेन्ड्लिस्ट्मधे एक नाव कॉमन आहे. तो पत्ता वापरायची वेळ आली नाही म्हणा.

या प्रकरणात चिनूक्सची सर्वात आधी मदत घेतली आणि लिगल नोटीस देण्याच्या दृष्टीने माबोकर मुग्धानंद व - उजू अशा वकील मैत्रिणींशीही सल्लामसलत केली. सहज म्हणून कट्ट्यावर "अभिनंदन प्रकाशन" बद्दल विचारणा केली आणि दुनिया छोटी है चा प्रत्यय देत राम ने सांगितलं "कवे, अभिंनदन प्रकाशनचा जोशी माझा सख्खा मावसभाऊ आहे" मग काय टाकलं थोडं ओझं त्याच्या खांद्यावर - हर एक फ़्रेन्ड जरुरी होता है म्हणतात ते काय उगाच wink emoticon (तो मनात हर एक फ़्रेन्ड कमिना होता है म्हणत बसला असेल पण तेव्हढं चालतं मैत्रीत :P) मग रामची आणि चिन्मयची मात्रा योग्यवेळी आणि योग्यठिकाणी लागू पडून एकादिवसात सगळा प्रश्नच सुटला.

भावाला त्या चित्रकाराच्या मित्राने फोन करुन आमच्या खालील दोन्ही मागण्या मान्य असल्याचं सांगितलं
१. नुकसान भरपाई द्यावी
२. पुस्तकावर करेक्शन स्लीप लावून त्यात "मुखपृष्ठाकरता वापरलेलं धनगराचं व्यक्तीचित्र हे किशोर गोविलकर यांच आहे" असा त्यावर स्पष्टं उल्लेख असावा

त्यानुसार, करेक्शन स्लिप लावलेली एक प्रत भावाच्या हातात पोस्टाने आली आहे. जिचा फ़ोटो मी इथे सोबत जोडला आहे. आणि नुकसानभरपाई म्हणून मागण्यात आलेल्या मानधनापैकी निम्मी रक्कम त्याच्या खात्यात जमा झाली आहे.

माझा डिटेक्टिव्हमोड अजूनही चालू आहेच. मुंबईतल्या बूकशॉप्समधे अजूनही हे पुस्तक आलेलं नाहीये. मी एक कॉपी सांगून ठेवली आहे. त्यावरही करेक्शन स्लीप्स लावल्या आहेत की फ़क्तं भावाला पाठवून दिलेल्या कॉपीवर बोळवण केलेय हे मी शोधत रहाणार आहेच Wink

यासगळ्यात जो पुढे जाण्यासाठी एक सपोर्ट लागतो तो मला सगळ्याच मित्रं मैत्रिणींकडून मिळाला म्हणून हे अपडेट मी इथे देत आहे.

भाऊ आणि माझ्यातर्फ़े चिनूक्स आणि राम यांचे स्पेशल आभार.

हा झाला चित्रकला चोरीचा प्रकार. पण काही वर्षांपुर्वी आपल्या मायबोलीवरुन माझ्या, शशांक पुरोहितांच्या व कर्णिकांच्या काही बालकविता एका वेगळ्या वेबसाईट्वर आम्हाला न विचारता आणि अर्थातच क्रेडीटही न देता टाकल्या होत्या. त्यासंदर्भात त्यावेळी त्या वेबसाईटवाल्याच्या हे लक्षात आणून दिल्यावर त्याने आधी त्या कविता त्याच्याच आहेत, त्याच्या मित्रांच्याच आहेत असा आव आणला. मी पुरावा आहे माझ्याकडे असं सांगितल्यावर मग त्याने "मग असतील तुमच्या, मी प्रसिद्ध करुन तुम्हाला मोठं करतोय" असा कांगावा केला. मग परत परत मागे लागल्यावर त्याने त्या एकदाच्या कटकट नको म्हणून कायमच्या त्याच्या पेजवरुन काढून टाकल्या (शेवटपर्यंत लेकाचा ज्याचं क्रेडीट त्याला द्यायला काही तयार झाला नाही Proud ) असो. पण त्यावेळी मला ओळख ना पाळख असतानाही "कांचन कराई" या ब्लॉगरने खूप मदत केली. पुरावे कसे सेव्ह करावेत, इमेलची भाषा कशी ठेवावी इ. चे खूप छान मार्गदर्शन केले. तिच्या सजेशन नुसार मी कॅचफाईल्स वगैरे सेव्ह करुन ठेवल्या, जेणेकरुन त्याने पब्लीश केलेल्या डेट्सच्या आधी माझ्या माबोवर्/ब्लॉगवर पब्लीश केलेल्या डेट्स आहेत हे सप्रमाण सिद्ध करु शकेन. माझ्या कविता काही फार उच्च होत्या असा माझा समज तेव्हाही नव्हता आणि आताही नाही, पण तरी चोरी करणार्‍याला तसच सोडून द्यायच? पटलं नव्हतं म्हणुन तेव्हा तो खटाटोप केला होता.

भावाच्या केसमधे मला त्या अनुभवाचाही उपयोग झाला. किमान पाठपुरावा केला तर आपण न्याय मिळवूही शकू असा आत्मविश्वास त्या पहील्या अनुभवाने दिला होता. ज्याला जोड चिनूक्स, मुग्धानंद, उजू, राम यासगळ्यांची मिळाली आणि प्रश्नाच्या मुळापर्यंत गेल्याचं प्रचंड समाधान मिळालं

kishor_book_01.jpg

हे ते मुखपृष्ठ. यातील धनगराचं व्यक्तीचित्रं किशोरचं आहे

kishor_book_02.jpg

करेक्शन नोट लावून किशोरला पोस्टाने पाठवून दिलेल्या पुस्तकाच्या कॉपीमधलं हे करेक्शन नोट असलेलं पान

धन्यवाद !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अर्रे व्वा.. किती छान कविन.. तुझ्या चिकाटीमुळे आणी योग्य मित्रमैत्रीणींच्या सहाय्यामुळे हे यश मिळालेय
खूप अभिनंदन तुम्हा सर्वांचे!!!
या उदाहरणामुळे कित्येक जण इन्स्पायर होतील.. ग्रेट जॉब कविन!!!

अभिनंदन..

फक्त एकच पाहिजे, ते म्हणजे शिक्षा अशी पाहिजे की परत असे उद्योग करायच्या आधी हजार वेळा विचार केला जाईल..

खरय हिम्या. आता प्रकाशक त्या चित्रकाराकडे पैसे परत मागतोय आणि भावालाही बहुतेक भरपाई चित्रकाराकडूनच मिळालेय (चित्रकाराचा मित्र असं म्हणालाय) त्यामुळे यावेळी खोटेपणा करून जितके कमावले त्याहून जास्तं गमवावं लागलय त्याला. मानहानी झाली असेलच. यातून तो योग्य तो धडा घेईल अशी आशा आहे.

धन्यवाद मंडळी. आत्मस्तुतीपर तर वाटणार नाही ना असं वाटून मी इथे पोस्टणार नव्हते.

फेसबूकवर भीतभीतच टाकलेलं पण मिल्याने तिथे आणि अजून काहींनी व्हाॅट्स अॅपवर " मायबोलीवर पण टाक अजून कोणाला कधीतरी उपयोग होईल " असं सुचवल्याने इथेही पोस्ट केलं.

कालच हि पोस्ट फेसबुक वर वाचली होती. कौतुक आणि अभिनंदन..
Hopefully, दुसऱ्याच्या कामाला आपल्या नाव लावून फुकट श्रेय घेणारे लोकं थोडा शाहाणपणा घेतील..

छान! कविता .......तुझं कौतुक हं!
आणि तुझा भाऊ कलाकार दिसतो. फेबुवर चित्र पाहिलं होतं. सुंदरच काढलंय!

अभिनंदन !!

तूमच्या भावाच चित्र गूगलवर शोधून पाहिल. अगदी अप्रतीम आहे. कोणालाही चोरायचा मोह होईल ईतके.

कविन
हा अनुभव इथे पोस्टल्याबद्द्ल आभार. ज्याना असे अनुभव आले असतील त्यांच्यासाठी हा लेख मार्गदर्शक असेल.
सर्वांचे अभिनंदन ...

त्यावेळी मला ओळख ना पाळख असतानाही "कांचन कराई" या ब्लॉगरने खूप मदत केली. +++++

"कांचन कराई" यांनी मलाही ब्लॉग साठी बरीच मदत केली होती.

शाब्बास! अभिनंदन Happy

जे लेखक blogger.com लेख / कविता / प्रकाशचित्र टाकतात त्यांनी जिप्सीने सुचवलेली खालिल गोष्ट करावी. खालिल प्रमाणे सेटिंग केल्यावर कोणालाही तुमच्या blog वरचा मजकूर copy करता येत नाही.

1. Login to your dashboard
2. Select your blog and go to Layouts >> Add a Gadget
3. Select HTML/Javascript gadget
4. And put the following script below before on HTML/Javascript gadget

//below javascript is used for Disabling right-click on HTML page
document.oncontextmenu=new Function("return false");//Disabling right-click

//below javascript is used for Disabling text selection in web page
document.onselectstart=new Function ("return false"); //Disabling text selection in web page
if (window.sidebar){
document.onmousedown=new Function("return false");
document.onclick=new Function("return true") ;

//Disable Cut into HTML form using Javascript
document.oncut=new Function("return false");

//Disable Copy into HTML form using Javascript
document.oncopy=new Function("return false");

//Disable Paste into HTML form using Javascript
document.onpaste=new Function("return false");
}

.

Pages