पनवेल मधील मुस्लीम बांधवांचे अभिनंदन

Submitted by स्पॉक on 7 September, 2015 - 23:22

शासनाने आणि माननीय कोर्टाने सर्व धर्मीयांना त्यांच्या सगळ्या प्रार्थना / उत्सवादरम्यान आवाज निंयत्रित करण्याची आणि इतरांना त्रास होणार नाही अशा शांततेत उत्सव साजरा करण्याची विनंती / आवाहन केले होते.

आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार आमच्या गावातील सर्व मुस्लीम बांधवांनी एकत्र येऊन सदरच्या आवाहनाला प्रतिसाद देत पनेवलमधील सर्व मशिदींवरील बाहेरचे भोंगे (मराठीत स्पीकर्स) उतरवण्याचे मान्य केले आहे.

या अतिशय स्तुत्य निर्णयाबद्दल, पनवेलमधील सर्व मुस्लीम बांधवांचे मनापासुन अभिनंदन आणि धन्यवाद.

मशिदीच्या आतमधील भोंगे तसेच राहतील. त्यामुळे धार्मीक पद्धतीने अजान म्हणन्यास कुठल्याही प्रकारचे बंधन नाही.
या स्तुत्य निर्णयामुळे, ध्वनी प्रदुषन कमी होण्यास मदत होईल.
मुळ बातमी: http://www.lokmat.com/storypage.php?catid=10&newsid=7783618

आता ईतर सर्व धर्मीयांनी मुस्लीम बांधवांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवुन आपापले सर्व प्रार्थना व उत्सव शांततेत, कशाचीही नासाडी न करता आणि सामान्य जनतेला कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेत साजरे करावे, अशी नम्र विनंती करत आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रचंडा !!!! मार्तंडा !!!!!!!!!!

आमच्याकडे वाजवा रे वाजवा सुरु झाले.

मुस्लुमानानी स्पीकर काढले म्गणून हभिणंदन करणारे कुठे गेले ?

Proud

अभिनंदन>>>> लोकसत्तेच्या बातमीनुसार २२ मशिदींवरील भोंगे बेकायदेशीर होते.
तरीही अभिनंदन! आता काही दिवस त्रास आहे..

हाश्शम हुश्शम (नक्की काय बोलतात ते माहीत नाही) >>> ऋन्मेष भावा , ते "याह हुसैन, याह हुसैन" असे म्हणत असतात आणि आपली छाती बडवत असतात .

ते "याह हुसैन, याह हुसैन" असे म्हणत असतात आणि आपली छाती बडवत असतात .>>>>>>> हसन आणि हुसैन , हे दोघे पैगंबरांचे नातू होते.बहुतेक ,करबला येथील युद्धात लढताना मरण पावले.त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ,शियापंथीय मुस्लीम ,स्वत:ला जखमा करून किंवा छाती बडवून शोक (मातम) करतात.

Pages