आतिफ ! अस्लम !

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 September, 2015 - 13:51

अत् अस् लम .. अत् अस् लम .. अत् अस् लम .. अत् अस् लम ..

पुर्ण ऑडिटोरीयम या गर्जनांनी दणाणून उठले होते. आमचाच ग्रूप यात आघाडीवर होता. थोडे ओळखीपाळखीचेही त्यात सामील झाले होते. ईतरांची काय बिशाद जे या आवाजाला दाबायला जातील. जेमतेम चारपाचशे मुलांना सामावून घ्यावा इतका तो हॉल. मात्र त्याला हजारोंच्या स्टेडियमचे रूप आले होते.. आणि ट्रिंग्गग ऽऽ .. त्याने गिटारवर एक झंकार बीट् देताच क्षणार्धात सारा माहौल शांत.. पण क्षणभरासाठीच.. आणि पुन्हा एकवार भयंकर मोठा जल्लोष ..

आणि तो गाऊ लागला ..

दूरीऽऽ .. दू री ऽऽऽऽऽ सही जाये ना ऽऽ .. हो ओ हो ऽऽ सही जाये ना ऽऽऽ आआ ऽऽऽ

काळजालाही छाती फाडून बाहेर येत त्याच्या सोबत गावेसे वाटावे असे ते शब्द न तो आवाज कानात शिरत होता..

खामोशिया ये सह ना सकू ...
आवाज दे के मुझे तू दे जा सुकून ..

सर्वांचा उत्साह तसाच ठेवत त्याने दुसरे गाणे घेतले..

पहली नजर मे कैसा जादू कर दिया..
तेरा बन बैठा है मेरा जिया..

ओ जाने जा दोनो जहा ..
मेरे बाहो मे आ भूल जा

आणि पाठोपाठ आतिफ अस्लमच्या गाण्यांची एक ‘रेस’च लागली

या सर्वांत परीक्षक शांत होते. निव्वळ त्यांनाच शांत करणे हा आमचा हेतू होता.
जेव्हा त्या आमच्या मित्राला स्टेजवर विचारण्यात आले होते, की स्पर्धेसाठी तू आता कोणाचे गाणे गाणार आहेस.. तेव्हा आतिफ अस्लमचे नाव घेताच त्याच परीक्षकांमध्ये हास्याची खसखस पिकली होती. त्यांचे तेच हसणारे दात आता आम्हाला त्यांच्याच घशात घालायचे होते.

-----------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------

आतिफ अस्लम !

Atif-Aslam.jpg

आमच्या कॉलेजलाईफची सुरुवात आणि त्याच्या कारकिर्दीची सुरुवात बहुधा एकाच वेळची.
त्याच्या "आदत" या एका गाण्याने आम्हाला त्याचा फ्यानक्लबात नेऊन बसवले. तेव्हा आमच्या दर वाक्यात "अब तो आदत सी है मुझको, ऐसे जीने मे.." हे पालुपद असायचेच. त्यानंतर त्याने काही गायले नसते तरीही आम्ही आजीवन त्याचे फ्यान बनून राहिलो असतो.

पण त्याला तेवढ्यावरच थांबायचे नव्हते.
त्यानंतर एका पाठोपाठ एक हिट गाण्यांचा त्याने धडाकाच लावला. मी तर तेव्हा, जेव्हा केव्हा गायचो, त्याचीच गाणी गायचो. आवाजही माझा बरेपैकी त्याच्या आवाजाशी साधर्म्य राखणारा, त्यामुळे लवकरच मी `गरीबांचा आतिफ अस्लम' म्हणून ओळखलो जाऊ लागलो.

(माझ्या आवडत्या गाण्यांची लिस्ट लेखाच्या शेवटी दिली आहे)

पुढे ईंजिनीअरींगला देखील सुदैवाने म्हणा वा योगायोगाने, मला जो ग्रूप मिळाला त्यातही सारे आतिफचेच फ्यान. त्यात एक जण तर कमालीचा सुंदर गाणारा होता आणि त्याचाही आतिफ लाडका होता. आता तो सिनिअर आतिफच्या नावानेच ओळखला जाऊ लागला आणि मी बनलो ज्युनिअर आतिफ. पण मी यातही खुश होतो.

बस्स आमचा तोच मित्र त्या दिवशी कॉलेजतर्फे ईंटरकॉलेज सिंगिंग कॉम्पिटीशनला कोण जाणार याच्या सिलेक्शन स्पर्धेत उतरला होता.

तर,
त्या दिवशी आम्ही आतिफच्या नावाने माहौल केला, मात्र परीक्षकांनी याचा वचपा अंतिम निकालात काढला.
पहिल्या तीन क्रमांकात तो आमचा ‘आतिफ मित्र’ कुठेही नव्हता, ना उत्तेजनार्थ बक्षीसांच्या यादीत होता.

पण सारे निकाल जाहीर झाल्यावर कॉलेजच्या सांस्कृतिक मंडळाकडून एक घोषणा झाली.
त्याने मुलांचा मिळवलेला रिस्पॉन्स आणि जिंकलेली मने बघता, त्याला फायनल ईयरच्या सेन्ड ऑफ पार्टी म्हणजेच निरोप समारंभात, कॉलेजच्या मैदानातील स्टेजवर गायचा बहुमान मिळणार होता.
तो हरूनही जिंकला होता...
आणि आमच्यासाठी आमचा आतिफ अस्लम जिंकला होता..

-----------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------

आज फार काही वर्षे झाली नाहीत त्या घटनेला. पण हल्ली आतिफची गाणी मुद्दामहून ऐकणे होत नाही. त्या दिवशी कोणीतरी ऑफिसमध्ये आतिफचे एक गाणे लावले होते. ‘हम किस गली जा रहे है.. अपना कोई ठिकाना नही’ ... दुसरा कोणीतरी ओरडला, काय रेकतोय हा.. तेव्हा मात्र चीड नाही आली त्या कोणाची. उलट ऑफिसच्या वातावरणाला अनुसरून ते पटलेच.. खर्रच गोंगाट नुसता !

पण तेव्हा एक गोष्ट समजली. आतिफ अस्लमची गाणी ऐकायचे एक वय असते, एक मूड असतो, एक माहौल असतो. शांत आणि चाकोरीबद्ध आयुष्य जगणार्‍यांनी त्या वाटेला जाऊ नये.

असो,
आतिफ अस्लमच्या माझ्या काही आवडत्या गाण्यांच्या यू ट्यूब लिंका खाली देत आहे. एंजॉय Happy

आदत - आतिफ अस्लम - https://www.youtube.com/watch?v=GRXwzUf9Atc
आदत (चित्रपट - कलयुग) - https://www.youtube.com/watch?v=FpsdrNLnDkI

तू जाने ना.. (चित्रपट - अजब प्रेम की गजब कहाणी) - https://www.youtube.com/watch?v=P8PWN1OmZOA

तेरा होने लगा हू .. (चित्रपट - अजब प्रेम की गजब कहाणी) - https://www.youtube.com/watch?v=rTuxUAuJRyY

पहली नजर मे .. (चित्रपट - रेस) - https://www.youtube.com/watch?v=BadBAMnPX0I

तेरे बिन ... (चित्रपट - बस एक पल) - https://www.youtube.com/watch?v=k6NnNv7XJYg

वोह लम्हे वोह बाते .. (चित्रपट - जहर) - https://www.youtube.com/watch?v=omv2hDDVBkg

बाखुदा तुम्ही हो .. (चित्रपट - किस्मत कनेक्शन) - https://www.youtube.com/watch?v=Jpq9tm0gnTM

पिया ओ रे पिया .. (चित्रपट - तेरे नाल लव हो गया) - https://www.youtube.com/watch?v=_hdgIqwIpSk

तू मोहोब्बत है .. (चित्रपट - तेरे नाल लव हो गया) - https://www.youtube.com/watch?v=ApnLd04X7-U

मै रंग शरबतों का .. (चित्रपट - फटा पोस्टर निकला हिरो) - https://www.youtube.com/watch?v=GnzZyGQi2ps

नादान परिंदे (आतिफ वर्जन) - https://www.youtube.com/watch?v=DwENxBjtpI8
रॉकस्टार चित्रपटात हे मोहीतच्या चौहानच्या आवाजात आहे. त्यापेक्षा हे सरस आहे.

दूरी फुल्ल अल्बम - https://www.youtube.com/watch?v=IydHmfhbnoA
यातील माझी आवडती गाणी -
१) दूरी .. २) अहसास .. ३) हम किस गली जा रहे है

वर फक्त माझी आवडती गाणी दिली आहेत. याव्यतिरीक्तही त्याची बरीच गाणी आहेत, जी हिट गेली आहेत. किंबहुना अपवाद वगळता तो हिट गाणीच गातो बहुधा. आता याला त्याच्या आवाजाची जादू बोला वा नशीबाची बाजू. पण अगदी विवेक ओबेरॉयच्या प्रिन्स सारख्या टुक्कार सिनेमात काही बघण्या ऐकण्यासारखे होते तर ते आतिफचीच दोन गाणी.

हे आतिफचे लेटेस्ट - तू चाहिये .. (चित्रपट - बजरंगी भाईजान) - https://www.youtube.com/watch?v=WTLLym2wzIM
(आतिफकडून असलेल्या अपेक्षा यात पुर्ण नाही होत, पण बरे आहे)

असो, हा लेख अपुरा, आहे क्रमश: आहे, किंबहुना लेख असा नाहीयेच.

माझ्या कॉलेज जीवनाशी आतिफच्या गाण्यांच्या एवढ्या काही आठवणी जोडल्या गेल्या आहेत की त्या अश्या पानभर जागेत नाही मावणार, त्यामुळे ही निव्वळ प्रस्तावनाच समजा.
तरी माबोवरील सर्व आतिफ अस्लमच्या चाहत्यांचे इथे स्वागत आहे हे वेगळे सांगायला नकोच Happy

या धाग्याच्या निमित्ताने आज आतिफची उजळणी झाली, वरची सारी गाणी पुन्हा पुन्हा ऐकून झाली. वेळेचे सार्थक झाले, मजा आली Happy

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुळीच नाही वाटत ऋन्मेष!
पाकिस्तानकडे टॅलेंट नाही असं वाटतं की काय तुला?
का पाकिस्तानी असून भारतात प्रिय आहे याचं कौतुक वाटतंय?
जे चांगलं आहे ते कुठंलंही असो कुठेही चालतच

का पाकिस्तानी असून भारतात प्रिय आहे याचं कौतुक वाटतंय?
>>>
हो, कारण त्यांना काही जणांचा (त्यातही बरेचदा ईंडस्ट्रीमधील प्रस्थापितांचा) रोष पत्करून, काही वेळेस संधी नाकारली जाऊनही, स्वताला सिद्ध करावे लागते.
तू किंवा मी देश-धर्म बघत नसलो तरी आतिफने ज्याचे कोणाचे दुकान बंद केले असणार तो आकसाने वर अभिजीत म्हणाला तसे या पकिस्तानी मुद्द्याकडे लोकांचे लक्ष वेधत विष ओकू शकतो.

@ सायो,
तो सो कॉलड रिअ‍ॅलिटी शो असला तरी ते मत अभिजीतचे स्वताचेच असणार. एकवेळ ते असे ओपनली मांडणे हे स्टंट घडवायला असू शकते, पण त्याचेच विचार असणार ते. कारण जर मूळात एखाद्याला असा काही प्रॉब्लेम नसताच तर तो असले काही बोलायला तयारच झाला नसता. बाकी एन्ड ऑफ द डे, यातून आतिफचा इन्सल्ट करणे आलेच ना. मग त्यामागे एकटा अभिजीत असो वा आणखी चार डोकी.

अभिजित हे मानतो ते मी मानत नाही. म्हणुन मला आतिफ गायक म्हणुन आवडतो.
पाकिस्तानी गायक वगैरे म्हणून नाही

सोनू व आतिफ चा एकत्र परफॉर्मेंस.. सोनुच्या गायकी समोर आतिफ कसला फिका वाटतोय.. अणि स्टेज परफॉर्मेंस म्हटला की सोनू फूल व सुटतो...
https://m.youtube.com/watch?v=jlSLzsAGWKI

असो.. आतिफ ची गाणी पण ऐकायला आवडतात भले मग तो रॉक स्टाइल मध्ये केकटत असेल... त्याच कुछ इस तरह हे गाणे खूप आवडते..

मित सही... Awesome Performance by Atif Aslam he killed it .. मूड बनवलात या विकेंड नाईटचा.. तीन तीन वेळा ऐकले .. किलिंग परफॉर्मन्स ..

@ यो रॉक्स
आतिफ ची गाणी पण ऐकायला आवडतात भले मग तो रॉक स्टाइल मध्ये केकटत असेल...
>>>
आपण ही वरची लिंक चेक करा नक्की, रॉक स्टाईल केकाटणे वगैरे काही नाही.. आतिफची मला आवडणारी स्टाईल. Happy

कधी कधी आतिफ अस्लम उगीचच आवाज चढवतो असे वाटते. पण जिथे तो कंट्रोल्ड असतो तिथे फार सुंदर वाटतो त्याचा आवाज.
अलीकडचे त्याचे आवडते गाणे

बाकी पाकिस्तानी गायक/संगीतकारांचे/गीतकारांचे कौतुक अशासाठी कि त्यांची गाणी अजून तरी अस्सल वाटतात. भारतात बरीचशी नवी गाणी आपल्या स्फिअरच्या बाहेरची वाटतात, रिलेटच होत नाहीत, सन्माननीय अपवाद फारच थोडे. किंवा माझी गाण्याची चॉईस फार ओल्ड फॅशन्ड असेल.

अलीकडचे त्याचे आवडते गाणे
>>>>>
जिओ माझेमन जियो
मी हेच गाणे आता लिहायला आलेलो..
गेले काही दिवस सॉरी दिवस नाही रात्री झोपताना तर हेच रिपीट मोड वर ऐकतोय
एक गाणे माझे एक लेकीचे असे ऐकत झोपतो आम्ही.. त्यात मुलगी मग स्वताहून मला हे लाऊन देते Happy

मैं रंग शरबतोंका तू मिठे घांट का पानी..हेच १ आवडते.
तो पाकिस्तानी असल्याने त्याला प्रमोट करावेसे वाटत नाही. राहत पण.

एक गाणे माझे एक लेकीचे असे ऐकत झोपतो आम्ही.. त्यात मुलगी मग स्वताहून मला हे लाऊन देते
>>>
आमच्याकडे पण झोपताना ऐकायचे हॉट फेवरीट गाणे आहे हे Happy

मला वाटतं सुरवातीला अतिफवर पाकिस्तानी संगीताचा प्रभाव होता. तुम्ही contemporary पाकिस्तानी गाणी, कव्वाल्या इ. ऐकल्यात तर जाणवतं की ते थोडे aggressive गातात. जसे जास्तीत जास्त सुरांना भोज्जा करून येणे, उगीच खालच्या वरच्या पट्टीत उड्या मारणे इ. जेव्हा तो सौम्य झाला त्यानंतरची गाणी उदा. जाने दे, दिल दिया गल्लां निश्चित चांगली आहेत.

तो पाकिस्तानी असल्याने त्याला प्रमोट करावेसे वाटत नाही
>>>>>>
कलेबाबत असे करू नये
किंबहुना कश्याबाबतही करू नये.
कोणी कुठल्या देशात जातीत धर्मात जन्म घेतला यावर काय ठरते...
असो, विषयांतर नको. अगदीच रहावले नाही म्हणून लिहिले.

तो पाकिस्तानी असल्याने त्याला प्रमोट करावेसे वाटत नाही
>>>>>>
कलेबाबत असे करू नये
किंबहुना कश्याबाबतही करू नये.
कोणी कुठल्या देशात जातीत धर्मात जन्म घेतला यावर काय ठरते...
असो, विषयांतर नको. अगदीच रहावले नाही म्हणून लिहिले.

बरोबर बोललात ऋन्मेष... देश महत्वाचा नाही... टॅलेंट...
मी गुलाम अली ऐकतो अधून मधून.. हे असले विचारही डोक्यात येत नाहीत कि इंडी कि पाक...

पंछी नदिया पवन के झोंके, कोई सरहद ना इन्हें रोके
सरहद इंसानों के लिए है
सोचो तुमने और मैंने क्या पाया इंसान होके

जुदा होके भी - हे गाणं आवडतं. त्यात दर्द ही दर्द बाकी रहा है सीने में - हे म्हणताना जो दर्द पाहिजे तो आतिफ की अस्लम, ज्याने गायलं आहे, त्याच्या आवाजात अगदी बरोब्बर आहे.

Pages