आतिफ ! अस्लम !

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 September, 2015 - 13:51

अत् अस् लम .. अत् अस् लम .. अत् अस् लम .. अत् अस् लम ..

पुर्ण ऑडिटोरीयम या गर्जनांनी दणाणून उठले होते. आमचाच ग्रूप यात आघाडीवर होता. थोडे ओळखीपाळखीचेही त्यात सामील झाले होते. ईतरांची काय बिशाद जे या आवाजाला दाबायला जातील. जेमतेम चारपाचशे मुलांना सामावून घ्यावा इतका तो हॉल. मात्र त्याला हजारोंच्या स्टेडियमचे रूप आले होते.. आणि ट्रिंग्गग ऽऽ .. त्याने गिटारवर एक झंकार बीट् देताच क्षणार्धात सारा माहौल शांत.. पण क्षणभरासाठीच.. आणि पुन्हा एकवार भयंकर मोठा जल्लोष ..

आणि तो गाऊ लागला ..

दूरीऽऽ .. दू री ऽऽऽऽऽ सही जाये ना ऽऽ .. हो ओ हो ऽऽ सही जाये ना ऽऽऽ आआ ऽऽऽ

काळजालाही छाती फाडून बाहेर येत त्याच्या सोबत गावेसे वाटावे असे ते शब्द न तो आवाज कानात शिरत होता..

खामोशिया ये सह ना सकू ...
आवाज दे के मुझे तू दे जा सुकून ..

सर्वांचा उत्साह तसाच ठेवत त्याने दुसरे गाणे घेतले..

पहली नजर मे कैसा जादू कर दिया..
तेरा बन बैठा है मेरा जिया..

ओ जाने जा दोनो जहा ..
मेरे बाहो मे आ भूल जा

आणि पाठोपाठ आतिफ अस्लमच्या गाण्यांची एक ‘रेस’च लागली

या सर्वांत परीक्षक शांत होते. निव्वळ त्यांनाच शांत करणे हा आमचा हेतू होता.
जेव्हा त्या आमच्या मित्राला स्टेजवर विचारण्यात आले होते, की स्पर्धेसाठी तू आता कोणाचे गाणे गाणार आहेस.. तेव्हा आतिफ अस्लमचे नाव घेताच त्याच परीक्षकांमध्ये हास्याची खसखस पिकली होती. त्यांचे तेच हसणारे दात आता आम्हाला त्यांच्याच घशात घालायचे होते.

-----------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------

आतिफ अस्लम !

Atif-Aslam.jpg

आमच्या कॉलेजलाईफची सुरुवात आणि त्याच्या कारकिर्दीची सुरुवात बहुधा एकाच वेळची.
त्याच्या "आदत" या एका गाण्याने आम्हाला त्याचा फ्यानक्लबात नेऊन बसवले. तेव्हा आमच्या दर वाक्यात "अब तो आदत सी है मुझको, ऐसे जीने मे.." हे पालुपद असायचेच. त्यानंतर त्याने काही गायले नसते तरीही आम्ही आजीवन त्याचे फ्यान बनून राहिलो असतो.

पण त्याला तेवढ्यावरच थांबायचे नव्हते.
त्यानंतर एका पाठोपाठ एक हिट गाण्यांचा त्याने धडाकाच लावला. मी तर तेव्हा, जेव्हा केव्हा गायचो, त्याचीच गाणी गायचो. आवाजही माझा बरेपैकी त्याच्या आवाजाशी साधर्म्य राखणारा, त्यामुळे लवकरच मी `गरीबांचा आतिफ अस्लम' म्हणून ओळखलो जाऊ लागलो.

(माझ्या आवडत्या गाण्यांची लिस्ट लेखाच्या शेवटी दिली आहे)

पुढे ईंजिनीअरींगला देखील सुदैवाने म्हणा वा योगायोगाने, मला जो ग्रूप मिळाला त्यातही सारे आतिफचेच फ्यान. त्यात एक जण तर कमालीचा सुंदर गाणारा होता आणि त्याचाही आतिफ लाडका होता. आता तो सिनिअर आतिफच्या नावानेच ओळखला जाऊ लागला आणि मी बनलो ज्युनिअर आतिफ. पण मी यातही खुश होतो.

बस्स आमचा तोच मित्र त्या दिवशी कॉलेजतर्फे ईंटरकॉलेज सिंगिंग कॉम्पिटीशनला कोण जाणार याच्या सिलेक्शन स्पर्धेत उतरला होता.

तर,
त्या दिवशी आम्ही आतिफच्या नावाने माहौल केला, मात्र परीक्षकांनी याचा वचपा अंतिम निकालात काढला.
पहिल्या तीन क्रमांकात तो आमचा ‘आतिफ मित्र’ कुठेही नव्हता, ना उत्तेजनार्थ बक्षीसांच्या यादीत होता.

पण सारे निकाल जाहीर झाल्यावर कॉलेजच्या सांस्कृतिक मंडळाकडून एक घोषणा झाली.
त्याने मुलांचा मिळवलेला रिस्पॉन्स आणि जिंकलेली मने बघता, त्याला फायनल ईयरच्या सेन्ड ऑफ पार्टी म्हणजेच निरोप समारंभात, कॉलेजच्या मैदानातील स्टेजवर गायचा बहुमान मिळणार होता.
तो हरूनही जिंकला होता...
आणि आमच्यासाठी आमचा आतिफ अस्लम जिंकला होता..

-----------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------

आज फार काही वर्षे झाली नाहीत त्या घटनेला. पण हल्ली आतिफची गाणी मुद्दामहून ऐकणे होत नाही. त्या दिवशी कोणीतरी ऑफिसमध्ये आतिफचे एक गाणे लावले होते. ‘हम किस गली जा रहे है.. अपना कोई ठिकाना नही’ ... दुसरा कोणीतरी ओरडला, काय रेकतोय हा.. तेव्हा मात्र चीड नाही आली त्या कोणाची. उलट ऑफिसच्या वातावरणाला अनुसरून ते पटलेच.. खर्रच गोंगाट नुसता !

पण तेव्हा एक गोष्ट समजली. आतिफ अस्लमची गाणी ऐकायचे एक वय असते, एक मूड असतो, एक माहौल असतो. शांत आणि चाकोरीबद्ध आयुष्य जगणार्‍यांनी त्या वाटेला जाऊ नये.

असो,
आतिफ अस्लमच्या माझ्या काही आवडत्या गाण्यांच्या यू ट्यूब लिंका खाली देत आहे. एंजॉय Happy

आदत - आतिफ अस्लम - https://www.youtube.com/watch?v=GRXwzUf9Atc
आदत (चित्रपट - कलयुग) - https://www.youtube.com/watch?v=FpsdrNLnDkI

तू जाने ना.. (चित्रपट - अजब प्रेम की गजब कहाणी) - https://www.youtube.com/watch?v=P8PWN1OmZOA

तेरा होने लगा हू .. (चित्रपट - अजब प्रेम की गजब कहाणी) - https://www.youtube.com/watch?v=rTuxUAuJRyY

पहली नजर मे .. (चित्रपट - रेस) - https://www.youtube.com/watch?v=BadBAMnPX0I

तेरे बिन ... (चित्रपट - बस एक पल) - https://www.youtube.com/watch?v=k6NnNv7XJYg

वोह लम्हे वोह बाते .. (चित्रपट - जहर) - https://www.youtube.com/watch?v=omv2hDDVBkg

बाखुदा तुम्ही हो .. (चित्रपट - किस्मत कनेक्शन) - https://www.youtube.com/watch?v=Jpq9tm0gnTM

पिया ओ रे पिया .. (चित्रपट - तेरे नाल लव हो गया) - https://www.youtube.com/watch?v=_hdgIqwIpSk

तू मोहोब्बत है .. (चित्रपट - तेरे नाल लव हो गया) - https://www.youtube.com/watch?v=ApnLd04X7-U

मै रंग शरबतों का .. (चित्रपट - फटा पोस्टर निकला हिरो) - https://www.youtube.com/watch?v=GnzZyGQi2ps

नादान परिंदे (आतिफ वर्जन) - https://www.youtube.com/watch?v=DwENxBjtpI8
रॉकस्टार चित्रपटात हे मोहीतच्या चौहानच्या आवाजात आहे. त्यापेक्षा हे सरस आहे.

दूरी फुल्ल अल्बम - https://www.youtube.com/watch?v=IydHmfhbnoA
यातील माझी आवडती गाणी -
१) दूरी .. २) अहसास .. ३) हम किस गली जा रहे है

वर फक्त माझी आवडती गाणी दिली आहेत. याव्यतिरीक्तही त्याची बरीच गाणी आहेत, जी हिट गेली आहेत. किंबहुना अपवाद वगळता तो हिट गाणीच गातो बहुधा. आता याला त्याच्या आवाजाची जादू बोला वा नशीबाची बाजू. पण अगदी विवेक ओबेरॉयच्या प्रिन्स सारख्या टुक्कार सिनेमात काही बघण्या ऐकण्यासारखे होते तर ते आतिफचीच दोन गाणी.

हे आतिफचे लेटेस्ट - तू चाहिये .. (चित्रपट - बजरंगी भाईजान) - https://www.youtube.com/watch?v=WTLLym2wzIM
(आतिफकडून असलेल्या अपेक्षा यात पुर्ण नाही होत, पण बरे आहे)

असो, हा लेख अपुरा, आहे क्रमश: आहे, किंबहुना लेख असा नाहीयेच.

माझ्या कॉलेज जीवनाशी आतिफच्या गाण्यांच्या एवढ्या काही आठवणी जोडल्या गेल्या आहेत की त्या अश्या पानभर जागेत नाही मावणार, त्यामुळे ही निव्वळ प्रस्तावनाच समजा.
तरी माबोवरील सर्व आतिफ अस्लमच्या चाहत्यांचे इथे स्वागत आहे हे वेगळे सांगायला नकोच Happy

या धाग्याच्या निमित्ताने आज आतिफची उजळणी झाली, वरची सारी गाणी पुन्हा पुन्हा ऐकून झाली. वेळेचे सार्थक झाले, मजा आली Happy

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थोडीशी समजण्यात गल्लत होत आहे असं वाटतंय. रेहमानला सुरांचं ज्ञान नाही असं म्हणायचं नसणार. एकापेक्षा एक गाणी रेहमान ने दिली आहेत. पण एखादा संगीतकार चांगला गायक असलाच पाहिजे असा नियम नाही. रेहमान निश्चितच चांगला संगीतकार आहे, पण बर्‍याचदा तोही (आतिफ प्रमाणेच) सुरात गात नाही. हे असूनही दोघांच्याही आवाजात काहीतरी वेगळेपण एक्स फॅक्टर आहे.. तसं नसतं तर 'ख्वाजा मेरे ख्वाजा' कधीही लागलं तरी तितक्याच उत्साहाने नव्यानेच ऐकल्यसारखं तल्लीन होऊन ऐकलं गेलं नसतं. ( हे फक्त एक उदाहरण आहे)

... एक रेहमान व आतिफचा चाहता Happy

मित,
हो, रसपना असेच म्हणायचे असणार हे नक्की,
मला सूरताल समजायचा संगीताचा कान नसल्याने मी हे खरेखोटे सांगू शकत नाही.
पण त्या उदाहरणामुळे नकळत रेहमान आणि आतिफ एका तागडीत आलेत एवढे मात्र खरे.
आणि मग आता इथून पुन्हा माझा आधीचा मुद्दा स्ट्राँग होतोय,
एखाद्याच्या गायकीत इतर काही कमालीच्या गोष्टी असतील तर थोडाफार सूर इथे तिथे असेल तर चालून जातेच Happy

पण त्या उदाहरणामुळे नकळत रेहमान आणि आतिफ एका तागडीत आलेत एवढे मात्र खरे.
>>
प्लिज असं नको करूस बाबा Sad
एक धागा बरा चाललाय. मस्त लिंका जमा होतायेत. कशाला वाट लावतोस त्याची.

हे वाक्य अगदीच अनावश्यक आहे.
रेहमान आणि अतिफ दोघंही बेस्ट असले तरी एका तागडीत नक्कीच नाही.
प्लिजच!

अरे तसे नाही, मी ते फक्त माझ्या मुद्द्या संदर्भात बोल्लोय, खाली तो मुद्दाही मांडलाय. सूर म्हणजेच सारे काही नाही. थोडे उन्नीस बीस चालतेच. बाकी सर्व बाबतीत त्यांची तागडी वेगळी आहे. फक्त एक साम्य म्हणजे दोघे स्टेजवर अवतरले तर अपल्या लाखो चाहत्यांना खिळवू शकतात..

असो, तर मग याचा अर्थ इतर गायक गायिका उदाहरणार्थ श्रेया घोषाल यांचा सूर लतादीदींसारखा 100 टक्के नसावा. 99 टक्के किंवा 99.9 टक्के असावा. म्हणजेच त्यांचा एखादा सूर (0.1-1 टक्के सूर) इथे तिथे होतो असे म्हणू शकतो.चुकत असेल तर करेक्ट करा. >> नाही रे, माझी तेवढी कुवत नाही कि मी श्रेया घोषालचा चुकला सूर शोधावा. हां, मी आतिफचा बेसूर नक्कि ऐकू शकतो. ०१. ते १ % वगैरे मोजमाप तू कर जमलं तर. मला गाणं ऐकताना सूर चुकला कि त्रास होतो आणि जो गायक वेगवेगळ्या भावातील गाणी गाताना त्यातल्या भावनेचा लिहाज ठेवून वेगवेगळ्या प्रकारे गातो तो मला भावतो. उदाहरणार्थ सोनु निगम, शंकर महादेवन, हरिहरन इ.
केवळ वेगळ्या गाण्याचे शब्द व चाल वेगळी पण नेहमी एकाच प्रकारे गाणारा गायक मला आवडत नाही उदाहरणार्थ - अदनान सामी, आतिफ असलम, हिमेश वगैरे बरेच.

पुढे आपण म्हणालात तसे सूर एडीट करून परफेक्ट करायचे सॉफ्टवेअर आहे. म्हणजे आतिफचा एखादा इथे तिथे जाणारा सूर एडीट करून त्याला पर्रफेक्ट करू शकतो. >> भले शाब्बास.. असच केल्याने आपल्याला अजून "प्रतिभाशाली" नवीन गायक मिळतील. सगळेच परफेक्ट. अगदी तू आणि मी सुद्धा!! सा रे ग म वगैरे स्पर्धा पण रद्दच करुयात मग. कशाला उगाच लोकांना लाईव्ह गायला लावायचं?

राहिला प्रश्न प्रत्यक्षात गाण्याचा.. तर कम ऑन.. आग लावतो तो स्टेजवर.. यूट्यूब करा आणि त्याचा कुठलाही लाईव्ह कॉन्सर्ट बघा >> बघितले आहेत. त्याचं ते गळा काढुन गाणं अजिबात आवडलं नाही. एका प्रतिसादात कोणी म्हटलं आहे कि दुसर्‍या भागात तो गायल्यावर, श्रेया घोषाल पहिल्या भागात गायली हे विसरायला झालं... माझ्या बाबतीत नंतर आतिफ ने गाऊन सगळा विचका केला असं झालं.

ह्या बाफ वर हे मा शे पो, कारण माझ्या मते मी तुला रसमलाईची महती सांगतोय आणि तुला चमचाभर साखर घातलेल्या दुधाच कौतुक आहे. तुझं मत, तुझी ईच्छा.... शुभेच्छा!!

रच्याकने - मी एका गायकाच्या गाण्याचा दुवा दिला होता.. त्यावर तुझं मत सांगितलं नाहिस.

टण्या | 9 September, 2015 - 08:46 नवीन
ॠनमेष उत्तम युक्तिवाद.

+१
मी बॅरिस्टर विषयीची प्रतिक्रिया उपहासाने केलेली नव्हती.
ऋन्मेऽऽष कडे डोके न फिरवता स्वतःचे (दुर्दैवाने बरेचदा चुकीचे) मुद्दे मांडायची विलक्षण हातोटी आहे.
एका धाग्यावर त्यानेच म्हणले होते की यु कॅन लव ऑर हेट हिम बट कॅनॉट इग्नोर हिम.
हे आता त्याच्या बाबतीतच ज्यास्त खर ठरतय.

चि ऋन्मेऽऽष, तु "मायबोलीचा उगवता सुप्परस्टार - ऋन्मेऽऽष !" असा धागा पण काढूनच टाक आता.

चौकट राजा, ओके
थोडक्यात तुमचा आतिफ नावडता नसून तो ज्या जॉनरमध्ये गातो तो तुमचा टाईप नाहीये.
तरी आतिफच्या आवाजातील गाणे म्हणजे दुधात साखर या आपल्या मताचा मान ठेवतो Happy

@ गोगोल, आपला बॅरीस्टर प्रतिसाद उपहासाने नव्हती हे मला समजले होते, त्याबद्दल धन्यवाद, टण्या आपलेही, शक्यतो धागा भरकटू नये वा अवांतर पोस्ट वाढू नयेत म्हणून मी चांगल्यावाईट वैयक्तिक प्रतिसादांना उत्तर देणे शक्यतो टाळतो Happy

आतिफचा आवाज सगळ्याच गाण्यांत आवडत नाही. त्यामुळे माझ्याकडून यात काही अ‍ॅडिशन नाही.

आतिफ आवडलाच पाहीजे अशी सक्ती करण्यात येणार नसेल तर - लेख म्हणून चांगला आहे हा लेख.

इतक्या काथ्याकुट, उलट सुलट चर्चा, अर्ग्युमेंट ,मुद्दे पटवून देण्याचा अट्टाहास करताना त्या कलेतला, गाण्यातला, संगीतातला, शब्दातला, अनुभूतीतला आनंद घेणं बाजूला तर राहून जात नाही ना !

जमाना झाला असली सॉफ्टवेअरं येऊन. ए. आर. रहमान जेव्हा गातो, तेव्हा त्याचे असिस्टन्ट्स रहमानचं गाऊन झालं की अनेक तास 'ओढाताण' करून त्याला सुरात आणतात, असं मला त्याच्या टीममधल्या एकाने सांगितलं होतं. >>
काहीही काय! Lol
रहमान लाइव्ह गातो तेव्हा कोण ओढाताण करत असतं?

बाकी आतिफ अस्लम आधी खुप्प आवडायचा. आता ठीक. "तेरे बिन..", "दूरी" वगैरे फार आवडतात.

रमड, धन्यवाद. सक्ती नक्कीच नाही. किंबहुना लेखातही कुठे आतिफ महान गायक आहे असे म्हटले नाहीयेच उलट तो काही जणांना आवडत नाही असाही उल्लेख आहेच लेखात.

रार, लेखाच्या शेवटी ज्या लिंका दिल्यात त्या शोधताना बहुतांश आतिफ पुर्ण दिवसभर ऐकून झाला आहे. तसेच त्यानंतरही सध्या आतिफच ऐकतोय. आणि हो, गुणगुणतोयही. काल संध्याकाळी आतिफचे दूरीमधील एहसास गाणे गुणगुणताना माझी ग'फ्रेंड माझ्याकडे चिमित्कारीक नजरेने बघू लागली की मी हे कुठले गाणे गातोय. तिलाही ते मग शोधून ऐकवले. तिला आवडले की नाही माहीत नाही, तिच्या चेहर्‍यावरून थांगपत्ता नाही लागला. पण या निमित्ताने मी आतिफ दुसर्‍यांपर्यंत पोहोचवतोयही Happy

पण या निमित्ताने मी आतिफ दुसर्‍यांपर्यंत पोहोचवतोयही >> पोचवायचं काम जरूर करावं. पण ते पोचतंय का, किती पोचतंय, का पोचत नाही, पोचत कसं नाही इ.इ. हे ऐकणार्याला ज्याचं त्याला ठरवू द्यावं, असं नाही का वाटंत? Happy

आता कुणीतरी मंगेशकर भगीनींना बेसुरं म्हणून टाका म्हणजे प्रश्न मिटला.
>>> हे म्हणून झालय . लता काय बेसुरी गात नाही काय असे फोनवर जयवंत कुलकर्णी दादा कोंडकेना म्हतले होते असे दादानी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे. पुढे ते यथावकाश 'योग्य जागी 'पोचवण्यात आले आणि जयवन्त कुलकर्णी यांचे गायन करीअर संपले.

रहमानच्या बाबतीत तो वाद्यमेळाचे ट्रॅक्सचे कॉम्प्युतरने सिंक्रोनाई़ज करतो . गायनाची ओढाताण नव्हे. गयन तर ओरिजिनल असते.

नाही आवडत याचे गायन. खरच रेकतो. गाताना प्रत्येक क्षणी रेकतो. त्यातल्यात्यात एकच गाणे ऐकु शकते, 'तुझको जो पाया' . बाकी फाफा. करावी लागतात. तरीही रेश्मैया इतका असह्य नाही करत. आणि अनु मलिकला मजेतपण गायक म्हणुन संगीताचा अपमान करु नका.

ऋन्मेष, गाणे ज्या पट्टीत गाऊ त्यातल्या प्रत्येक सुराची ठरलेली फ्रिक्वेन्सी असते, ती गाताना थोडीजरी कमीजास्त झाली की बेसुर होते व कानाला लगेच खट्कते
वर लता व श्रेयाबद्दल एकत्र वाचनात आले म्हणुन..... सुरात गायचे म्हटले तर लताच काय पण श्रेया, कालची अलका पण बेसुर होत नसतील, (श्रेया आवडते, अलका थोडी आवडते) पण आमच्या लताच्या गळ्यातुन वेदना, भावना आणि अजुन अलौकीक असे बरंच काही जे प्रकट होते ते इतरांना जमत नसते म्हणुन लता अद्वितीय होते आणि इतर येतात-जातात. म्हणुन पौडवाल मॅडम सुरात गायल्या तरी 'रसिका मी ' शिवाय कधीच आवडत नाहीत.
लताशी तुलना करणार नाही पण फक्त सुरात गाणे याशिवाय अजुनही काही लागते ते या गायकाकडे जाणवले नाही म्हणुन ऐकवत नाही. चौकट राजाने एक बरोबर लिहिले आहे की 'एकाच पद्धतीत तो सर्व गाणी गातो म्हणुन कंटाळ्वाणा होतो . अर्थात ज्यांना आवडतो त्याबद्दल काही म्हण्णे नाही. रैशमिय्यचे गाणे आवडते असे कोणी म्हटले तर जरा आपली ती ही म्हणजे चक्कर येइल. दॅट मॅन इज नॉट अ सिंगर.

आतिफ अस्लम या नावाचा कोणी गायक आहे?<<<
हा प्रश्न मलाही पडला.. Proud

या चर्चेवरून एक किस्सा आठवला.
मागे एकदा एका परिचयातल्या मुलीने 'मोहम्मद अझीज काय सुंदर गातो!!! मला तर बाई मोहम्मद रफीपेक्षा त्याचाच गाणं आणि आवाज आवडतो.' असं म्हटलं होतं. आजतागायत त्या मुलीशी गाण्याविषयी काहीही बोलण्याचं धाडस झालेलें नाही माझं.

अचानक आठवलं आणि इथे नोंदवण्यासारखं होतं म्हणून लिहिलं इतकच..

असो...
हिमेश, हनी सिंगनाही डोक्यावर घेणारे लोक आहेत.. Sad

शेवटी 'आपली आवड' :फिदी:.
जास्त लिहिण्यात आणि वाद घालण्यात रस नाही.
तुमचं चालू द्यात.

वाचकहो,

आयला, इथं लोकं कसले वाद घालत बसलेत कोणी गायक आहे की नाही यावर! खरा गायक मीच आहे. हेच पहा ना या सगळ्या गायकांना मंचावर जामानिमा लागतो. कुणाला कसलीकसली महागडी उपकरणं लागतात. मी मात्र तपेली, बालदीभर पाणी, टॉवेल आणि साबण यांच्या सान्निध्यात सप्तसुरांचे स्वर्ग उत्पन्न करत असतो रोज सकाळी स्नानगृहात. सूर थोडा इकडेतिकडे झाला तरी काही म्हणजे काहीही बिघडत नाही. कधीकधी तर सातांचे पन्नाससाठ सूर सहज होतात. आणि काय तो आतिफास्लम, म्हणे स्टेजवर आग लावतो. माझ्यासारखा पाण्याखाली येऊन आग लावून दाखव म्हणाव.

मला एकदा बोलावून तर बघा तुमच्या घरी. तुम्हीही माझ्यासारखेच गायक व्हाल. शंभर टक्के ग्यारंटी. Wink

आ.न.,
-गा.पै.

मला एक कळत नाहीये की आतिफचा प्रत्येक चहाता तो फार सुरेल नाहीये हे मान्य करतोय तर बाकिच्यांना आता नेमका काय प्रॉब्लेम आहे?
मला आता ही चर्चा बाजुला ठेवून आतिफच्या गाण्याच्या लिंका हव्या आहेत. मिळतील का त्या?

यू ट्यूब वर दमा दम मस्त कलंदर सुरक्षेत्र असा सर्च करा. सुरक्षेत्र चे व्हिडिओ येतील. त्यात आशाजी, रूना लैलाजी व आबीदा परवीनजी ह्या तिघी उत्स्फूर्त पणे दमा दम मस्त कलंदर म्हणतात व आतीफ त्याच्या जागेवरून उठून त्यांना जॉइन होतो. जबरदस्त पर्फॉरमन्स आहे तिघींचा. व त्यात आतीफच्या आवाजाने एक मजा आली आहे. हीमेस शहाण्यासारखा चुप बसून राहतो.

एक पॅन एशिअन साउंड आहे त्यात हे सिंगर्स येतात. नोटेबली जुनून चे गायक सलमान अहमद,
नुसरत फतेह अली खान ,आतीफ.. अजून बरेच आहेत. रेकॉर्डेड पर्फॉरमन्स हा विक्री साठी अस
ल्याने तो स्टु डीओत घासून पुसून पर्फेक्ट बनवलाच जातो. पण लाइव्ह मध्ये थोडा सूर वेगळा लागू शकतो. ते जास्त नैसर्गिक आहे. पण लाइव्ह मध्ये हे लोक्स सुरांच्या ज्या करामती करतात किंवा थोडे इंप्रॉव्ह करून युनीक सुरावटी आणतात त्याची मजा औरच आहे. त्या मानाने जे कायम लाइव्ह
गातात जसे साब्रि ब्रदर्स पटाखा गुडी वाल्या सिस्टर्स त्यांचे आवाज किती वेगळे व कमावलेले अस्तात ते श्रवणीय आहे.

जबरदस्त पर्फॉरमन्स आहे तिघींचा. व त्यात आतीफच्या आवाजाने एक मजा आली आहे.
>>>
हे शोधतो आज,
आतिफचा आवाज ड्युएटमध्ये धमाल उडवतो असा अनुभव..

दक्षिणाजी असे काही होणार नाही
जमल्यास आज रात्री मी आतिफला इथे शेअर करायला घेतो.
इतर चाहत्यांनी विनंती कर्तओ

आतिफ ची गाणी लागली की हल्ली एफेम चॅनल चेंज करतो मी.... फार किनरा गातो... त्यामुळे एकसुरीच वाटतो.

काही गाणी आवडतात त्याची.. पण ज्याची स्वतंत्रपणे एकामागून एक त्याचीच गाणी ऐकावी आणि माहौल तयार व्हावा अश्या यादीत आतीफ अजिबातच बसत नाही.....

द्यायला कशाला हव्यात सुपार्‍या? Uhoh घेतोयच की तो.

आता पुढचा नंबर कुणाचा रे भौ Proud

Pages