आतिफ ! अस्लम !

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 September, 2015 - 13:51

अत् अस् लम .. अत् अस् लम .. अत् अस् लम .. अत् अस् लम ..

पुर्ण ऑडिटोरीयम या गर्जनांनी दणाणून उठले होते. आमचाच ग्रूप यात आघाडीवर होता. थोडे ओळखीपाळखीचेही त्यात सामील झाले होते. ईतरांची काय बिशाद जे या आवाजाला दाबायला जातील. जेमतेम चारपाचशे मुलांना सामावून घ्यावा इतका तो हॉल. मात्र त्याला हजारोंच्या स्टेडियमचे रूप आले होते.. आणि ट्रिंग्गग ऽऽ .. त्याने गिटारवर एक झंकार बीट् देताच क्षणार्धात सारा माहौल शांत.. पण क्षणभरासाठीच.. आणि पुन्हा एकवार भयंकर मोठा जल्लोष ..

आणि तो गाऊ लागला ..

दूरीऽऽ .. दू री ऽऽऽऽऽ सही जाये ना ऽऽ .. हो ओ हो ऽऽ सही जाये ना ऽऽऽ आआ ऽऽऽ

काळजालाही छाती फाडून बाहेर येत त्याच्या सोबत गावेसे वाटावे असे ते शब्द न तो आवाज कानात शिरत होता..

खामोशिया ये सह ना सकू ...
आवाज दे के मुझे तू दे जा सुकून ..

सर्वांचा उत्साह तसाच ठेवत त्याने दुसरे गाणे घेतले..

पहली नजर मे कैसा जादू कर दिया..
तेरा बन बैठा है मेरा जिया..

ओ जाने जा दोनो जहा ..
मेरे बाहो मे आ भूल जा

आणि पाठोपाठ आतिफ अस्लमच्या गाण्यांची एक ‘रेस’च लागली

या सर्वांत परीक्षक शांत होते. निव्वळ त्यांनाच शांत करणे हा आमचा हेतू होता.
जेव्हा त्या आमच्या मित्राला स्टेजवर विचारण्यात आले होते, की स्पर्धेसाठी तू आता कोणाचे गाणे गाणार आहेस.. तेव्हा आतिफ अस्लमचे नाव घेताच त्याच परीक्षकांमध्ये हास्याची खसखस पिकली होती. त्यांचे तेच हसणारे दात आता आम्हाला त्यांच्याच घशात घालायचे होते.

-----------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------

आतिफ अस्लम !

Atif-Aslam.jpg

आमच्या कॉलेजलाईफची सुरुवात आणि त्याच्या कारकिर्दीची सुरुवात बहुधा एकाच वेळची.
त्याच्या "आदत" या एका गाण्याने आम्हाला त्याचा फ्यानक्लबात नेऊन बसवले. तेव्हा आमच्या दर वाक्यात "अब तो आदत सी है मुझको, ऐसे जीने मे.." हे पालुपद असायचेच. त्यानंतर त्याने काही गायले नसते तरीही आम्ही आजीवन त्याचे फ्यान बनून राहिलो असतो.

पण त्याला तेवढ्यावरच थांबायचे नव्हते.
त्यानंतर एका पाठोपाठ एक हिट गाण्यांचा त्याने धडाकाच लावला. मी तर तेव्हा, जेव्हा केव्हा गायचो, त्याचीच गाणी गायचो. आवाजही माझा बरेपैकी त्याच्या आवाजाशी साधर्म्य राखणारा, त्यामुळे लवकरच मी `गरीबांचा आतिफ अस्लम' म्हणून ओळखलो जाऊ लागलो.

(माझ्या आवडत्या गाण्यांची लिस्ट लेखाच्या शेवटी दिली आहे)

पुढे ईंजिनीअरींगला देखील सुदैवाने म्हणा वा योगायोगाने, मला जो ग्रूप मिळाला त्यातही सारे आतिफचेच फ्यान. त्यात एक जण तर कमालीचा सुंदर गाणारा होता आणि त्याचाही आतिफ लाडका होता. आता तो सिनिअर आतिफच्या नावानेच ओळखला जाऊ लागला आणि मी बनलो ज्युनिअर आतिफ. पण मी यातही खुश होतो.

बस्स आमचा तोच मित्र त्या दिवशी कॉलेजतर्फे ईंटरकॉलेज सिंगिंग कॉम्पिटीशनला कोण जाणार याच्या सिलेक्शन स्पर्धेत उतरला होता.

तर,
त्या दिवशी आम्ही आतिफच्या नावाने माहौल केला, मात्र परीक्षकांनी याचा वचपा अंतिम निकालात काढला.
पहिल्या तीन क्रमांकात तो आमचा ‘आतिफ मित्र’ कुठेही नव्हता, ना उत्तेजनार्थ बक्षीसांच्या यादीत होता.

पण सारे निकाल जाहीर झाल्यावर कॉलेजच्या सांस्कृतिक मंडळाकडून एक घोषणा झाली.
त्याने मुलांचा मिळवलेला रिस्पॉन्स आणि जिंकलेली मने बघता, त्याला फायनल ईयरच्या सेन्ड ऑफ पार्टी म्हणजेच निरोप समारंभात, कॉलेजच्या मैदानातील स्टेजवर गायचा बहुमान मिळणार होता.
तो हरूनही जिंकला होता...
आणि आमच्यासाठी आमचा आतिफ अस्लम जिंकला होता..

-----------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------

आज फार काही वर्षे झाली नाहीत त्या घटनेला. पण हल्ली आतिफची गाणी मुद्दामहून ऐकणे होत नाही. त्या दिवशी कोणीतरी ऑफिसमध्ये आतिफचे एक गाणे लावले होते. ‘हम किस गली जा रहे है.. अपना कोई ठिकाना नही’ ... दुसरा कोणीतरी ओरडला, काय रेकतोय हा.. तेव्हा मात्र चीड नाही आली त्या कोणाची. उलट ऑफिसच्या वातावरणाला अनुसरून ते पटलेच.. खर्रच गोंगाट नुसता !

पण तेव्हा एक गोष्ट समजली. आतिफ अस्लमची गाणी ऐकायचे एक वय असते, एक मूड असतो, एक माहौल असतो. शांत आणि चाकोरीबद्ध आयुष्य जगणार्‍यांनी त्या वाटेला जाऊ नये.

असो,
आतिफ अस्लमच्या माझ्या काही आवडत्या गाण्यांच्या यू ट्यूब लिंका खाली देत आहे. एंजॉय Happy

आदत - आतिफ अस्लम - https://www.youtube.com/watch?v=GRXwzUf9Atc
आदत (चित्रपट - कलयुग) - https://www.youtube.com/watch?v=FpsdrNLnDkI

तू जाने ना.. (चित्रपट - अजब प्रेम की गजब कहाणी) - https://www.youtube.com/watch?v=P8PWN1OmZOA

तेरा होने लगा हू .. (चित्रपट - अजब प्रेम की गजब कहाणी) - https://www.youtube.com/watch?v=rTuxUAuJRyY

पहली नजर मे .. (चित्रपट - रेस) - https://www.youtube.com/watch?v=BadBAMnPX0I

तेरे बिन ... (चित्रपट - बस एक पल) - https://www.youtube.com/watch?v=k6NnNv7XJYg

वोह लम्हे वोह बाते .. (चित्रपट - जहर) - https://www.youtube.com/watch?v=omv2hDDVBkg

बाखुदा तुम्ही हो .. (चित्रपट - किस्मत कनेक्शन) - https://www.youtube.com/watch?v=Jpq9tm0gnTM

पिया ओ रे पिया .. (चित्रपट - तेरे नाल लव हो गया) - https://www.youtube.com/watch?v=_hdgIqwIpSk

तू मोहोब्बत है .. (चित्रपट - तेरे नाल लव हो गया) - https://www.youtube.com/watch?v=ApnLd04X7-U

मै रंग शरबतों का .. (चित्रपट - फटा पोस्टर निकला हिरो) - https://www.youtube.com/watch?v=GnzZyGQi2ps

नादान परिंदे (आतिफ वर्जन) - https://www.youtube.com/watch?v=DwENxBjtpI8
रॉकस्टार चित्रपटात हे मोहीतच्या चौहानच्या आवाजात आहे. त्यापेक्षा हे सरस आहे.

दूरी फुल्ल अल्बम - https://www.youtube.com/watch?v=IydHmfhbnoA
यातील माझी आवडती गाणी -
१) दूरी .. २) अहसास .. ३) हम किस गली जा रहे है

वर फक्त माझी आवडती गाणी दिली आहेत. याव्यतिरीक्तही त्याची बरीच गाणी आहेत, जी हिट गेली आहेत. किंबहुना अपवाद वगळता तो हिट गाणीच गातो बहुधा. आता याला त्याच्या आवाजाची जादू बोला वा नशीबाची बाजू. पण अगदी विवेक ओबेरॉयच्या प्रिन्स सारख्या टुक्कार सिनेमात काही बघण्या ऐकण्यासारखे होते तर ते आतिफचीच दोन गाणी.

हे आतिफचे लेटेस्ट - तू चाहिये .. (चित्रपट - बजरंगी भाईजान) - https://www.youtube.com/watch?v=WTLLym2wzIM
(आतिफकडून असलेल्या अपेक्षा यात पुर्ण नाही होत, पण बरे आहे)

असो, हा लेख अपुरा, आहे क्रमश: आहे, किंबहुना लेख असा नाहीयेच.

माझ्या कॉलेज जीवनाशी आतिफच्या गाण्यांच्या एवढ्या काही आठवणी जोडल्या गेल्या आहेत की त्या अश्या पानभर जागेत नाही मावणार, त्यामुळे ही निव्वळ प्रस्तावनाच समजा.
तरी माबोवरील सर्व आतिफ अस्लमच्या चाहत्यांचे इथे स्वागत आहे हे वेगळे सांगायला नकोच Happy

या धाग्याच्या निमित्ताने आज आतिफची उजळणी झाली, वरची सारी गाणी पुन्हा पुन्हा ऐकून झाली. वेळेचे सार्थक झाले, मजा आली Happy

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋन्मेष,

तुमच्या एकदंर इतर आवडीनिवडी पाहता, मी तुमच्यासमोर हे सगळं बोललो ही माझीच चूक झाली. मला जीएंची 'कावळे आणि हंस' वाली कथा आठवली.
सॉरी.

बर्‍याच वेळा लोकप्रियता आणि गुणवत्ता ह्यात गल्लत होते. जे लोकप्रिय असतील ते गुणवान असायलाच हवेत असा अजिबात नियम नाही.
>>

अंह.. जे लोकप्रिय होतात ते गुणवत्तेमुळेच. मात्र आपण त्यांची गुणवत्ता कुठल्या प्रकारची आहे हे ओळखण्यात गल्लत करतो. आपण मनाशी गुणवत्तेचे काही निकष ठरवतो आणि त्यात ती व्यक्ती बसली नाही की ती केवळ नशीबाच्या जिवावर यशस्वी आणि लोकप्रिय झाली आहे असा साधासोपा निष्कर्श काढून मोकळे होतो.

यातही जनरेशन गॅप हा फॅक्टर आला की मग विचारायला नको Happy

रसप.
जगातल्या कोणत्याही दोन व्यक्ती अश्या नसतात जे एकूण एक बाबींत समान आवडीनिवडी राखून असतात. Happy

मी वर एक प्रश्न विचारला आहे... उत्तराच्या प्रतीक्षेत ..

आज बिजी असल्याने काही प्रतिसादांना त्वरीत प्रतिसाद देता आला नाही, आता देतो.

आपण एकदम खंग्री लैफ जगतो अशी स्वतःची इमेज करायची असेल तर याची दोन तीन गाणी फेकता आली पाहिजेत असे दिसते
>>>>>
आतिफबाबत हे असे नाहीये, नसावेच. हे बहुधा काहीतरी अगम्य क्लासिकल वा ओवरस्टायलिश गाणार्‍यांशी होते. आतिफ या दोहोंत नाही येत. जर मी चुकत नसेल तर त्याला जनमाणसात पहिली ओळख आदत गाण्यानेच मिळवून दिली आणि ते सर्वच स्तरावरच्या लोकांना आवडलेले. हिट गेलेले. कोण कुठला आतिफ हे लोकांना माहीतही नव्हते. मग ते मुद्दाम त्याची गाणी आवडतात असे दाखवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. Happy
त्याच्या पुढच्या गाण्यांबाबतही हेच म्हणता येईल.

..

'एक वय असते' हे नाही पटलं..
आवडणारी गाणी ऐकायला वयाची मर्यादा नसते
>>>
सहमत,
ते वाक्य लिहिताना माझ्या डोक्यात मानसिक वय होते Happy

..

'जिने लगा हूं', 'बैरिया' आणि 'रंग जो लाग्यो' पैकी शेवटचं गाणं अशक्य सुंदर जमलंय.
>>>
हल्ली मी कुठलीच नवीन गाणी फॉलो करत नाही त्यामुळे याबद्दलही माहीत नाही. पण आता ही ऐकून बघतो. धन्यवाद Happy

जे लोकप्रिय होतात ते गुणवत्तेमुळेच. मात्र आपण त्यांची गुणवत्ता कुठल्या प्रकारची आहे हे ओळखण्यात गल्लत करतो. >>>>>
आँ, हनी सिंग ही लोकप्रियच आहे, मी मात्र त्याची गुणवत्ता ओळखण्यात गल्लत केली Sad

असोच....

हनीसिंगमध्येही काहीतरी गुणवत्ता नक्कीच असणार ना, अन्यथा सर्वांनीच त्याच्या मार्गाचा अवलंब करून पैसा आणि प्रसिद्धी कमावली असती. बेरोजगारी अशी उरलीच नसती.

अर्थात त्या गुणवत्तेचे प्रमाण आणि मार्केटमधील वॅल्यू यांवर अश्या कलाकारांचे आयुष्य ठरते. हनीसिंग आज आहे, उद्या काळाच्या पोटात गडप होईल. त्याचे चाहते असेही कुठे असणार नाहीत.

पण आतिफने इथे म्युजिक ईंडस्ट्रीमधील काही मतलबी लोकांच्या टिका झेलूनही टिकून दाखवलेय, मोठमोठ्या बॅनरबरोबर काम करून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. उगाच कोणी कोणावरही आपले पैसे इथे लावत नाही.

आतिफच्या दिसण्यातच नाही तर त्याच्या गाण्यात, त्याच्या आवाजातही एक एक्स फॅक्टर आहे.
अश्यांचे बरेच चाहते असतात आणि कायम राहतात.
इतरांना मात्र हे कोडे काही केल्या उलगडत नाही, आणि अर्थात यात त्यांचा दोषही नसतोच, म्हणून आतिफवर होणारी टिका आतिफच्या चाहत्यांनी व खुद्द आतिफनेही स्पोर्टींगलीच घेतली पाहिजे.

आतिफवर होणारी टिका आतिफच्या चाहत्यांनी व खुद्द आतिफनेही स्पोर्टींगलीच घेतली पाहिजे.
>>
O.gif

हे सई आणि स्वजोलाही लागू पडतं शेठ!

हो नक्कीच.
पण टिका स्पोर्टिंगली घेणे म्हणजे, "हो बरोबर आहे तुमचे" म्हणत माना डोलावणे नाही तर, कुठलाही थयथयाट न करता शांतपणे समोरच्याचे ऐकून घ्यायचे आणि तितक्याच विनम्रपणे त्याला त्याची चूकी दाखवून द्यायची. Happy

तितक्याच विनम्रपणे त्याला त्याची चूकी दाखवून द्यायची. >>>>>पण ती स्वीकारायची धाडसच् तू करत नाही भाऊ. उलट तीच चूक कशी बरोबर आहे, हे ठासुन सान्गत बसतोस.:फिदी:

करतो की कबूल, चूक मला पटली की करतो कबूल.
व्याकरणातील वा ईंग्लिशची असेल वा इतर कोणत्याही ठाम माहितीची असेल तर लक्षात येता करतो लगेच कबूल.

पण जर विचारांमधली तफावत असेल तर ते मला समोरच्याचे विचार पटल्याशिवाय का कबूल करू?
तसेच आवडीनिवडींबाबत असेल तर माझी आवड चुकीची आहे हे कबूल करण्याचा प्रश्नच येत नाही.
किंबहुना असे कोणीच करू नये. ते कमजोरांचे आणि आत्मविश्वासाच्या अभावाचे लक्षण आहे.

>>ऋन्मेष,
तुमच्या एकदंर इतर आवडीनिवडी पाहता, मी तुमच्यासमोर हे सगळं बोललो ही माझीच चूक झाली. मला जीएंची 'कावळे आणि हंस' वाली कथा आठवली. सॉरी.>>

रसप - ही चुक करणार्‍यांच्या क्लबात स्वागत. ह्या क्लबातील बहुतांश सदस्य आता त्यांच्या चुकिची जाणीव झाल्यामुळे ह्या लेखकाच्या धाग्यांवरील नवनवीन मुक्ताफळे वाचुन आपली करमणुक करून घेतात.
एखादा सुर इकडे तिकडे झाला तरी चालतो, मराठी लिहिताना शब्द इकडे तिकडे झाला तरी चालतो अशा गोष्टी मान्यच कराव्या लागातात"च" बर का.

ऋन्मेऽऽष - आयुष्यात एकदाच जमलं तर एखादा सुर इकडे तिकडे झाला तरी चालतो हे वाक्य मंगेशकर घराण्यातील भाऊ-बहिणी,शंकर महादेवन, सोनु निगम ह्यांना म्हणून त्यांची प्रतिक्रिया काय झाली ह्यावर लेख पाड.
महंमद रफी आणि सोनु निगम ह्यांच्यातला कोणाचा सूर पक्का असं विचारतोस? - मला निरुत्तर केलेस रे! रसप आधी एका लेखाच्या प्रतिसादात म्हणाले होते त्याप्रमाणे "येथे माझी मति खुंटली".

मंगेशकर घराण्यानेच गायचे का? ईतरांनी गाऊच नये का? एखाद्या आईने आपल्या बाळासाठी अंगाई गातानाही आधी सूर चेक करावेत का? मला पुरणपोळी आवडते, तिच्यातील पुरण थोडे कमी गोड झाले तरी मी खाऊच नये का? भले त्यावर त्या पुरणाभोवतीचे वेष्टन आणि त्यावर शिंपडलेले तूप आहाहा कितीही स्वादिष्ट का असेना पण मग त्याला काही किंमतच नाही का? या जगात किती गायक आहेत जे पर्रफेक्ट सूरात गातात यांची एक लिस्ट मिळेल का? परफेक्ट सूर म्हणजे नेमके काय याचे काही युनिट किंवा निकष मिळतील का? वर मी विचारलेला प्रश्न - सोनू निगम आणि मोहम्मद रफी यांच्यात पर्रफेक्ट सूर कोणाचे या प्रश्नालाच बाद ठरवलेत, पण मी हा प्रश्न नेमका का कशासाठी विचारला हे आपणास समजले का? उद्या जर असे एखादे सॉफ्टवेअर निघाले ज्यात गाणे रेकॉर्ड करून नंतर सूर एडीट करून गाणे पर्रफेक्ट सूरात आणता येईल तर तेव्हाही सुरात गाणार्‍यांना तीच किंमत राहील का? तेव्हा मग कोणत्या गायकाला डिमाण्ड असेल आणि त्याच्याकडून काय अपेक्षित असेल Happy

सावकाश विचार करून उत्तरे येऊद्यात, नाही दिलीत तरी हरकत नाही, पण हे प्रश्न स्वताला नक्की विचारा Happy

मंगेशकर घराण्यानेच गायचे का? ईतरांनी गाऊच नये का? >>> असे अजिबात नाही. सर्वांनी गावे. मंगेशकरांचे उदाहरण दिले फक्त. जिच्या स्वराला १००% परफेक्शन म्हटले जाते तिचे उदाहरण देणे समर्पक वाटले म्हणून दिले. आणि असं बघ प्रत्येक घरी बाईंसारखी गायिका असती तर भारतात करोडो लता - आशा झाल्या असत्या. तेवढ चांगलं गाणं प्रत्येकाला जमत नाही म्हणून त्या महान आहेत ना! आणि ते काय आपोआप नाही आलं त्यांना. त्यामागे अनेक वर्षांची तपष्चर्या आहे.

एखाद्या आईने आपल्या बाळासाठी अंगाई गातानाही आधी सूर चेक करावेत का? >>> अजिबात नाही. पण तीच अंगाई ती रोज माईक वर म्हणून सगळ्या मुहल्ल्याला ऐकवत नसते. फरक तिथे आहे.

मला पुरणपोळी आवडते, तिच्यातील पुरण थोडे कमी गोड झाले तरी मी खाऊच नये का? भले त्यावर त्या पुरणाभोवतीचे वेष्टन आणि त्यावर शिंपडलेले तूप आहाहा कितीही स्वादिष्ट का असेना पण मग त्याला काही किंमतच नाही का? >>> खावी कि. अगदी पुरण नसलेली पुरणपोळी सुद्धा आवडीने खावी. पण म्हणून पुरण नसलेली / कमी असलेली पुरणपोळी कशी छान व बाकिच्यांनी ती तशी आवडून घ्यावी ह्यावर हटून बसू नये. मला पुरणपोळी एवढी आवडते कि माझ्या मते कमी गोड पुरण असेल तर ती पुरणपोळी चांगली नाही व मला ती आवडणार नाही.

या जगात किती गायक आहेत जे पर्रफेक्ट सूरात गातात यांची एक लिस्ट मिळेल का? >>> येथे माझी मती परत एकदा खुंटली.

परफेक्ट सूर म्हणजे नेमके काय याचे काही युनिट किंवा निकष मिळतील का? >>> जमेल तेवढ्या कमी शब्दात सांगायचा प्रयत्न करतो. १. सा रे ग म प ध नी सा ह्या सप्तकातील प्रत्येक स्वर एका सप्तकात एकाच प्रकारे म्हणता येतो. एखादी चाल बांधली जाते तेव्हा अमुक एक तान घेताना, अमुक एका सुरानंतर तमुक एक सूर यावा असे ठरलेले असते. ते तसे न होता निराळाच सूर आला तर त्याला बेसुर होणे म्हणतात व ते कानाला चांगले वाटत नाही. आपल्याला न झेपणार्‍या पट्टीत गाताना काही गायक असे बेसूर होतात किंवा आवाज वळत नसल्यास अवघड तान सोपी करून म्हणतात. किंवा चालीच अशा असतात कि त्यात गायकाला फार काही करिष्मा करायला वावच नसतो (आतिफची अनेक गाणी मला अशी वाटतात) २. प्रत्येक गायकाच्या आवाजाची एक पट्टी असते. व त्या पट्टीत तो जेव्हा एखादा स्वर गातो तेव्हा त्याच पट्टीतील एखाद्या वाद्यावर (उदाहरणार्थ हार्मोनियम), तोच स्वर तसाच उमटत असेल तर तो सूर पर्फेक्ट लागला असे म्हणता येईल. हे झाले माझे बाळबोध ज्ञान. जाणकारांनी अजुन प्रकाश पाडावा.

वर मी विचारलेला प्रश्न - सोनू निगम आणि मोहम्मद रफी यांच्यात पर्रफेक्ट सूर कोणाचे या प्रश्नालाच बाद ठरवलेत, पण मी हा प्रश्न नेमका का कशासाठी विचारला हे आपणास समजले का? उद्या जर असे एखादे सॉफ्टवेअर निघाले ज्यात गाणे रेकॉर्ड करून नंतर सूर एडीट करून गाणे पर्रफेक्ट सूरात आणता येईल तर तेव्हाही सुरात गाणार्‍यांना तीच किंमत राहील का? तेव्हा मग कोणत्या गायकाला डिमाण्ड असेल आणि त्याच्याकडून काय अपेक्षित असेल स्मित ->> असे सॉफ्टवेअर आहेच. ए आर रेहमान त्या कलेतला प्रचंड वाकबगार असा संगितकार आहे हे तू ऐकलं नाहीस का कधी? आणि आपण ऐकतो त्यातली अनेक गाणी तुकड्यात रेकॉर्ड करून अशी "एडीट" केलेली असतात हे तुम्हाला माहिती आहे का? उदाहरणार्थ - "ऐका दाजिबा" हे गाणं मी आजतागायत रेकॉर्ड मधे ऐकलं तसं ( तेवढं चांगल) वैशाली सामंत प्रत्यक्ष गाताना ऐकलं नाही. म्हणूनच शंकर महादेवन, सोनु निगम जेव्हा प्रत्यक्ष कार्यक्रमात एखादं गाणं रेकॉर्ड मधे आहे जस्सच्या तस्स गाऊन दाखवतात तेव्हा त्यांना भाव मिळतो. खरा "चांगला" गायक प्रस्थापित गाण्यामधे स्वतःचे बदल करूनही ते तेवेढच श्रवणीय ठेवू शकतो. (आठव पु लंचे रावसाहेब - त्यांच्या सारखी एक तान घ्या, मुळव्याध होतो कि नाही बघा).

उत्तम सुरातले गाणे व त्या वरील प्रभुत्व म्हणजे काय ह्याचं शेवटचं उदाहरण म्हणून एका व्हिडिओचा दुवा देतो आहे तो बघ. एका मित्रानी हा दुवा पाठवला होता. ह्यातले कलाकार तरूण आहेत पण त्यांनी जे जुनं गाणं म्हटलय त्यातली कमाल तुला जाणवते ते आहे का जरूर सांग.

https://www.youtube.com/watch?v=oKFdA1V9K9Y

मंगेशकर घराण्यानेच गायचे का? ईतरांनी गाऊच नये का? एखाद्या आईने आपल्या बाळासाठी अंगाई गातानाही आधी सूर चेक करावेत का? मला पुरणपोळी आवडते, तिच्यातील पुरण थोडे कमी गोड झाले तरी मी खाऊच नये का? भले त्यावर त्या पुरणाभोवतीचे वेष्टन आणि त्यावर शिंपडलेले तूप आहाहा कितीही स्वादिष्ट का असेना पण मग त्याला काही किंमतच नाही का? या जगात किती गायक आहेत जे पर्रफेक्ट सूरात गातात यांची एक लिस्ट मिळेल का? परफेक्ट सूर म्हणजे नेमके काय याचे काही युनिट किंवा निकष मिळतील का? वर मी विचारलेला प्रश्न - सोनू निगम आणि मोहम्मद रफी यांच्यात पर्रफेक्ट सूर कोणाचे या प्रश्नालाच बाद ठरवलेत, पण मी हा प्रश्न नेमका का कशासाठी विचारला हे आपणास समजले का? उद्या जर असे एखादे सॉफ्टवेअर निघाले ज्यात गाणे रेकॉर्ड करून नंतर सूर एडीट करून गाणे पर्रफेक्ट सूरात आणता येईल तर तेव्हाही सुरात गाणार्‍यांना तीच किंमत राहील का? तेव्हा मग कोणत्या गायकाला डिमाण्ड असेल आणि त्याच्याकडून काय अपेक्षित असेल स्मित

सावकाश विचार करून उत्तरे येऊद्यात, नाही दिलीत तरी हरकत नाही, पण हे प्रश्न स्वताला नक्की विचारा स्मित

रुन्म्या रुन्म्या, लेका बालिष्टल का नाही झालास?

आतीफ अस्लम आवडतो मला खूप. लाईव्ह परफॉमन्स मधे तर 'ही इज फिनॉमिनल ऑन स्टेज' !
श्रेया घोषाल - आतीफ अस्लम अशी लाईव्ह कॉन्सर्ट होती. श्रेया घोशाल मध्यंतराआधी गायलीये , हे लक्षातही राहिलं नाही इतका भन्नाट होता आतीफ स्टेजवर.
पाकिस्तानी पंजाबी गाणी तर सहीच आहेत त्याची...
त्याच्या आवाजाला लिमीटेशन्स आहेत, पण तो त्या लिमीटेश्न्सचा मस्त वापर करतो, माझ्यासाठी तोच त्याच्या आवाजातला 'एक्स - फॅक्टर ' आहे Happy

त्याचा स्टेज प्रेसेन्स हा पण त्याचा एक्स फॅक्टर आहे Happy

त्याच्या आवाजाला लिमीटेशन्स आहेत, पण तो त्या लिमीटेश्न्सचा मस्त वापर करतो >> +१

एक्झॅक्टली चौकट राजा एक्झॅक्टली, लता मंगेशकर यांचे सूर 100 % आहे हेच तर ऐकायचे होते. म्हणून तर वर मुद्दाम सोनू निगम आणि रफी यांच्या सूराची तुलना विचारली होती.
असो, तर मग याचा अर्थ इतर गायक गायिका उदाहरणार्थ श्रेया घोषाल यांचा सूर लतादीदींसारखा 100 टक्के नसावा. 99 टक्के किंवा 99.9 टक्के असावा. म्हणजेच त्यांचा एखादा सूर (0.1-1 टक्के सूर) इथे तिथे होतो असे म्हणू शकतो.
चुकत असेल तर करेक्ट करा.

पुढे आपण म्हणालात तसे सूर एडीट करून परफेक्ट करायचे सॉफ्टवेअर आहे. म्हणजे आतिफचा एखादा इथे तिथे जाणारा सूर एडीट करून त्याला पर्रफेक्ट करू शकतो.
राहिला प्रश्न प्रत्यक्षात गाण्याचा.. तर कम ऑन.. आग लावतो तो स्टेजवर.. यूट्यूब करा आणि त्याचा कुठलाही लाईव्ह कॉन्सर्ट बघा

सुर वगैरे मधलं फारसं काही कळत नाही बाबा मला तरी.
पण प्रथम तुझं पाहता जीव वेडावला पेक्षा पेहली नजर मे कैसा जादू कर दिया मला जास्त भावतं.
इथे कोणत्या गाण्यात पर्फेक्ट सुर आहेत आणि कोणतं गाणं बेसूर आहे याबद्दल मी भाष्य न करता जे मला आवडतंय त्याची मजा घेणं प्रेफर करेन.

असेना का अतिफ बेसूरा....वो सिधा दिल मे घुस जाता है और वही बस जाता है! बस पुरे की इतकंच Happy

ऋन्मेषा, ज्या दिवशी हा धागा आलाय तेंव्हापासून रिपिट मोड वर अतिफला ऐकतेय! खुप खुप थँक्स!
जादू आहे या माणसामधे!

>> उद्या जर असे एखादे सॉफ्टवेअर निघाले ज्यात गाणे रेकॉर्ड करून नंतर सूर एडीट करून गाणे पर्रफेक्ट सूरात आणता येईल तर तेव्हाही सुरात गाणार्‍यांना तीच किंमत राहील का? <<

जमाना झाला असली सॉफ्टवेअरं येऊन. ए. आर. रहमान जेव्हा गातो, तेव्हा त्याचे असिस्टन्ट्स रहमानचं गाऊन झालं की अनेक तास 'ओढाताण' करून त्याला सुरात आणतात, असं मला त्याच्या टीममधल्या एकाने सांगितलं होतं.

ही अशी सॉफ्टवेअरं आली आहेत म्हणून तर कावळे, कबुतरं, घुबडं, बेडकं, गाढवं वगैरे सर्वांना माईकसमोर घसे खरवडायची संधी मिळाली आहे. वर्षानुवर्षं कोकीळ, चिमण्या वगैरे 'तथाकथित' श्रवणीयांनाच ऐकल्याने ही नवी वेगळ्याच चित्रविचित्र आवाजांची फळी 'X,YZ' असे कसले कसले फॅक्टर्स भासवते आहे.

ऋन्मेषा, ज्या दिवशी हा धागा आलाय तेंव्हापासून रिपिट मोड वर अतिफला ऐकतेय! खुप खुप थँक्स!
जादू आहे या माणसामधे!
>>>
सेम हिअर,
याचा आणखी एक फायदा मी कॉलेज जमान्यात देखील पोहोचलोय.

असेना का अतिफ बेसूरा....वो सिधा दिल मे घुस जाता है और वही बस जाता है! बस पुरे की इतकंच
>>>
याच्याशी सहमत.
पण प्रश्न फक्त त्याच्या सुरात नसण्याचा असता तर ते तो स्वताही कबूल करेन,
प्रश्न आहे त्याला टारगेट करण्याचा. माबोकरांनी नाही हा. तर म्युजिक ईंडस्ट्रीमधील काही प्रस्थापित लोकांनी, ज्यांना त्याच्यात धोक्याची चाहूल लागली.

जमाना झाला असली सॉफ्टवेअरं येऊन. ए. आर. रहमान जेव्हा गातो, तेव्हा त्याचे असिस्टन्ट्स रहमानचं गाऊन झालं की अनेक तास 'ओढाताण' करून त्याला सुरात आणतात, असं मला त्याच्या टीममधल्या एकाने सांगितलं होतं.
>>>>>>
हे खरे की खोटे देवच जाणे, बहुधा मिथ असावे हे देखील.
पण मग लाईव्ह शो गाजवणार्‍या आतिफचे कौतुकच करायला हवे नाही का Happy

जमाना झाला असली सॉफ्टवेअरं येऊन. ए. आर. रहमान जेव्हा गातो, तेव्हा त्याचे असिस्टन्ट्स रहमानचं गाऊन झालं की अनेक तास 'ओढाताण' करून त्याला सुरात आणतात, असं मला त्याच्या टीममधल्या एकाने सांगितलं होतं. >>

ए आर रहमानला सुराचे ज्ञान नाही ? Uhoh

इथे जगचे ज्ञान खुंटले सुरांचा प्रवास संपला.

ए आर रहमानला सुराचे ज्ञान नाही ? अ ओ, आता काय करायचं

इथे जगचे ज्ञान खुंटले सुरांचा प्रवास संपला.>>>>>> ऋन्मेष तू अस्सा बोलायला लागला ना की मला माबोवरच्या दुसर्‍या एका माबोकराची आठवण येते, तो पण ऐकत म्हणून नाही बघ. नेहेमी आपलेच खरे.

रहमानला आयुष्यात एकदाच लाईव्ह ऐकावा. सुराबिरांचं ज्ञान गेलं तिकडे.... माणूस केवळ जादू करत जातो.

आता कुणीतरी मंगेशकर भगीनींना बेसुरं म्हणून टाका म्हणजे प्रश्न मिटला.

रच्याकने, "त्या" सॉफ्टवेरचं ना ऑटोट्युन आहे. कसं वापरायचं यासाठी प्रियांका चोप्राला भेटा.

Pages