आतिफ ! अस्लम !

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 September, 2015 - 13:51

अत् अस् लम .. अत् अस् लम .. अत् अस् लम .. अत् अस् लम ..

पुर्ण ऑडिटोरीयम या गर्जनांनी दणाणून उठले होते. आमचाच ग्रूप यात आघाडीवर होता. थोडे ओळखीपाळखीचेही त्यात सामील झाले होते. ईतरांची काय बिशाद जे या आवाजाला दाबायला जातील. जेमतेम चारपाचशे मुलांना सामावून घ्यावा इतका तो हॉल. मात्र त्याला हजारोंच्या स्टेडियमचे रूप आले होते.. आणि ट्रिंग्गग ऽऽ .. त्याने गिटारवर एक झंकार बीट् देताच क्षणार्धात सारा माहौल शांत.. पण क्षणभरासाठीच.. आणि पुन्हा एकवार भयंकर मोठा जल्लोष ..

आणि तो गाऊ लागला ..

दूरीऽऽ .. दू री ऽऽऽऽऽ सही जाये ना ऽऽ .. हो ओ हो ऽऽ सही जाये ना ऽऽऽ आआ ऽऽऽ

काळजालाही छाती फाडून बाहेर येत त्याच्या सोबत गावेसे वाटावे असे ते शब्द न तो आवाज कानात शिरत होता..

खामोशिया ये सह ना सकू ...
आवाज दे के मुझे तू दे जा सुकून ..

सर्वांचा उत्साह तसाच ठेवत त्याने दुसरे गाणे घेतले..

पहली नजर मे कैसा जादू कर दिया..
तेरा बन बैठा है मेरा जिया..

ओ जाने जा दोनो जहा ..
मेरे बाहो मे आ भूल जा

आणि पाठोपाठ आतिफ अस्लमच्या गाण्यांची एक ‘रेस’च लागली

या सर्वांत परीक्षक शांत होते. निव्वळ त्यांनाच शांत करणे हा आमचा हेतू होता.
जेव्हा त्या आमच्या मित्राला स्टेजवर विचारण्यात आले होते, की स्पर्धेसाठी तू आता कोणाचे गाणे गाणार आहेस.. तेव्हा आतिफ अस्लमचे नाव घेताच त्याच परीक्षकांमध्ये हास्याची खसखस पिकली होती. त्यांचे तेच हसणारे दात आता आम्हाला त्यांच्याच घशात घालायचे होते.

-----------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------

आतिफ अस्लम !

Atif-Aslam.jpg

आमच्या कॉलेजलाईफची सुरुवात आणि त्याच्या कारकिर्दीची सुरुवात बहुधा एकाच वेळची.
त्याच्या "आदत" या एका गाण्याने आम्हाला त्याचा फ्यानक्लबात नेऊन बसवले. तेव्हा आमच्या दर वाक्यात "अब तो आदत सी है मुझको, ऐसे जीने मे.." हे पालुपद असायचेच. त्यानंतर त्याने काही गायले नसते तरीही आम्ही आजीवन त्याचे फ्यान बनून राहिलो असतो.

पण त्याला तेवढ्यावरच थांबायचे नव्हते.
त्यानंतर एका पाठोपाठ एक हिट गाण्यांचा त्याने धडाकाच लावला. मी तर तेव्हा, जेव्हा केव्हा गायचो, त्याचीच गाणी गायचो. आवाजही माझा बरेपैकी त्याच्या आवाजाशी साधर्म्य राखणारा, त्यामुळे लवकरच मी `गरीबांचा आतिफ अस्लम' म्हणून ओळखलो जाऊ लागलो.

(माझ्या आवडत्या गाण्यांची लिस्ट लेखाच्या शेवटी दिली आहे)

पुढे ईंजिनीअरींगला देखील सुदैवाने म्हणा वा योगायोगाने, मला जो ग्रूप मिळाला त्यातही सारे आतिफचेच फ्यान. त्यात एक जण तर कमालीचा सुंदर गाणारा होता आणि त्याचाही आतिफ लाडका होता. आता तो सिनिअर आतिफच्या नावानेच ओळखला जाऊ लागला आणि मी बनलो ज्युनिअर आतिफ. पण मी यातही खुश होतो.

बस्स आमचा तोच मित्र त्या दिवशी कॉलेजतर्फे ईंटरकॉलेज सिंगिंग कॉम्पिटीशनला कोण जाणार याच्या सिलेक्शन स्पर्धेत उतरला होता.

तर,
त्या दिवशी आम्ही आतिफच्या नावाने माहौल केला, मात्र परीक्षकांनी याचा वचपा अंतिम निकालात काढला.
पहिल्या तीन क्रमांकात तो आमचा ‘आतिफ मित्र’ कुठेही नव्हता, ना उत्तेजनार्थ बक्षीसांच्या यादीत होता.

पण सारे निकाल जाहीर झाल्यावर कॉलेजच्या सांस्कृतिक मंडळाकडून एक घोषणा झाली.
त्याने मुलांचा मिळवलेला रिस्पॉन्स आणि जिंकलेली मने बघता, त्याला फायनल ईयरच्या सेन्ड ऑफ पार्टी म्हणजेच निरोप समारंभात, कॉलेजच्या मैदानातील स्टेजवर गायचा बहुमान मिळणार होता.
तो हरूनही जिंकला होता...
आणि आमच्यासाठी आमचा आतिफ अस्लम जिंकला होता..

-----------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------

आज फार काही वर्षे झाली नाहीत त्या घटनेला. पण हल्ली आतिफची गाणी मुद्दामहून ऐकणे होत नाही. त्या दिवशी कोणीतरी ऑफिसमध्ये आतिफचे एक गाणे लावले होते. ‘हम किस गली जा रहे है.. अपना कोई ठिकाना नही’ ... दुसरा कोणीतरी ओरडला, काय रेकतोय हा.. तेव्हा मात्र चीड नाही आली त्या कोणाची. उलट ऑफिसच्या वातावरणाला अनुसरून ते पटलेच.. खर्रच गोंगाट नुसता !

पण तेव्हा एक गोष्ट समजली. आतिफ अस्लमची गाणी ऐकायचे एक वय असते, एक मूड असतो, एक माहौल असतो. शांत आणि चाकोरीबद्ध आयुष्य जगणार्‍यांनी त्या वाटेला जाऊ नये.

असो,
आतिफ अस्लमच्या माझ्या काही आवडत्या गाण्यांच्या यू ट्यूब लिंका खाली देत आहे. एंजॉय Happy

आदत - आतिफ अस्लम - https://www.youtube.com/watch?v=GRXwzUf9Atc
आदत (चित्रपट - कलयुग) - https://www.youtube.com/watch?v=FpsdrNLnDkI

तू जाने ना.. (चित्रपट - अजब प्रेम की गजब कहाणी) - https://www.youtube.com/watch?v=P8PWN1OmZOA

तेरा होने लगा हू .. (चित्रपट - अजब प्रेम की गजब कहाणी) - https://www.youtube.com/watch?v=rTuxUAuJRyY

पहली नजर मे .. (चित्रपट - रेस) - https://www.youtube.com/watch?v=BadBAMnPX0I

तेरे बिन ... (चित्रपट - बस एक पल) - https://www.youtube.com/watch?v=k6NnNv7XJYg

वोह लम्हे वोह बाते .. (चित्रपट - जहर) - https://www.youtube.com/watch?v=omv2hDDVBkg

बाखुदा तुम्ही हो .. (चित्रपट - किस्मत कनेक्शन) - https://www.youtube.com/watch?v=Jpq9tm0gnTM

पिया ओ रे पिया .. (चित्रपट - तेरे नाल लव हो गया) - https://www.youtube.com/watch?v=_hdgIqwIpSk

तू मोहोब्बत है .. (चित्रपट - तेरे नाल लव हो गया) - https://www.youtube.com/watch?v=ApnLd04X7-U

मै रंग शरबतों का .. (चित्रपट - फटा पोस्टर निकला हिरो) - https://www.youtube.com/watch?v=GnzZyGQi2ps

नादान परिंदे (आतिफ वर्जन) - https://www.youtube.com/watch?v=DwENxBjtpI8
रॉकस्टार चित्रपटात हे मोहीतच्या चौहानच्या आवाजात आहे. त्यापेक्षा हे सरस आहे.

दूरी फुल्ल अल्बम - https://www.youtube.com/watch?v=IydHmfhbnoA
यातील माझी आवडती गाणी -
१) दूरी .. २) अहसास .. ३) हम किस गली जा रहे है

वर फक्त माझी आवडती गाणी दिली आहेत. याव्यतिरीक्तही त्याची बरीच गाणी आहेत, जी हिट गेली आहेत. किंबहुना अपवाद वगळता तो हिट गाणीच गातो बहुधा. आता याला त्याच्या आवाजाची जादू बोला वा नशीबाची बाजू. पण अगदी विवेक ओबेरॉयच्या प्रिन्स सारख्या टुक्कार सिनेमात काही बघण्या ऐकण्यासारखे होते तर ते आतिफचीच दोन गाणी.

हे आतिफचे लेटेस्ट - तू चाहिये .. (चित्रपट - बजरंगी भाईजान) - https://www.youtube.com/watch?v=WTLLym2wzIM
(आतिफकडून असलेल्या अपेक्षा यात पुर्ण नाही होत, पण बरे आहे)

असो, हा लेख अपुरा, आहे क्रमश: आहे, किंबहुना लेख असा नाहीयेच.

माझ्या कॉलेज जीवनाशी आतिफच्या गाण्यांच्या एवढ्या काही आठवणी जोडल्या गेल्या आहेत की त्या अश्या पानभर जागेत नाही मावणार, त्यामुळे ही निव्वळ प्रस्तावनाच समजा.
तरी माबोवरील सर्व आतिफ अस्लमच्या चाहत्यांचे इथे स्वागत आहे हे वेगळे सांगायला नकोच Happy

या धाग्याच्या निमित्ताने आज आतिफची उजळणी झाली, वरची सारी गाणी पुन्हा पुन्हा ऐकून झाली. वेळेचे सार्थक झाले, मजा आली Happy

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता हा धागा मी वाचणार नाहिये, कारण आतिफ अस्लमचं तेरे बिन कैसे जिया (बस एक पल) हे गाणं मला खूप आवडतं आणि ते मला माझ्या आवडिच्या लिस्टमधुन गमवायचं नाहिये (या ऋ च्या नादात)
आणि अगदी धागा वाचलाच तर मी माझं मन संयमित करण्यासाठी योग साधना वगैरे करीन म्हणजे माझं मन कलुषित वगैरे होणार नाही Wink Proud

ओम नम: शिवाय!

बाकी बॉलीवूडने उगाच डोक्यावर घेऊन लाड केलेल्या पाकिस्तानी कलाकारांच्या मांदियाळीत आतिफ बसतो...

मुद्दा तो पाकिस्तानी असल्याचा कधीच नाही...

पण इथल्या कमाल खान, राजा हसन सारख्यांना फक्त लाईव्ह शोज करायला फॉरेन टूर्स करत सडवायचं आणि प्लेबॅकला आतिफ, राहत फतेह अलि यांना बोलवायचं....

भट कँपला टॅलेंट हंटच्या नावाखाली बाहेरून एक एक नमुने आणायचा भारीच सोस आहे.... आढी गायक झाले आता हिरो - हिरॉईन्स Proud
आपल्याकडे रेशनची रांग लावायला चाहते उभे असतातच Proud Wink

ऋन्मेष,

पुढचा धागा यो यो हनी सिंग, हिमेश रेशमिया, शब्बीर कुमार किंवा तत्सम कोणावर तरी काढा म्हणजे हळूहळू ही सगळी जळमटं झटकून टाकण्याच्या यादीत जातील.

आणि हो, सूर इकडे तिकडे जाण्याबद्दल -

आमच्या पूर्वजांनी नांदती-जागती पेशवाई पाहिली आणि आमच्या सुदैवाने अद्यापही ती कॅसेट आणि सीडीरुपाने शिल्लक आहे. आम्ही शनिवारवाड्यातीलही काही कलाकार पाहिले आणि ऐकले आणि ते मनाला भावले, पण म्हणून मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये गाणार्‍या कलाकारांच्या सुरात गाणार्‍यांना आम्ही डोक्यावर घेऊ शकत नाही.

मला आवडतो अतिफ अस्लम..
माझ्या आईला, दादाला तो रेकतो हेच वाटते. इट्स ओके. मलाही नाट्यसंगीत मुळीच आवडत नाही. आवड आपली आपली.

मी एकच ऐकले आहे - 'तेरा होने लगा हूँ' - आणि आलिशा चिनॉय च्या आवाजानंतर याचा रडा आवाज विचका करतो असेच वाटते मला ते गाणे ऐकल्यावर. >>>> फा, अगदी अगदी ! हे गाण्याशी संबंधीत नाही खरतर पण रणबीर अश्या आवाजात गात असेल हे पटतच नाही. ह्याची बरीच गाणी रेकल्यासारखी असतात.

भुंग्यालाही थोड्याफार प्रमाणात अनुमोदन.

 हे गाण्याशी संबंधीत नाही खरतर पण रणबीर अश्या आवाजात गात असेल हे पटतच नाही.
>>>>>>>

याच्याशी सहमत.
आतिफ प्लेबॅक मध्येही आतिफच असतो आणि त्याचा आवाज खरेच कोणालाही सूट होत नाही.
युनिक आवाज असल्याचा दुष्परीणाम म्हणा की आणखी काही, ते गाणे चित्रपटातले न वाटता आतिफच्या एखाद्या प्रायव्हेट अल्बममधीलच वाटते. म्हणून बरेच गाण्यांवर आतिफचा विडिओही शूट करतात. इथे मात्र त्याचे एका मॉडेलसारखे दिसणे फायदेमंद ठरते.

खरतर पण रणबीर अश्या आवाजात गात असेल हे पटतच नाही. >>> पराग, प्लेबॅक देताना हिरो सारखा आवाज आणि लकबींचा जमाना रफी, किशोर आणि नंतर थोड्या प्रमाणात अभिजीत, उदीत नारायण इथेच संपलाय.
आता कोणताच सींगर प्लेबॅक देताना हिरोच्या आवाजात गात नाही, स्वतःच्याच आवाजात गातो ही रीअ‍ॅलीटी आहे.

ते आहे. पण अगदी हिरोसारख्या लकबी किंवा आवाज काढला नाही तरी आवाज सुट होणं ह्याबद्दल म्हणतोय. म्हणजे ते गाणं सोनु निगम, शान वगैरे 'गोड' आवाजाच्या लोकांनी म्हटलं असतं तर रणबीरला सुट झालं असतं. अतिफ असलामचा आवाज अगदीच विजोड वाटतो.

आता हा धागा मी वाचणार नाहिये, कारण आतिफ अस्लमचं तेरे बिन कैसे जिया (बस एक पल) हे गाणं मला खूप आवडतं आणि ते मला माझ्या आवडिच्या लिस्टमधुन गमवायचं नाहिये (या ऋ च्या नादात)
आणि अगदी धागा वाचलाच तर मी माझं मन संयमित करण्यासाठी योग साधना वगैरे करीन म्हणजे माझं मन कलुषित वगैरे होणार नाही डोळा मारा फिदीफिदी

ओम नम: शिवाय! >> दक्षे मी पन धागा आला तेव्हा हेच गाण आवडत म्हणुन लिहिलय Wink आणि म्हणुन आजकाल मी पन इग्नोरास्त्र मारतेय..याचा स्वजो नै झाला म्हणजे मिळवल..हा आवडतो म्हणुन त्याला इतंरासोबत ( लतादि, रहमान, सोनु, श्रेया, हरिहरन, शंकर म. इत्यादींसोबत ) तोलन म्हणजे अशक्य झालय.. नकोच...


आशाजी, रूना लैलाजी व आबीदा परवीनजी ह्या तिघी उत्स्फूर्त पणे दमा दम मस्त कलंदर म्हणतात व आतीफ त्याच्या जागेवरून उठून त्यांना जॉइन होतो. जबरदस्त पर्फॉरमन्स आहे तिघींचा. व त्यात आतीफच्या आवाजाने एक मजा आली आहे.

https://www.youtube.com/watch?v=B5hIvJWQg5Y

धन्यवाद या विडिओबद्दल, मजा आली Happy
आतिफशी न पटणारेही बघू शकतात

मी पाहीन. मला जर आतीफचे गाणे यात आवडले तर चांगलेच वाटेल.
भुंगा, राहत उत्तम गायक आहे की का तुम्ही लिहिलत ते समजण्यात माझा गैरसमज झालाय?

आता पुढचा नंबर कुणाचा रे भौ>>>>> माझी विनंती. कृपया महागुरूंच मनावर घेणे. आधीच घेतले असल्यास लिंक देणे.

बरेचदा त्याचा आवाज "झोपेतुन उठुन गायला लागला" टाईप्स वाटतो (आठवा आ...आ....आ.... असं काहीतरी. ).
आतिफ डोक्यात जातो, हिमेश परवडला पण आतिफ आवर.

हिमेश हा गायक स्वताहून बनला आहे, त्याला तो स्वता सोडून आणखी कोणा संगीतकाराने गायला दिलेय का?
बाकी तो संगीतकार वाईट नाही, एकेकाळी त्याने धडाधड हिट गाणी दिली होती. त्याला त्याचा गर्व झाला आणि त्यात तो गेला.. याउलट आतिफ डाऊन टू अर्थ आहे.
असो, धागा आतिफचा आहे म्हणून ईतकेच ...

आठवा आ...आ....आ.... असं काहीतरी. >>>>>> हे खरे तर आठवायची गरज नाही. कारण अतिफची गाणी म्हणताना हे आआआ म्हणायलाच जास्त मजा येते Happy

आज सहज एफबी वर खालची पोस्ट पाहिली आणि हा धागा आठवला,
आतिफचा आवाज हा युवा पिढीसाठी काय ब्रॅन्ड आहे याचे उत्तम उदाहरण Happy

11904741_934471953256341_480861000629437898_n.jpg

शिट! एका माणसाची किती जळाली आहे बघा या विडिओमध्ये..
https://www.youtube.com/watch?v=bwxGuVo1N0U
आणि त्यानंतर उत्तरादाखल आतिफची क्रेझ बघा.. आणि त्याचे लंबी जुदाई नक्की ऐका.. निर्विवादपणे एका अदभूत आवाजाची देणगी आहे.

थॅंक्स फाॅर शेअरींग द क्लिप; आय टोटली ॲग्री विथ अभिजीत. माय अमेरिकन कलिग्ज सिंग हिंदि साॅंग्ज वे बेटर दॅन अतिफ, डिस्पायट हेवि ॲक्सेंट... Happy

सर्वात प्रथम मला अतिफची गाणी भयंकर आवडतात. त्याच्या सगळ्या त्रुटींसकट.

आणि त्यानंतर उत्तरादाखल आतिफची क्रेझ बघा.. >> क्रेझ हा मुद्दा नव्हता अभिजीतच्या आक्षेपामधे. तुला वरती तिघा चौघांनी अतिफ सूरामधे गाण्याबद्दल जे लिहिले होते तोच मुद्दा अभिजीतने मांडला आहे.

आणि त्याचे लंबी जुदाई नक्की ऐका.. >> सॉरी बॉस. ते गाणे रेशमाच्या आवाजात जे आहे त्याची सर अतीफला येत नाही. हिजरे कि दीवार नि त्या नंतरच्या दोन ओळी गाताना सूर वर खाली करताना त्याची ओढाताण झाली आहे ती माझ्या सारख्या औरंजझेबाला पण लक्षात येते. तुला स्वरांची रेंज ऐकायचीच असेल तर हे ऐक नुसत्या पेटी नि तबल्याच्या साथीला रेशमाने केलेली त्या गाण्यातली कमाल ऐक. ती जुदाई शब्द किती सुंदर फिरवते दर वेळी ते अनुभव. हिजरे कि उंची दिवार चा लागलेला टीपेचा स्वर ऐक.
https://www.youtube.com/watch?v=kowARsNeMqo

ह्मम, ओके. Happy

पण अभिजीत खूप कमाल माणूस आहे. त्यानंतर मी त्याचा आणखी एक वादग्रस्त विडिओ पाहिला ज्यात तो म्हणाला की मी यापुढे शाहरूखसाठी गाणार नाही. उत्तरादाखल शाहरूख यावर हसला, आणि म्हणाला की हा एक पब्लिसिटी मिळवायचा सोपा स्टंट आहे की मी शाहरूखबरोबर काम नाही करणार असे बोलायचे आणि फेमस व्हायचे. अर्थात, दोन्ही घटना पाहता अभिजीतसाठी ते पटतेच. शाहरूख असो वा आतिफ, अश्या स्टार लोकांबद्दल काहीतरी टिप्पणी करा आणि आपले नाव चर्चेत आणा Happy

असो, पण या लफड्यात मस्त विडिओ हाती लागला,
एखादेच कडवे पण आतिफ फॅन परत परत ऐकतील नक्कीच.. Happy

Atif Aslam - Lambi Judai - tribute to Reshma - https://www.youtube.com/watch?v=hEejj51WJ7s

Lambi Judai - atif Aslam - https://www.youtube.com/watch?v=xcP-g0wCJGM

कदाचित अभिजीत स्पष्टवक्ता असेल असे लक्षात घे. माझ्या आठवणींप्रमाणे तो नेहमीच त्याला वाटलेय ते सरळ सरळ बोलत आलाय नि म्हणूनच तो मागे पडत गेला.

स्पष्टवक्ता Happy
अभिजीतचा बोलायचा टोन बघूनही असे वाटते का याला स्पष्टवक्तेपणा म्हणतात..
उद्या मग एखादा वाह्यात विद्यार्थी शिक्षकांचा अनादर करत त्यांना उलट उत्तर देईन आणि म्हणेन की याला टिळकांसारखा बाणेदारपणा म्हणतात Happy
बॉस, जलन आणि तडफड त्याच्या वाक्यावाक्यातून दिसत होती. अशी माणसे तशीही कधीच पुढे जात नाहीत ..

असो,
आता इथे भारतात साडेचार उलटून गेले आहेत, आणि मी खालील विडिओ बघत आजच्या म्युजिकल नाईटचा समारोप करत आहे Happy

Atif Aslam |Vs| Arijit Singh || Live Performence || Gima Awards 2015 ||

https://www.youtube.com/watch?v=QA55B4_WiTE

ह्या रिअ‍ॅलिटी शो'जमध्ये हे सगळं जे चालतं त्यावर तुमचा सहज विश्वास बसतो का? मला तो सगळा स्टेज्ड ड्रामा वाटतो नेहमीच. शोमध्ये जान आणण्याचा प्रयत्न.

अभिजीत नेहेमीच पाकिस्तानी गायकांचा दु:स्वास करत आला आहे आणि त्यात वावगं काहिच नाहि. भारतात अतिफ, अदनान सारख्या फालतु गायकांचा त्यांच्या लायकिपेक्षा जास्त उदो-उदो होतो, ते हि भारतात भर्पुर टॅलंट असताना - या प्रकाराला अभिजीतचा विरोध आहे.

काश मेहदि हसन, गुलाम अली, नसरत फते अलि यांना त्यांच्या उभरत्या काळात एव्हढं एक्स्पोजर भारतात मिळालं असतं...

लंबी जुदाई आतिफला अजिबात झेपलेलं नाहीये

रेश्माच्या अफलातून गाण्यानंतर आवडलेलं एकमेव व्हर्जन एका मैत्रीणीनं गायलंय. युट्युबवर आहेच, पण मी ऐकलेलं वेगळं.

आम्ही तिच्या घरी परीक्षा जवळ आली म्हनून अभ्यासाला गेलो होतो. रात्रभर अभ्यास एके अभ्यास करून वैतागलो. पहाटे तीन साडेतीनला या मैत्रीणीची बहिण (ही पण मैत्रीणच, ही गायिका आहे) झोपेतून उठून आली, आणि मग कॉफीचा राऊंड झाला. कॉफे पिताना सहज गप्पा आपापल्या बॉयफ्रेन्डबद्दल चालू झाल्या. एका मैत्रीणीचा बॉयफ्रेण्ड तेव्हा रशियाला (कशासाठी ते माहित नाही) गेला होता. तिला चिडवताना अचानक मैत्रीणीनं दोनेक ओळी गुणगुणल्या. म्हटलं "यार फेव गाना है. पूरा सुनादे" त्यानंतर जवळजवळ अर्धा एक तास ती हे गाणं म्हणत होती. अफलातून, कमाल, धमाल, गूजबंप्स, डोळ्यांत पाणी, क्षण विसरूच नये काळ थांबला होता-- वगैरे वगैरे सर्व काही.

हा तिनं गायलेल्या एका व्हर्जनचा वीडीओ:

https://www.youtube.com/watch?v=oogVLGp1T2s

असामी, धन्यवाद. रेशमाचे वरचे गाणे स्वर्गीय आहे, आणि आतिफचे.... सॉरी ऋन्मेष, पण भयानक आहे. त्याने अशी अद्वितीय गाणी गावीत जरूर पण घरीच, स्टेजवर वगैरे नकोत. केवळ त्याची क्रेझ आहे (खरंच आहे का हा आता प्रश्न पडलाय Sad ) म्हणुन चालुन गेले असेल. एका अद्भुत गाण्याचा अपमान झाल्यासारखे मनापासुन वाटले. असो. रेशमाची आठवण येऊन डोळ्यात पाणी आले.

Arthatach ...
Reshma n atif chi tulna house shakat nahi.
Pan mhanun atif waeet gato asahi nahi..
Mala 'Pakistani' 'gayak' ha shabdch avadat nahi.gayak ha gayak asato to bharatiy kinva Pakistani nasatoch. Aso!

Runmesh thanks for the links.
Atif cha awaj an and denara ahe. Surat aso was naso

रीया, वेलकम .. Happy

आतिफचे गाणे सूराशी फारकत घेते यावर चर्चा करण्यात हशील नाहीयेच कारण ते सर्वच मान्य करतात.
मात्र आवाज.. तो नक्कीच अलग, हटके, युनिक असा आहे, आणि तो जे गाऊ शकतो ते ईतर कोणी गाऊ शकत नाही हे देखील तितकेच खरे आहे.
आतिफची क्रेझ आहे की नाही याबद्दल शंका यावी हे नाही पटत. यूट्यूबवरचे त्याचे स्टेज शो बघा, वा त्याची हिट गाणी ऐका, त्याखालील कॉमेंटस बघा.. सगळीकडे ती जाणवते.. अगदी वरचा लंबी जुदाई स्टेज शो विडिओच बघा, त्याचा आवाज कानी पडताच लोकांमध्ये ती क्रेझ जाणवते बघा..
त्यामुळे क्रेझ तर आहेच, तसेच ती निर्माण होण्यास कारणीभूत असे त्याच्या गाण्यात काहीतरी असणारच.
फरक ईतकाच काही जणांना ते दिसते, जाणवते, आवडते, आणि काही जणांना ते नाही गवसत वा गवसले तरी नाही आवडत, ईतकेच!

मला ते आवडते म्हणूनच काल आतिफ, सोनू आणि तीन मोठाले मग भर कॉफीने मला सारी रात्र जागवले..

@ पाकिस्तानी गायक,
यासाठी तर त्याचे एक्स्ट्रा कौतुक करायला हवे असे नाही वाटत.

Pages