वैद्यकीय इच्छापत्र

Submitted by प्रकाश घाटपांडे on 29 August, 2015 - 03:56

२२ ऑगस्ट २०१५ रोजी कोथरुड येथे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात माझ्या सुखांताचा माझा विचार या विषयावर परिसंवाद झाला होता.खाली नमूद केली वैद्यकीय इच्छापत्र हे नमुन्या दाखल आहे. यात प्रत्येक व्यक्ती आपल्या इच्छेनुसार बदल करु शकते. ऎड असीम सरोदे यांनी स्थापन केलेल्या सहयोग ट्रस्ट तर्फे इच्छामरण या विषयावर समाजप्रबोधनात्मक कार्यक्रम घेतले जातात. डॉ शिरीष व डॉ आरती प्रयाग ( वैद्यकीय क्षेत्र) असीम व रमा सरोदे ( कायदा क्षेत्र) मंगला आठलेकर, डॉ रोहिणी पटवर्धन ( वृद्धकल्याणशास्त्र) शुभदा जोशी, विद्या बाळ व रविंद्र गोरे असा एक गट या विषयावर काम करतो आहे. वैद्यकीय इच्छापत्रा आधारे इच्छामरणाला कायदेशीर आधार मिळवण्यासाठी सहयोग ट्रस्ट काम करत आहे. आपण जर हे वैद्यकीय इच्छापत्र संमती व शक्य असल्यास त्यांचे कडे पाठवले तर जनहित याचिकेला जोडता येईल.
सहयोग ट्रस्ट
१, प्रथमेश सहकारी गृहरचना सोसा, प्रभात रोड गल्ली नं ५, पुणे ४११००४
फोन नं- ०२० २५४५९७७७
sahayogtrust.in
वैद्यकीय इच्छापत्र
माझे कुटुंबीय,माझ्या आरोग्याबाबत आस्था बाळगणारी मंडळी आणि माझे डॉक्टर यांच्यासाठी मी हे वैद्यकीय इच्छापत्र लिहून ठेवत आहे.

मी------------------------------------------------------------------------------------------------------------------
जन्मतारीख-.--------------------------------------------------- वय------------------------------------------------
माझा पत्ता-----------------------------------------------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

१) मी मृत्युशय्येवर असेन, लवकरच मरण्याची शक्यता दिसत असेल, आणि मी बोलण्याच्या परिस्थितीत नसेन अशा अवस्थेत माझ्यावर केल्या जाणार्याच उपचारांसंदर्भात मी हे वैद्यकीय इच्छापत्र करुन माझी इच्छा स्पष्टपणे नोंदवून ठेवत आहे
२) आपल्या राज्यघटनेत नमूद केलेल्या, जगण्याचा अधिकार या संकल्पनेची, तसेच अविष्कार स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्काची मला पूर्ण माहिती आहे. सन्मानाने जगणे व सन्मानाने मरणे या भूमिकेला माझा पूर्ण पाठिंबा आहे.
३) माझ्या आजारपणात मला जगवण्यासाठी जे उपचार केले जातील त्यासंबंधी स्पष्ट सूचना मी माझ्या संबंधीतांसाठी पुढीलप्रमाणे लिहून ठेवत आहे.
अ) मी मरणाच्या दारात असेन ,किंवा गाढ बेशुद्धीत असेन, तर माझा मृत्यू लांबवण्याकरिता काहीही उपचार करु नयेत, शरीराला सुया टोचून औषधोपचार करण्याचा किंवा कृत्रिम साधनांच्या मदतीने मला जगवण्याचा प्रयत्न कृपया करु नये.कारण अशा अवस्थेत आपल्या परावलंबनाचे ओझे इतरांवर टाकणे आणि जगत राहणे हे मला कीव करण्यासारखे आणि म्हणुनच घृणास्पद वाटते.
ब) अशा प्रकारे केवळ जगवण्यासाठी जर उपचार सुरु झाले असतील आणि तेही मला सन्मानाचे जिणे जगण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार नसतील तर मला असे निरर्थक जीवन जगण्याची अजिबात इच्छा नाही. म्हणुन हे उपचार ताबडतोब थांबवावे अशी माझी आग्रहाची विनंती आहे.
क) मी असाध्य रोगाने आजारी आहे, एकूणच जगण्याच्या शक्यता मंदावल्या आहेत, किंवा बेशुद्धीतून मी बाहेर येण्याची ही आशा नाही, अशा अवस्थेत मला कृत्रिमरित्या अन्नपाणी देउन जगवण्याचा खटाटोप करु नये. मला आग्रहपूर्वक सांगायचे आहे की,मला अशा परिस्थितीत कृत्रिम रित्या जिवंत ठेवण्याचे सारे उपचार मी नाकारु इच्छितो/ इच्छिते.
ड) मला माहित आहे की,मी काहीही इच्छा नोंदवून ठेवली असली तरी वैद्यकीय तज्ञांशी सल्लामसलत, विचारविनिमय केला जाईल; पण मला ठामपणे म्हणायचे आहे की, याबाबत कायदा असे स्पष्टपणे सांगतो की, अशा परिस्थितीत माणुस स्वत: बोलू शकत नसेल तर त्याच्या इच्छापत्राचे ऐकावे.म्हणुनच माझ्या बाबतीत या संदर्भातील निर्णयाची जबाबदारी घेणार्या सर्वांना माझी पुन:पुन्हा विनंती आहे की, माझ्या वैद्यकीय इच्छापत्राचा मान राखला जावा.
४) माझ्यावर प्रेम करणार्यान, माझ्याविषयी आस्था बाळगणार्‍या सार्‍यांसाठी या इच्छापत्रातून सांगू पहात आहे की, ज्यावेळी कृत्रिम जीवनाधारांच्या मदतीनंतरही मी पुन्हा पहिल्यासारखा स्वावलंबी सहज जीवन जगू शकणार नाही, त्यावेळी तशा अवस्थेत जिवंत राहण्याची माझी इच्छा नाही. त्यावेळी मी सुदृढ मनाने निर्णय घेण्याच्या अवस्थेत मी नसेन, म्हणुनच इथे विचारात घेतलेल्या शक्यतांच्या पलिकडे तुम्हाला काही विचार करुन निर्णय घेण्याची वेळ आलीच तर सन्मानाने जगणे आणि तसेच सन्मानाने मरणे या माझ्या ध्यासाची तुम्ही आठवण ठेवा. हे वैद्यकीय इच्छापत्र मी कुणाच्या दबावाखाली नव्हे तर स्वत:च राजीखुषीने करत आहे.
मी-------------------------------------------------------------------------------------------
खाली साक्षीदारांसमक्ष दि. ------------------------------रोजी वैद्यकीय इच्छापत्रावर माझी सही करत आहे.
----------------
सही
साक्षीदार १)---------------------------------------------------------- सही----------------------------------
साक्षीदार २)---------------------------------------------------------- सही----------------------------------
साक्षीदार ३)---------------------------------------------------------- सही----------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझे किंवा त्यांचे या विषयातील कार्य तुला माहीत आहे का ? असे सुनावण्याची इचछा बाळगणे , ह्यालाच तर सोस म्हणतात ना ?

मरायचे आहे तर गप मरावे , हॉस्पिटलात आजारी असेल तर डी एन आर भरावे नाहीतर बाहेर असेल तर ज्याला रूढार्थाने आत्महत्या म्हणतात , ते मुकाट्याने करून मोकळे व्हावे. दोन्ही मार्ग समाजाने उपलब्ध करून दिले आहेत.

विद्या बाळ यांनी ते मनोगत सांगितलेल्या चर्या दुसऱ्या दिवशी त्या गेलेल्या.
त्या फक्त स्वत:पुरता तो विचार मांडत नाहीएत.
आपलं जगून झालं आहे किंवा जगणं आणखी कठीण व्हायच्या आत मरण हवं , असं वाटणाऱ्या सर्वांसाठी.
कायमची झोप देणारं इंजेक्शन असावं आणि त्याचा वापर सांगून सवरून कायद्याने करता यायला हवा.

सोस नाही वाटला पण मृत्युशय्येवर असलेल्या व्यक्तीची असाह्यता दिसली आणि वाईट वाटलं. बाळ ठणठणीत असताना गारुड्या कडून किंवा मारण्याची सुपारी देऊन काम करणाऱ्या कडून मरावे असं त्यांना खचितच वाटले नसेल. जीवन खात्रीशीररित्या संपवण्याचे मार्ग काही कमी नाहीत. मरण डीग्नीटीने आणि कमीतकमी क्लेश सहन करून झटकन मिळावे हा हक्क असावा याच्याशी ही सहमत. दुर्दैवाने कायद्याची अंमलबजावणी ढिसाळ असलेल्या भारतात तशा कायद्याचा दुरुपयोग होण्याची शक्यता विचारात घेता कुत्रा आवर वेळ येण्याच्या शक्यतेकडे डोळेझाक करणे ही योग्य नाही.
साप आणि सुपारी हे ' उपाय ' वाटणं ते ही बाळ यांना याचं वाईट वाटलं. पराधीन आहे जगती!

भरत + १.

फक्त जगून झालं आहे हा विचार कायद्यात गोळीबंद कसा करायचा? मरण जवळ आहे पण येत नाहीये, जगणे क्लेशकारक आहे आणि क्लेश कमी करायचा उपाय नाही, आजारावर उपाय नाही, हे सगळं सांगणारा आज आत्ता पूर्ण विचार करण्याच्या शुद्धीत आहे हे कायद्याच्या भाषेत ठरवणे तरी शक्य व्हावे.

साप आणि सुपारी हे ' उपाय ' वाटणं ते ही बाळ यांना याचं वाईट वाटलं.>>>>> ते ही हा शब्द का वापरावासा वाटला. मृत्युशय्येवर असताना विद्या बाळ या सुद्धा होमो सेपियन सेपियन आहेत. मृत्युशय्येवर असताना नेमकी काय अवस्था असेल हे आपण फक्त साउंड माईंड मधे कल्पना करतो.

normally i dont mention him here but anyways ... this is not some conclusive dialogue but people familiar with him might get something to ponder over (only if you have spare time in hand for this)
https://jkrishnamurti.org/content/suicide
https://jkrishnamurti.org/content/time-and-death-0
https://kfoundation.org/the-meaning-of-death/
On death and detachment
https://youtu.be/OS4oGI2oQzw

हे वैद्यकीय इच्छा पत्र वाचून काही मुद्द्यावरून दिशाभूल होईल असे वाटते , म्हणून काही मुद्दे स्पष्ट करत आहे :

1. इच्छा मरणाचे एकूण 4 प्रकार आहेत , पैकी महत्वाचे 2 आहेत , एकाला एक्टिव्ह एथुनिसिया म्हणतात , एकाला पेसिव्ह एथुनिसिया म्हणतात. एक्टिव्ह म्हणजे धडधाकट किंवा आजारी माणसाला कसले तरी इंजेक्शन देऊन मारणे, याला भारतात आज मान्यता नाही व भविष्यातही मिळण्याची शक्यता आलमोस्ट शून्य आहे, त्यामुळे मला आता जगण्यात रस नाही , म्हणून मी अवतार समाप्त करत आहे , वगैरेला कायद्याने काहीतरी साप , इंजेक्शन शोधून काढावे , असे ज्यांना जे वाटते , ते तसे सध्या तरी होणार नाही. त्यांच्यासाठी रूढार्थाने आत्महत्या हाच मार्ग उपलब्ध आहे.

2. पेसिव्ह म्हणजे काय ? तर आजारी मनुष्य ऑलरेडी लाईफ सपोर्टवर असेल तर त्याचे ते सपोर्ट बंद करणे , उदा व्हेंटिलेतर बंद करणे , ऑक्सिजन बंद करणे इ इ

3. त्यांनी वर जे लिहिले आहे , मला गंभीर रोगात फार मोठे उपचार करून जगवू नका वगैरे ते पेसिव्ह चाच एक प्रकार / भाग होईल. त्याला भारतात अंशतः परवानगी आहे , बहुतांश वेळेला आर्थिक कारणाने रुग्ण , नातेवाईक असे निर्णय घेत असतात . अर्थात , यावर एक उपाय आहे , सरकारी हॉस्पिटलात मोफत उपचार घेण्याचा, तोही त्याच पत्रात उल्लेख करून रुग्ण , नातेवाईक तेही नाकारून घरी जातात , ह्याला DAMA म्हणतात म्हणजे डिस्चार्ज अंगेंस्ट मेडिकल एडव्हाईज म्हणतात , मग त्याचे जे घरी किंवा रस्त्यात होईल ते होईल.
महागडे उपचार टाळून किरकोळ उपचार करत हॉस्पिटल मध्येच शेवट होऊ द्यावे , असेही करतात , तेदेखील या पेसिव्ह प्रकारातच येईल.

4. आता महत्वाचा प्रश्न आहे , सही कोण कोण व कुठे करणार ? त्यांनी वर जे पत्र दिले आहे , की असे पत्र लिहून तीन साक्षीदार वगैरे लिहून ठेवा , वगैरे , तर असे पत्र कायद्यानुसार शून्य शून्य आहे. असे पत्र म्हणजे काही आधार कार्ड नव्हे की एकदा काढून लेमीनेट करून ठेवले की झाले.

हे पत्र त्या हॉस्पिटलायझेशन मध्येच सही करून द्यावे लागते म्हणजे एडमिशन झाल्यानंतर त्या हॉस्पिटल मध्येच , ते त्या हॉस्पिटलच्या नमुन्यात किंवा हॉस्पिटल देईल त्या केस पेपरवर तारीख वार वेळ घालून लिहायचे असते , आधीच लिहून खिशात ठेवायचे नसते.

कायद्यानुसार दोन साक्षीदार व एक मॅजिस्ट्रेट हजर असावा लागतो , शिवाय हॉस्पिटल इंचार्ज , ट्रीटिंग डॉकटर आणि तिथले डॉकटर पेनेल ह्यांच्या सह्या असतात.

साक्षीदार दोन असतात , पैकी एक रुगणाचा नातेवाईक असतो व एक हॉस्पिटलचा स्टाफ असतो. हॉस्पिटल बाहेरच्या कुणा तरी 3 लोकांच्या सह्या घेऊन आधीच केलेले लेटर व्हॅलीड होत नाही.

5. रुगणाचीही सही लागते , रुग्णा ऐवजी नातेवाईक सही करू शकतो , पण फक्त 4 च कारणांनी

रुग्ण मायनर असेल , बिलो 18
रुग्ण कोम्यात असेल
रुग्ण मानसिक दृष्ट्या विकलांग असेल
रुगणाच्या त्या हातालाच काहीतरी झाल्याने रुग्ण सही करू शकत नसेल

ह्यातले कारणही त्या पत्रात लिहावे लागते.

6. एकदा दिलेले पत्र फक्त फक्त त्या हॉस्पिटलायजेशन मध्येच चालते , थोडा बरा झाला म्हणून रुग्ण घरी घेऊन गेले व पुन्हा एडमिट केले , तर पुन्हा नवीन लेटर लिहावे लागते.

म्हणून वर जे लेखात दिले आहे की असे पत्र लिहून ठेवा , अशा हॉस्पिटल बाहेरील पत्राचा काडीमात्र उपयोग होत नाही.

मुळात हा लेख 2015 चा आहे , 2020 येईतो काही कायदे बदलले गेले आहेत

कृष्णमार्जार यांचा हा प्रतिसाद संयत व माहिती पुर्ण आहे. हा वैद्यकीय इच्छापत्राचा मसुदा झाला त्यावेळी हे पुर्ण कायदेशीर आहे असे म्हणता येणार नाही असे डॉ शिरिष प्रयाग यांनी कार्यक्रमात सांगितले होते. पण काहीच नसण्यापेक्षा हे बरे. डॉक्टरांना कायद्याच्या कचाट्यात पकडण्याचा कुणी प्रयत्न केला तर उपययोगाला तरी येइल असे म्हटले होते. सुजाण डॊक्टर व सुजाण पेशंटचे सुजाण नातेवाईक असतील तर अडचण येत नाही. कारण हा परस्पर सामंजस्याचा मामला असतो. पण तरी दक्षता घ्यावी लागते.

पुरेपूर सहमती, विद्या बाळ ह्यांच्या विचारांना.
माणसाला आपल्या शरीरावर फुल्ल बॉडीली ऑटोनॉमी असावी, कोणीही त्यासोबत काय करावे सांगू शकू नये.

Pages