स्केच - स्मार्टफोनवरील क्रिएटिव अ‍ॅप ... भाग -२

Submitted by पुरंदरे शशांक on 28 August, 2015 - 05:24

स्केच - स्मार्टफोनवरील क्रिएटिव अ‍ॅप ... भाग -२

स्केच अ‍ॅप वापरताना खूपच मर्यादा (लिमिटेशन्स) येतात हे लक्षात आले होतेच.
यातील मुख्य अडथळे म्हणजे -
१] बोट नेमके कुठे टेकले आहे हे कळत नाही.
२] रेघ/ रेषा मारताना एका बाजूला जरा जाड येते तर दुसर्‍या बाजूला जरा बारीक
३] रंगांचे मिश्रण करता येत नाही.
४] एकाच रंगाच्या विविध शेड्स निर्माण करता येत नाहीत.
५] एकसारख्या रेषा कधी नीट येतात तर कधी पार गंडतात
तरीही हे अ‍ॅप इतके चॅलेन्जिंग वाटते की बस्स..

या अ‍ॅपची निर्मिती ज्याने केली त्याच्या मनात नेमके काय असेल असे राहून राहून वाटते ...

मात्र या १० सें. मी बाय ६ सें मी. च्या स्क्रीन वर हे अ‍ॅप वापरुन काही बाही करत राहिले तर आपल्यातील क्रिएटिव्हीटीला (निर्मितीक्षमता म्हणता येईल का ? Happy ) एक (ओबडधोबड का होईना) वाट मिळते एवढे मात्र खरे ...

या भागात फक्त पाने-फुले-झाडे यांचीच रेखाटने आहेत.

(काही त्रुटी आढळल्यास नि:संकोचपणे जरुर सांगा...)

वॉट्स अ‍ॅपवर जे मित्र आहेत त्यांची प्रतिक्रिया - इथे ही रेखाटने जशी दिसताहेत त्यापेक्षा स्मार्टफोनवरील स्क्रीनवर जास्त उठावदार दिसतात.
मला तरी त्यांचे म्हणणे पटतंय पण काय कारण असेल हे लक्षात येत नाही... Happy Wink
--------------------------------------------------------------

१]

sketch-1440742248697.jpg

२]
sketch-1440742463282.jpg

३]
sketch-1440741668600.jpg

४]
sketch-1440681485874.jpg

५]

sketch-1440681254107.jpg

६]
sketch-1440680454084.jpg

७]
sketch-1440680352276.jpg

८]
sketch-1440680289304.jpg

९]

phpTQjWCSAM.JPG

-------------------------------------------------
http://www.maayboli.com/node/54184 स्केच - स्मार्टफोनवरील क्रिएटिव अ‍ॅप ... भाग -१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त दिसतायत सगळीच चित्रं..
फक्त त्या नारळ पोफळींची पानं थोडी जाड हवीत.. अगदीच दुर्वांसारखी दिसत आहेत..

मस्त!

सुंदर.

!काय छान काढली आहेत चित्रे.
तुमचा हात आणि चित्रकल्पना आवडल्या सुंदर आहेत.

माठाच्या भाजीचा देठ स्टइलससारखा वापरून काढलेली स्माइली.
स्माइली

अजुन किती छान हवीत....तुमच पाहुन मी पण मो.वर गिरगाटन सुरु केले तेव्हाच समजले दिसते तितकं हे काम सोपं नाही. बोटाने चित्र काढताना खूप मर्यादा येतात पण मी यावर पण उपाय शोधलाय तयार इमेज एडीट करून त्यावर संदेश लिहिणे ,प्रतीकात्मक आकृत्या काढणे किंवा वारली आर्ट वगैरे वगैरे . खर तर यापेक्षा मनसोक्त आनंद मिळतो छोटया मुलांसारखे बोटे रंगात बुचकळून थेट कागदावर भसाभस रंगवत जाणे .

मस्त.. चढत्या क्रमाने सफाई जाणवतेय चित्रांमधील Happy

माझी ग'फ्रेंड सुद्धा ही आवड राखून आहे. कधीतरी पाहतो तिचीही बोटे या अ‍ॅपवर सफाईदारपणे फिरताना.. नेमका याऊलट मी Happy

हे एक नवीन माध्यम आहे.त्यातल्या खुब्या शोधायच्या,अडचणींना वळसा घालून जायचे आणि कलाकारी करायची.
पांढरा रंग(!) सहज लावता येणे ही या माध्यामाची देणगी आहे.जलरंगात पांढरा भाग राखणे फार कठीण.
व्यंग चित्रासाठी फार उपयोगी आहे.