हरीयाली मावा - पाव किलो
साखर - पाव किलो
बारीक रवा - ४ टे. स्पून
कॉर्नफ्लोर - १ टे. स्पून
तूप - तळण्यासाठी
चौकोनी खडीसाखर / साखर / पिस्ता / काळी मनुका/ ड्रायफ्रूट पावडर/ केसर ह्या पैकी एक किंवा वेळ असेल तर सगळ ट्राय करु शकता.
खायचा सोडा - एका चण्याच्या डाळी एवढा
१. प्रथम हरीयाली मावा, रवा, कॉर्नफ्लोर, खायचा सोडा मिक्स करून गोळा बनवा. अर्धा तास झाकून ठेवा.
२. अर्ध्या तासाने पुन्हा हलक मळून त्याचे छोटे गोळे करा. गोल गोळा करून त्यात अंगठयाने दाबून त्यात चौकोनी खडीसाखर / साखर / पिस्ता / काळी मनुका/ ड्रायफ्रूट पावडर/ केसर ह्या पैकी एक किंवा वेळ असेल तर प्रत्येक गुलाबजाममध्ये एकेक प्रकार घालून ट्राय करु शकता.
३. साखरेत तीन वाटी पाणी घालून पाक तयार करून घ्या.
४. तूप गरम करून घ्या आणि स्लो फ्लेमवर गुलाबजाम तळून घ्या. तळलेले गुलाबजाम पाकात घाला.
५. सगळे तळलेले गुलाबजाम पाकात घातल्यावर पाकाला पुन्हा २-३ मि. उकळवा.
६. गरम किंवा पाकात मुरवून थंड कसेही खा.
डाएटवाल्यांनी अर्धा अर्धा खा.
आणि हा कॅलरीजचा विचार न करता खा.
जाडा रवा असेल तर थोड पाणी घालून भिजवून घ्या.
भारी रेसिपी!आम्ही नेहमी
भारी रेसिपी!आम्ही नेहमी गुलाबजामचाच खवा वापरतो. मंजूडीने टाकलेला फोटो जीवघेणा आहे. त्या मित्राला गाठायला हवं.
मंजूडी, मस्त फोटो ग.असे फोटो
मंजूडी, मस्त फोटो ग.असे फोटो टाकून जळवू नका ग.
मस्तच! माझा झब्बू. मिल्क
मस्तच!
माझा झब्बू. मिल्क पावडरचे.
आई ग, हे फोटो सारखे बघून
आई ग, हे फोटो सारखे बघून मला दोन दिवस गुजा खावेसे वाटताहेत.
आता जानू म्हणाली असती तर ठिक.
पण इतकं कमालीचं क्रेवींग होतय ना.... गोड कमी केलय म्हणून फोटो बघते आणि शांत होते पण ह्या मनाला कोण समजावणार?
नानक चे बरे आहेत आणले पाहिजेत.
घरी इतकी मारामारी कोण करणार
मस्तच.
मस्तच.
एक से एक भारी फोटो आहेत गुजा
एक से एक भारी फोटो आहेत गुजा चे!!!
काही ठिकाणी कढईतला मावा /खवा
काही ठिकाणी कढईतला मावा /खवा मिळतो त्याचे गुलाबजाम केले तर फारच सुगंध येतो ,अगदी पाकालाही.परंतू ते फारच ढेपाळतात. फुटु नये म्हणून रवा घातला की सुगंध गायब होतो.
कढलं किंचित उचलून हलकेच
कढलं किंचित उचलून हलकेच गोलगोल फिरवायचं. गुलाबजाम आपलेआपणच गिरक्या घेत सर्व बाजूनी सारखे तळले जातात आणि झारा न लागल्याने फुटत नाहीत. <<<<< अश्विनी, ही आयडीया मस्त आहे. नेक्स्ट टाईम युज करणार.
नलिनी झब्बू मस्तच.
झंपी, तुम्हि नानकच्या गु.जा. चे फोटो टाका.
Pages