सॅटीन आणि फक्त सॅटीन - भाग २ - कृतीसह

Submitted by टीना on 25 August, 2015 - 10:40

या धाग्यावर फोटो जास्त झाल्यामुळे अपलोड व्हायला त्रास होत आहे त्यामुळे हा नविन धागा काढलाय. यापुढे नविन फोटो मी इथे शेअर करेल.. तुम्हीपन तयार केलेल सॅटीनच काम इथं शेअर केल्यास आवडेल..

बर्‍याच लोकांनी मागे मी दिलेल्या हेअरबेल्ट ची कृती इथे देण्याचा प्रयत्न करत आहे.. लि़ंक त्यावर दिली आहे तरीही फोटोद्वारे ती समजवुन सांगण्याचा हा प्रयत्न.. तुमच्या आवडत्या रंगांना घेऊन तुम्हीसुद्धा हे तयार करा आणि बनवल्यावर त्याचे फोटो शेअर करा :)..

हा बेल्ट :

हि कृती :

दुसर्‍या कोलाज मधला शेवटचा फोटो पिकासाने परस्पर अ‍ॅडजस्ट केलाय आणि तो काढून टाकायला मी विसरली. त्यात स्टेपनुसार फोटो अरेन्ज केलेत मी पण १ २ ३ ४ नंबर टाकायला विसरली Sad

मागील धाग्यावर एक बन असणारा हेअरबेल्ट दिला आणि त्याच रंगाच्या हेअरक्लीप्स सुद्धा दिल्यात. त्यात तयार केलेल्या फुलांच्या पाकळीची हि कृती..

ह्या पिन्स आणि फुलं :

हि त्याची कृती :

तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा करते Happy ..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रीया Proud
मी सद्ध्या तरी डेव्हलपमेंट मधेच आहे.. Lol
राहता राहिला बग्स चा प्रश्न तर मला आणखी एक गोष्ट खटकलीए त्या कानातली Wink

ती रिबीन आहे गं..
पकडू तशी राहते..उजव्या बाजुच्या बिडकॅप ला पहा.. डावीकडली पाकळी समोर आहे तेच उजवीकडली दोन पाकळ्यांमधली गॅप समोर आलीये Lol

टीना, etsy अशी एक साईट गुगल कर . तिथे आपण केलेल्या वस्तुंचे फोटो, डिटेल्स, किंमत वगैरे टाकायचे आणि अॅार्डर आली की कुरियर करायचं . आपलं छोटसं ई -दुकानच.

मी माझ्या क्रोशेकामासाठी बघत होते मध्यंतरी पण नंतर सोडुन दिलं. म्हटलं छंद आहे तेच पुरे. नोकरी आणि घर हेच खुप होतं मला. पण तु बघ. तुझी कपॅसिटी डेफिनेटली जास्त आहे.

ममो..
बघते गं..सुचवल्याबद्दल धन्यवाद Happy
मला यात करिअर वगैरे करायचा विचार नै अज्जिब्बात पण माझ्या असिस्टंट ( माझी मोठी ताई आणि मयु ) सुद्धा हौशी आहे . अर्थात वर बॉस असला तरच Wink .. पण हरकत नाही.. आवड म्हणुन तयार करत राहतो आम्ही अस बरच काही बाही.. ते जर एखाद्याला विकता आल तर छानच आहे..

प्रॉब्लेम अस विकताना हा आहे कि बरेचदा लोकांना हँडमेड गोष्टी रुचत नाही..ते त्या डेलिकसी ने हाताळत सुद्धा नाही. ओढून पाहु दे , आपटून पाहु दे असले प्रकार करतात आणि म्हणतात,"छे यात काय !" ..
करणारा गेला चुलीत Lol

असो..बघते..मध्यंतरी आमचा olx वर टाकायचा विचार होता..पण राहुन गेल ते..हे बघते आता..

फॅबिंडिया किंवा तत्सम दुकानात चांगले पॅकेजिंग करुन विका(त्याना अप्रोच कसे करायचे माहित नाही), आरामात विकले जातील आणी पब्लिक ओढाताणीचे धाडस करणार नाही.

नविन हेअरपिन्स तयार केल्या..
ह्या काळ्या रंगाच्या कृष्णधवल रंगात काढलेले प्रचि Happy

सारखं काय गं तेच तेच सांगायच ???? ---- "मस्तयं , आवडलयं , छानच ..... "
>> नै तर काय.. ही नुस्तचं फोटो दाखवते.. गटग करत नाही शिकवायला.. करुन पण देत नाही आयतचं ... हुह!

आयला गटग आयडिया सहिये...
शिकवायलामज्जा येईल..
आज सॅटीनचे ट्युलिप बनवले पण मोबाइल वरुन दाखवता नाहीं येत Sad

नविन ट्युलिपचे फुलं तयार करायला शिकली..मग काय त्याचाच धुमाडा धरला..
फोटो सगळे मोबी मधले म्हणुन एवढे काहि खास नै आले..

खुपच सोप्पे आहे तयार करायला..मी १" च्या रिबीन चे तयार केलेयत सगळे..
आता माझ्याकडे रंगबेरंगी ट्युलिपची बाग फुललीये बघा..असले नसले सगळे रंग वापरलेत.. हिरवा सोडून ..पुढ मागं पान तयार करायची म्हटल तर म्हणुन ..

हे बघा सगळे प्रचि :

Pages