सॅटीन आणि फक्त सॅटीन - भाग २ - कृतीसह

Submitted by टीना on 25 August, 2015 - 10:40

या धाग्यावर फोटो जास्त झाल्यामुळे अपलोड व्हायला त्रास होत आहे त्यामुळे हा नविन धागा काढलाय. यापुढे नविन फोटो मी इथे शेअर करेल.. तुम्हीपन तयार केलेल सॅटीनच काम इथं शेअर केल्यास आवडेल..

बर्‍याच लोकांनी मागे मी दिलेल्या हेअरबेल्ट ची कृती इथे देण्याचा प्रयत्न करत आहे.. लि़ंक त्यावर दिली आहे तरीही फोटोद्वारे ती समजवुन सांगण्याचा हा प्रयत्न.. तुमच्या आवडत्या रंगांना घेऊन तुम्हीसुद्धा हे तयार करा आणि बनवल्यावर त्याचे फोटो शेअर करा :)..

हा बेल्ट :

हि कृती :

दुसर्‍या कोलाज मधला शेवटचा फोटो पिकासाने परस्पर अ‍ॅडजस्ट केलाय आणि तो काढून टाकायला मी विसरली. त्यात स्टेपनुसार फोटो अरेन्ज केलेत मी पण १ २ ३ ४ नंबर टाकायला विसरली Sad

मागील धाग्यावर एक बन असणारा हेअरबेल्ट दिला आणि त्याच रंगाच्या हेअरक्लीप्स सुद्धा दिल्यात. त्यात तयार केलेल्या फुलांच्या पाकळीची हि कृती..

ह्या पिन्स आणि फुलं :

हि त्याची कृती :

तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा करते Happy ..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बायदवे...बहोतही ऑर्डर येत आहे मला याच्या..
काय म्हणता? नुसत पेंडंट कितीला विकता येईल Wink
फावल्या वेळातला टाईमपास चांगलाय न .. काय हरकत आहे ?

टीना, मस्त स्टेप बाय स्टेप फोटो टाकले आहेस. मी ट्राय करीन. पण लायटर आणुन नंतरच करीन.

टीना , पेंडट सही झालयं. वरीजनल पेक्षाही सुंदर.

ममो..आंधळ प्रेम करतेस का तू माझ्यावर Wink ? थँक्यु गं ..
आता कल्पना आलीय..दोन तीन लाईनमधे आहे मला बनवून द्यायचे आहे गं..
दुसरे रंग ट्राय करावे का गड्यांनो ?

टिने, ममो म्हणतेय ते मी पण म्हणणार होते. ओरिजनल पेक्षा हे जास्त छान दिअस्तंय
(पण नाही म्हणले )

दुसरे रंग कुठले सुचतायेत तुला?

कसलं सुबक काम आहे हे ! तो स्वस्तिने फोटो दिलाय तसले पेंडंट माझ्याकडे आहे... फक्त ते सेमी प्रेशियस स्टोन्स लावलेले आहे Happy

नका सुचवू जाऊद्या..
मेरा रीटेलर ऐसे इंग्लिश कलर प्रोव्हाईड नै करता न बा Sad

बाकी मी हे पेंडंट थोपू वर फेविक्रिल हॉबी आयडीयाज वर टाकल .. खुप जणांना आवडल आणि त्यांनी मला प्रोसिजर विचारली..आली न आफत...म्हटल आपला जुगाड अंगावर बसतो कि काय पर देवा..कृती सांगताना पहिलेएवढ्या अडचणी अज्जिब्बात नै आल्या आणि मी स्टेप बाय स्टेप कृती देउ शकली..
कोलाज करुनही तब्बल नऊ फोटो आहे.. इथं हवे असल्यास इथेपन देते पण इतर जे बनवण्यात इंटरेस्टेड नै त्यांना उगा बोर होईल न बघणे .. त्यातही फाँट जरा लहानच आला आहे लिहिलेला Sad .. तस फोटोवरुन कल्पना येईल म्हणा तरीपन.. असो..

सर्वांना धन्यवाद..पीच कलर, मोतीया कलर, ग्रे कलर चा शोध घ्यावा लागेल..

दिनेशदा, लक्की यु..मला गरिबी गरिबी बनवाव लागलं Wink Proud

तिथे बरच न विचारता आपली पोस्ट शेअर करणार्‍यांचा अनुभव येत आहे मला..तरी बर झालं की निदान कंटाळत का होईना पण वॉटरमार्क टाकते मी..
आज आणखी एकजणीने शेअर केली..मि तिला मॅसेज टाकला कि,
तुला माझ काम आवडल याचा मला आनंद झाला पन निदान कुणाच्या पोस्ट शेअर करण्यापूर्वी एकदा त्या व्यक्तीला विचारण्याचे कष्ट घेत जा.. अ‍ॅटलिस्ट कॉपीराईट्स फॉलो कर .. असे..
बर केलं ना ?
मागे एका --- Enterprize वाल्याने केलं होत अस काम..त्याच्यासोबत तर बहोतच खडाजंगी झाली माझी अगदी ब्लॉक करेपर्यंत..

हात्तीच्या .. कुणालाच कळलं नै होय..>> कळल की काय फरक आहे ते! तुझ्या पेन्ड्टच्या पाकळ्या सगळ्या डाउनवर्ड आहेत त्यामुळे एकावर एक दाबल्या गेल्यात,..ओरिजनल मधे प्र्त्येक पाकळीच्या जोडिचा आकार वेगळा आणी खुललेला दिसतोय...ते कदाचित तुला हव ते मटेरियल न मिळाल्याने असेल.

तुझ पेन्ड्ट ओरिजनल शी तुलना न करता एक indivisaul पिस म्हनून उत्तम जमलय...तुलना केली तर ओरिजनल सरस ठरेल.

मि अनू, प्राजक्ता, plooma, अन्जू थँक्स Happy

हे त्यावर मॅचिंग कानातले केलेत..

हे दुसर्‍यांदा केलेल..हात बसल्यासारखा वाटतो न पहिलेपेक्षा.. मला वाटतोय कारण.. Happy

तो जो निळा मणी आहे तो निळ्या सॅटिन रिबिन मधुन एका बाजुने जरासा बाहेर आलाय.
म्हणजे एका बाजुला तो रिबिनच्या आत न दिसता रिबिनच्या वर दिसतोय

छान दिसतंय गं.
प्रायसिंग करण्यासाठी मदत म्हणून बरेच ब्लॉग्ज आहेत. How to price handmade किंवा अश्या अर्थाचे कीवर्डस घेऊन गुगल कर. मिळतील.
त्यावरून प्रायसिंगची आयडिया येईल.

इथं प्रोफेशनॅलिझम मधे मार खाते
>>
असं मुळीच नाही. हाताने बनवलेल्या वस्तू कधीच एकसारख्य अहोत नाहीत Happy
तूला ते दुरुस्त करायला आलं तर बघ इतकंच Happy

मीच टेस्टींगमधे असल्याने जिकडे तिकडे बग्स काढत बसण्याची सवय लागलीये मला आजकाल खरतर Proud

Pages