मेरे पास राधे मॉं है! - दिवस ३ रा

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 August, 2015 - 17:54

सध्या सोशलसाईटसवर राधे मा आणि त्यांचे स्कर्ट घातलेले फोटो हिट ठरताहेत.
आणि त्यावरूनच व्हॉटसपवर एक मेसेज फिरतोय,

व्हाय शूड* बाबाज हॅव ऑल द फन ..
- राधे मा

ज्यांना लगेच विनोद समजत नाही अश्यांना उलगडून देतो. म्हणजे आसारामबापूंसारखे पुरुषच का बाबागिरीच्या आड लाईफ एंजॉय करणार.. आता आमची पाळी आहे Happy

विनोदावर हसलो आणि फॉर्वर्ड केला. मायबोलीवर नव्हता टाकला कारण राधे मा यांचे कोणी भक्त इथे असल्यास भावना दुखवायला नको.

आज मात्र टाकला कारण हा विनोद नव्हताच असा साक्षात्कार मला सोनू निगमच्या लेटेस्ट ट्वीट वरून झाला.
त्याने स्त्री-पुरुष समानतेचा हाच मुद्दा उचलत राधे मा यांच्या बचावासाठी ट्वीट केलेय की जर पुरुष साधू नग्न फिरू शकतात तर राधे मा यांनी स्कर्ट घातले तर बिघडले काय?

मगाशी सविस्तर बातमी पाहिली,
पुढे त्याने जोडले आहे की मी कोणाला मानत वगैरे नाही पण माझा मुद्दा एवढाच आहे की कपड्यांच्या लांबीवरून कोणा स्त्रीचे चारीत्र्य ठरवू नये.
अर्थात, स्वतंत्रपणे हा मुद्दा योग्यच आहे. पण नक्कीच राधे मा प्रकरणात हा आणि एवढाच मुद्दा नसावा.

काही का असेना, आपल्या कडून स्त्री-पुरुष समानता राखली जावी म्हणून पुरुष बाबा बापू महाराजांवर जसे मायबोलीवर आजवर अनेक धागे निघालेत तसा हा एक धागा स्त्री असलेल्या राधे मा के नाम Happy

* शूल्डचे शूड करण्यात आले आहे याची नोंद घ्यावी.

-----------

राधे मा यांना सुभाष घई यांनी भक्तीपुर्ण पाठिंबा दर्शवला.

Radhe Maa treats me and my wife as her parents: Subhash Ghai

http://www.hindustantimes.com/bollywood/radhe-maa-treats-me-and-my-wife-...

पुरा बॉलीवूड जुट गया है राधे मां को बचाने के लिये. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

राधा राधा राधा राधा, माझी राधा कुठे गेली बघा
केस गेली कोर्टात म्हणून जीव झाला माझा आधा
राधा राधा

चाळीस वर्षांपुर्वी बोरिवलीच्या नॅशनल पार्कात लेण्यांच्या आजूबाजूस भटकंती करत होतो .आतमध्ये चार पाच आश्रम पाहिले.मठ बनवून मंदिरे ,आंबे काजू,नारळ यांच्या बागा केल्या होत्या.श्रीमंत कुटुंबे तिथे येऊन मठाधिपतींचा आशिर्वाद घेत होती.मठातल्या अधिपती,सेवेकय्रांच्या तब्येती तेज:पुंज होत्या.
इकडे गेटच्या आसपास मोठ्या प्रमाणात वस्ती होत्या.दिल्लीकरांचा आशिर्वाद कारण इथे राज्य सरकारचं काही चालत नाही.त्यांना डोबिवलीजवळ अधिकृत घरे बांधून स्थला्ंतरीत करण्याचा डाव तिथल्या गावकय्रांनी हाणून पाडला होता.गुरू/गरुवीणींना रंजलेल्या गांजलेल्या भक्तांचा(!) उद्धार करण्यासाठी सर्वसंगपरित्याग पत्करावा लागतो त्यांच्याबद्दल कुणाला सहानुभूती वाटत नाही. वर निंदा होते हा समाजाचा ढोंगीपणा नाही का?

गुरू/गरुवीणींना रंजलेल्या गांजलेल्या भक्तांचा(!) उद्धार करण्यासाठी सर्वसंगपरित्याग पत्करावा लागतो.
जय राधे मा
तुमच्या सादगीला प्रणाम.

एक शादी में फोटोग्राफर ने दुल्हन के २५० फोटो खींच लिये....
तब जाके दुल्हन के बाप ने उसको बताया

" भाई ये दुल्हन नहीं है ! ये तो राधे माँ है..... दुल्हन तो अभी पार्लरमें ही है ! "

Whats App वरील,

कल राधे माँका जन्मदिन है..

यह sms 9 लोगोंको भेजे तो राधे माँ
ख्वाब में आकर मिलेगी!

एक लडकेने इसे झूठ समझकर डिलीट किया
तो ख्वाब में आसाराम बापू आ गया!!

आगे आपकी मर्जी!!!

>>वाचताना मात्र 'ल' ला मूकबधीर ठेवत शूड असे वाचू शकता>> मी "मुकबधीर" वरच अडकलो आहे अजून. सीरियसली?? "मुकबधीर" ?? मराठी प्रतिशब्द सुचत नसल्यास हरकत नाही पण म्हणून काहीही लिहायचं का? इंग्रजी 'सायलेंट' ला मराठीत मुकबधीर म्हणण्या ऐवजी "वाचताना ल गाळून वाचा" असं म्हणायला हरकत नाही.

>>धागा उघडायचा तर काही तरी चार ओळी लिहाव्या लागणार ना.>> अगदी बरोबर!! त्यामुळेच हा एक टीपिकल "ऋन्मेऽऽष धागा" आहे व त्यामुळे धाग्याच्या मुळ विषयावर माझा पास.

इंग्रजी 'सायलेंट' ला मराठीत मुकबधीर म्हणण्या ऐवजी "वाचताना ल गाळून वाचा" असं म्हणायला हरकत नाही.
>>>>

त्यावेळी माझी प्रायोरीटी शुद्ध मराठी लिहिणे नसून समोरच्यापर्यंत आपला मुद्दा पोहोचवणे होते, ते मी पटकन करून टाकले. Happy

असो, पण त्याबदल्यात "वाचताना ल गाळून वाचा" एवढे मोठे वाक्य सुचवण्याऐवजी सायलंटला नेमका शब्द सुचवा ना ..

>>धागा उघडायचा तर काही तरी चार ओळी लिहाव्या लागणार ना.>> अगदी बरोबर!! त्यामुळेच हा एक टीपिकल "ऋन्मेऽऽष धागा" आहे
>>>

हो, कारण मला या धाग्यात राधेमा बद्दल काही सांगायचे नव्हते तर त्या नेमके काय चीज आहेत हे जाणून घ्यायचे होते. माझे त्यांच्याबद्दल अजून काही ठाम मत होत नाहीये तर उगाच का मांडा.

>>त्यावेळी माझी प्रायोरीटी शुद्ध मराठी लिहिणे नसून समोरच्यापर्यंत आपला मुद्दा पोहोचवणे होते, ते मी पटकन करून टाकले. स्मित>> आधी सुद्धा दोन तीन प्रसंगी हेच कारण सांगुन तु वाट्टेल ते शब्द वापरले आहेस (आठव एकदा मी 'स्वता' ऐवजी 'स्वतः' लिहित असं म्हणालो होतो, तुझं ते "कोपरापासून धन्यवाद" इ.)
इथेसुद्धा > वाचताना मात्र 'ल' ला मूकबधीर ठेवत शूड असे वाचू शकता > ऐवजी, > वाचताना मात्र 'ल' गाळून शूड असे वाचू शकता > इतका सोपा बदल करता येऊ शकतो.

असो, माझा उद्देश तुझ्या चुका काढण्याचा नसून तुझं मराठी अजून चांगलं / शुद्ध व्हावं हाच आहे. मायबोलीवरच्या इतर अनेक लोकप्रिय लेखकांच्या लेखांमधे तसे विचित्र शब्द्प्रयोग वाचायला मिळत नाहीत म्हणून ते जास्त भावतात हेही लक्षात घे. पण तुला लवकरात लवकर काहीतरी लिहून टाकायचं असतं. मग लिहिताना अर्थाची वाट लावणारे चुकिचे शब्द्प्रयोग झाले तरी चालतील पण मुद्दा लवकरात लवकर खरडायचा नाही का?
मी प्रयत्न करून बघितला पण तुझा उद्देशच वेगळा आहे. त्यामुळे ह्यापुढे माझा राम राम आणि राधे मा वरच्या संशोधनास शुभेच्छा.

आपल्या हेतूबद्दल शंका नाही की आले मोठे माझ्या चुका काढणारे असेही नाहीये.. चुका निघाल्या मराठीच्या आणि ते सुधारले तर चांगलेच आहे. कारण माझे मराठी वाह्यात आहे हे मी कबूल करतोच. पण काही वेळा खरेच पटकन खरडून टाकायचा एवढाच हेतू असतो. मायबोलीवरच्या ईतर लेखकांशी मी माझी तुलना नाहीच करत, तसेच माझे लिखाण वाचून कोणी तेच मराठी प्रमाण मानेल आणि चुकीचे मराठी पसरेल असेही नाहीये. म्हणून शुद्ध लिखाण जास्त सिरीअसली घेत नाही ईतकेच.

तसेही माझी आज्जी म्हणायची,
एकवेळ लिखाण अशुद्ध चालते रे रुनम्या पण माणसाचे विचार शुद्ध असावेत. Happy

साहेबाने बनवली की भारतीयाने?
>>
बनवली कोणी हे मॅटर करत नाही.
तुम्ही वापरता तर ती योग्य आहे की नाही हे बघणे तुमची जबाबदारी आहे.

----------------------------------------------------------------------------------------------------------
इंग्रजी 'सायलेंट' ला मराठीत मुकबधीर म्हणण्या ऐवजी "वाचताना ल गाळून वाचा" असं म्हणायला हरकत नाही.
>>>>

त्यावेळी माझी प्रायोरीटी शुद्ध मराठी लिहिणे नसून समोरच्यापर्यंत आपला मुद्दा पोहोचवणे होते, ते मी पटकन करून टाकले.

-----------------------------------------------------------------
वा ऋन्मेऽऽष ,,,, हे चांगलय
तुम्ही वापरता ती भाषा योग्य आहे कि नाही हे बघणे ही तुमची जबाबदारी आहे अस ज्ञान ह्याच धाग्यात पाजळल होतस तू

आणि लोकशाहीने तुला वादविवाद करायचा अधिकार दिलाय अस म्हणत उच्चशिक्षित लोकांना अक्कल शिकवायचा प्रयत्न करत होतास
पण तू स्वतःची मातृभाषा वापरताना ती शुद्ध लिहिणे हि तुला तुझी जबाबदारी वाटत नाही
तुझी प्रायोरिटी भाषा शुद्ध लिहिण्यापेक्षा पटकन धागा काढणे ही होती

समोरच्या पर्यंत मुद्दा पोचवण्याची एवढी घाई कशाला ,धागा पटकन काढण्या ऐवजी व्यवस्थित शुद्ध भाषा वापरून निवांत काढता आला असता कि
तुला कदाचित अस वाटल असेल कि घाई करून पटकन धागा काढला नाही आणि जर दुसऱ्याच कोणी ह्या विषयावर धागा काढला तर तुझी आणखी एक शतकी आणि तितकाच निरुपयोगी धागा काढण्याची संधी जाईल ,,,,,,, म्हणून घाई , शुद्ध मराठी गेल उडत

तुझे वरचे बोल्ड केलेले दोन्ही प्रतिसाद वाचून एक म्हण आठवली

लोकां सांगे ब्रम्हज्ञान । स्वतः कोरडे पाषाण ।।

पण तू स्वतःची मातृभाषा वापरताना ती शुद्ध लिहिणे हि तुला तुझी जबाबदारी वाटत नाही
तुझी प्रायोरिटी भाषा शुद्ध लिहिण्यापेक्षा पटकन धागा काढणे ही होती
>>>

एक्झॅक्टली मनरंग,
प्रायोरीटी आणि जबाबदारी या भिन्न गोष्टी आहेत.
जबाबदारी वाटत नव्हती असे नाही, वाटत होती, नव्हे होतीच..
पण मी प्रायोरीटी लक्षात घेता समयसूचकता दाखवली ईतकेच Happy
त्यानंतर मात्र मी माझी जबाबदारी न विसरता मराठी प्रतिशब्द सुद्धा लोकांना विचारत आहे हे देखील लक्षात घ्या

....

लोकां सांगे ब्रम्हज्ञान । स्वतः कोरडे पाषाण ।।
>>>>>
याच्याशी मात्र सहमत,
माझी ग'फ्रेंड सुद्धा मला पाषाणहृदयी म्हणते Happy

इतक्या निरर्थक विषयावर धागा काढणे ही तुमची प्रायोरिटी वाटते तुम्हाला ? Biggrin Biggrin Biggrin
राधे माँ सारख्या विषयवार टीआरपी मिळवायला धागा काढण्याची घाई करणे म्हणजे तुमची 'समयसूचकता ' Biggrin Biggrin Biggrin
आणि वाटत होती जबाबदारी तर ती पूर्ण न करता घाई घाई ने धागा काढण्यासारखी अशी काय आपात्कालीन परिस्थिती निर्माण झाली होती
समयसूचकता कसली ? धागा काढायला एखाद दोन तास उशीर झाला असता तर काय जगबुडी होणार होती का ?
लोकां सांगे ब्रम्हज्ञान । स्वतः कोरडे पाषाण ।।
एवढ्या सध्या म्हणीचा अर्थ कळत नाही का तुम्हाला ? आणि जर नसेल माहिती तर आधी मातृभाषा शिका
आणि मग लोकांना तुम्ही वापरता ती भाषा योग्य आहे कि नाही हे बघणे ही तुमची जबाबदारी आहे असे सल्ले दया.

लंच टाइम मधे बाकीच्यांपुढे भाव खायला निरर्थक धागे काढायचे
आणि उगाच समयसूचकता , प्रायोरीटी आणि जबाबदारी असे मोठे मोठे शब्द वापरून तत्ववेत्त्याचा आव आणायचा

आणि योग्य भाषा वापरण्याची जबाबदारी स्वतःला पूर्ण करता येत नसेल तर उगाच जगाला सल्ले देऊ नका

पण काही वेळा खरेच पटकन खरडून टाकायचा एवढाच हेतू असतो. मायबोलीवरच्या ईतर लेखकांशी मी माझी तुलना नाहीच करत, तसेच माझे लिखाण वाचून कोणी तेच मराठी प्रमाण मानेल आणि चुकीचे मराठी पसरेल असेही नाहीये. म्हणून शुद्ध लिखाण जास्त सिरीअसली घेत नाही ईतकेच.

तसेही माझी आज्जी म्हणायची,एकवेळ लिखाण अशुद्ध चालते रे रुनम्या पण माणसाचे विचार शुद्ध असावेत.

तुमच्या ह्या पोस्टवरून समजतंय कि शुद्ध भाषा वापरण ही तुम्हाला जबाबदारी वाटतच नाही मुळी
आणि जर एवढी महत्वाची गोष्ट तुम्ही सिरीयसली ( गांभीर्याने ) घेत नाही
तर कुठल्या तोंडाने तुमच्या पेक्षाही उच्चशिक्षित आणि हुशार लोकांना तुम्ही भाषा जबाबदारीने वापरण्याचे
सल्ले देता ?
आता येऊ दे आणखी एक निरर्थक एक्सक्युज (समर्थन )

तुमची वरची प्रतिक्रिया वाचून आणखी एक म्हण आठवली

' गिरे तो भी टांग उपर '

लोकां सांगे ब्रम्हज्ञान । स्वतः कोरडे पाषाण ।।
>>>>>
याच्याशी मात्र सहमत,
माझी ग'फ्रेंड सुद्धा मला पाषाणहृदयी म्हणते स्मित >>

आई शप्पथ, हा आज पर्यंतचा सगळ्यात भारी होता Happy

तर कुठल्या तोंडाने तुमच्या पेक्षाही उच्चशिक्षित आणि हुशार लोकांना तुम्ही भाषा जबाबदारीने वापरण्याचे
>>>>>>>>>

मी रावण नाहीये Happy

जोक्स द अपार्ट, जेव्हा तुम्ही एखाद्याला माझ्यापेक्षा उच्चशिक्षित आणि हुशार म्हणता तेव्हा तुम्हाला माझे शिक्षण आणि आयक्यू (किंवा ज्यात तुम्ही हुशारी मोजता ते युनिट) माहीत असणे गरजेचे आहे.
सांगा बरे Happy

अवांतर - जर मी चुकत नसेल तर सचिन तेंडुलकर बारावी नापास होता आणि बिल गेटस देखील युनिवर्सिटी टॉपर नव्हता, पण आज युनिवर्सिटी टॉपर त्याच्याकडे काम करतात.. असे म्हणतात..

तर, हुशारी सर्वांकडेच कमी अधिक प्रमाणात असते. पण ती आपण वापरतो कशी यावर बरेच काही ठरते.

आयुष्य 4 दिवसाचे आहे. सर्व क्षेत्रात प्रावीण्य मिळवण्याच्या नादात ते संपवायचे की प्रायोरीटीजप्रमाणे जगायचे हे तुम्हीच ठरवा.

@ राधे मा,
तुम्हाला हा विषय निरर्थक वाटू शकतो. मी नास्तिक असल्याने मला लोकांचे मंदिरात जाणे आणि देवाला साकडे घालणेही निरर्थक वाटते. शेवटी हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग झाला Happy

@ गिरे तो भी टांग उपर ही म्हण मला लागू होऊ शकते.

न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमाप्रमाणे जर डोके भरलेले असेल तर पडताना ते खालील बाजूला झुकण्याची शक्यता असते.

बुल्स आय का काय म्हणतात अगदी तसे!
>>>>>

स्पॉक ईंग्रजी बद्दल खात्री नसेल तर मराठी भाषांतर पोपटाचा डोळा असे वापरू शकता. Happy

इथे तू इन्ग्लिश उच्चार शिकवतोयस कुणाला, तर व्यक्तीगत जीवनात डॉक्टर, इन्जीनीअर, सॉ. कन्स्लटन्ट आणी बहुविध करीअर असणार्‍या लोकाना,
>>>>
ताई या देशात चहावाला पंतप्रधान होतो अशी आपली लोकशाही आहे. आणि त्याच लोकशाहीने मला हा अधिकार दिला आहे की मी माझ्यापेक्षा उच्चशिक्षित लोकांशीही वादविवाद अन चर्चा करू शकतो.
अर्थात त्यांचा मान राखूनच, जे मी प्रत्येक व्यक्तीचा राखतो. त्यात आगळीक झाली असेल तर सांगा, कोपरापासून हात जोडून माफी मागेन
------------------------------------------------
तुझ्या ह्या प्रतिसादात तूच हे मान्य केल आहेस की इथे असणारे डॉक्टर ,इंजीनिअर हे लोक तुझ्यापेक्षा उच्चशिक्षित आहेत
आणि तुझ्या हुशारीच म्हणशील तर इतका जर हुशार आहेस तर कॉन्फरन्स रूमची पाच नाव स्वतःची हुशारी वापरून द्यायची होतीस इथे धागे काढण्यापेक्षा
आश्चर्य आहे तुझ्या भरलेल्या डोक्यात साधी ५ नाव येऊ नयेत

उत्तम आयक्यू म्हणजे काय ?
स्वतःची बाजू पडू नये म्हणून शब्दांची जाळी विणत रहाणे का ?

नाही माहिती मला तुमच शिक्षण
आणि तसही सचिन च्या उदाहरणावरून तुम्हाला अस म्हणायचय की नाव कमवायला शिक्षण लागत नाही
पण शुद्ध भाषा वापरण्याची जबाबदारी तुम्ही पूर्ण करत नसताना बाकीच्यांना भाषेची योग्यता बघण्याच्या जबाबदारीचे सल्ले का देताय ?

तुझ्या ह्या प्रतिसादात तूच हे मान्य केल आहेस की इथे असणारे डॉक्टर ,इंजीनिअर हे लोक तुझ्यापेक्षा उच्चशिक्षित आहेत
>>>>>>
डॉक्टर ईंजिनीअर हे तुमच्या तोंडचे शब्द आहे, त्यात बहुविध करीअर असे सुद्धा लिहिलेय.
मी माझ्या प्रतिसादातात माझ्यापेक्षा उच्चशिक्षित असेच आणि एवढेच लिहिले आहे.
उलट माझा विनम्रपणा बघा की मी कबूल करतोय की मी जगातील सर्वात उच्चशिक्षित नाहीये आणि माझ्यापेक्षाही जास्त शिकलेले लोक जगात आहेत. Happy

...

पण शुद्ध भाषा वापरण्याची जबाबदारी तुम्ही पूर्ण करत नसताना बाकीच्यांना भाषेची योग्यता बघण्याच्या जबाबदारीचे सल्ले का देताय ?
>>>>>
आपण सारेच असे करतो,
आपण कधी ईटरनॅशनल क्रिकेट खेळलो नसतो, पण धोनीने आजच्या मॅचमध्ये काय करायला हवे होते हे आपण त्याला सुचवतो.
आपण कोणी कधी नाटकात, मालिकेत, चित्रपटात काम केले नसते. पण शाहरूखने आता कश्या प्रकारच्या भुमिका स्विकाराव्यात हे सल्ले (तो स्विकारतोय की नाही याची पर्वा न करता) आपण त्याला सहज देतो.
आपण कधी साधे नगरसेवकाच्या निवडणूकीला उभे राहिलो नसतो, पण मोदींपासून राहुलगांधींपर्यंत सर्वांनी कसल्या प्रकारचे राजकारण करावे या आशा अपेक्षा सल्ले आपण देवाण विदाऊट घेवाण करतोच ना..

थोडक्यात काय तर आपण स्वत: काय कसे आहोत आणि कसे वागतो हा दुसर्‍याला सूचना देण्याचा निकष नसतो, तर ज्यांच्याकडून आपल्याला आशाअपेक्षा असतात त्यांना आपण त्यांनी आपले मत मागितले नसतानाही काहीबाही सुचवतोच.
हे देखील तसेच आहे.
माझे काय मी तसाही एक सडाफटींग मुलगा आहे, जबाबदारी घेतली काय नाही घेतली काय, कोणाला काय फरक पडतोय. पण ज्यांच्याकडून मला आशा अपेक्षा आहेत त्यांना तसे सुचवले ईतकेच. Happy

चप्पल शिवणाय्राकडे एक तिनपायाची लोखंडी ऐरण असते ती कशीही ठेवली तरी एक पाय आकाशाकडेच राहतो.चप्पलेला खिळा ( चुक हे इथे बरोबर आहे )ठोकताना खाली आधार मिळाल्याशी मतलब.मन चंगा तो कठौती में गंगा ।

Pages