मेरे पास राधे मॉं है! - दिवस ३ रा

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 August, 2015 - 17:54

सध्या सोशलसाईटसवर राधे मा आणि त्यांचे स्कर्ट घातलेले फोटो हिट ठरताहेत.
आणि त्यावरूनच व्हॉटसपवर एक मेसेज फिरतोय,

व्हाय शूड* बाबाज हॅव ऑल द फन ..
- राधे मा

ज्यांना लगेच विनोद समजत नाही अश्यांना उलगडून देतो. म्हणजे आसारामबापूंसारखे पुरुषच का बाबागिरीच्या आड लाईफ एंजॉय करणार.. आता आमची पाळी आहे Happy

विनोदावर हसलो आणि फॉर्वर्ड केला. मायबोलीवर नव्हता टाकला कारण राधे मा यांचे कोणी भक्त इथे असल्यास भावना दुखवायला नको.

आज मात्र टाकला कारण हा विनोद नव्हताच असा साक्षात्कार मला सोनू निगमच्या लेटेस्ट ट्वीट वरून झाला.
त्याने स्त्री-पुरुष समानतेचा हाच मुद्दा उचलत राधे मा यांच्या बचावासाठी ट्वीट केलेय की जर पुरुष साधू नग्न फिरू शकतात तर राधे मा यांनी स्कर्ट घातले तर बिघडले काय?

मगाशी सविस्तर बातमी पाहिली,
पुढे त्याने जोडले आहे की मी कोणाला मानत वगैरे नाही पण माझा मुद्दा एवढाच आहे की कपड्यांच्या लांबीवरून कोणा स्त्रीचे चारीत्र्य ठरवू नये.
अर्थात, स्वतंत्रपणे हा मुद्दा योग्यच आहे. पण नक्कीच राधे मा प्रकरणात हा आणि एवढाच मुद्दा नसावा.

काही का असेना, आपल्या कडून स्त्री-पुरुष समानता राखली जावी म्हणून पुरुष बाबा बापू महाराजांवर जसे मायबोलीवर आजवर अनेक धागे निघालेत तसा हा एक धागा स्त्री असलेल्या राधे मा के नाम Happy

* शूल्डचे शूड करण्यात आले आहे याची नोंद घ्यावी.

-----------

राधे मा यांना सुभाष घई यांनी भक्तीपुर्ण पाठिंबा दर्शवला.

Radhe Maa treats me and my wife as her parents: Subhash Ghai

http://www.hindustantimes.com/bollywood/radhe-maa-treats-me-and-my-wife-...

पुरा बॉलीवूड जुट गया है राधे मां को बचाने के लिये. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ईंग्लिश भाषा बनवताना आधी उच्चार बनवले की स्पेलिंग हे आपण मला सांगू शकाल का?
राधे मा वर आपण नंतर बोलू>>>>>>
कृपया त्यासाठी वेगळा धागा काढावा... हा धागा राधे मा ना समर्पीत आहे नाही नाही स्त्रि-पुरुष असमानता नाही थाम्बा बुवाबाजी मधील स्त्रि-पुरुष अ समानता (आता तरी बरोबर आहे का?)... छ्या! 'अ' आणि 'समानता' वेगवेगळे लिहील्याने गोन्धळ होतोय.

ऋन्मेषा, तुझा मुद्दा बरोबर आहे.
पण मग तू psychology, Hunt, Hunk, Colour, continue, culture, cutting हे शब्द मराठीत करे लिहितोस ते मला सांगू शकशील का?
आधी उच्चार बनवले की स्पेलिंग वर आपण नंतर बोलू

...आणि ते Should चे शुल्ड कसे झाले? ते शौल्ड हवे ना? "नियमाप्रमाणे"?

>>
हां ! यावरही बोल रे एकदा

रीया, स्पॉक
मी कोणाला चूक नाही ठरवत आहे की मीच बरोबर आहे असेही नाही बोलत आहे. तर मी सुद्धा चुकीचा नाहीये हे सांगतोय.
म्हणून मी माझ्या पोस्टमध्ये वाचकांची व्याकरण चॉईस असे लिहिलेय.
तुम्ही शूड बोला, माझी खरेच काही हरकत नाही.
पण शूल्ड असे लिहिण्यातही काही चूक नाही.

तुम्ही मला चुकीचे ठरवण्यासाठी तुम्हाला आधी उच्चार बनवले गेले की स्पेलिंग याचे उत्तर शोधावेच लागणार.

मला सांगा, तुम्हाला प्रश्न नाही का पडत, असे उच्चार आणि स्पेलिंग वेगवेगळे का?
की साहेबांनी सांगितले असेच बोलायचे म्हणजे असेच बोलायचे.

या अश्या आपल्या श्रद्धाळू आणि प्रश्न न पडण्याच्या वृत्तीमुळेच तर राधे मा सारख्या लोकांचे फावतेय ..

ज्या त्या भाषेचे व्याकरण तसेच फॉलो करावे.
ते विचित्र आहेच. यात वाद नाही.
त्याच न्यायाने ou=ओउ सुद्धा सायलेंट आहे आणि तो ऊ असा उच्चारला जातो आहे शुड मधे. मग?
नाहीतर आहेच रामा, शिवा, अर्जुना, रावना, महाभारता ई. ई.
-अभिजिता

या अश्या आपल्या श्रद्धाळू आणि प्रश्न न पडण्याच्या वृत्तीमुळेच तर राधे मा सारख्या लोकांचे फावतेय ..

सहमत

प्रश्न पडणे आणि तर्क करणे मानवाच्या प्रगतीसाठी साठी सहायक ठरतात.

प्रश्न पडणे आणि तर्क करणे मानवाच्या प्रगतीसाठी साठी सहायक ठरतात. >>
योग्य अभ्यासपश्चात योग्य प्रश्न पडणे आणि अभ्यासू तर्क करणे मानवाच्या प्रगतीसाठी साठी सहायक ठरतात.

तुम्ही शूड बोला, माझी खरेच काही हरकत नाही.>>>>> Ohhhhh...तुम्ही शूड बोला, माझी खरेच काही हरकत नाही. >>>>How kind of you to allow us to do so !!! The thoughtfulness you showed has made
A difference in my life... I' ll never forget dis. (for get १ word)

की साहेबांनी सांगितले असेच बोलायचे म्हणजे असेच बोलायचे.>>>>>:अओ: ऑ! इग्लिश ही साहेबाची मातृभाषा आहे की भारतीयान्ची? साहेबाने बनवली की भारतीयाने? जर साहेबाने बनवली असेल तर तोच करणार ना त्याची जडण-घडण आणी व्याकरण. साहेबाचे याबाबतीत ऐकण्यात कसली आली अन्धश्रद्धा?:अओ::फिदी: काहीही ह!

स्पॉक लय भारी.:फिदी:

साहेबाने बनवली की भारतीयाने?
>>
बनवली कोणी हे मॅटर करत नाही.
तुम्ही वापरता तर ती योग्य आहे की नाही हे बघणे तुमची जबाबदारी आहे.

तुम्ही वापरता तर ती योग्य आहे की नाही हे बघणे तुमची जबाबदारी आहे.>>
आणि भाषेच्या बाबतीत योग्य अयोग्य नॉर्म्स अलरेडी ठरलेले असतात, व्यक्तीनुसार बदलत नाहीत.
नाहीतर शाळेत असताना मराठी शुद्धलेखनाचे गुण, इंग्रजी स्पेलिंगचे गुण चुकीचे मराठी, इंग्रजी लिहुन बोलुनही कोणाचेच कमी झाले नसते.

ऋन्मेऽऽष, व्हाय शूड बाबाज हॅव ऑल द फन .........असा बदल कर व राधे मा ला पुढे जाऊ दे.......

धागा शूल्ड? की शूड? मधे अडकायला नको.

ऋन्मेष, मी धाग्याच्या विषयासंबंधीपण एक प्रतिसाद दिलाय.
कर्यबाहुल्यामुळे तुला वेळ झाला नसेल तर आत्ता वाचून त्यानुसार पुढचे डिस्कशन कर ना चालु.
Wink

बनवली कोणी हे मॅटर करत नाही.
तुम्ही वापरता तर ती योग्य आहे की नाही हे बघणे तुमची जबाबदारी आहे.>>> हेच तुला लागु होतय ना रे बबडु? इथे तू इन्ग्लिश उच्चार शिकवतोयस कुणाला, तर व्यक्तीगत जीवनात डॉक्टर, इन्जीनीअर, सॉ. कन्स्लटन्ट आणी बहुविध करीअर असणार्‍या लोकाना, जे शिक्षण, अनूभव या जोरावर तुझ्या १०० पावले पुढे आहेत. हो ना?

ऋन्मेष, एक फुकटचा सल्ला देते, मान अथवा न मान. चार लोक हिताचे सान्गत असतील तर त्यान्चे ऐकायला शिक. फायदा नाही झाला तरी नुकसान नक्कीच होणार नाही.

ही राधे माँ कोणत्या भाषेत बोलते हो? एव्हढी भाषेवर गाडी घसरली म्हणून इचारले. आनि हो एक टल्लीबाबा नावाचा माणूसपण असतो ना तिच्यासोबत तो काय नेहमी "टल्ली" असतो का? राधे माँच्या भक्तजनांनी किंवा माहितगारांनी जरा प्रकाश टाकावा.

इथे तू इन्ग्लिश उच्चार शिकवतोयस कुणाला, तर व्यक्तीगत जीवनात डॉक्टर, इन्जीनीअर, सॉ. कन्स्लटन्ट आणी बहुविध करीअर असणार्‍या लोकाना,
>>>>
ताई या देशात चहावाला पंतप्रधान होतो अशी आपली लोकशाही आहे. आणि त्याच लोकशाहीने मला हा अधिकार दिला आहे की मी माझ्यापेक्षा उच्चशिक्षित लोकांशीही वादविवाद अन चर्चा करू शकतो.
अर्थात त्यांचा मान राखूनच, जे मी प्रत्येक व्यक्तीचा राखतो. त्यात आगळीक झाली असेल तर सांगा, कोपरापासून हात जोडून माफी मागेन Happy

ताई या देशात चहावाला पंतप्रधान होतो अशी आपली लोकशाही आहे. आणि त्याच लोकशाहीने मला हा अधिकार दिला आहे की मी माझ्यापेक्षा उच्चशिक्षित लोकांशीही वादविवाद अन चर्चा करू शकतो.>>>>:फिदी: कर ना चर्चा. पण त्या वादातुन चान्गले निष्पन्न होत असेल तर ते मान्य कर ना. वर सायो यानी म्हणले की शुड आणी शुल्ड यात फरक आहे, तर तू त्यानाच वेड्यात काढायला गेलास. धन्य आहे! बहुतेक तुझा कधी फॉरीनर लोकान्शी सामना झाला नसेल आणी जर चुकुन झालाच असेल तर तुझ्या भयाण इग्लिश उच्चाराने ते बिचारे हतप्रभ झाले असतील किन्वा या या असे बोलुन तुच खरा असे त्यानी मान्य केले असेल.

जाउ दे. यावर पुढे चर्चा नको. तर तू काय म्हणत होतास राधे मा बद्दल? धागा घरन्गळायला नको इकड-तिकड

गजानन, तुम्ही काय लिहिलय ते मल्;आ कळालंच नाही Proud

शुल्ड, वॉल्क , टॉल्क हे नक्कीच चुकीच आहे. कारन माझ्या मातृभाषेत दिसणार्‍या प्रत्येक अक्षराचा उल्लेख/ उच्चार केला जातोच.

मला मराठीत असा एक शब्द सांग ज्यात एखाद्या अक्षराचा उच्चार सायलेंट आहे

namo: ur point is noted. I will take this matter in my visit to britain.

Happy

Pages