मेरे पास राधे मॉं है! - दिवस ३ रा

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 August, 2015 - 17:54

सध्या सोशलसाईटसवर राधे मा आणि त्यांचे स्कर्ट घातलेले फोटो हिट ठरताहेत.
आणि त्यावरूनच व्हॉटसपवर एक मेसेज फिरतोय,

व्हाय शूड* बाबाज हॅव ऑल द फन ..
- राधे मा

ज्यांना लगेच विनोद समजत नाही अश्यांना उलगडून देतो. म्हणजे आसारामबापूंसारखे पुरुषच का बाबागिरीच्या आड लाईफ एंजॉय करणार.. आता आमची पाळी आहे Happy

विनोदावर हसलो आणि फॉर्वर्ड केला. मायबोलीवर नव्हता टाकला कारण राधे मा यांचे कोणी भक्त इथे असल्यास भावना दुखवायला नको.

आज मात्र टाकला कारण हा विनोद नव्हताच असा साक्षात्कार मला सोनू निगमच्या लेटेस्ट ट्वीट वरून झाला.
त्याने स्त्री-पुरुष समानतेचा हाच मुद्दा उचलत राधे मा यांच्या बचावासाठी ट्वीट केलेय की जर पुरुष साधू नग्न फिरू शकतात तर राधे मा यांनी स्कर्ट घातले तर बिघडले काय?

मगाशी सविस्तर बातमी पाहिली,
पुढे त्याने जोडले आहे की मी कोणाला मानत वगैरे नाही पण माझा मुद्दा एवढाच आहे की कपड्यांच्या लांबीवरून कोणा स्त्रीचे चारीत्र्य ठरवू नये.
अर्थात, स्वतंत्रपणे हा मुद्दा योग्यच आहे. पण नक्कीच राधे मा प्रकरणात हा आणि एवढाच मुद्दा नसावा.

काही का असेना, आपल्या कडून स्त्री-पुरुष समानता राखली जावी म्हणून पुरुष बाबा बापू महाराजांवर जसे मायबोलीवर आजवर अनेक धागे निघालेत तसा हा एक धागा स्त्री असलेल्या राधे मा के नाम Happy

* शूल्डचे शूड करण्यात आले आहे याची नोंद घ्यावी.

-----------

राधे मा यांना सुभाष घई यांनी भक्तीपुर्ण पाठिंबा दर्शवला.

Radhe Maa treats me and my wife as her parents: Subhash Ghai

http://www.hindustantimes.com/bollywood/radhe-maa-treats-me-and-my-wife-...

पुरा बॉलीवूड जुट गया है राधे मां को बचाने के लिये. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋन्मेष फॅन क्लब काढा कुणीतरी.
मी पहिली मेंबर!
काय चुरुचुरु बोलतो.
खूप गोड वाटतं ऐकायला.
Happy

साती धन्यवाद Proud

सायो, आपलेही धन्यवाद. मला करेक्ट करण्यामागे आपला हेतू चांगला होता, पण माझी ईंग्लिश कच्ची असली तरी जोक्स अपार्ट मला माहीत आहे, मी गंमतीने प्रत्यक्ष बोलतानाही जोक्स द अपार्ट असे बोलतो तसेच गंमतीत ईथेही टंकले ईतकेच Happy

ऋन्मेष फॅन क्लबात मी पण.सामिल
ऋन्मेष च्या धाग्यावर मोठ्ठे-मोठ्ठे तज्ञ लोक लंब्या चौड्या पोस्टी लिहुन दगडावर डोक आपटताना बधुन मजा वाटतिय.
ऋन्मेष तु जसा आहेस तसाच छान आहेस मायबोली वर शुद्ध लिहुन कुठे तुला शुद्धलेखनाचे सर्टिफिकीट मिळवायच आहे
पुढिल धाग्यासाठी शुभेच्छा!
जय राधे मा.

आयुष्य 4 दिवसाचे आहे. सर्व क्षेत्रात प्रावीण्य मिळवण्याच्या नादात ते संपवायचे की प्रायोरीटीजप्रमाणे जगायचे हे तुम्हीच ठरवा.

न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमाप्रमाणे जर डोके भरलेले असेल तर पडताना ते खालील बाजूला झुकण्याची शक्यता असते. >>>>व्वा रुन्म्या

न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमाप्रमाणे जर डोके भरलेले असेल तर पडताना ते खालील बाजूला झुकण्याची शक्यता असते. 

>> छान Happy

त्याही पुढे जाऊन

न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमाप्रमाणे जर डोक्यात "दगड" भरलेले असेल तर पडताना ते खालील बाजूला झुकण्याची शक्यता असते. 
Wink

हा हा राहुल..
पण येथील आधीच्या काही पोस्ट पहिल्या तर समजेल की मी पाषाणासारखा आहे, आणि पाषाणाची वस्तुमान घनता दगडापेक्षा जास्त असल्याने दगड त्यासमोर हलकेच ठरतील. म्हणून ती शक्यता बाद Happy

अरे ए, पण धागा राधे मां चा आहे हे विसरू नका ...

एक तर मुळात तू जे उदाहरण दिल आहेस , त्या उदाहरणांमधे सचिनने काय करायच किंवा मोदींनी काय कराव याची चर्चा आपण आपापसात करात असतो ,डायरेक्ट त्या लोकांना नाही सांगत त्यामुळे तुझी ही उदाहरणे गैरलागु आहेत
जर तू स्वतः सचिनबरोबर इंडियन टीममधे असतास ,आणि फील्डिंग न करता मख्खासारखा उभा राहिलास आणि मॅच जिंकणे ही काही माझी जबाबदारी नहिये पण मी सचिनला बॅट कशी धरायची हे शिकवीन
कारण मला लोकशाहीने हा अधिकार दिलाय ,तर कुणीही तुझ ऐकणार नाही

इथे तू ह्या चर्चेत सहभागी आहेस म्हणजेच तू ह्या टीमचा सदस्य आहेस ,अशा वेळी मला जस पाहिजे तसं मी बोलीन पण बाकीच्यांनी मात्र जबाबदारीने बोललं पाहिजे अस तू म्हणू शकत नाहीस

थोडक्यात काय तर आपण स्वत: काय कसे आहोत आणि कसे वागतो हा दुसर्‍याला सूचना देण्याचा निकष नसतो, तर ज्यांच्याकडून आपल्याला आशाअपेक्षा असतात त्यांना आपण त्यांनी आपले मत मागितले नसतानाही काहीबाही सुचवतोच.
हे देखील तसेच आहे.

ह्याला म्हणतात 'क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे ' म्हणजे जी गोष्ट अमलात आणण तुम्हाला सहज शक्य आहे ती जर तुम्ही करत नसाल तर विनाकारण बडबड करू नये

तुझ हे मत फक्त ह्या धाग्यापुरत मर्यादित असेल तर तो फक्त स्वतःची बाजू पडू नये म्हणून केलेला बचाव आहे
आणि जर तुझ हे मत नेहमीच असेल तर मामींच्या 'पुरुषांची जबाबदारी ' धाग्यावर तू इतरांना ज्या सूचना दिल्यास तेव्हा आपण सुद्धा तसं वागल पाहिजे म्हणून दिल्यास कि आपण कसे वागतो ह्या दुसऱ्यांना सूचना देण्याचा निकष नसतो म्हणून सुचवल्या होत्यास

आणि मी सुद्धा अस मान्य करते कि जगात ऐश्वर्या ,माधुरी ह्या माझ्यापेक्षा सुंदर स्त्रिया आहेत
पण ह्यात माझी विनम्रता आहे अस नाही , तर जे सत्य आहे ते कबूल कराव लागतच असा मुद्दा आहे

तू जगातला सर्वात जास्त शिकलेला मनुष्य आहेस का ? नाहीच मग हे सत्य कबूल करण्यात कसली आलीये विनम्रता

प्रायोरीटी आणि जबाबदारी या भिन्न गोष्टी आहेत.
जबाबदारी वाटत नव्हती असे नाही, वाटत होती, नव्हे होतीच..

माझे काय मी तसाही एक सडाफटींग मुलगा आहे, जबाबदारी घेतली काय नाही घेतली काय, कोणाला काय फरक पडतोय.

तसेच माझे लिखाण वाचून कोणी तेच मराठी प्रमाण मानेल आणि चुकीचे मराठी पसरेल असेही नाहीये. म्हणून शुद्ध लिखाण जास्त सिरीअसली घेत नाही ईतकेच.


बनवली कोणी हे मॅटर करत नाही.
तुम्ही वापरता तर ती योग्य आहे की नाही हे बघणे तुमची जबाबदारी आहे.

स्वतःची बाजू पडू नये म्हणून एकाच धाग्यात किती परस्परविरोधी विधान करत तुम्ही

माझी आजी म्हणायची
झोपेच सोंग घेतलेल्याला कधीच जाग करता येत नाही ,

त्या उदाहरणांमधे सचिनने काय करायच किंवा मोदींनी काय कराव याची चर्चा आपण आपापसात करात असतो ,डायरेक्ट त्या लोकांना नाही सांगत त्यामुळे तुझी ही उदाहरणे गैरलागु आहेत
>>>>

तसे असेल तर हे आणखी चूक आहे,
म्हणजे आपण त्यांच्या पाठीशी बोलतो.

तू काय त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलतोस का ?

आणि तस नसेल तर मग एकदम गप्प बस

नाही तू गप्प बसणार नाहीसच
कारण चुकीच्या गोष्टी करणे आणि त्यांच भंकस समर्थन करणे हाच तर तुझा छंद आहे

राधेमा बद्दल एकच तक्रार आहे,,,
माझे आवडते गाणे "अखियो के झरोखो से" त्यांनी माझ्यासाठी Ruin केले. आता ते गाणे ऐकल्यावर तो डान्सच आठवतो. (या गाण्यावर कोणी डान्स करु शकेल असे वाटले नव्हते पण "राधेमा" साठी काय अशक्य आहे? Happy )

राधे मा यांना आता या कपड्यांमधुन दागिन्या मधून व डान्स मधून इच्छा असुन सुद्धा बाहेर पडता येणार नाही कारण अजुबाजुची चांडाळ चौकडी त्यांना तसे करु देणार नाही. कानपट्टिवर ......ठेवुन म्हणतिल नाचो राधा नाचो....

अखियो के झरोके से ... हा हा
पण चांगलेच आहे की, थिल्लर गाण्यांवर त्या नाचल्या तरी लोक टिका करणार, आणि चांगल्या गाण्यांवर नाचल्या तरी आपली तक्रार Happy

मनरंग,
आपण माणसे काळ- वेळ आणि परिस्थितीचे गुलाम असतो. आपली प्रत्येक कृती किंवा विधान काळवेळ पाहून त्या परिस्थितीनुसार आलेली असते. तू तसा त्या दिवशी अमुकतमुक वागलास म्हणजे आजही तेच तत्व तू फॉलो केले पाहिजेस, किंवा त्या धाग्यातले तुझे विधान या धाग्यातील विधानाशी विसंगत वाटतेय असे आपण कोणाला नाही बोलू शकत, असे नाही ठरवू शकत. कारण खुद्द आपण स्वत:ही प्रसंगानुसार बदलत असतोच, कुठे कायम असतो आपल्या शब्दांवर.

विरोधाला विरोध म्हणून नाही, पण आता तुमचेच बघा ना, आधीच्या पोस्टमध्ये आपण लिहिलेत की "हेमाशेपो".. म्हणजे त्यानंतर आपण या धाग्यावर किमान आपल्यात चाललेल्या विषयावर पोस्ट टाकणे अपेक्षित नव्हते. तरीही त्यानंतरच्या माझ्या पोस्टनंतर परिस्थिती बदलली हे पाहता आपण पुन्हा आणखी एक पोस्ट टाकलीच ना, कदाचित या पोस्टनंतर आणखी दोनचार टाकाल. मग याचा अर्थ आपण मायबोलीवर जी विधाने करतात त्यावर ठाम राहत नाहीत असा सहजपणे घ्यावा का .. नक्कीच नाही. Happy

राधे मा यांना आता या कपड्यांमधुन दागिन्या मधून व डान्स मधून इच्छा असुन सुद्धा बाहेर पडता येणार नाही कारण अजुबाजुची चांडाळ चौकडी त्यांना तसे करु देणार नाही. कानपट्टिवर ......ठेवुन म्हणतिल नाचो राधा नाचो....
>>>>>>>>

सकुरा, पॉईंट आहे.. त्यांच्या डोक्यावरही काही गॉफा बसले असणारच.. ही एक ईंडस्ट्रीच तर आहे.

मी कधी हेमाशेपो अस लिहील होत ?
मी म्हणते मी अस लिहिलाच नव्हत
मला चुकीच ठरवायचं असेल तर सिद्ध करा .......... कि मी अस लिहील होत

मनरंग,
माझ्या पोस्टनंतर आपण आपल्या आधीच्या पोस्टमधील हेमाशेपो एडीट का केलेत? माझा त्यावर काहीही आक्षेप नव्हता. आपण सारेच हेमाशेपो बोलून ईच्छा झाली की पुन्हा लिहितोच, पण याचा अर्थ `आपण आपल्या विधानांवर ठाम राहत नाही' असा सरसकट घेता येत नाही एवढाच माझा मुद्दा होता.

माझा आपल्यावर काही आरोपच नाही तर सिद्ध का करू Happy

कशावरून मी एडिट केले
जर मी लिहिलच नव्हत तर एडीट करण्याचा प्रश्न येतोच कुठे ?
just kidding
anyways तुला एकच सल्ला देईन प्रत्येकवेळी विधान करताना स्वतःला बरोबर सिद्ध करायचं म्हणून करू नकोस , आणि त्यासाठी सतत परस्परविरोधी विधान करणे ,एकाच धाग्यात दोन सर्वस्वी विरुद्ध वाक्य बोलणे अस करून काय साध्य होत

मनरंग ताई,राधे मां विषयी पण लिहा की जरा.
छान लिहताय तुम्ही मुद्देसूद.

राधे माँ ह्या विषयात काडीचाही रस नाही
ह्या धाग्यावर टाइमपास करायला आले होते ,

छान लिहताय तुम्ही मुद्देसूद. thank you

जय राधे मा
.

ह्या धाग्यावर टाइमपास करायला आले होते , >>..

तस असेल तर ठिक आहे मला वाटले दगडापुढे डोक आपटून कपाळमोक्ष व्हायचा .चालू दे धागा १००० गाठेल.

ऋन्मेष बाबा की जय.

आपण माणसे काळ- वेळ आणि परिस्थितीचे गुलाम असतो. आपली प्रत्येक कृती किंवा विधान काळवेळ पाहून त्या परिस्थितीनुसार आलेली असते. तू तसा त्या दिवशी अमुकतमुक वागलास म्हणजे आजही तेच तत्व तू फॉलो केले पाहिजेस, किंवा त्या धाग्यातले तुझे विधान या धाग्यातील विधानाशी विसंगत वाटतेय असे आपण कोणाला नाही बोलू शकत, असे नाही ठरवू शकत.

कोण म्हणत मी बोलू शकत नाही
मी बोलू शकते , वाद घालू शकते , मला लोकशाहीने लोकांशी वाद घालण्याचा हक्क दिलाय .

ह्या धाग्यावर टाइमपास करायला आले होते
.......
मी बोलू शकते , वाद घालू शकते , मला लोकशाहीने लोकांशी वाद घालण्याचा हक्क दिलाय .

>>

टाईमपास की वाद? की वाद घालणे हाच टाईमपास Happy

असो, पण खरेच झाला असेल टाईमपास तर त्याचे श्रेय द्या.
अंह, मला नाही हा, तर राधे मा यांना ..

अश्या तर्हेने मी धागा पुन्हा राधे मा वर आणला आहे, सहकार्य अपेक्षित Happy

ऋन्मेऽऽष, तुम्हाला राधेमाची किंवा इतर कोणाचीही जरुरत नाही. तुम्ही तसेच स्थितप्रज्ञ आहात असं तुमच्या सगळ्यांना दिलेल्या उत्तरा वरून दिसत आहे.

ऋन्मेऽऽष फॅन क्लबात मी पण!!!

बरं.... मायबोलीवर कोणी राधे मां चा भक्त आहे का?

ंमला त्या भक्ताकरवी राधे मां ला खालील प्रश्न विचारायचे आहेत...

१. हे माते, तुझा ड्रेस डिझाइनर कोण आहे?
२. लाल रंग तुझा का आवडता आहे?
३. त्रिशुल खरोखरच जखमी करतो का समोरच्याला?
४. नवीन नवीन नेकलेसेस कुठे मिळतात?
५. तुझ्या आशीर्वादाने कोणाचं खरंच भलं झालं आहे का?
६. तुम्ही नेहमी तोंड बंद ठेवून हसता. ती किमया कशी काय जमते तुम्हाला?

तूर्तास या प्रश्नांची उत्तरे समर्पक मिळावीत अशी माफक अपेक्षा आहे

Pages