आधुनिक भारतातील युगपुरूष !

Submitted by केदार on 14 August, 2015 - 07:48

६९ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येस आधुनिक भारतात कोण कोण युगपुरूष होते असा विचार करू जाता केवळ एकच नाव समोर दिसते.

मोहनदास करमचंद गांधी ! फॉर बेटर ऑर फॉर द व्हर्स - ही वॉज द मॅन इंडिया निडेड.

More you read about him, more you hate and more you read about him, more you respect !

भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा ! जय हिंद !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

More you read about him, more you hate and more you read about him, more you respect ! >> हे अगदी खरंय. सहमत. ह्या माणसानं कायम अचंबित केलेलं आहे.

जय हिंद!

हे म्हणताना कसलं भारी वाटतं!

सर्वाना स्वातन्त्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. पण केदार माझ्या नजरेत अजून दोन जण आहेत. ( स्वातन्त्र्यानन्तरच्या काळातले) पन्डित लालबहादूर शास्त्री आणी सरदार वल्लभभाई पटेल.

जयहिन्द!

स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!

पण राव, गांधीजींबद्दल कितीही रिस्पेक्ट वाटला तरी ते 'ऐतिहासिक 'व्यक्तिमत्त्व झाले की.

मला वाटले तुम्ही आधुनिक म्हणजे त्या दुसर्‍या गुजराती व्यक्तिमत्त्वविशेषाबद्दल लिहिताय.त्यांना खरे आधुनिक हायटेक युगपुरुष म्हणता येईल.

मोहनदास करमचंद गांधी!!

पूर्ण अनुमोदन!

Exactly ह्याच अवस्थांमधून गेलेलो आहे … More you read about him, more you hate and more you read about him, more you respect !!

इतर कोणी युगपुरुष वगैरे वाटत नाही … अर्थात केज्रीवाल सोडले तर Wink

पंडीत जवाहरलाल नेहरू.

सर्व मायबोलीकरांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दीक शुभेच्छा !
(स्वातंत्र्यदिनानिमित्त फेसबुक प्रोफाईल तिरंगी करणारे, चारचाकी मधे कागदी झेंडे ठेवणारे, टू व्हीलरच्या हँडलला कागदी झेंडा + भिंगरी लावणारे, तिरंगी टी शर्ट परिधान करणारे..यासर्वांन्बद्दल अतीव आदर वाटत असल्याने अस्।आ सर्वांना आगाऊ वंदन ! )

आधुनिक भारतातील..
मला वाटल मोठा लेख असणार..फक्त महात्मा गांधीच नाव आहे..

More you read about him, more you hate and more you read about him, more you respect ! >> याला मात्र लाखोनि अनुमोदन Happy

पण केजरीवाल नकोच आणी मोदी पण नको >> +१ रश्मी

स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना शुभेच्छा.. उद्याचा दिवस मस्त असणार.. भलेही एक दिवस गाणे वाजवतात नारे देतात तरी खुपच छान वाटत..मस्त वाटत सकाळी सकाळी..

More you read about him, more you hate and more you read about him, more you respect ! याला मात्र लाखोनि अनुमोदन स्मित... अनुमोदनास अनुमोदन!

ब्रिटिश रॉयल फ़ॅमीली या वरिल काही तरि वाचताना, मुख्य घटना या यादी मधे म.गांधींची हत्या हि नोंद वाचुन ही भावना जास्तच अधोरेखीत झाली.

आधुनिक भारत म्हणजे नक्की कोणत्या काळातला? स्वातंत्र्योत्तर भारत = आधुनिक भारत?
गांधीजी हे युगपुरुष होते ह्यात काहीच शंका नाही!
More you read about him, more you hate and more you read about him, more you respect ! >>

I don't really hate him but I do respect him a lot. Nobody is perfect and everybody makes mistakes. Gandhiji was no exception!

कधी कधी वाटते की आपण गांधीजींना युगपुरुष/महात्मा वगैरे विशेषणं खूप सोयीस्करपणे मुद्दामून लावली आहेत. ह्याचा अर्थ ते युगपुरुष किंवा महात्मा नव्हते असं मुळीच नाही पण एकदा त्यांना ह्या पदव्या चिकटवल्या की त्यांच्या चांगल्या गुणांचा अंगीकार न करण्यास आपण मोकळे राहतो! Only "mahatmas" can always speak the truth or follow non violence! We are poor fallible "normal" humans! We have basically reduced him to his laurels Sad

असो, सर्वांना भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा! भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो!

टिळकांवर धागा येऊन गेल्याने गांधीबॅशींग साठी तर नाही ना उघडला हा धागा ? Lol
हरकत नाही. जुन्याच पोष्टी पुन्हा नव्याने लिहिण्यासाठी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मरगळलेल्या सदस्यांमधे कसा जोर येईल ते पाहण्यासारखे असेल. ( अमक्या धाग्यावर काय लिहीलं हे पुढच्या धाग्यावर लक्षात राहण्यासारखे नसल्याने जुने शब्द कुणी इथे आणले, म्हणजे ते आणतीलच म्हणा, की मग दे दणादणा... वीरू से टक्कर !)

<<
जुन्याच पोष्टी पुन्हा नव्याने लिहिण्यासाठी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मरगळलेल्या सदस्यांमधे कसा जोर येईल ते पाहण्यासारखे असेल.
>>

मायबोलीवर २-३ आठवडे आयुष्य असलेले सदस्य हे बोलतात. चला विकांत विनोदाची सोय झाली.

भाजप विरुद्ध विरोधी, ब्रिगेडी विरुद्ध बामणी , गांधी विरुद्ध सावरकर, जुने विरुद्ध नवे, हुशार विरुद्ध अति-हुशार अशी कधीही न अनुभवलेली चर्चा वाचायला मिळणार!

टिळकांवर धागा येऊन गेल्याने गांधीबॅशींग साठी तर नाही ना उघडला हा धागा ? हाहा
हरकत नाही. जुन्याच पोष्टी पुन्हा नव्याने लिहिण्यासाठी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मरगळलेल्या सदस्यांमधे कसा जोर येईल ते पाहण्यासारखे असेल. ( अमक्या धाग्यावर काय लिहीलं हे पुढच्या धाग्यावर लक्षात राहण्यासारखे नसल्याने जुने शब्द कुणी इथे आणले, म्हणजे ते आणतीलच म्हणा, की मग दे दणादणा... वीरू से टक्कर !) >>

डोन्ट नो, तुमजा अजेंडा काय आहे ते. पण मी माझ्या स्वत:च्या आयडीने अनेकदा गांधी बॅशिंग केले आहे आणि अनेकदा ते ग्रेट आहेत हे लिहिलेले आहे. त्यासाठी असे बाफ काढून बॅशिंग करायची गरज मला भासत नाही.

टिळकांवर लिहिले म्हणून मी हा बाफ काढला हा जोक आहे. आज १४ ऑगस्ट आहे म्हणून काढला. मला विरोध करायचाच असला तर टिळक बाफवरही मी लिहिले असते.

बायदवे भारतात गांधींचे सर्वात जास्त बॅशिंग भीमराव रामजी आंबेडकरांनी केलेले आहे. (सहज तुम्हाला माहिती असावे म्हणून. )

असो तुम्हाला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा.

-

जिज्ञासा, एक्झॅटली माय थॉट्स

-

आपापली व्यक्तीगत भांडणं दुसर्‍या वाहत्या बाफवर करा कृपया.

फार मनाला लावून घेता बुवा तुम्ही. जरा विनोद बिनोद कळत नाहीत. संघाचे दिसता ! Lol ( ते बिचारे प्रभात वंदनीय मानतात हो गांधीजींना )

I don't really hate him but I do respect him a lot. Nobody is perfect and everybody makes mistakes. Gandhiji was no exception! >> same here जिज्ञासा .. म्हणुनच लेखातल्या वाक्यांना अनुमोदन दिले Happy

<<
आपापली व्यक्तीगत भांडणं दुसर्‍या वाहत्या बाफवर करा कृपया.
>>

क्षमस्व. खरे तर असे करायची मला आवश्यकता नव्हती. प्रत्येक धाग्यात नको तिथे तोंड खूपसून दिड-शहाणी अक्कल पाजळ्णा रे नवीन आयडी वाचले की उगाचच विचारवंत मोड ऑन करावा लागतो.

पुन्हा या धाग्यावर माझ्याकडून असे घडणार नाही.

महात्मा गांधी,आंबेडकर,जवाहरलाल नेहरू नि इंदिरा गांधी.

गांधीजींबद्दल मलासुद्धा नितांत आदर आहे पण का कुणास ठाउक गांधीजींचा भारतीय राजकारणात झालेला प्रवेश, त्यानंतर त्यांना मिळालेला जनाधार, पुढचं यश इ. या सगळ्यात आणि गाईड सिनेमातल्या राजुचं उत्तरायुष्य यात विलक्शण साम्य आढळतं.

राजु एका परक्या गांवात येतो, गावकरी त्याला साधु बनवतात, स्वत:तल्या त्रुटींची त्याला जाणीव असते पण तो प्रवाहाबरोबर जात रहातो, उपास करतो, पाउस पाडतो आणि या सगळ्या प्रवासात काहि लोकांच्या द्वेषालाहि कारणीभुत ठरतो... होप यु गेट माय पाॅइंट. Happy

राज यांच्याशी सहमत....

आज दुपारी एक १०-१२ जणांचे टोळके बाईक्स वरुन भगवे झेंडे घेऊन जात होते आणि "काट देंगे" अशी गर्जना करत होते.
नक्की कोणाला काटणार होत तो पार्ट ऐकू नाही आला पण भारताचे स्वातंत्र्य साजरा करताना भगवे झेंडे आणी कापा कापी कशाला पाहिजे? त्या झेंड्यांवर मधे सुर्य आणि त्यात ओम लिहिले होते. कोणती संस्था आहे ही? हे अतिशय अयोग्य आहे.

राजु एका परक्या गांवात येतो, गावकरी त्याला साधु बनवतात, स्वत:तल्या त्रुटींची त्याला जाणीव असते पण तो प्रवाहाबरोबर जात रहातो, उपास करतो, पाउस पाडतो आणि या सगळ्या प्रवासात काहि लोकांच्या द्वेषालाहि कारणीभुत ठरतो... होप यु गेट माय पाॅइंट.
>>>

अहो गांधींजींबद्दल अनेक पुस्तके आहेत, ती वाचा. त्यांनी दक्षिण आफ्रिकेत केलेले काम बघा. तिथे चालवललेले श्रमदानाचे आश्रम, चळवळी, सत्याग्रहाची बैठक ते बघा जरा. थोडी थोडकी नव्हेत तर त्यांनी तब्ब्बल २१ वर्षे दक्षिण आफ्रिकेत घालवली. ते भारतात आले तेव्हाच मोठे नेते व व्यक्तिमत्व होते.

गाइडमधला राजू लफंगेगिरी, दारु-जुगार, खोट्या सह्या करून तुरुंगात जातो. आणि ओळखीच्या समाजापासून पळून जाताना अनवधानाने साधू बनतो.

साम्य असेलच तर केवळ गांधीजी व राजू हे दोघेही जेल मध्ये होते इतकेच. मात्र ते जेल मध्ये का होते यात जमीन आस्मानाचे अंतर आहे.

भारताला आधुनिक करण्यात माझ्या दृष्टीने पंडित नेहरू व डॉ आंबेडकर. नेहरू - देशी उद्योगधंद्यांना (लायसन्स राज चे प्रॉब्लेम धरून सुद्धा, आधीच्या तुलनेने) अनुकूल धोरणे , शास्त्रीय संस्था, पुरोगामी योजना ई करता, तर आंबेडकर - घटनेद्वारे इतर आधुनिक जगाशी सुसंगत असे कायदे आणण्याकरता.

महात्मा गांधींच्या मोठेपणाबद्दल काहीच शंका नाही पण 'आधुनिक' कॅटेगरीत हे दोघे येतील माझ्या दृष्टीने.

अरे होच की राजभाऊ. सॉरी हां. आमचे मराठी कच्चे आहे.
तरिही तुमच्या अ‍ॅनालिसीसशी सहमत नाही. गांधींजींची तात्विक बैठक होती, तिला अनुसरून त्यांनी आचरण केले. राजू भाऊंनी साधुपणाचा फायदा करून घेतला, त्याला अनेक पदर आहेत हे मान्य. तरी गांधीजींनी अ‍ॅक्टिवली राजकारण केले, देशातील जनतेला जागे केले.
तुम्ही राजु गाइड कॅरॅक्टरशी तुलना करून त्यांचे काम बिलिटल करता आहात असे वाटते.

राज यांच्याशी सहमत.

त्यांचा उपयोग करुन घेतला व मारुन टाकले इंग्रजांनी मारले असते तरी समजन्या सारखे होते पण अपनोंने ही मार डाला.

मला वाटते आधुनिक भारतातील युगपुरूष अरविंद केजरीवाल ठरतिल.

Pages