१. कोळत घातलेली चिंच- लिंबाएवढी.
२. काळी मिरी दाणे चमचाभर
३. जीरं चमचाभर
४. लसणाची एखाददुसरी पाकळी.
५. सुकी मिरच्या २ (मद्रासी मिरच्या असल्यास दोन तीन घ्या. संकेश्वरी वगैरे असेल तर एखादी ठिक)
६. तूर डाळ दोनेक चमचे
फोडणीसाठी: तेल आणि तूप, मोहरी, कढीपत्ता, हिंग आणि लाल सुकी मिरची.
१. मिरी, जिरे, लसूण, मिरची आणि तूरडाळ एका पॅनमध्ये कोरडीच परतून घ्या. डाळ चांगली तांबूस होऊ द्यात.
२. हे सगळं गार अक्रून मिक्सरमधेय ओबडंधोबडं वाटून घ्या. फार वस्त्रगाळ पूड करत बसू नका.
३. कोळत घातलेली चिंचेचा पल्प काढून तो पाण्यात मिक्स करून घ्या. (उरलेली चिंच फेकू नका, ती आम्टीत घालून वापरा)
४. आता पाणी उकळत ठेवा. त्यात चवीनुसार मीठ घाला. चांगलं खळखळून उकळत राहू देत.
५. त्यात वर केलेली रसम पावडर घाला. दोन तीन मिनिटे उकळू द्या. दरम्यान तेलातुपाची फोडणी करून घ्या. रसमला चरचरून ही फोडणी मारा. हवं असल्यास वरून कोथींबीर घाला.
६. फोडणी घातल्यावर रस्सम उकळू नका. सरळ पेल्यात ओतून घ्या आणि फू फू करून प्या. (मिरीच्या वाफेनं नाक मो़कळं होइल आणी गरमागरम रस्समने घशाला त्वरित आराम)
७. रस्सम अति उकळू नका.
सर्दी अथवा घसेदुखीनं त्रास होत असेल तर हे रस्सम अतिशय इलाजकारक आहे. यामध्ये मुख्य पदार्थ मिरी आहे हे लक्षात घेऊन मग इतर पदार्थ घालायचे आहेत. सर्वसाधारणपणे बाजारात मिळणारी रसम पावडर मी यात घालत नाही (घातली तरी किंचितच)
रस्सम हे साधारण पातळ सुपासारख्या कन्सिस्टन्सीचे हवे. आंबट आणी तिखट या दोन्ही चवी बरोबर साधल्या तरच रस्सम टेस्टी लागतं. त्यामुळे भसाभसा रस्सम पावडर घालून त्याची चव बिघडवू नये.
रस्समवर फोडणी ऑप्शनल नाही. ती चरचरूनच बसली पाहिजे. पण अतितेल घालू नका. किंचित तेलातुपावर कढीपत्ता आणि हिंगाचा तो अस्सल स्वाद येईल अशीच फोडणी बसायला हवी. क्ढीपत्ता ताजा असल्यास रस्सम तुम्हाला दुवा देईल.
रस्समचे अनेक प्रकार आहेत. पैकी दालरस्सम, टोमॅटो रस्सम, पेपर रस्सम, लेमन रस्सम आणि गार्लिक रसम हे प्रसिद्ध आहेत.
रस्सम भातासोबत खातात, पण मला ते सुप म्हणून अतिशय आवडतं.
इतर रस्समची अथवा रस्सम पावडरची रेसिपी हवी असल्यास लापि वाजवणे मस्ट आहे.
यात बटाटे किंवा पनीर घालायचं असेल तर आजूबाजूला कोण तमिळी नाही ना याची खात्री करून मगच घाला.
अप्रतिम झाले. मनापासून धन्स
अप्रतिम झाले. मनापासून धन्स नंदिनी
मस्तच!!! थंडी पडायला लागली की
मस्तच!!! थंडी पडायला लागली की करण्यात येईल
नंदिनी, जमलं तर परूप्पु रस्समची कृती सांगू शकशील काय?
टीना, सध्या मीच घसादुखीनं
टीना, सध्या मीच घसादुखीनं त्रस्त असल्यानं फोटो वगैरे काढण्याचे त्राण नाहीत गं. तुम्ही कुणी केलं की इथं फोटो नक्की डकवा.
अननसाचं आणि आंब्याचं रस्सम मी ऐकलंय. कधी केलं नाही. शेजारणीला रेसिपी विचारून बघते.
रमड, आणि योकु, उद्या लिहिते!
थँक्स, नंदिनी
थँक्स, नंदिनी
Nandini aaj kela hota..
Nandini aaj kela hota.. Saglyana khup awadala..Thanx...
Ha ghe zhabbu...
अरे, सायली. मस्तच दिसतंय. मी
अरे, सायली. मस्तच दिसतंय.
मी आता ग्लासभर रसम परत प्यायले. तेवढाच घशाला आराम.
Thank u..
Thank u..
Sampadit..
Sampadit..
तामिळ रूममेट बेबी टॉमेटो
तामिळ रूममेट बेबी टॉमेटो सार्ख्या गोल मिरच्या आणायची आणि त्याचे रसम करायची. त्या मद्रासी मिरच्या असतात का??
आता रस्सम केलंच पाहिजे. मस्त.
आता रस्सम केलंच पाहिजे. मस्त.
सायली , धन्यवाद प्रचि
सायली ,
धन्यवाद प्रचि पोस्टल्याबद्दल
मस्तच दिसतेय..चव पन भारीच असणार..
इन रस्समोंने तो मेरी रातोकी
इन रस्समोंने तो मेरी रातोकी निंद हराम करदी..
मग काय टोमॅटो होते त्याच बिना चिंचेच टोमॅटो रस्सम बनवल..
मस्त वाटताय आता..तृप्तीची (म्हणजे तृप्ततेची..उगाच एखादा माबो आयडी सरसावून यायचा ) ढेकर वगैरे की काय ती पन देउन झाली माझी..
ना ना ना बच्चो..कौतुक वगैरे नको..
रेस्पी गुगलुन मग तयार केलेली हाय..
डाळ नव्हती, गोडलिंबाचा पत्ता नोता अन भरीस भर सांभार पन नोता..
तरी बी काय बनली.. काय बनली.. आहाहा.. गप पिली दोगिंनी..
डिस्क्लेमर :
इथ बरीच नावं आलि आहेत ती सर्व विशेषण आहेत नाम नै .. आणि ती त्याच अर्थाने घेण्यात यावी..
धाग्याला दुसर वळण लावण्याचा अज्याबात हेतु नै आहे पण टोमॅटो रस्सम वाला धागा न दिसल्यामुळे फटू इथं टाकण्यात आला आहे, करिता नंदिनी बाईंना वाईट वाटू नये म्हणुन सेम टू सेम प्रतिसाद अमेय यांच्या धाग्यावर पोस्टण्यात आला हाय रे बा.. मांगुन कोनी बोलु नए..
त्या मद्रासी मिरच्या असतात
त्या मद्रासी मिरच्या असतात का?? <<< हो.
टीना फोटो मस्त दिसतोय कढीपत्ता नाही मग त्यात तरंगतंय ते काय?
मिरच्या.. मद्रासी होय का नै
मिरच्या..
मद्रासी होय का नै ते नाई माहित..
आमची गल्ली सोडुन असलेल्या किराणा दुकानवाल्याकडल्या आहेत हे मात्र नक्की
- काही काही बाबतीत घोर अज्ञानी बालक
आणि हो तेल मी छोटा चमचाच टाकल
आणि हो तेल मी छोटा चमचाच टाकल गं
तेल मी छोटा चमचाच टाकल गं
तेल मी छोटा चमचाच टाकल गं >>>=गूड. त्या मिरच्या मद्रासी नाहीत. सी म्हनते तशा त्या चेरी टोमॅटोसारख्य दिसतात.
छान दिसतंय टीना.
छान दिसतंय टीना.
नै गं नेहमीच्याच आहे..गोल नै
नै गं नेहमीच्याच आहे..गोल नै आहेत..
चेरी टोमॅटो मिरच्या गोल असतात ना..बरेचदा दाल तडका मधे तडक्यात वगैरे वापरतात ..
ठांकु अन्जू
ही पण मस्त आहे रेसिपी!
ही पण मस्त आहे रेसिपी!
नंदिनी.. यम्मी यम्मी वाटलं
नंदिनी.. यम्मी यम्मी वाटलं रेस्पी वाचूनच.. तोंपासु
इस्को जरूर ट्राय करेंगे..
मस्त आहे . ट्राय करण्यात येईल
मस्त आहे . ट्राय करण्यात येईल . सायली ,टीना फोटो छान !!
एवढ्या मसाल्यात पाणी किती?
एवढ्या मसाल्यात पाणी किती? प्लीज लिहा.
मी ते कंसातल आधी गिळाम रस्सम
मी ते कंसातल आधी गिळाम रस्सम वाचलं.
रेसिपी माहिती नव्हती पण रस्सम ने घशाला जे ऑस्सम फिलिन्ग येत ते लै भारी कॅटेगरीत.
भारी आहे रस्सम.
सीमंतिनी, त्या बोरमिरच्या!
सीमंतिनी, त्या बोरमिरच्या! गुजराथी कढीतला मुख्य घटक. दिसायला सुंदर, फोडणीत घातल्यावर मस्त स्वाद येतो आणि अजिबात तिखट नसतात.
काल रेसिपी वाचल्यावर दुखर्या
काल रेसिपी वाचल्यावर दुखर्या घशाला 'हाच' एक इलाज असे अचानक वाटायला लागले. पण उशिरा तुरडाळ भाजायचे आणि उकळुन शिजवायचे जीवावर आले होते. म्हणुन इतर जिन्नस भाजले आणि मिक्सरमधुन काढले. कुकर आधीच लावल्यामुळे शिजलेली तुरडाळ होती तीच दोन चमचे + ही वरची पावडर + चिंच उकळली आणि त्यावर फोडणी घातली.
एकदम यम्मी. घसा छान शेकुन निघाला.
नंदिनी मस्त रेसिपी. सायली,
नंदिनी मस्त रेसिपी. सायली, टीना फोटो सही आहेत. टीना तेल दिसत आहे रस्सममध्ये.
आम्ही बेडगी मिरची वापरतो. रस्सममध्ये तूप अजिबात नको, चव बदलते. तेलाचीच फोडणी हवी. मी सुद्धा रस्समप्रेमी आहे. जास्त पिऊ नको असे सगळे ओरडतात कारण गरम असत.
रस्सम वडा फेव्हरेट. मी भाताबरोबर नाही खात आमच्याकडे शेवटचा भात दही किंवा रस्सम असत. मी रस्सम अगोदरच पिऊन टाकते, सूपप्रमाणे.
बंगळूरातील नंदिनीच रस्सम मिस करते.
वाह! मलाही रस्सम अतिशय आवडतं.
वाह! मलाही रस्सम अतिशय आवडतं. प्रायोगिक तत्वावर करून बघते.
अवांतर- पुण्यामध्ये कर्वे रस्त्यावर 'किमया' नावाच्या हॉटेलमध्ये मस्त रस्सम मिळतं.
मस्त होते हे रस्सम. रस्समवर
मस्त होते हे रस्सम.
रस्समवर फोडणी ऑप्शनल नाही. ती चरचरूनच बसली पाहिजे. >>> + १००.
फोडणी घालायच्या आधीचे रस्सम आणि घातल्यानंतरचे रस्सम यांच्या चवीत जमीनास्मानाचा फरक होता.
मी यात अर्धा टोमॅटो आणि अर्धा चहाचा चमचा गूळ पण घातला (मला नुसतीच चिंचेची चव आवडत नाही)
ओके! बोरमिरच्या एकदा आणायला
ओके! बोरमिरच्या एकदा आणायला हव्या आता.
रस्सम वडा फेव्हरेट. मी भाताबरोबर नाही खात >> + १०००
म्हैसूर जंक्शन आठवलं.
म्हैसूर जंक्शन आठवलं.
Pages