प्लीज प्लीज मदत करा. ईज्जतचा सवाल आहे.
हवे तर चार दिवस ईतर कोणता धागा काढत नाही, पण या चार दिवसांत मला एवढी मदत करा.
आमच्या ऑफिसमध्ये दोन कॉन्फरन्स रूम आणि तीन मीटींग रूम्स आहेत. त्यांच्यासाठी नावे सुचवा.
आजवर या खोल्या पहिल्या माळ्यावरची, ग्राऊंड फ्लोअरवरची, मोठ्या कॅंटीनच्या शेजारची, छोट्या टॉयलेट जवळची वगैरे वगैरे नावांनी पुकारल्या जात होत्या. मात्र आता त्यांना नावे द्यायची आहेत.
ज्या गिन्याचुन्या खांद्यांवर ही जबाबदारी टाकली आहे त्यात दोन खांदे माझेही आहेत. पण मी एकट्याने कितीही डोकेफोड केली तरी मला नाही जमणार हे नामकरण प्रकरण. म्हणून तमाम मायबोलीकरांची डोकी एकत्र येऊन काही सुयोग्य नावे सुचवतील या आशेने हात फैलावतोय.
इथे मोठमोठ्या ऑफिसात काम करणारे माबोकर आहेत. बरेच जणांच्या गाठी कित्येक ऑफिसांचे अनुभव असतील. कैक मीटींग्ज आणि कॉन्फरन्स ऊरकल्या असतील. त्यावरून अंदाज घेऊन एखादे नवे वा त्यापैकीच आवडलेली नावे सुचवा.
** दोन्ही कॉन्फरन्स रूमची, वा तिन्ही मीटींग रूम्सची नावे एखाद्या थीम मध्येच हवीत असे गरजेचे नाही.
** तसेच प्रत्येकी एक अशी पाच नावे सुचवा असेही नाही. कमी ही चालतील, जास्तही चालतील. सुटी सुटी, स्वतंत्र, जितकी सुचतील तितकी सुचवा.
** मुद्दामहून सांगण्यात आले नसले तरी ऑफिसच्या मंडळींना संस्कृतप्रचुर नावे नकोत तर बहुधा ईंग्लिश नावेच अपेक्षित आहेत.
प्लीज प्लीज प्लीज ... नावे सुचवा..
ज्यांना ईतरांची नावे आवडतील त्यांला प्लस १ करा ..
माझ्या कुठल्या जुन्यापुराण्या रुमाल धाग्याचा राग ईथे काढू नका..
जे नावे सुचवतील त्यांचेही देव भले करो, जे प्रयत्न करतील त्यांचेही देव भले करो..
तुम्हा सर्वांनाच ईन अॅडवान्स
कोपरापासून धन्यवाद,
ऋन्मेऽऽष
ऋन्मेऽऽष >> काही कधी ऐकली
ऋन्मेऽऽष >> काही कधी ऐकली नसतील अशी काही नावं
Osage ओसेज
Shawnee शॉनी
Creek क्रीक
Cherokee चेरोकी
Chickasaw चिकसॉ
ही सगळी ओक्लाहोमा मधल्या नेटीव्ह अमेरिकन ट्राईब्ज ची नावं आहेत!
धनि, गंमत म्हणून लिहिलंत
धनि, गंमत म्हणून लिहिलंत तुम्ही पण चिकसॉ वरून सुचलेलं jigsaw नाव मला आवडलं मिटींग रूम किंवा कॉन्फरंस रूम साठी.

धनि मस्त सुरुवात, मला आवडली
धनि मस्त सुरुवात, मला आवडली ही नावे..
तुर्तास शुभरात्री, भारतात १२ वाजले..
कंपनीचा बिझनेस कशाशी रीलिटेड
कंपनीचा बिझनेस कशाशी रीलिटेड आहे त्याच्या अनुषंगाने द्या.
तुझ्यावर टाकलीये का जबाबदारी
तुझ्यावर टाकलीये का जबाबदारी ?
बर. एफटीआयआय मधे एक विस्डम ट्री आहे त्या धर्तीवर एखादं नाव दे.
बाकी तुझ्या कंपनीतलं वातावरण माहीत नसल्यानं पास द्यावा वागेल. कसलीच अट नसेल तर अवघड काय आहे ?
मी जिथे कामं केलीत तिथे नावं नव्हतीच. एका ठिकाणी आदीत्य, भास्कर अशी नावं होती, तर एका ठिकाणी लिओनार्दो, कोपर्निकस, गागाभट्ट इ.नावं होती.
आठवायला आकडे बरे पडतात.
आठवायला आकडे बरे पडतात. तुमच्या कंपनीच्या नावाची इनीशियल्स घेऊन कॉ. रुमला नंबर द्यायचे.
उदा. AB - 1, >>> हे सगळ्या खोल्या एकाच मजल्यावर असतील तर.
वेगवेगळ्या मजल्यावर असतील तर : कंपनीची इनीशियल्स + मजल्याचा नं. + रुम नं.
शॅंकी. हो आपला मुद्दा योग्य
शॅंकी. हो आपला मुद्दा योग्य आहे.
पण मुद्दामच कंपनीशी वा आमच्याच कामाशी रिलेटेड नावे नको आहेत. उगाच अभ्यासाला बसल्याचा फील नकोय. म्हणून ते डिटेलही हेडरमध्ये दिले नाहीत, ना आता देतोय.
@ jigsaw .. ईंटरेंस्टींग वाटतेय खरे
आयुर्वेदाच्या गोळ्या बनवणारी
आयुर्वेदाच्या गोळ्या बनवणारी कंपनी असेल तर वात, पित्त, वायू ही नावं..:फिदी:
शुगोल, अहो नंबर वगैरे
शुगोल,
अहो नंबर वगैरे फॉर्मेटमध्ये नको आहेत..
आमच्या आणखी एका ब्रांचमधील कॉन्फरन्स रूमची नावे galaxy, sapphire अशी काहीशी आहेत..
खडीसाखर, यासाठीच आदित्य भास्कर वगैरे संस्कृतप्रचुर नकोयत असे म्हणालेलो वर
पर्वतांची नावं द्या
पर्वतांची नावं द्या ...
.
हिमालय, सह्याद्री, अरावली, निलगिरी, विंध्य, शिवालिक
आणि
नंगा (टॉयलेट जवळ ची मिटींग/कॉन्फ रुम)
भकती, शक्ती, श्रद्धा आणि
भकती, शक्ती, श्रद्धा आणि टॉयलेटजवळची सबुरी
एक जेन्युइन शंका : एमएनसी मधल्या कॉन्फरन्स / मीटिंग्ज रुम्स अशा महत्वाच्या जागांना नाव देण्यासाठी पाच समर्थ नावं निवडली म्हणजे तुझ्या क्षमतेचा त्यांना अंदाज असणारच. म्हणजे तुझ्याकडे काही नावं असणारच. ती कशी दिली, काय विचार केला हे लिहीलस तर इतरांना जरा अंदाज येईल कुंपणीचा. कारण मॅनेजमेंटला कशी नावं चालतील याचा बेस्ट जज्ज इथे तूच आहेस.
व्हेकेशन डेस्टिनेशन्स् ची
व्हेकेशन डेस्टिनेशन्स् ची नावं द्या किंवा मग वन्डर्स ऑफ द वर्ल्ड ..
किंवा मग बॉलीवूड पिक्चर्स ..
बॉलीवूड अगदीच थिल्लर वाटत असेल तर हॉलीवूड क्लासिक्स् ची द्या ..
माझ्या ईथे फुलांची आहेत.
माझ्या ईथे फुलांची आहेत. लिली, पॉपी, डेझी, जस्मिन, रोझ इ. लक्षात ठेवायला सोप्पी आहेत.
आमच्या जुण्या ऑफिसात इथल्या
आमच्या जुण्या ऑफिसात इथल्या (massachusetts) मधल्या काउंटीज ची नावं होती...
उदा:
Middlesex
Berkshire
Hampden
Essex
Dukes
Franklin
Bristol
Barnstable
अशी जगातील प्रसिद्ध सिटींची/ठिकाणांची नावे ट्राय करता येतील... Moscow, Berlin, Vienna, Manila etc...
किंवा आपल्या सौरमालेतील ग्रहांची नावे पहा: Mercury, Pluto, Saturn, Venus etc.
रोजच्या वापरातील नावे: Nexus, Orbit एत्च..
आमच्य इथे ब्राऊजर्सची नावे
आमच्य इथे ब्राऊजर्सची नावे आहेत. क्रोम, सफारी, फायरफॉक्स, ऑपेरा.
हिमालयातील पर्वतांची नावे
हिमालयातील पर्वतांची नावे (कांचनजंगा, एवरेष्ट इ)
नद्यांची नावे (गोदावरी, यमुना इ)
किल्ल्यांची नावे (शिवनेरी, रायगड इ)
मुंबईतील प्रसिद्ध ठिकाणंची नावे (band stand, gateway of india, national park, worli seaface)
फारिनच्या शहरांची नाव:
फारिनच्या शहरांची नाव: बार्सिलोना, ननायमो, व्हिएन्ना : एकदम स्केलेबल, भारतातल्या शहरांची नावं ठेवू नका, कायतरी भारी/ भव्यदिव्य वाटलं पाहिजे. अम्रिकेत 'मुंबई, लोअर परेल गेलाबाजार कुर्ला, कांदिवली' रूम छान वाटते इंड्यातल्या भारतात नाही.
भारत/ संस्कृती: भारतातल्या नद्या, पर्वत, शास्त्रज्ञ, तत्त्ववेत्ते (इथे तुम्ही डावे/ उजवे कोण आहात त्यावर ठरवा), झाडं, फुलं चिक्कार स्कोप.
बेटांची नावं: अरुबा आणि शोधा
आकाशगंगा आणि ग्रह/ तारे इ. नावं.
फारिनला एकतरी रूम सें जॉन, सें लौरा (म्हणजे आपलं सेंट लोरेंट :p) असते. भारतात संत पण वाटून घेतात त्यामुळे ते नकोच.
आमच्याकडे तलावांची नावे
आमच्याकडे तलावांची नावे आहेत,
अलोहा
अल्पाईन
अल्मनोर
अम्डोर
Disneyland च्या theme ची नावे
Disneyland च्या theme ची नावे : Main Street, Tomorrowland, Fantasyland, Frontierland, Adventureland.
किंवा
पहिल्या माळ्यावरची : Up n Above, ग्राऊंड फ्लोअरवरची : Down to earth, मोठ्या कॅंटीनच्या शेजारची: Foodland, छोट्या टॉयलेट जवळची: The Goldfish Bowl
किंवा
अशा जागा, गावांची नावे जे उच्चारायला गम्मत वाटेल....Zanzibar, Jhumri Telaiya, Cincinnati
थीमबेस्ड केलंत तर स्केलेबल
थीमबेस्ड केलंत तर स्केलेबल ठेवा. नवीन रूम काढल्या, पण आधी पर्वत बांधा असलं महागात पडेल.
The Goldfish Bowl
The Goldfish Bowl
नंबर का देत नाहीत? ते उलट
नंबर का देत नाहीत? ते उलट जास्त सोप नाही का? असो.
अल्फा बीटा गॅमा इत्यादी
रेड रुम्,ग्रीन रुम , ग्रे रुम इत्यादी (रुम मधल्या एका वॉलला तसा कलर दिला तर छान. आमच्या डॉक कडे आहेत तशा रुम. लक्षात ठेवायला सोपे)
किंवा युनिटी, ईंटिग्रीटी इत्यादी
प्रत्येक खन्डातील समिट देउ
प्रत्येक खन्डातील समिट देउ शकाल.
१) एव्हरेस्ट
२) किलिमान्जारो
३) ब्लान्क
४) मकिन्ली
५) जया (पन्काक जया)
वा बेटे पण होतिल
१) अलोहा
२) अन्दमान
३) ताहिती
४) अरुबा
५) बाली
sonalisl | 5 August, 2015 - 12:52
अशा जागा, गावांची नावे जे उच्चारायला गम्मत वाटेल....झान्जिबार, झुमरीतलैया,
.>> आणि ओपानेमा, टिम्बक्टु, गॉथम, अलिबाग ,क्लाय्मॅक्स
Jaohny Walker Jack
Jaohny Walker
Jack Daniels
Tia Maria
Drambuie
Jim Beam
Krupnik Belvédère
Kakubin Suntory
हेमंत हे काय त्या त्या रुम
हेमंत हे काय त्या त्या रुम मध्ये गेल्यावर घ्यायच का? रिव्युज च्यावेळी या रुम मध्ये काय होईल याची कल्पना करतीये.
रंगावरून नावं ठेवली आणि रंग
रंगावरून नावं ठेवली आणि रंग दिला तर रंगाधळ्याला डिस्क्रीमिनेशन वाटेल ना?
व्हायाकॉम मधे एम टी व्ही च्या
व्हायाकॉम मधे एम टी व्ही च्या मजल्यांवर त्यांच्या बँड्स ची / गृप्सची नावे देत असत कॉन्फ रूम्स ना. निकलोडियन च्या मजल्यावर मिस्टर एड वगैरे नावे असत
ग्रीक पुराणातील देवतांची नावे
ग्रीक पुराणातील देवतांची नावे देऊ शकता - Apollo, Athena, Demeter, Poseidon, Zeus... गुगल केलीत तर अजुन १०० पौराणिक ग्रीक नावे सापडतील. जुन्या ग्रीक शहरांची नावे पण शेकड्यानी आहेत आंतरजालावर.
किंवा अमेरिकन स्पेस मोहीमांची नावे प्रसिद्ध आहेत - Endeavor, Gemini, Mercury, Discovery, Atlantis, Voyager, Armstrong
भारतातील झाडांची नावं - Mohogany, Oak, Pine, Spruce, Mulberry, Palm - इंग्रजी नावे पण ही आपल्या झाडं देशातही सापडतात.
जगातील विविध खंडातील उंच पर्वत शिखरे - Mount Everest, Aconcagua, Mount McKinley, Mount Kilimanjaro, Pico Cristóbal Colón. ---- "कॉपरमाईन" ह्यांचा खालील प्रतिसाद बघा.
जगातील प्रसिद्ध शहरे - लंडन, पॅरीस, इस्तंबुल... यादी बरीच मोठी आहे.
असे शास्त्रज्ञ ज्यांची नावे आंतरराष्त्रीय मापकांना दिली आहेत - Ampere, Kelvin, Pascal, Newton, Celsius, Coulomb, Watt, Volt, Ohm, Farad, Siemens, Joule, Tesla, Hertz अजुनही असतील, हे पटकन आठवले.
"आता ४ दिवस एकही धागा काढणार नाही" असा शब्द दिला आहेस ते लक्षात ठेव रे
ड्रोईड इदेशी गोड पदार्थ घेते
ड्रोईड इदेशी गोड पदार्थ घेते नव्या रिलीजला तुम्ही स्वदेशी तिखट घ्या. झुणका, तांबडा रस्सा, बिर्याणी, ठेचा (इथे अप्रयझल मिटींगा होतील).
अमितव, हे आवडलं खूप ..
अमितव, हे आवडलं खूप ..
चौकट राजा, जगातली पाच उतरत्या
चौकट राजा,
जगातली पाच उतरत्या क्रमाची शिखरे हिमालयातली 'एट थाउजंडर्स' आहेत ज्यात एव्हरेस्टनंतर के-२, कांचनगंगा, ल्होत्से आणि मकालू यांचा नंबर लागतो.
https://en.wikipedia.org/wiki/Eight-thousander
आपण दिलेली यादी वेगवेगळ्या खंडांतील सर्वोच्च शिखरांची आहे ज्यांना सेव्हन समिट्स म्हणतात. अर्थात त्यातही अनेक वाद आहेतच.
https://en.wikipedia.org/wiki/Seven_Summits
अमितव, ठेचा
अमितव,
ठेचा
कॉपरमाईन, बदल करतो.
कॉपरमाईन, बदल करतो.
Dilbert Ratbert Catbert Dogbe
Dilbert
Ratbert
Catbert
Dogbert
Asok
जी कंपनी आपल्या एम्प्लॉईजना असली निरुद्योगी कामे देते त्यांच्याकरता बरोबर आहेत नावं.
२ कॉन्फरन्स रूम : लोकसभा,
२ कॉन्फरन्स रूम : लोकसभा, राज्यसभा
(lower house, upper house)
आणि ३ मीटींग रूम : कॅबिनेट, सिनेट, असेंब्ली.
5 Schools og
5 Schools og Magic
Hogwarts
Beauxbatons
Durmstrang
Mahoutokoro
Koldovstoretz
5 Ivy league universities
Princeton
Yale
Harvard
Columbia
Dartmouth
5 kingdoms of middle earth
Gondor
Rohan
Mordor
Isengard
Shire
5 houses in game of thrones
House Stark
House Arryn
House Hoare
House Lannister
House Martell
5 Alter Egos of Superheros
Peter Parker
Clark Kent
Bruce Wayne
Tony Stark
Scott Lang
भंकस भेजा
भंकस
भेजा फ्राय
मंडई
हटाई
टोचन
राडा
सीरीयस मोड ऑन: दादर, माटुंगा,
सीरीयस मोड ऑन:

दादर, माटुंगा, सायन अशी सोपी नावं, पाचू, हिरा, मोती विन्ग्रजीत चालतील का?
ऑफिस बहु मजली असेल तर , तळ क्रमांकाने सुरुवात केलेली उत्तम
एक्लेअर, टॉफी, किटकॅट, लॉलीपॉप (एन्ड्रोईड वर्जन्स वरुन सुचलेली).
आता सीरीयस मोड ऑफ:
सई, स्वप्नील, शाहरुख चालतील का?
खल, दळण, बाचाबाची, हमरीतुमरी चालतील का?
हायझेनबर्ग, अशक्य भारी. all
हायझेनबर्ग, अशक्य भारी.
all hands मीटिंग होते त्याला : भंकस
डिझाईन रिव्हू वाल्याना: भे फ्रा, मंडई
पर्फ रिव्हू : हटाई, टोचन आणि गाजर, शेंगदाणे टाकू.
लेट गो: राडा
मस्त प्रतिसाद. बॉलीवूड अगदीच
मस्त प्रतिसाद.
बॉलीवूड अगदीच थिल्लर वाटत असेल >>> ह्याला नाव सुचवायला सांगताहेत म्हणजे चालणार असेल :प
आमच्या प्रत्येक बिल्डींग ला एक एक थीम वापरुन नाव दिली आहेत. उदा. विन्टेज कार चे मॉडेल्स, डॉग ब्रिड्स, वेग वेगळ्या देशांची करन्सी, चॉकलेट ची नावं ई.
म्हणजे अजुन कुणी
म्हणजे अजुन कुणी
सई
शाहरुख
स्वप्निल सुचवली नाहित.. कस काय बुवा??
धुम
दन्बग
दिल्वाले
शाखा
आखा
सखा
मला
मला सुचलेली
प्लॅटिनम
गोल्ड
डायमंड
जेड
सफायर
Inspire Stimulate Unite Conve
Inspire
Stimulate
Unite
Converse
Connect
Encourage
हटके नावं हवी असतील तर येल,
हटके नावं हवी असतील तर
येल, व्यापम, चिक्की, ललित
the five elements spheres
the five elements spheres -
terra (earth),
aqua (water),
aer (air),
ignis (fire),
aether (sky)
मस्त नावं सुचवतायत सगळे.
मस्त नावं सुचवतायत सगळे. सुचली की लिहीते. तोवर ऋन्मेष तू फिल्टरींग सुरू कर म्हणजे कोणत्या प्रकारची नावं सुचवावी ते कळेल.
लाईफबॉय, संतूर, पिअर्स, लक्स
लाईफबॉय, संतूर, पिअर्स, लक्स आणि टॉयलेटजवळच्या रुमला हार्पिक
शक्यतो, कंपन्या अशा वेळी नाव सुचवा म्हणून सर्वांसाठी स्पर्धा वगैरे जाहीर करतात किंवा सर्क्युलर काढतात.
दोन कॉन्फरन्स रूम आणि तीन
दोन कॉन्फरन्स रूम आणि तीन मीटींग रूम्स आहेत
मोठ्या कॉन्फरन्स रूमला दिवान-ए-आम आणि छोट्याला दिवान-ए-खास!!
सर्वात मोठ्या मीटींग रूमला सदर, त्यानंतर फड आणि सर्वात छोट्या मीटींग रूमला खलबतखाना!!!
सर्वत्र शिवाजी, अकबर, राणा प्रताप, पेशवे इत्यादींची पोर्ट्रेट्स लावा!
सध्या येक अजब प्रकार
सध्या येक अजब प्रकार बघितला...
बायको ने सेमी कोलोन ( ; ) चा टाटू बनवून घेतला ..... मी confused .
तिने मला तुच्छतेने बघून सांगितले कि हा ट्रेन्ड तुला माहित नाही ?
तर हे बघा
http://www.upworthy.com/have-you-seen-anyone-with-a-semicolon-tattoo-her...
"A semicolon is used when an author could've chosen to end their sentence, but chose not to. The author is you and the sentence is your life."
Originally created as a day where people were encouraged to draw a semicolon on their bodies and photograph it, it quickly grew into something greater and more permanent. Today, people all over the world are tattooing the mark as a reminder of their struggle, victory, and survival.
तर नाव म्हणून नुसती चिन्हे का नकोत - कि बोर्ड वरची चिन्हे लिहा आणि त्यांना अर्थ द्या
अर्थ देणे जमले नाही तर मार्केटींग चे MBA पकडा .. त्यांना चांगली दारू फुकट पाजा .. ते सर्वांचा अर्थ लावून देतील .. ( मी पण मार्केटींग चा MBA आहे हे मी नमूद करू पाहतो . तर केव्हा बसायचे ??)
तर नावे अशी आहेत
;
:
+
#
*
@
>
<
/
?
\
Meeting room - ladder,
Meeting room - ladder, cloud
Conference - war room, idea room, faraway tree
Pages