प्लीज प्लीज नावे सुचवा ! २ कॉन्फरन्स रूम आणि ३ मीटींग रूम !

Submitted by ऋन्मेऽऽष on 5 August, 2015 - 15:02

प्लीज प्लीज मदत करा. ईज्जतचा सवाल आहे.
हवे तर चार दिवस ईतर कोणता धागा काढत नाही, पण या चार दिवसांत मला एवढी मदत करा.

आमच्या ऑफिसमध्ये दोन कॉन्फरन्स रूम आणि तीन मीटींग रूम्स आहेत. त्यांच्यासाठी नावे सुचवा.

आजवर या खोल्या पहिल्या माळ्यावरची, ग्राऊंड फ्लोअरवरची, मोठ्या कॅंटीनच्या शेजारची, छोट्या टॉयलेट जवळची वगैरे वगैरे नावांनी पुकारल्या जात होत्या. मात्र आता त्यांना नावे द्यायची आहेत.

ज्या गिन्याचुन्या खांद्यांवर ही जबाबदारी टाकली आहे त्यात दोन खांदे माझेही आहेत. पण मी एकट्याने कितीही डोकेफोड केली तरी मला नाही जमणार हे नामकरण प्रकरण. म्हणून तमाम मायबोलीकरांची डोकी एकत्र येऊन काही सुयोग्य नावे सुचवतील या आशेने हात फैलावतोय.

इथे मोठमोठ्या ऑफिसात काम करणारे माबोकर आहेत. बरेच जणांच्या गाठी कित्येक ऑफिसांचे अनुभव असतील. कैक मीटींग्ज आणि कॉन्फरन्स ऊरकल्या असतील. त्यावरून अंदाज घेऊन एखादे नवे वा त्यापैकीच आवडलेली नावे सुचवा.

** दोन्ही कॉन्फरन्स रूमची, वा तिन्ही मीटींग रूम्सची नावे एखाद्या थीम मध्येच हवीत असे गरजेचे नाही.
** तसेच प्रत्येकी एक अशी पाच नावे सुचवा असेही नाही. कमी ही चालतील, जास्तही चालतील. सुटी सुटी, स्वतंत्र, जितकी सुचतील तितकी सुचवा.

** मुद्दामहून सांगण्यात आले नसले तरी ऑफिसच्या मंडळींना संस्कृतप्रचुर नावे नकोत तर बहुधा ईंग्लिश नावेच अपेक्षित आहेत.

प्लीज प्लीज प्लीज ... नावे सुचवा..
ज्यांना ईतरांची नावे आवडतील त्यांला प्लस १ करा ..
माझ्या कुठल्या जुन्यापुराण्या रुमाल धाग्याचा राग ईथे काढू नका..
जे नावे सुचवतील त्यांचेही देव भले करो, जे प्रयत्न करतील त्यांचेही देव भले करो..
तुम्हा सर्वांनाच ईन अ‍ॅडवान्स
कोपरापासून धन्यवाद,
ऋन्मेऽऽष

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बॉस / CEO / डिरेक्टर हे फार फार महत्वाचे

त्यांची आवड जाणून घ्या

जी खास आवड असेल तर त्यातील subtle ( मराठी शब्द सुचत नाही) शब्द सुचवा

जसे कि

गाड्या

अ साम्भाधित खास शब्द / मोडेल्स

GTO
SLK
GT50
GL
F50
V12
V8
W140
SS

ब Lamorgini ची मोडेल्स

Islero
Urraco
Countach
Jalpa
Diablo
Murciélago
Gallardo
Reventón
Aventador
Egoista
Huracán

ते ठर्की आणि चमडी / चामटया असतील तर प्रसिद्ध pornstars ची आडनावे

zemanova
jamson
givonani
leonne
akira
anderson
smith
Bitonni

first floor conference room, ground floor meeting room etc. अशी सोप्पी नावे का नको म्हणे?

पाच महासागरांची नावे आकाराप्रमाणे. Pacific, Atlantic (या मोठ्या कॉन्फरन्स रूम्स) Indian, Southern, Arctic (या मीटींग रूम्स).
किंवा सॉफ्टवेअर कंपनी असेल तर त्यात महत्वाची प्रणाली शोधणार्यांची नावे - Dennis Ritchie, Ken thompson, Bjarne Stroustroup, James Gosling,Christopher Alexander. यातलं पहिलं किंवा आडनाव घेऊ शकतो.

lux (symbol: lx) - unit of illuminance
watt (W) - unit of power
Joule (J) - unit of energy
Lambda (λ) - unit of volume
ohm (symbol: Ω) - unit of electrical resistance
degree Celsius (°C) - unit of measurement for temperature

Byte
KiloByte
MegaByte
GigaByte
TeraByte

आमच्या ऑफिसमधल्या कॉन्फरन्स रूमला तारामंडलांची नावे दिली आहेत…. Pyxis, Auriga etc . या लिंक वर बरीच नावे आहेत

https://en.wikipedia.org/wiki/Wikipedia:WikiProject_Constellations/Borde...

गंगा , गोदावरी , सिंधु , नर्मदा , कृष्णा या नद्यांची नावे द्या. हव असेल तर मिठी नदीच नाव द्या ऐखद्या पेशल मिटींग रुमला Wink
गडांची नाव द्या सिंहगड , रायगड , सज्जनगड , हरीष्चंद्रगड वगैरे
नक्षत्रांची नाव देऊ शकाल
mnc असली तरी भारतातल हापीस आहे तर भारतीय नाव देण्याचा प्रयत्न करा

Conference Room - 1) Vision 2) Master Plan

Meeting Room - 1) Aspire 2) Blue Print 3) Energy.

ग्रीक अल्फाबेट्स

  1. alpha
  2. beta
  3. gamma
  4. delta
  5. epsilon

माझ्या ऑफीस मधे संगितातील रागांची नावे दिली होती

  1. भैरवी
  2. मारवा
  3. पुर्वी
  4. आसावरी
  5. त्रिवेणी
  6. ऋतूं ची नावे

    1. वसन्त
    2. ग्रिष्म
    3. वर्षा
    4. शरद
    5. शिशीर

    Gemstone. precious or semi-precious stone

    diamond, ruby, sapphire, emerald, pearl , opal

आम्ही आमच्या लायकी नुसार नावे सुचवतो

कांफेरेंस रूम्स
वॉर रूम अल्फा
वॉर रूम ब्रावो

मीटिंग रूम्स

पिट स्टॉप १,२,३

तुमच्या कडे top चे management मराठी आहे का ???

तसेच ते बरेच hi fi असतील तर भारतीय आणि खास करून मराठी नावे आवडणार नाहीत

म्हणून या वेगळ्या themes आणि नावे

Star Wars Theme

Luke
Skywalker
Han
Solo
Leia
Obi - wan Kanobi
Yoda
Darth
Vadar
Dark Side

Jules Verne Theme

Nemo
Philius Fog
Auoda ( Awada)
Michael Ardan
Dr. Pierre Aronnax
Hans Bjelke

Tintin Theme

Tintin
Capt Haddock
Prof Calculas
Thomson and Thompson
Bianca Castafiore
Nestor

Astrix Theme

Asterix
Obelix
Dogmatix
Getafix
Cacofonix
Druid
Julius Caesar

If they are into Ganja / Marijuana

weed
block
grass
bud
Boo boo bama
Chocolate
Joint
Golden leaf
Kate Bust

इतिहासातल्या कर्तुत्त्ववान व्यक्तींची नाव चालतील का? जात, पात, प्रदेश, धर्म, वर्ण, असे सर्व भेद टाळुन अशी नाव देता येतील... एकेका क्षेत्रातील एकेक कर्तुत्त्ववान व्यक्ती अशी ६ क्षेत्र निवडा आणि त्यातल्या कर्तुत्त्ववान व्यक्तींची नाव द्या या रुम्सना.

फुलांची नावे देऊ शकता, जसे

१. Rose
२. Hibiscus
३. Aster
४. Daffodil
५. Daisy

हवेतील वेगवेगळ्या घटकांची नावे पण देऊ शकता
१. Argon
२.Oxygen
३. Krypton
४. Helium
५. Hydrogen

Based on theme of Luxury Car Manufacturers

  • Aston Martin
  • Audi
  • Bentley
  • BMW
  • Bugatti
  • Cadillac
  • Ferrari
  • Jaguar
  • Lamborghini
  • Land Rover
  • Lexus
  • Mercedes-Benz
  • Porsche
  • Rolls-Royce

Godric Gryffindor,
Helga Hufflepuff,
Rowena Ravenclaw

Salazar Slytherin.

black lake or forbidden forest

नंदिनी | 6 August, 2015 - 04:10 नवीन
0
Vote up!
Godric Gryffindor,
Helga Hufflepuff,
Rowena Ravenclaw
Salazar Slytherin.
black lake or forbidden forest>>>>>>>म्याडम, तुम्ही सुचवलेली नावं लक्षात ठेवायला लोकांना वेगळा पगार द्यावा लागेल.:-P Proud Proud Proud

नावे निवडताना ती सहज लक्षात राहतील व उच्चारता येतील हे पहा. नाहीतर मंडळी त्यांना पूर्वीच्याच नावाने हाक मारतील व त्याचा मूळ उद्देशच नाहीसा व्हायचा. तसेच तुमची नवी नावे वाक्यात उपयोगित करून कशी वाटताहेत तेही पहा.

काही नावे :
गांधी, मंडेला, तेरेसा, कलाम, सत्यार्थी, टागोर, इत्यादी
राकेश, कल्पना, सुनिता (भारतीय अंतराळवीर)

जर खोल्या वेगवेगळ्या दिशांना असतील तर सरळ दिशांचीच नावे देता येतील. लक्षात ठेवायची कटकट नको. Wink

GOLD
COPPER
SILVER
CARBON
SULFUR
MERCURY
ATOM

Jupiter
Saturn
Venus
Mercury
Mars
Neptune
Earth

सगळी नाव इंग्लीश मधे आहेत, चालतील का??

आज मेलबॉक्समध्ये येउन धडकलेला छोटासा पोपट,
आम्हा गिनेचुने लोकांवर ही जबाबदारी आहे या भ्रमाचा भोपळा फुटला आणि ही स्पर्धा म्हणून सर्वांसाठी खुली आहे, असा मेल येऊन टपकला.
तरी सुचवलेली नावे व्यर्थ जाणार नाहीत, पण आता मी यातील फक्त ५ नावेच निवडून स्पर्धेची एंट्री म्हणून देऊ शकतो, ईतकेच.
अन्यथा या धाग्याची प्रिंटच काढून मॅनेजमेंटच्या तोंडावर मारायचा विचार होता तो तेवढा बारगळला.

असो, नावे मात्र एवढी सही सही आणि प्रचंड प्रमाणात आली आहेत की आधी मलाच थोडा वेळ घ्यावा लागेल.. तो जरा घेतो..
अजून काही सुचले तर सुचवा, वेळ सोमवारपर्यंतची आहे.
माझे म्हणजे आपले नाव निवडले गेले तर बक्षीस सर्वांशी शेअर करेन Happy

आज मेलबॉक्समध्ये येउन धडकलेला छोटासा पोपट,
आम्हा गिनेचुने लोकांवर ही जबाबदारी आहे या भ्रमाचा भोपळा फुटला आणि ही स्पर्धा म्हणून सर्वांसाठी खुली आहे, असा मेल येऊन टपकला.

जर स्पर्धा आहे तर तू स्वतःच डोक वापरून ५ नाव ठरव ना
तू ह्या नावांमधली ५ नाव दिलीस आणि जर तू जिंकलास तर मॅनेजमेंट ला सांगणार आहेस का ? की ही नाव दुसऱ्यांनी सुचवली होती ,तुला स्वतःला सुचली नाहीत

स्पर्धेसाठी दुसऱ्यांची मदत घेण योग्य नाही Angry

जिंकलास तर श्रेय तू मिळवणार
आयत्या पीठावर रेघोट्या

आशूडी
तोवर ऋन्मेष तू फिल्टरींग सुरू कर म्हणजे कोणत्या प्रकारची नावं सुचवावी ते कळेल.
>>>
वाचली सारी नावे, शॉर्टलिस्ट करतोय माझ्या आवडीनुसार,
पण मला तर असे वाटतेय आता आपल्याला (मला) चांगली वाटतील आणि जी ठेवावीशी वाटतील ती त्यांना सुचवावीत, त्यांना ती रुचली नाही तर त्यांचे कमनशीब.

सामी, वर्षू नील,
आपण सुचवलेली sapphire, emerald ही नावे आधीच दुसर्‍या ब्रांचला आहेत, पण आपले विचार आमच्या मॆनेजमेंटशी जुळले तर Happy

जर तू जिंकलास तर मॅनेजमेंट ला सांगणार आहेस का की ही नाव दुसऱ्यांनी सुचवली होती , तू स्वतःला सुचली नाहीत
>>>>

हो सांगणार !

मला स्वताला लिहायची हौस आहे, मागे माझे काही लिहिलेले फेसबूकवर फिरताना दिसले तेव्हा मला स्वताला त्रास झालेला त्यामुळे मला स्वतालाही मुळीच नाही आवडणार कोणाचेही श्रेय घ्यायला. Happy

मला नाही वाटत तू सांगशील

कारण खर सांगितलस तर ऑफिसमध्ये लंच टाईम डिस्कशनला शायनिंग नाही ना मारता येणार

आणि आपण एखाद्या स्पर्धेत भाग घेतो तेव्हा जी कुठली स्पर्धा असेल ते काम स्वतः करायच असत

एवढ सगळ करण्यापेक्षा जर भाग घेण कम्पलसरी नसेल तर भाग घेऊ नकोस

मनरंग,
या वर माझे उत्तर आणि त्यावरची चर्चा एक स्वतंत्र धाग्याचा विषय होईल.
ज्यात एकंदरीतच मला स्पर्धा या विषयावर भाष्य करायला आवडेल.
मी राखून ठेवतो हा विषय, तुम्ही आपले मत ईथे मांडायचे की माझ्या त्या स्वतंत्र धाग्यात हा आपला चॉईस Happy

वा म्हणजे आता उत्तराचे सुद्धा स्वतंत्र धागे काढणार तू
पण नवा धागा चार दिवसानंतर काढ

तोपर्यंत तुलाही विचार करायला वेळ मिळेल शब्दांच जाळ विणायला
ज्यात फक्त तूच कसा बरोबर हे तू सिद्ध करणार

तुझे जेव्हढे आय डी आहेत त्यापैकीच् ५ निवड हा का ना का

On a serious note
धरणांची नावे सुचव.. meeting room मधल्या गोष्टी तिथेच रहाणे आणि धरणातलेपाणी..

नंदीनी, हॉगवर्ट्झ च्या चार हाउसेस बरोबर फॉरबिडन फॉरेस्ट? ये बात कुच हजम नही हुई.. त्या ऐवजी हॉरक्रक्सेस ची नावं ठेवावी Happy

बांधा
आवळा
हलवा
ढवळा
सोडा

अहो ही टीम बिल्डिंग एग्झरसाईझ मधल्या फेजेसची नावं आहेत Happy

बांधा = बिल्ड
आवळा = रीएनफोर्स
हलवा = मोटिवेट
ढवळा = सिंथेसाईझ
सोडा = डीलीवरन्स

ऊगीच भलते सलते अर्थ लावू नका. Wink

नंदीनी, हॉगवर्ट्झ च्या चार हाउसेस बरोबर फॉरबिडन फॉरेस्ट? ये बात कुच हजम नही हुई.. त्या ऐवजी हॉरक्रक्सेस ची नावं ठेवावी >>

ग्रेट हॉल
चेंबर ऑफ सिक्रेट्स
फॉर्बिडन फॉरेस्ट
रूम ऑफ रिक्वायरमेंट्स
श्रेकिंग शॅक
डंजन हॉल
बोट हाऊस
अ‍ॅस्ट्रोनॉमी टॉवर

आणि भिंतीवर मॉरॉडर्स मॅप लावा रूम्स चे लोकेशन्स दाखवण्यासाठी

हायझेनबर्ग, एकदम झकास.

मीटींग रूम ला ग्रेट हॉल, चेंबर ओफ सीक्रेट्स, रूम ऑफ रिक्वायरमेंट्स आणि फॉर्बिडन फॉरेस्ट.. ही नावं ठेवायला विनोदबुद्धीच हवी Happy

बघ रे बाबा ऋन्मेश, चार दिवस धागा काढणार नाही म्हणालास तर किती लोकांनी प्रतिसाद दिले तुला. बघ जरा "लोकभावनेचा" विचार कर Wink

हायझेनबर्ग.. टीम बिल्डींग Lol

चौकट राजानू उगाच लोकांना परत परत त्याची आठवण करून देऊ नका ना Sad
पण खरेच अपेक्षा फाडून प्रतिसाद आलेत.. म्हणून तो शब्द पाळेनच .. Happy

बाकी मला नाही वाटत हे आमच्या ऑफिसवाले विनोदबुद्धी दाखवत नावे ठेवतील .. मला ऑफिसमध्ये ठेवलाय तेच त्यांचे विनोदबुद्धीचे लिमिट आहे बस्स

ऑशवित्झ
बर्कनॉव
बेल्झेक
बर्जेन-बेल्सेन
ट्रेबलिंका
डाचाऊ
फ्लॉसेनबर्ग
कैसरवर्ल्ड

(या सर्व नावांमध्ये तिथे काय झालं याचं उदात्तीकरण करण्याचा हेतू नाही. पण मिटींगांमध्ये जे काही चालतं ते इथे झालेल्या सर्व प्रकारांसारखंच असतं असं माझं मत).

माझ्या जुन्या ऑफिसमध्ये अ‍ॅटलांटाच्या जवळच्या प्रसिद्ध ठिकाणांची नावं होती, जसं की सेंटेनियल, स्टोन माउंटन, लिनियर वगैरे. आताच्या ऑफिसमध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची नावं आहेत, केनडी, जॉन्सन, मॅडीसन, अ‍ॅडम्स, लिंकन, आयजनहावर, क्लिव्हलंड वगैरे.

काही जणांना इतर देशांमधल्या गोष्टींची नावं आवडत असतील, पण आपल्याकडेही नावांची रेलचेल आहे की! वर काही जणांनी लिहिल्याप्रमाणे नद्या, पर्वत, थोर व्यक्ती, ऋतुंची नावं, राग, गावं, प्रसिद्ध ठिकाणं वगैरे. किंवा वैश्विक गोष्टींची नावं ग्रह, तारे, गॅलेक्सीज वगैरे, किंवा धातू, महासागर, खंड वगैरे वगैरे....

१०० !
माबोकर मदतीला उतरतात तेव्हाही शतक मारून देतात .. ते देखील २४ तासांच्या आत, कोणतीही अवांतर पोस्ट न टाकता Happy

धन्यवाद आणि शुभरात्री Happy

Pages