प्लीज प्लीज नावे सुचवा ! २ कॉन्फरन्स रूम आणि ३ मीटींग रूम !

Submitted by ऋन्मेऽऽष on 5 August, 2015 - 15:02

प्लीज प्लीज मदत करा. ईज्जतचा सवाल आहे.
हवे तर चार दिवस ईतर कोणता धागा काढत नाही, पण या चार दिवसांत मला एवढी मदत करा.

आमच्या ऑफिसमध्ये दोन कॉन्फरन्स रूम आणि तीन मीटींग रूम्स आहेत. त्यांच्यासाठी नावे सुचवा.

आजवर या खोल्या पहिल्या माळ्यावरची, ग्राऊंड फ्लोअरवरची, मोठ्या कॅंटीनच्या शेजारची, छोट्या टॉयलेट जवळची वगैरे वगैरे नावांनी पुकारल्या जात होत्या. मात्र आता त्यांना नावे द्यायची आहेत.

ज्या गिन्याचुन्या खांद्यांवर ही जबाबदारी टाकली आहे त्यात दोन खांदे माझेही आहेत. पण मी एकट्याने कितीही डोकेफोड केली तरी मला नाही जमणार हे नामकरण प्रकरण. म्हणून तमाम मायबोलीकरांची डोकी एकत्र येऊन काही सुयोग्य नावे सुचवतील या आशेने हात फैलावतोय.

इथे मोठमोठ्या ऑफिसात काम करणारे माबोकर आहेत. बरेच जणांच्या गाठी कित्येक ऑफिसांचे अनुभव असतील. कैक मीटींग्ज आणि कॉन्फरन्स ऊरकल्या असतील. त्यावरून अंदाज घेऊन एखादे नवे वा त्यापैकीच आवडलेली नावे सुचवा.

** दोन्ही कॉन्फरन्स रूमची, वा तिन्ही मीटींग रूम्सची नावे एखाद्या थीम मध्येच हवीत असे गरजेचे नाही.
** तसेच प्रत्येकी एक अशी पाच नावे सुचवा असेही नाही. कमी ही चालतील, जास्तही चालतील. सुटी सुटी, स्वतंत्र, जितकी सुचतील तितकी सुचवा.

** मुद्दामहून सांगण्यात आले नसले तरी ऑफिसच्या मंडळींना संस्कृतप्रचुर नावे नकोत तर बहुधा ईंग्लिश नावेच अपेक्षित आहेत.

प्लीज प्लीज प्लीज ... नावे सुचवा..
ज्यांना ईतरांची नावे आवडतील त्यांला प्लस १ करा ..
माझ्या कुठल्या जुन्यापुराण्या रुमाल धाग्याचा राग ईथे काढू नका..
जे नावे सुचवतील त्यांचेही देव भले करो, जे प्रयत्न करतील त्यांचेही देव भले करो..
तुम्हा सर्वांनाच ईन अ‍ॅडवान्स
कोपरापासून धन्यवाद,
ऋन्मेऽऽष

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Cyan
Magenta
Yellow
Black
White

or

Pacific
Atlantic
Indian
Antarctic
Arctic

or

Cricket
Soccer
Rugby
Baseball
Golf

Wink Wink Wink

आमच्याकडे वॉर रूम ला वज्र आणि ट्रेनिंग रूमला तक्षशीला.अशी नाव आहेत.
इतर रूम्सस ची नावे
दिशा, ल्क्ष,
रामनुजम, बोस
आर्यभट्ट, कौटिल्य
भारद्वाज, वाल्मिकी
न्युटन आइनस्टाइन
नाइल, अ‍ॅमेझॉन
बनायन, अ‍ॅकाशिया

Happy

आमच्याकडे फुलांची नावं आहेत.
पेटुनिया, रोझ, सनफ्लावर, मॅरीगोल्ड, अ‍ॅस्टर, अ‍ॅम्ब्रोशिया, ऑर्किड, जर्बेरा, कार्नेशन, गार्डेनिया & सो ऑन.... अशीही ठेवता येतील नावं.

आमच्या कडे एका मीटीन्ग रूममध्ये एसी जरा जास्तच आहे . थंडी फार वाजते तिथे .
तिच अनौपचारीक नाव अलास्का आहे .

बाकी अथेना , सफायर ई. ई.

आमच्याकडे आमच्या कंपनीच्या पहिल्या चेअरमनचे नाव व पुढे नं. १,२,३.... अशी नावे आहेत.

हॉटेल्सच्या रूम्सना जशी नावे असतात लेक व्ह्यू, रिवर साइड व्ह्यू तसेही करता येईल. कोणत्या रूममधून कसला व्ह्यू दिसतो आहे त्यानुसार, उदा. रोड व्ह्यू, गार्डन व्ह्यू इ.

काही नावं आणखी ( या नावांचे कुठे साधर्म्य आढळल्यास निव्वळ योगायोग समजण्यात यावा)

१. खंबीर समीक्षक
२. फलकधारी
३. फ्रीसाधक
४. पातक
आणि टॉयलेटजवळच्या रुमसाठी
बेफिकीर

सर्वांना धन्यवाद,
मी येथीलच ५ निवडक नावांचा आज मेल टाकला.
कोणती ते ईथे तुर्तास सांगू का नको या विचारात आहे.
पण जी एकंदर परिस्थितीचा अंदाज घेत मला योग्य वाटली ती दिली.
निकाल काय कधी तुर्तास काही कल्पना नाही, पण जेव्हा लागेन तेव्हा तो ईथे देईनच.

अरेरे मी हा धागा उशीरा वाचला

मला चेतन भगत पुस्तकांची नावे सुचवायची होती!

१. Five Point Someone
२. One Night @ the Call Center
३. The 3 Mistakes of My Life
४. 2 States
५. Half Girlfriend

हा हा हा हा !

हा हा वा वा आणि काय योगायोग पहा ..
आताच मेल येऊन धडकलाय ..
मी येथील ४ व स्वताचे एक असे ५ नावे सुचवलेली त्यातील एकही नाही ठेवले मेल्यांनी ..
कदाचित मी येथील नावे शॉर्टलिस्ट करतानाही गंडलो असेल हा माझा दोष

जरा हाच न्याय स्वजो, सता, शाखा ला लावुन बघावा अशी "अखिल माबो-स्वजो-सता-शाखा- रोरो-तेते-धापा-त्रस्त मंडळा " कडुन अतिनम्र सादर विनंती.

Pages