अमेरिकेतल्या निवडणुका - २०१६

Submitted by maitreyee on 5 August, 2015 - 11:41

अमेरिकेच्या निवडणुका जवळ आल्यात !! २०१६ च्या रेस मधे रंग भरू लागलेत !! त्यावर चर्चा करायला हा धागा:

डेमोक्रॅटिक पक्षातर्फे मुख्य उमेदवार म्हणजे नारी शक्तीची एकमेव प्रतिनिधी हिलरी !! Happy बाकी बर्नी सँडर्स आणि सध्याचे व्हाइस प्रेसिडेन्ट जो बायडन (कदाचित) ही चर्चेत असलेली नावं.
रिपब्लिकन्स मधे मात्र डझनावारी उमेदवार बाशिंग बांधून उभे आहेत !! टॉपची चर्चेतील नावं - फ्लोरिडा चे एक्स गवर्नर आणि थोरल्या प्रेसिडेन्ट बुश यांचे धाकटे पुत्र जेब बुश, फ्लोरिडाचेच सिनेटर मार्को रुबिओ ,न्यू जर्सी गवर्नर क्रिस क्रिस्टी, सिनेटर्स रँड पॉल आणि टेड क्रुज, आणि लास्ट बट डेफिनेटली नॉट द लीस्ट - बिलिनेयर बिझ्नेसमन आणि अचाट वक्तव्यांसाठी आणि तेवढ्याच अचाट हेअरस्टाइलसाठी प्रसिद्ध डोनाल्ड ट्रम्प!!

एकूण पुढचे काही महिने मज्जाच मज्जा येणार !! Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>जे काही मत आहे ते छक्केपंजे न करता रोखठोक मांडणे हे दोघांच्या बाबतीत लागू आहे. <<

हे सगळं ठिक आहे हो. पण बर्नीकाकांची डेमक्रॅटिक सोश्यलिझम ची मतं तुम्हाला पटतात का? छोट्या देशात एकवेळ चालेल पण अमेरिकेसारख्या विशाल देशाला त्यांची धोरणं लागु होतील का? ते सगळं ऐकायला छान-छान वाटतं पण राबवायला खुप कठीण आहे...

ते सगळं ऐकायला छान-छान वाटतं पण राबवायला खुप कठीण आहे... >> बर्नी काका नि ट्रंप दोघांबाबत हे तेव्हढेच सत्य आहे. problem दाखवणे नि ते मी फिक्स करीन हे म्हणणे ते फिक्स कसे करायचे हे सांगण्यापेक्षा सोपे असते. (बर्नीकाकांनी जे काही प्रस्ताव दिले आहेत ते सद्य परिस्थितीमधे - GOP dominated congress मधे होणे शक्यच नाही)

तसेच रोखठोक बोलणे नि आक्रस्ताळे बोलणे ह्यात फार फरक आहे. ट्रंप हे सीमारेषा कधीच पार करून पुढे गेलेला आहे.

>>तसेच रोखठोक बोलणे नि आक्रस्ताळे बोलणे ह्यात फार फरक आहे. ट्रंप हे सीमारेषा कधीच पार करून पुढे गेलेला आहे
<<

कुठल्या आक्रस्ताळेपणाबद्दल बोलत आहात ह्याचा खुलासा केल्यास मी त्याचा प्रतिवाद करेन.
मला ट्रंपचे कुठलेही विधान आक्रस्ताळे वाटलेले नाही. मुख्यत: प्रसिद्धी माध्यमांनी त्याचा विपर्यास करून त्याच्यावर राळ उडवली आहे.

>>
हे सगळं ठिक आहे हो. पण बर्नीकाकांची डेमक्रॅटिक सोश्यलिझम ची मतं तुम्हाला पटतात का? छोट्या देशात एकवेळ चालेल पण अमेरिकेसारख्या विशाल देशाला त्यांची धोरणं लागु होतील का? ते सगळं ऐकायला छान-छान वाटतं पण राबवायला खुप कठीण आहे...
<<
असेल. पण काही बाबतीत अमेरिकेला डावीकडे वळवणे आवश्यक आहे. शस्त्रास्त्रे बनवणारे उद्योग, औषधे बनवणारे उद्योग, शेअर बाजारात उलाढाली करणारे उद्योग असल्या लोकांच्या ताटाखालचे मांजर असणारी सरकारे किती दिवस सहन करायची?

कुठल्या आक्रस्ताळेपणाबद्दल बोलत आहात ह्याचा खुलासा केल्यास मी त्याचा प्रतिवाद करेन. मला ट्रंपचे कुठलेही विधान आक्रस्ताळे वाटलेले नाही. >> तो तुमचा चॉइस आहे. त्याची एकंदर इस्लाम नि मेक्सिकनबद्दलची मते मला आक्रस्ताळी वाटतात, फक्त मतदारांचे लांगुलचालन करण्यासाठी हायपर केलेली. त्याला स्वतःलाही 'हे शक्य नाही' हे माहित असताना फक्त मते मिळवण्यासाठी केलेली.

एकीकडे भारतीय (व अन्य परदेशी) लोकांना एच वन वा ग्रीन कार्डसाठी पाच दहा वर्षे ताटकळत ठेवायचे आणि दुसरीकडे मेक्सिकन लोकांच्या बेकायदा घुसखोरीकडे दुर्लक्ष तर करायचेच शिवाय त्यांना नागरिक बनवण्याकरता प्रयत्न करायचे हा दुटप्पीपणा आहे.
ट्रंपचे विधान हे बेकायदा घुसखोरांबद्दल होते. नियम पाळून केलेल्या स्थलांतराबाबत नव्हते.

मुस्लिम लोकांवर बंदी घालणे. सॅन बर्नार्डिनोच्या कत्तलीनंतर जेव्हा असे लक्षात आले की त्या दोघांतली ती मोहतरमा आपली अतिरेकी, दहशतवादी पार्श्वभूमी उघड असतानाही अमेरिकन व्हिसा मिळवू शकली तेव्हा ट्रंपने असे म्हटले की हा ढिसाळपणा बंद होईपर्यंत मुस्लिम लोकांना देशात येऊ देऊ नका. (अन्टिल यू फिगर आऊट व्हॉट द हेल इस गोईंग ऑन, डोंट गिव्ह विसाज टू मुस्लिम्स). हे विधान अतिरंजीत वा आक्रस्ताळे वाटले तरी अनेक अमेरिकन लोकांची ही भावना होती. अब्जावधी डॉलर सुरक्षेकरता खर्च होत असताना ढळढळीत अतिरेकी असणारी बाई व्हिसा का मिळवू शकली ह्याचे उत्तर द्यायला अमेरिकेचे परराष्ट्र खाते व संरक्षण खाते बांधिल आहे की नाही? मुस्लिम लोकांवर अमेरिकेत यायला कायमची बंदी असावी असे मत ट्रंपने कधीही मांडलेले नाही. तसा विपर्यास माध्यमांकडून केला गेला आहे.

जाता जाता: जेव्हा जेव्हा मुस्लिम अतिरेकी विविध दहशतवादी कार्यक्रम पार पाडतात तेव्हा ते घडवून आणणारे हे मुस्लिम नाहीतच असे ओबामा जेव्हा ठासून सांगतो तेव्हा मला ते जास्त आक्रस्ताळेपणाचे वाटते.

>>तुम्ही फक्त सोयीस्कर एक दोन वाक्ये उचलत आहात असे तुम्हाला वाटत नाहि<<
हा हा; हेच तर म्हणतेय ट्रंप कॅंपेन त्यांच्या विरोधकांबाबत... Proud

हाच बचाव प्रत्येक भाषणानंतर करावा लागतोय हीच तरी सडेतोडपणाची मजा आहे Wink शिवाय त्याशिवाय दुसरे काही बोलायला नाहि हा भाग अलहिदा.

असामीशी सहमत आहे बर्^यापैकी. हिलरी आधी बरी वाटली होती पण आता बर्नी आजोबा बरे का असं वाटतंय? आज डिबेट पुन्हा दाखवणार आहेत ते रेकॉर्डला लावलंय. होपफुली पाहायला मिळेल. काल लेट लावलं आणि नंतर नीट पाहिलं गेलं नाही.

हिलेरीच्या ईमेल प्रकरण का चर्चेत येत नाही ? बर्नी त्या मुद्द्यावर बोलतच नाही, का तो योग्य वेळेची वाट पहातो आहे?

Hard hitter Trump made my day though Happy
http://www.salon.com/2016/02/05/donald_trumps_iran_idiocy_the_interview_...
nded_his_candidacy_once_and_for_all/

कुठल्याही पॉलीसीबद्दल एखाद दुसरा पॅराग्राफ (I'm being generous here) वगळता माहित नसण्याचे त्याचे कौशल्य अफाट आहे.

>>तुम्ही त्याची फक्त सोयीस्कर एक दोन वाक्ये उचलत आहात (सगळा context वगळून) असे तुम्हाला वाटत नाहि ?
<<
मी ट्रंपची सगळ्यात वादग्रस्त समजली जाणारी वक्तव्ये उद्धृत केली.
आपणास त्यामागचा पूर्ण संदर्भ माहित असल्यास तो जरूर कळवा. आपणास सोयीची काही वाक्ये ससंदर्भ उद्धृत केलीत तर कदाचित जास्त बरे होईल.

शेंडेनक्षत्र, आपण इथेच थांबूया. तुम्ही मला किंवा मी तुम्हाला कन्विंस करण्यात काहीच अर्थ नाही.

कालच्या बिल मार (Bill Maher) च्या कार्यक्रमात एक पाहुणाही असेच म्हणाला की त्याला बरेच लोक माहित आहेत ज्यांना बर्नी आणि ट्रंप हे दोनच उमेदवार आवडले आहेत. त्यावर बिल म्हणाला की त्यात आश्चर्य नाही. दोघेही अस्सल (authentic) आहेत. बिल हा उघड उघड बर्नी समर्थक आणि ट्रंप निंदक आहे. तोही असे म्हणून गेला हे विशेष दखल घेण्याजोगे आहे.

बिल मारशी सहमत.

ट्रंपचा काहि हिडन अजेंडा आहे/असेल याची मला तरी कल्पना नाहि बिकाॅज आॅल आय नो इज हिज मिडिया श्टिक. बट आय नो हि विल बी फार बेटर प्रेसिडेंट दॅन क्लिंटन आॅर सॅंडर्स इन नाॅट रेझिंग टॅक्सेस ॲंड नाॅट इंक्रिजिंग द रोल आॅफ गवर्नमेंट इन अवर डे-टु-डे लाइफ. ॲंड आय वुड मच रादर हॅव हिम टेक आॅन पुटिन, इराण, चायना, नाॅर्थ कोरिया दॅन क्लिंटन/सॅंडर्स बिकाॅज हि इज श्रुड, ॲंड ए डॅम गुड/टफ निगोशिएटर एनि गिवन विकडे ॲंड ट्वाइस आॅन संडे...

पॉलिटिको ची यावेळची कार्टून्स. या लिन्क वरच्या कार्टून च्या आधीसुद्धा आहेत पण या लिन्क वरून उजवीकडचे क्रमाने बघा. धमाल आहेत
http://www.politico.com/gallery/2016/02/the-nations-cartoonists-on-the-w...

शेवटचा कार्सन चा सेव्हन ड्वार्फस चा संदर्भ वाचून तर मेलो हसून.

कालच्या डिबेटमधे दोन तीन गोष्टी नोंद घेण्याजोग्या होत्या.
१. रुबियो घोकून पाठ केलेली वाक्ये तीन चार वेळा पुन्हा पुन्हा म्हणत होता. "ओबामाला आपण काय करत आहोत ते कळत नाही असे नाही तर त्याला ते व्यवस्थित कळते आहे". ख्रिस्तीने त्याला त्याबद्दल हटकले.

२. वॉटर बोर्डिंग हा एक वादग्रस्त अत्याचाराचा प्रकार आहे (त्याला "तीव्रपणे केलेली विचारपूस" एन्हान्स्ड इंटरोगेशन असेही गोंडस नाव दिले जाते). दहशतवादात अडकलेल्या लोकांवर हा वापरला जावा का? राष्ट्राध्यक्ष म्हणून तुम्ही त्याचे समर्थन कराल का? असा प्रश्न होता. टेड क्रुझ अगदी मोजून मापून उत्तर देत होता. हो आणि नाही अशी दोन्ही उत्तरे देण्याची कसरत चालू होती. ट्रंपचे उत्तर रोखठोक. आयसिसचे लोक प्रचंड अत्याचार करतात. त्याला तोंड द्यायला वॉटर बोर्डिंगच काय त्याच्याही पुढे जायला मी तयार आहे!

३. एमिनंट डोमेन अर्थात एखादी खाजगी जमीन सक्तीने सरकारला विकत घेता घेण्याचा हक्क ह्याबद्दल ट्रंपबाबांची थोडी पंचाईत झाली. त्याच्या कुठल्याशा द्यूतावासाकरता (कॅसिनो) जागा हवी होती ती हा कायदा वापरून घेण्यात आली असा त्याच्यावर आरोप झाला. त्याने ह्या कायद्याचे समर्थन करणारे मुद्दे मांडले आणि लगेचच हा आरोप झाल्यामुळे तो तोंडघशी पडला.

४. ट्रंपसाहेबांनी लहान मुलांसारखे नाकावर बोट ठेवून "शू!" म्हणून बुशला गप्प रहायला सांगितले त्यावर तमासगीर लोकांनी त्याची बरीच हुर्यो उडवली!

नं २ बद्दल. आज सकाळी ट्रंप ला Meet the press मधे ह्याबद्दल विचारल्यावर तो म्हणाला कि आयसीस हे बारबारीयन्स आहेत. अजूनही मिडिव्हियल आहेत. म्हणून तो वॉटर बोर्डिंगच काय त्याच्याही पुढे जायला मी तयार आहे. म्हणजे अमेरिकेने पण आयसीस सारखेच बारबारीयन्स व्हायचे का ? ह्याचे उत्तर त्याने ठाम होकारार्थी दिले. 'वॉटर बोर्डिंगच काय त्याच्याही पुढे' म्हणजे 'नक्की काय करणार ?' ह्याचे उत्तर अर्थातच त्याला देता आले नाही. तिथे रुबियोसारखेच I am going to make America Great हे सत्यवचन उद्धरून धन्यवाद सांगितले.

नं. ४ बद्दल बुशसारख्या 'ज्याला कोणी ही घाबरत नाही' अशा व्यक्तीला बुली करायची वेळ ट्रंपवर यावी ह्यासारखे करूण द्रुष्य नसावे. त्यापेक्षा बू करणार्‍या लोकांना दिलेले उत्तर कमीत कमी चांगले चपखल होते. 'आपल्याविरुद्ध बोलणारा प्रत्येक जण हा कुठल्या ना कुठल्या तरी conspiracy group चा भाग आहे' हे लक्षण कसले आहे हे उघड आहे. RNC ने कालच्या प्रेक्षक वर्गामधे १०% डोनर होते हे जाहीर केले आहे.

>>शेंडेनक्षत्र, आपण इथेच थांबूया. तुम्ही मला किंवा मी तुम्हाला कन्विंस करण्यात काहीच अर्थ नाही<<

चर्चा झालीच पाहिजे... Lol

काल क्रिस्टि वाज आॅन फायर, रुबियोचा पार धुव्वा उडवला.

काल कोणि एसेनेल बघितलं का?

SNL पाहिले. बर्नीबाबाच्या स्किट मधे फार मजा आली नाही.

चर्चा झालीच पाहिजे. >> राज, be my guest, तुम्ही करा चर्चा शें.न. शी Wink

Live Free or Die ह्या स्लोगनला अनुसरून granite state ने अनुक्रमे बर्नी नि ट्रंपला बहुमत दिले आहे. हपो is having field day with headlines. Bit on excessive side though.

हपो is having field day with headlines. Bit of excessive side though. >> Lol अगदी बरोबर आहे !!

सँडर्स सुपर ट्युसडे वर लक्ष देणार म्हणतोय पण सध्या तरी आमच्या राज्यात हिलरी वरचढ आहे. पण २३% अनडिसायडेड आहेत आणि पहिल्यांदाच डेम्स त्यांची प्रायमरी इंडीपेंडंट्स करता ओपन करत आहेत.

>>
Live Free or Die ह्या स्लोगनला अनुसरून granite state ने अनुक्रमे बर्नी नि ट्रंपला बहुमत दिले आहे
<<

कफल्लक असाल तर हा अनुक्रम ठीक आहे मात्र खिशात पैसे असतील तर तो अनुक्रम उलटा करावा!

अनुक्रम उलटा करावा >> हो ट्रंप आला तर शेवटी त्याच्या अगणित projects सारखेच सगळे free होऊन die होण्याचीच वेळ येईल Wink

>>हो ट्रंप आला तर शेवटी त्याच्या अगणित projects सारखेच सगळे free होऊन die होण्याचीच वेळ येईल<<

हो हो, बरोबर. सगळ्या फ्रीलोडर्सचे नक्कीच वांदे होतील... Wink

फ्रीलोडर्सचे >> ही बातमी NH मधे कळवली असती तर बरे झाले असते, तिथे freeloaders वरून बारीच रामायणे झाली आहेत.

Pages