कु. कुंजलतिका तनमुडपे यांचे ‘आवळा: कृती व विचार’ हे पाककृतींपलिकडे जाऊन जेवणानुभूतीबरोबरच जीवनानुभूती देणारे खास नवगृहिणींसाठीचे पुस्तक लवकरच बाजारात येत आहे. ‘खल व बत्ते’ हे त्यांचे वायव्य महाराष्ट्रात प्रचंड खळबळ उडवून दिलेले पुस्तक वाचकांच्या ओळखीचे आहेच.
दोन्ही पुस्तके घेतल्यास २५% टक्के सवलत तसेच आवळकाठीचे एक पाकिट (लहान साईज) मोफत मिळेल.
सर्वत्र उत्सुकता निर्माण करणा-या ह्याच पुस्तकातील एक कृती खास तुमच्यासाठी.
मिठातले आवळे
साहित्य:
५० ग्राम काजू (नसल्यास भाजलेले शेंगदाणे चालतील)
८ ते १० आवळे. (१० ते ८ ही चालतील. तुम्ही कुठून बघताय त्यावर आहे)
मीठ (आयोडिनयुक्त असल्यास उत्तम. शक्यतो चवीला खारट असावे व दिसायला कतरीना कैफ च्या रंगाहून थोडे कमी उजळ असावे)
एक आकर्षक बाऊल (हा नसला तरी चालेल पण काहीही सर्व्ह करताना हा कृतीच्या शेवटच्या ओळीत सवयीने लागतोच तेव्हा हाताशी असलेला बरा असतो)
एक चमचा (पाहुण्यांना चिवडा देताना वापरतात तसा लहान आकाराचा असावा)
एक स्मार्ट मोबाईल (आवळ्यांच्या विविध अवस्थांचे तरंगते फोटो फेसबुकवर टाकायला)
कृती:
प्रथम दोन तीन काजू तोंडात टाकावेत. त्याने चित्तवृत्ती उल्हसित होतात आणि पाककृती करायला शारीरिक व मानसिक बळ मिळते.
काजू नीट खावून झाल्याची खात्री झाल्यावर बरणी समोर घ्यावी. त्यात बेताबेताने फिल्टर केलेले पाणी साधारण गळ्यापर्यंत येईल असे घालावे. मुंबईत काही विशिष्ट भागांत रहात असाल तर नळाचे पाणी घेऊ नये कारण पाण्याच्या रंगामुळे त्यात तरंगणारे आवळे दिसणार नाहीत.
टीप: बरणी नीट स्वच्छ असावी. त्यात आधी भरलेल्या कडधान्याचे वगैरे दाणे शिल्लक राहिले तर पाण्यामुळे मोड येऊन आवळ्यांची चव बदलू शकते. विशेषत: नवगृहिणींनी असा अनावस्था प्रसंग टाळावा.
आता मोबाईलने बरणी, आतले पाणी तसेच फिल्टर, किचन प्लॅटफॉर्म, टाईल्स, मायक्रोवेव्ह इत्यादी गोष्टींचे विविध कोनात फोटो काढावेत. फोकस, उजेड, क्लॅरिटी अशा फालतू गोष्टींमुळे कुठलाही फोटो बाद न ठरवता ते सर्वच्या सर्व फोटो फेसबुकवर पोस्ट करावेत. शिवाय खाली ‘आज वेळ होता म्हटलं मिठातले आवळे करावे’ अशी कॉमेंट टाकावी.
थोडा वेळ थांबून साधारण पहिला ‘लाइक’ आल्यावर सेलिब्रेट करायला अजून दोन-तीन काजू तोंडात टाकावे. मग आवळ्यांकडे वळावे. आवळे आठ ते दहा आहेत ना ते मोजून एकेक करुन बरणीच्या पाण्यात गरम तेलात लाटलेली पुरी सोडतात तसे सोडावे (तिखटमिठाच्या पु-यांची कृती ‘खल व बत्ते’ मधे पान नं. ६७ वर पहा)
मग चमचा चमचा मीठ सावकाश घालावे. मध्यम आकाराच्या आवळ्याला एक सपाट चमचा असे प्रमाण असावे. त्याच चमच्याने सावकाश ढवळून मिश्रण एकजीव करावे.
टीप: तो ढवळलेला चमचा पुन्हा मिठाच्या बरणीत खूपसू नये.
आता मघाचच्या फेसबुक पोस्टचे लाईक्स चेक करावेत. साधारण पंचेचाळीस लाईक झाले की मग पुन्हा एकदा पाणी ढवळून मिठासकटच्या पाण्याचे फोटो काढून फेसबुकवर पोस्ट करावेत. पुढची पंधरा मिनिटे ‘अगं आत्ता ग कुठे मिळाले आवळे?’, ‘छानच. पण प्रमाण तर सांगशील? किती चमचे पाणी घ्यायचे?’, ‘आता खातानाही टाका सगळ्यांचे फोटो’, ‘ए आवळ्यांवरून आठवले, रणवीर काय क्यूट दिसतो ना बाजीराव मधे’ अशासारख्या कॉमेंट्सना रिप्लाय द्यावेत.
ह्यानंतर पाच मिनिटे श्रमपरिहार करावा व अजून दोन-तीन काजू खावेत.
तरंगणा-या आवळ्यांचे फोटो काढून पोस्टावेत. काही वेळ आवळ्यांचे निरीक्षण करावे. सर्व आलबेल असल्याची खात्री करुन मग पोस्ट चेक करावे. ‘काय गोड कलर आहे गं. आम्ही कालच अश्याच रंगाचा फ्रिज घेतला. नव-याला वाईन कलरचा हवा होता पण मी दुर्लक्ष केले’ अशासारख्या कॉमेंट्स ना गोडगोड रिप्लाय द्यावेत.
टीप: आधी मीठ पाण्यात मिसळून मग आवळे टाकले तर चालणार नाही का? असा एक कॉमन आणि काहीसा आगाऊ प्रश्न मला विचारण्यात येतो. ही एक घातक प्रथा नवविवाहितेंमधे पडते आहे. अंतिम परिस्थिती साधारण तशीच असली (म्हणजे मॅरीड विथ वन किड) तरी लग्न व बारसे त्याच क्रमाने करतात हे इथे लक्षात ठेवावे.
मघाशी काढलेला आकर्षक बाऊल फोटो काढून पुन्हा कपाटात ठेवून द्यावा. आता ‘झाले तुमचे मिठाचे आवळे!’ असे कदाचित तुम्हाला वाटेल पण मध्यम आकाराच्या ८ ते १० आवळ्यांसाठी साधारण २ ते ३ मध्यम आकाराचे दिवस जाऊ द्यावेत. असे दिवस गेल्यावर आवळे चांगले लागतात हा सार्वत्रिक अनुभव आहे!
दर तासाने मिठातल्या आवळ्यांचे फोटो काढावेत व फेसबुकावर पोस्ट करावेत. मीठ थेट बरणीत न टाकता वाटीत काढून घेतले असेल तर उरलेले मीठ वापरून बाकीचे खारे काजू करावेत.
मग, आवडली ना मैत्रिणींनो ही सोप्पी पाककृती? ह्या पाककृतीला फार डोके लागत नसल्याने नव-यालाही शिकवायला हरकत नाही!
हाहा खूप भारी. धमाल आहे. परत
हाहा खूप भारी. धमाल आहे.
परत एकदा वाचताना मज्जा.
वेलकम बॅक राफा.
राफा इज बॅक.
राफा इज बॅक.
भारीच
भारीच
वेलकम बॅक!
वेलकम बॅक!
मस्त मस्त मस्त
मस्त मस्त मस्त
राफा इज बॅक.>>>>>११११
राफा इज बॅक.>>>>>११११
अॅन्ड हियर कम्स "द" राफ्फा!
अॅन्ड हियर कम्स "द" राफ्फा!

राफ्फा टच
राफ्फा टच
(No subject)
(No subject)
भन्नाट. अति'च'शय आवडली पाकृ
भन्नाट. अति'च'शय आवडली पाकृ
गळ्यापर्यंत येईल असे घालावे>>>
:अशोकसराफ मोड ऑनः
कोणाच्या? हां बरणीच्या गळ्यापर्यंत! मग ठीके.. मला वाटलं...
:अशोकसराफ मोड ऑफः
भ न्ना ट! वेल्कम ब्याक राफा!!
(No subject)
.. एक नंबर..
:P.. एक नंबर..
असे दिवस गेल्यावर आवळे चांगले
असे दिवस गेल्यावर आवळे चांगले लागतात हा सार्वत्रिक अनुभव आहे! <<<



राफ्या, सुस्वागतम्
BTW, तुला भरपूर काजू लागणार.. आधीच घेऊन ठेव..
राफा टच!! अतिचशय ब्येश्ट
राफा टच!! अतिचशय ब्येश्ट आहे..
शिर्षक वाचुनच तोंडाला पाणि
शिर्षक वाचुनच तोंडाला पाणि सुटले
(No subject)
सुबह बन गई कु. कुंजलतिका
सुबह बन गई
कु. कुंजलतिका तनमुडपे>> धम्माल लिहिलंयस!
(No subject)
ओह.. हसून हसून मेले...
ओह.. हसून हसून मेले... शब्दनशब्द भार्री..:
टिप्स तर खतरनाक आहेत एकेक... टू गुड!!!!!!!!!!
त्यात बेताबेताने फिल्टर
त्यात बेताबेताने फिल्टर केलेले पाणी साधारण गळ्यापर्यंत येईल असे घालावे.>>बेताबेताने पाणी कोणता फिल्टर करतो??
मस्तच...
मस्तच...:D

शिर्षक वाचुनच तोंडाला पाणि
शिर्षक वाचुनच तोंडाला पाणि सुटले >>> ऑ
कस शक्यय 
ब ह आ र ई !!!!
ब ह आ र ई !!!!
वेल्कम बॅक राफा मज्जा आली
वेल्कम बॅक राफा
मज्जा आली वाचुन
(No subject)
:D
लाँग टाईम नो सी. छान!
लाँग टाईम नो सी. छान!
अगदी अगदी. इथे बटाटे नाही का
अगदी अगदी. इथे बटाटे नाही का चालणार? नाहीतर आवळे कुठले? ते कसे दिसतात? फोटो नवीन घेतलेल्या डिनर सेटच्या बोल मधून टाका ना हो..
------------
अशीच एक कृती ("आलू बेदम इन माय मसाला" ) असे उगाच ईंग्लिश नाव दिलेली बटाट्याची काचरा भाजी फेबू वर बघायला मिळाली.
आणि त्याच गुळचट कमेंट्स , "खूपच सुग्रण हां, 'अय्या किती तुला उरक.', 'खूपच मस्त आहे तुझं किचन(पाकृ काय त्यात... कौतुक करण्यासारखं).', 'बारीक झालीस का? ( बेदम बटाटे रेसीपीच्या चित्रातून दिसलेला हाताचा कोपरा बघून)' लगेच मुख्य कृती सोडून, छान दिसतेस...' , तुझा फोटो टाक नं
ते कृत्रिंम सखी प्रेम विचित्र वाटते.
------------
Pages