रायगड

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago
Time to
read
1’

दोन दिवस सुट्टी होती म्हणून रायगडावर गेलो होतो. या प्रवासात काढलेली ही काही प्रकाशचित्रे..

गडावर प्रचंड गर्दी होती. त्यामुळे बरीचशी प्रकाशचित्रे संध्याकाळी किंवा सकाळी लवकर काढली आहेत.

नीरा-देवघर प्रकल्पाचे बॅकवॉटर..

1.jpg2.jpg3.jpg

किल्ल्याचा दर्शनी भाग

4.jpg5.jpg

गडावरील महाराजांचा पुतळा

6.jpg

मेघडंबरी

7.jpg

महाराजांची समाधी

8.jpg

गडावरील बाजारपेठ

9.jpg

अमात्यांचे निवासस्थान

10.jpg

टकमक टोक

11.jpg12.jpg13.jpg14.jpg

ध्वजारोहणाच्या वेळी दोर अडकला होता. एका सात-आठ वर्षांच्या मुलाने वर चढून तो सोडवला..

16.jpg17.jpg18.jpg

मस्त फोटो. टकमक टोकाच्या फोटो खालचे ते तीन फोटो कोठले आहेत? त्या शेवटच्या फोटोसारखे चित्र का फोटो मी पूर्वी बर्‍याच जणांकडे पाहिला आहे.

तीनही फोटो गडावरचेच आहेत.. अवशेष..

***
दिखला दे ठेंगा इन सबको जो उडना ना जाने...

मस्त दर्शन घडवलेस रायगडाचे..:)
दुसरा अन तिसरा गुढरम्य वाटले. टकमक टोकाचे फोटोही फारच सही.

--
आतली पणती, तेवायला अशी;
अंधाराची कुशी, लागतेच..!!

चिनू, त्या छोट्या मुलाला माझा सलाम!!!!!

अवशेष पाहून कसेतरी वाटते. ती जागा पुर्वीची बाजारपेठे होती हे माहित नव्हते.

फोटो छान आहे आहेत. खरे तर अशा निसर्गरम्य ठिकाणी काढलेला कुठलाही फोटो छानच वाटतो.

ध्वजस्तंभाखालचे प्रकाशचित्र सही. फक्त त्याचा शार्पनेस थोडा कमी वाटतोय का ?

  ***
  The Truth Shall Make Ye Fret. - The Truth, Terry Pratchett

  छान फोटो
  ----------------------
  यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
  क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
  दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
  होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
  दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,

  बाजाराचे अन अमात्यांच्या घराचे अवशेष अनेक वर्षांपूर्वी पाहिले होते तेंव्हाही पोटात कालवा कालव झाली होती. आता फोटो पाहून परत तसंच वाटलं. कालाय तस्मै नमः सुद्धा म्हणावंसं वाटत नाही. Louvre चं, व्हर्साय च्या राजवाड्याचं बांधकाम, इटली मधल्या, स्पेन, जर्मनी मधल्या साधारण रायगडाला समकालीन वास्तूंची परिस्थिती आठवली की अगदी उद्विग्न होतं मन.

  चिनूक्स फोटो मस्त आहेत. प्रवासवर्णन पण वाचायला आवडेल...

  चिनू, खरचं! तू प्रवासवर्णन लिहू शकशील असे वाटते.

  शोनू, कळले नाही.. पॅरीसातील वर्सायचा तो राजवडा तर किती छान आहे. मग कशामुळे तुझ मनं उद्विग्न होतं?

  चिनू,फोटो छान आले आहेत.

  बी असे का रे?समकालीन असूनही त्या ठिकाणांचे बांधकाम अजूनही जसेच्या तसे आहे आणि आपल्याकडे मात्र ही अवस्था. म्हणुन मनं उद्विग्न होतं.

  अतिशय सुंदर फोटो..
  ----------------------------------------
  Within each of us lies the power of our consent
  to health and to sickness,
  to riches and to poverty,
  to freedon and to slavery.
  It is we, who control these and not another.

  चिन्मय मस्त आले आहेत फोटो.. वाघ्याची समाधी आणि केदारेश्वराचे पण फोटो टाक ना..

  सरिविना,
  हा वाघ्या कोण? शिवचरित्रात याचा उल्लेख कसा नाही.

  सुधाकर, वाघ्याचा उल्लेख शिवचरित्रात नाही हे खरंय. पण केदारेश्वरापासुन काही अंतरावर एक समाधी आहे. ती वाघ्या कुत्र्याची समजली जाते.

  मस्तच आहेत रे फोटो. तु प्लीज प्रवास वर्णनही लिहीच आता.

  शोनु ला अनुमोदन. आपल्याकडे सगळ्या किल्ल्यांची देखभाल आर्कियोलॉजिकल सोसायटीच्या अखत्यारीत असते. ते साले स्वत: काही करत नाहीत. आणि दुसर्‍या कुणी करायला गेले की लगेच हेरिटेज मॉन्युमेंटचे रडगाणे लावतात. नवीन काही सुधारणा करायला गेलं तर मुळ स्वरुपाला बाधा येते म्हणे. सगळा मुर्ख आळशीपणा.

  सस्नेह...

  विशाल.
  ____________________________________________

  कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं य: !
  जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:) स शिवछत्रपतिजयत्यजेय: !!

  रोपवेचे फोटो नाहीत कारण मी गड चढून गेलो. आणि त्या दोन्ही दिवशी प्रचंड गर्दी होती. त्यामुळे दुपारी उन्हात भरपूर लोकांची डोकी मध्ये आल्याशिवाय फोटो काढणं शक्य नव्हतं. Happy

  ***
  दिखला दे ठेंगा इन सबको जो उडना ना जाने...

  चिनुक्ष, मी ही गडावरच होतो त्या दिवशी. माहीत असत तर भेट झाली असती Happy

  केदारेश्वराच पण मंदीर आहे का? मला जगदीश्वराच माहित्ये. त्याच्याच बाहेर महाराज आणि वाघ्याची समाधी आहे. एका प्रसिद्ध शिलालेखाचा फोटो टाकतोय ...
  seveche_thayi.jpg

  >>आपल्याकडे सगळ्या किल्ल्यांची देखभाल आर्कियोलॉजिकल सोसायटीच्या अखत्यारीत असते. ते साले स्वत: काही करत नाहीत. आणि दुसर्‍या कुणी करायला गेले की लगेच हेरिटेज मॉन्युमेंटचे रडगाणे लावतात. नवीन काही सुधारणा करायला गेलं तर मुळ स्वरुपाला बाधा येते म्हणे. सगळा मुर्ख आळशीपणा.<<
  १०००% अनुमोदन...
  -नी
  http://saaneedhapa.googlepages.com/home