पंचरंगी पोपट माझा

Submitted by व्यत्यय on 23 July, 2015 - 09:47

आमच्या अड्ड्यावर लिहिलेली ही कलाकृती काळाच्या ओघात वाहून गेलेली.
निव्वळ दस्तऐवजीकरणार्थ इथे टाकत आहे.

मायबोलीवरच्या नार्सिसीस्ट सर्वज्ञ ट्रोल्सना अर्पण.

मी माझा, तू ही माझा
हा ही माझा, तो ही माझा

जमीन माझी, झाड़ ही माझे
पंचरंगी, पोपट माझा

अर्थपूर्ण, भावगर्भ
कित्ती चपखल, प्रतिसाद माझा

कथा माझी, कविता माझी
प्रकाश झोतात, इगो माझा

खाजवून ही, रक्त काढतो
शब्दबम्बाळ, शब्द माझा

सडकुन पडलो, तरीही पुन्हा
वरतीच आहे, पाय माझा

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्याचं काय्ये ना, एका अनुभवी महापुरुषाने सांगितलं की माझ्यात ट ला ट आणि फ ला फ जुळवायचं ट्यालेंट आहे पण "दर्द" नाही त्यामुळे माझ्या प्रतिभेला कोंब फुटत नाहीत.

आता एकच बायको, दोन मुलं अशा रेखीव चौकोनी आयुष्यात दर्द कुठून आणू? गेला बाजार मृत्युच्या दाढेतून वगैरे पण कधी परत आलो नाही. नाही म्हणायला कधी कधी अपचनाचे ढेकर येतात तेव्हा काही कविता पाडतो झालं. इतर प्रतिथयश कलाकारांचे "दैनिक स्फुर्तीपेय" एकदा प्यायलो पण कवितांचे दळण पाडण्याऐवजी स्वतःलाच सर्वज्ञ समजून राजकारणापासून क्रिकेटपर्यंत सगळ्या विषयांवर बरळत सुटलो. तेव्हापासून कानाला खडा लावला. असो.

प्रतिभेला कोंब फुटत नाहीत.
<<
मोड येत नाहीत असं म्हणायचं आहे का? Wink

आधी बी. ती रुजते. मग मोड येतात. मग कोंब फुटतो.

वैयक्तीक आकस जाणवला.

तोच उद्देश असल्यास सफल झाला आहे.

तुमच्या मनापासून केलेल्या कवितांपेक्षा मात्र ही रचना बरी आहे. कारण भावनांची तीव्रता 'खरीखुरी' आहे.

या कवितेत वैयक्तीक आकस?? कोणाबद्दल?

मी मनापासून केलेल्या कविता कुठे वाचलात बेफिकीर? मीपण एकदा वाचीन म्हणतो?

बाकी आप आये हमारे झोपडे मे असं काय ते वाटून राहिलंय!!

>>>मी मनापासून केलेल्या कविता कुठे वाचलात बेफिकीर? मीपण एकदा वाचीन म्हणतो?<<<

मी मायबोलीवरचा भाबडा अडाणी मनुष्य आहे. मला अनेक आय डीं मधला फरक आजसुद्धा कळत नाही. कोणाच्या कोणत्या धाग्यावर त्याक्षणी मी काय रिप्लाय दिला होता हे मनात धरून मी नंतर लिहीत नाही. मला कोणी कधी काय रिप्लाय दिला होता हेही (तीन आय डी सोडले तर) माझ्या लक्षात राहात नाही. मला तुम्ही ट्यागो वाटलात. माफ करा. तुम्ही ते असलात किंवा नसलात तरी मला फरक पडत नाही हे नोंदवू इच्छितो.

तुमची वरील रचना गझलपासून योजने दूर आहे. तुमचा कोणावरचा तरी वैयक्तीक (आंतरजालीय) राग व्यक्त करणारी रचना वाटली ही! तो राग चांगला उतरला आहे. बाकी एक त्रयस्थ काव्यवाचक म्हणून पाहिले तर रचना फारच सामान्य वाटत आहे. भावना मात्र तुडुंब आहेत.

शुभेच्छा!

तुमच्यासारख्या भाषाप्रभूंना, स्वत:च्या कार्यशाळेतले विद्यार्थी आणि त्यांच्या रचना सोडून म्या पामराची नोंद घ्यावीशी वाटली यानेच माझी छाती छप्पन इंची झालीये.

सडकुन पडलो, तरीही पुन्हा
वरतीच आहे, पाय माझा

हा माझा आवडता शेर आहे. तुम्हाला कुठला आवडला?

>>> टग्या | 23 July, 2015 - 21:29

सडकुन पडलो, तरीही पुन्हा
वरतीच आहे, पाय माझा

हा माझा आवडता शेर आहे. तुम्हाला कुठला आवडला?
<<<

कुणाशीतरी ही रचना घेऊन बोलण्याचा आत्मविश्वास आवडला मला!