भरली वांगी ( तूपाची बेरी वापरुन )

Submitted by दिनेश. on 14 July, 2015 - 10:55
लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
चार जणांना पुरेल.
माहितीचा स्रोत: 
प्रयोगच !
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय छान आयडिया आहे. बेरी वापरल्यामुळे भाजीला मस्तं तूपाचा खमंग स्वाद येईल. फारच छान आणि अनोखी पाककृती आणि फोटोही मस्तं.

एक टेबलस्पूनच आहे बेरी म्हणजे चवीपेक्षा घमघमाटाकरताच जास्त वापर होईल. बाकी अनसॉल्टेड बटरची बेरी खाऊन नाही बघितली कधी. ते बटर आपल्या घरच्या लोण्यासारखं नसतं त्यामुळे कदाचित चांगली लागणार नाही असं वाटतं. ह्या बेरीचे खरं काय काँटेट्स असतात तोही एक प्रश्नच आहे मला. इन फॅ़क्ट तूप केल्यावर लोण्यातले नेमके काय घटक उडतात आणि काय राहतात ह्याबद्दल पण कुठे वाचलं नाहीये कधी.

फोटो भारी आलाय! Happy

बाकी अनसॉल्टेड बटरची बेरी खाऊन नाही बघितली कधी. >>>>> चांगली लागते ती बेरी. (कॉस्कोच्या अनसॉल्टेड बटरची तरी). मी साखर घालून खातो नेहमी. आता पुढच्या वेळी ही भाजी करू.

छान आहे आयडीया. आम्हीपण दोन बटाटे तरी भरतोच वांग्याबरोबर.

बेरी नव-याला खायला आवडते, पण एकदा ट्राय करेन त्याला बेरी न देता अशी भाजी.

मस्त आयड्या. आम्ही कृष्णाकाठची माण्सं...त्यामुळे तूप आणि वांगी दोन्ही प्रियच.
वैद्यबुवा>>>>>>>>>प्रश्नच आहे मला. इन फॅ़क्ट तूप केल्यावर लोण्यातले नेमके काय घटक उडतात आणि काय राहतात ह्याबद्दल पण कुठे वाचलं नाहीये कधी.>>>>>>>>>>>>
हे पहा.
अनसॉल्टेड लोण्याला उष्णता देऊन तूप बनवतात. अश्या पद्धतीने उष्णता देऊन कढवलेल्या लोण्याचे तीन घटकांमध्ये विघटना होते.
हे ते तीन घटक……. लेक्टोज(साखर), मिल्क प्रोटीन आणि फॅट.
मंद आचेवर लोण्यातली आर्द्रता नष्ट केली जाते. मग साखर आणि प्रोटीन बेरीमध्ये रूपांतरित होऊन भांड्याच्या तळाशी साठत जाते. नंतर तयार तूप गाळून घेऊन ही बेरी बाजूला काढली जाते.

दिनेशदा - साक्षात अन्नपूर्णेचा वरदहस्त असल्यानेच असे एकसे एक पदार्थ तुमच्याकडून येत असतात .... Happy

_______/\_______

दिनेशदा मस्त रेसिपी, नक्की करून पहाणार. तुमच्या रेसिपी नेहमीच छान असतात. मी नेहमी तूप केलेल्या भांड्यात जीरे फ्राय करून भात करते, किंवा फ्लॉवरची भाजी करते, आता ही करून पाहीन.

धन्यवाद सर्वांना..

तूपाच्या बेरीत पोषक असे काहीच नसते, फक्त तिला खमन्ग चव असते एवढेच. सॉल्टेड बटर वापरूनही तूप करता येते, पण त्यातले मीठ ( तूपात विद्राव्य नसल्याने ) खाली जाऊन बसते आणि बेरी कमालीची खारट होते.

मी एकदाच असे तूप करुन पाहिले होते आणि छान झाले होते. तुम्ही अशा तुपाची पण कृती लिहा ना एकदा प्लीज.

माझ्या घरी बेरी उरली की आई त्यातच चहा करायची. तो चहा तुपकट लागायचा. मी अगदी लहाणपणापासून असा चहा प्यायला आहे म्हणून मला नवल वाटले नाही कधी त्याचे. पण इथे अनेकांना चहात तुप वा बेरीतला चहा ह्याचे कोण नवल वाटेल. पण अकोल्यात्/विदर्भात चहात तुप घालतत. (आता तुपाची पोळी चहाबरोबर आपण खातोच की. शिवाय खार्‍या पण तुपातल्याच असतत. शंकरपाळे डालड्यातले असतात. )

भरली वांगी आवडतात. तूपाची बेरी पण आवडते. पण एकत्र आवडेल की नाही सांगता येत नाही.

बाकी फोटो मात्र एकदम यम्मी आलाय Happy

बी, तू लिहिल्यापासून मलाही तसा चहा प्यायची इच्छा होतेय. नेमकं तूप कढवल्यावर लक्षात रहात नाही. आपल्याकडे तूपावर भरपूर चर्चा झाली आहे. तिथे मी लिहिलेही होते सविस्तर.

या भाजीसाठी मी वेगळे तूप वापरलेच नाही, तरीपण छान चव आली. एखाद्या वांग्यावर प्रयोग करुन बघा. नक्की आवडेल.

दिनेशदा, एकदा ते बनवलेले तूपही इथे दाखवा.

मी बनवले होते एकदा तेंव्हा ते थिजेना पण वर रवाळ कण तरंगत होते. मग मैत्रेयीने सांगितले थोडा वेळ फ्रिजमधे ठेव. तसे केले तर एकदम योग्य तो रिजल्ट मिळाला होता.

साजुक तुपात केलेले गोड पदार्थच फक्त आवडतात. वरून घेतलेलं तूपही नाही आवडत. बेरी लई लांब Wink
भरली वांगी मात्र आवडतात. सो तेलातली रेस्पीच जिंदाबाद.

सॉरी दिनेशदा पण तुपाची बेरी अन भरलीवांगी काही जमत नाहीये. माझा पास.
पण तुमची पुढची रेसीपी मस्त असेलच Happy

बी, हवामानावर अवलंबून आहे. सध्या आमच्याकडे थंड हवामान आहे म्हणून रवाळ तूप होते उन्हाळ्यात तर आठवडाभर ठेवले तरी त्यात कण दिसत नाहीत.. कढवलेले तूप थंड व्हायला जितका जास्त वेळ देऊ तेवढे चांगले. या वेळातच कण मोठे होतात. फ्रिजमधे ठेवले तर पटकन थिजून मेणासारखे घट्ट होते.

मला नाही आवडत वांग Sad
दिसायला मस्त दिसतंय Happy

पण अकोल्यात्/विदर्भात चहात तुप घालतत.
>>
अय्यो! :आओ:
चहाची चव कशी लागत असेल त्याचा अंदाज येईना Uhoh
गाईचं दुध घालून चहा केला की पण तसा तुकटच लागतो म्हणा.
चहात तुप ऐकलं नव्हतं कधीच Happy

Pages