तडका - उसणी मैत्री

Submitted by vishal maske on 12 July, 2015 - 00:26

उसणी मैत्री

स्वार्थ साधता यावा म्हणून
उसणी गोडी जपली जाते
मनी शत्रु असणार्‍याशीही
जनी मैत्री थापली जाते

प्रभारी मैत्रीतलं शत्रुत्व मात्र
मनी प्रकर्षानं भासत असते
अन् अहंतामिश्रीत मैत्री सदैव
मैत्रीमध्येच धुसफूसत असते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रभारी मैत्रीतलं शत्रुत्व मात्र
मनी प्रकर्षानं भासत असते
अन् अहंतामिश्रीत मैत्री सदैव
मैत्रीमध्येच धुसफूसत असते
>>>>>>>>>>>>>>>व्वा !व्वा!! आज पहाटेच तुम्हाला प्रसववेदना‌ सुरु‌ झाल्या असणार,त्याशिवाय काय ईतके तरल काव्य जन्म घेते.चिऊऊऊऊऊऊऊऊ

तुमच्या प्रसव वेदना तुम्हालाच होतील,
मला तुमच्या विडंबनात्मक प्रसव वेदना पाहण्याची आवश्यकता नाही,त्या तुम्ही मोठ्या व्याकुळतेनं घेऊ शकता,...

तुमच्या प्रसव वेदना तुम्हालाच होतील,
मला तुमच्या विडंबनात्मक प्रसव वेदना पाहण्याची
आवश्यकता नाही,त्या तुम्ही मोठ्या व्याकुळतेनं घेऊ शकता,...>>>>>>>>>श्या!शब्दप्रभो तुम्ही ईतके चिडताय का?तुम्च्या नवोनवोण्मेषशालीनि काव्यपंक्तींचा प्रभाव पडून अनेक कवी होऊ घातले आहेत.त्याणा कविता प्रसवत आहेत.आपण म्हस्के म्याटरनीटी होम काढूयात,लै पैसा असतो बघा यात,डायरेक्ट् सिझेरीयनच करुन टाकायचे.हाकानाका.चला मी जातो....it is going to be a busy day

छान

.

प्रश्न चिडण्याचा नाही,
मला उलट आनंद होतो आहे,
इतरांची ओढुन ताणून,डकारून होत असलेली काव्य प्रसुती पाहून,
खरंच हा अनुभव माझा उत्साह द्विगुणित करणारा आहे,
सर्व डकारांचे आभार,...

आणि मला सर्वांना वेळ नाही देता येत,
परंतु तुम्ही सर्वजण माझ्यासाठी वेळ देत आहात,
हे पाहून पण बरं वाटलं,...

प्रथम म्हात्रेजी,
माझे मायबोली वरील तडका हे सदर बंद करण्याच्या विचारात मीच होतो,
परंतु आज माझ्या तडका या सदरामुळे मायबोली वर अनेकजण लिहिण्याचा प्रयत्न करत आहेत,
त्यांच्या लिखाणात दर्जेदारपणा नसला तरीही ते लिहीत आहेत हे छान,
माझे तडका हे सदर आवरण्यासाठी अनेकजण मनोमन अपेक्षा करत असतील,अनेकांनी प्रयत्नही केले,मला माहीती आहे, त्यांना इथे प्रसिध्दी मिळवायची आहे,परंतु माझ्या तडका या सदरामुळे ते प्रसिध्दी पासुन कदाचित वंचित रहात असतील,( मला प्रसिध्दी मिळवायची नाही )
आणि त्यांच्या याच भावनेचा विचार करून,मी तडका हे सदर बंद करण्याचा विचार केला होता,
परंतु माझे तडका हे सदर बंद करण्यासाठी आपल्याच काही मायबोली करांनी जे प्रयत्न केले,ते मला आवडले नाही,ते त्यांच्याही नैतिकतेला तडा देणारे होते,माझ्या मनात आलं तर मी त्यांचे खुप मोठे नुकसान करू शकतो, परंतु त्यांच्या विचारांतला कमकुवतपणा लक्षात घेता मी ते केलेलं नाही,
त्यांच्या विचारांची पातळी निच्चतम पातळीची असली तरीही,ते प्रसिध्दी साठी या ठीकाणी धडपडत आहेत, आणि आपल्याच मायबोली परिवारातील आहेत,त्यांना विशिष्ट मर्यादेपर्यंत संभाळून घेणं हे आपलंच कर्तव्य आहे,
हल्ली माझ्या तडका या सदरामुळे जे काही मायबोलीकर डकारण्यासाठी पुढे आले आहेत त्यांचे लिहीणे माझ्या तडका हे सदर बंद करण्याने बंद होऊ शकते,
आणि त्यांचे लिहीणे बंद न होता वाढत जावे,यासाठी मला नाईलाजाने तडका हे सदर चालु ठेवावे लागत आहे,
आणि ते सर्वांनी वाचायलाच हवं किंवा त्यांना ते आवडायलाच हवं असा माझा कदापीही आग्रह राहीला नाही,राहणारही नाही,
त्यामुळे ज्यांना माझे तडका हे सदर आवडणार नाही,त्यांनी त्याकडे निशंक दूर्लक्ष करावे,...

किती गैरसमज करून घ्याल स्वत:बद्दल?
तुमचे तडका प्रकरण हे जितके वाईट आहे त्याच्यापेक्षा त्याची विडंबने बरी आहेत. अनेकजण हसतायत तरी.
बाकी त्या सगळ्यांनी तुम्ही मायबोलीवर यायच्या आधी बरंच काही चांगलं लिहिलेलं आहे. ते कधी वाचलंत तर माझ्यामुळे लोक लिहायचा प्रयत्न करतायत वगैरे फालतू वल्गना सुचणार नाहीत.

माझ्या मनात आलं तर मी त्यांचे खुप मोठे नुकसान करू शकतो, परंतु त्यांच्या विचारांतला कमकुवतपणा लक्षात घेता मी ते केलेलं नाही
>>
एक कुतूहल म्हणून विचारतोय. कृपया राग मानू नये..

आपण खुप मोठे सनदी पदाधिकारी किंवा राजकारणी वगैरे आहात का?

मस्के, तुम्ही कोणाचीही कसलीही मतं किंवा विडंबनं विचारांत न घेता तुमच्या पद्धतीने लिहीत रहा. Happy

दर्जा ही सापेक्ष बाब आहे आणि जोवर काही असभ्य लिहिलं जात नाही तोवर गुलमोहोरातील कोणत्याही लिखाणाला दर्जाची कात्री न लावण्याचं मायबोली प्रशासनाचं धोरण आहे. गुलमोहरावर प्रत्येकच पिढीतल्या कवींना ते पूर्वसुरींइतकं चांगलं लिहीत नसल्याचं ऐकायला मिळतं. तेव्हा डरनेका नहीं. Happy

इबा,

एका दृष्टिने तुमचे बरोबर आहे,

पण,

तुमच्या प्रतिसादाच्या एक्झॅक्टली वर एक प्रतिसाद आहे.
त्यात उर्धृत केलेलं वाक्य पहा. ते वाक्य याच महोदयांनी टंकलेलं आहे.

"माझ्या मनात आलं तर मी त्यांचे खुप मोठे नुकसान करू शकतो, परंतु त्यांच्या विचारांतला कमकुवतपणा लक्षात घेता मी ते केलेलं नाही" << हे ते वाक्य.

दुसरें,

कुणा कवीच्या कवितेचे विडंबन होते आहे, याचा अर्थ त्या कवितांना 'रेकग्निशन' मिळते आहे असा होतो. हे समजून न घेता, पहिल्याच विडंबनाच्या खाली या कवी महोदयांनी त्यांच्या परिपक्वतेचा जो पुरावा दिला आहे. तो तुम्ही पाहिलात का?

तडका चांगला का वाईट हे व्यक्तीसापेक्ष आहे. पण मुळ कवी त्याचा तडका घेऊन कुठेही "हे वाचाच" असा आग्रह घेऊन फिरत नसताना, कुठल्याही बीबीवर किंवा कोणाच्याही विपुमध्ये आपल्या लिंका डकवत नसताना, उगीच त्याचा तडका वाईट आहे ही टीका कशाला? काही उच्च अभिरुचींना तो खटकलाही असेलही पण मुळात ज्या कवीच्या साहित्याला एकही प्रतिसाद मिळत नाहीये आणि पर्यायाने ते साहित्य प्रकाशित केल्या केल्या मागच्या पानांवर आपसुक जातेय त्या साहित्याच्या साहित्यविषयक बाबी सोडुन इतर चर्चा कशाला? विडंबने वगैरे ठिक आहे, पण त्यावरच्या प्रतिसादांमध्येही मुळ कवीची व्यक्तीगत खिल्ली उडवणे कशाला?

वाचुन आश्चर्य वाटते. जास्त आश्चर्य ह्याचे की जे लोक त्यांच्या स्वतःच्या व्यक्तीस्वातंत्र्याबाबतीत अतीआग्रही असतात तेच यात सगळ्यात आधी उड्या घेतात.

कुणा कवीच्या कवितेचे विडंबन होते आहे, याचा अर्थ त्या कवितांना 'रेकग्निशन' मिळते आहे असा होतो. हे समजून न घेता, पहिल्याच विडंबनाच्या खाली या कवी महोदयांनी त्यांच्या परिपक्वतेचा जो पुरावा दिला आहे. तो तुम्ही पाहिलात का?

या कवीने या आधी ६ पाने भरुन तडके टाकलेत ज्यातल्या जवळ जवळ ९०% साहित्यावर एकही प्रतिसाद नाही आणि उरलेल्या साहित्यावरचे एकुण प्रतिसाद मोजले तर हाताची १० बोटे जास्त होतील. इतके दिवस गप्प बसलेल्या कवीला त्याच्या परिपक्वतेचा पुरावा द्यायला माबोवरच्या सदस्यांनी भाग पाडले. नाहीतर त्याने अजुन ६ पाने एकाही प्रतिसादाविना भरली असती आणि तरीही तो गप्पच बसला असता.

>>गुलमोहरावर प्रत्येकच पिढीतल्या कवींना ते पूर्वसुरींइतकं चांगलं लिहीत नसल्याचं ऐकायला मिळतं
मग खोटं आहे का ते?