भडका - किसणी पात्री

Submitted by साती on 12 July, 2015 - 01:06

खोबरं खवता यावं म्हणून
किसणी पात्री जपली जाते
मनी म्हावरं असलं तरी
घरी भाजी रांधली जाते

प्रभारी शाकाहारातलं शत्रूत्वं मात्रं
जिभेला प्रकर्षाने भासत असते
आणि अहंतामिश्रित सूनबाई मात्रं
किचनमध्ये धुसफूसत असते!

भडका.... किसणी बघून उमळून आलेला भडका...

(मीन्वा आज्जींना गुरुदक्षिणा म्हणून!
ता. क. - याकवियित्री छान आहे. एखादा शब्दं माझ्याबद्दलही लिहायला हवा होता. मी काय फक्तं याकचा फोटो पाठवला का?
माझ्यावर खर्चं केलेले फोटोतले पिक्सेल व्यर्थं गेले.)

Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्पॉक, तुम्हीच हो तुम्हीच!
तुम्हाला खरी कळली माझ्या हृदयातली व्यथा.

भरत, तुम्ही हसू नका.
सकाळी उठून ,खोबरं किसून , त्याचा शाकाहारी पदार्थं रांधून तुम्हाला भेट पाठवला आहे.

हे हे वा वा शिष्या असावी तर अशी ... ! माझं कामच करुन टाकलं..

बाकी माझ्या घरी मात्र आज म्हावरं आहे

स्पॉयलर अ‍ॅलर्ट - ता.क. तुमच्या तुमचयाबद्दल आधीच बोलून कवितेतली मजा घालवायला नको हो.. बाकी काय ते ध्यान तुमचं याकवरचं.. म्हणजे अगदी सुंदर ते ध्यान बसे याकवरी...
असो कवितेतली मजा घालवायला नको...

बाकी काही असो आपल्या दोघींच्या सशक्त प्रयत्नांमुळे.. मूळ कवितेला पण काही प्रतिसाद मिळायला लागले हे मात्र झालं हो. वाचकवर्ग वाढवला की काय आपण त्यांचा? Uhoh

छान

खाण्याच्या विषयावरची ही कविता वाचता वाचताच, एक कविता होतीये मला.
परवानगी न मागता इथेच देतो, गोड मानुन घ्या हं...

खात होतो चहा बरोबर
भाजणीच्या खुसखुशीत चकल्या
तत्क्षणी आले मनात
करुयात का थोड्या जिलेब्या

पाक केला साखरेचा
अंमळ दोन तारी जाहला
अओ आता काय करायचे म्हणत
तोच वापरला दुसर्‍या चहाला

... आणि हो पुढची कविता इडली पात्रावर येऊद्या असा प्रेमळ आग्रह करतो...

म्हावर्यऐवजी भाजी!!!!

मी आपल्या दु:खात मनापासून सहभागी आहे. कोळंबीचं लोणचं पाठवून देऊ का?