वर्षभरापूर्वी एका मित्राने म्हटलं की, 'ह्यावर्षी मी मुंबई मॅरेथॉन धावणार!'
मी म्हटलं, ' बाबा रे, तू काही अॅथलीट नाहीस आणि सेलेब्रिटी तर त्याहूनही नाहीस, कशाला उगाच जीवाला त्रास करून घेतोयस?'
पण तो ठाम होता. 'हे स्पिरीट आहे रे, 'स्पिरीट'. तुमच्या शहरासाठीचं तुमचं 'स्पिरीट''
तो पूर्ण नाही, हाफ मॅरेथॉन धावला. पण हाफ मॅरेथॉन पूर्ण करण्यासाठीसुद्धा सॉलिड जिद्द लागते. त्या जिद्दीला सलाम म्हणून काही दिवसांनी त्याला एक प्रशस्तीपत्रक तर मिळालंच, त्याहीपेक्षा मित्रांकडून क्वचितच मिळणारी कौतुकाची थाप आणि कायमस्वरूपी 'इज्जत' मिळाली !
एस एस राजामाउलीचा 'बाहुबली' अशीच एक हाफ मॅरेथॉन पूर्ण करतो. भव्य, अतिभव्य, अतिशयोक्तभव्य अश्या एकावर एक कडी करत जाणाऱ्या परदेशी इतिहासपटांच्या जोडीला भारताने जोधा-अकबर वगैरे काही मोजकेच चित्रपट उभे केले आहेत. जे उभे केले, त्यांतही लिखित इतिहासाकडून कथानकं उधार घेण्याकडे जास्त कल होता. पूर्णपणे काल्पनिक कथानकावरील एक भव्य इतिहासपट बनवणं, हा एक मोठा धोका राजामाउलीनी स्वीकारला. ह्या चित्रपटाचं नेमकं बजेट काय ह्यावर १७५ कोटींपासून ते २५० कोटींपर्यंत माहिती उपलब्ध आहे. १७५ कोटीसुद्धा काही चिल्लर नाही ! मुघल-ए-आझम बनवताना दिग्दर्शक के आसिफ ह्यांनी निर्माता शापूरजी पालनजींना पाण्यासारखा पैसा वाहवायला लावला होता, तेव्हा शापूरजींचे धाबे कसे दणाणले होते, ह्याच्या सुरस कथा बऱ्याच वाचायला मिळतात. पण वाहिलेल्या पैश्याचं जे चीज मुघल-ए-आझमच्या आरसेमहाल व इतर भव्य सेट्समध्ये झालं, तसंच चीज 'बाहुबली'नेही केलं आहे असं म्हणायला हरकत नाही.
'बाहुबली'ची भव्यता शीर्षकांपासूनच सुरु होते. अगदी सुरुवातीलाच प्रेक्षकाला करून दिलेली ही भव्यतेची अनुभूती, अगदी अखेरपर्यंत ठेवलेली आहे. काही दृश्यांमध्ये स्पेशल इफेक्ट्स कळून येतात, पण ते गुळगुळीत रस्त्यासाठी टोल भरण्याचा त्रास नसल्यासारखं निरुपद्रवी आहे.
कल्पनेच्या पलीकडे असणारा अतिप्रचंड धबधबा आपल्याला पहिल्याच दृश्यात दिसतो. एका मध्यमवयीन स्त्रीच्या (राम्या कृष्णन) मागावर काही सैनिक लागलेले असतात. तिच्या कुशीत एक लहानगं बाळही असतं. ती त्या सैनिकांपासून वाचते, मात्र जखमी अवस्थेत पाण्याच्या त्या अथांग प्रवाहाला शरण जाते. पण त्या लहान बाळाला सुरक्षित ठेवते. हे बाळ ह्या महाकाय जलपर्वताच्या पायथ्याशी असलेल्या भूमिपुत्रांना मिळते आणि त्यांच्या टोळीच्या मालकिणीला दैवदत्त पुत्रप्राप्ती होते. लहानपणापासून जलपर्वताच्या वरच्या बाजूस काय असेल, ह्याची जबरदस्त ओढ असलेला हा पुत्र - शिवा - पर्वतकडा चढून जायचे असंख्य अयशस्वी प्रयत्न करत राहतो. अनेक वर्षांनंतर 'शिवा'च्या (प्रभास) प्रयत्नांना यश मिळतं आणि तो त्या अज्ञात दुनियेत पोहोचतो. इथे असलेले लोक त्यालाच काय, कुणालाच माहित नसतात. काय असतं तिथे ? कोण असतात ते लोक ? शिवा कोण असतो ? नेमका संघर्ष काय आणि कुणाचा आहे ? ही सगळी कहाणी बरीच मोठी आहे. इतकी मोठी की ती एका चित्रपटात मावलेलीच नाही ! उत्कंठा शमते आहे असं वाटत असताना ती परत ताणली जाते आणि चित्रपट त्याच अपूर्ण अवस्थेत संपतो ! 'बाहुबली - द कन्क्ल्युजन - इन २०१६' असं झळकतं.
बहुतेक लोकांना हे खरंच झेपत नाही. कारण भारतीय चित्रपटाच्या प्रेक्षकाला अश्या अतिभव्यतेची आणि अपूर्णतेची सवय नाही. त्यातही 'पुढील वर्षापर्यंत थांबा' असं सांगितलं जाणं, म्हणजे त्यांना एक थट्टाच वाटते ! काही अंशी बरोबरही आहे म्हणा. पुढील भाग वर्षाखेरीस किंवा दोन-तीन महिन्यांत प्रदर्शित करायला काहीच हरकत नव्हती. पण, निर्मात्यांचं गणित काय असेल ते अडीचशे कोटींची फोडणी जेव्हा बसते, तेव्हाच कळत असावं !
मूळ चित्रपट तेलुगुमध्ये बनलेला आहे. हिंदीत त्याची डब केलेली आवृत्ती आहे. ह्या विसंगातीशी जुळवून घेण्यात आपला थोडासा वेळ जातो. त्यात भर म्हणून काही ठिकाणी गंभीर रसभंग आहेत. उदा. - शेकडो लोक मिळून ओढत असलेल्या दोरखंडाला झोळ असणे, काहीही गरज नसताना मध्येच एक आयटम सॉंग येणे, सर्वदूर फरशीचं बांधकाम आणि दृष्टीपथातसुद्धा एखादंही झाड नसताना म्हातारीने मोठ्ठा खड्डा भरून काटक्या गोळा करणे आणि त्या काटक्या तिला तिच्या आसपास २४ तास मिळतच राहणे वगैरे. डब केलेले संवाद असल्याने त्यांत विशेष दम नाहीच, उलटपक्षी 'वो देखो तुम्हाला बेटा क्या कर रहा है.. वो देखो तुम्हारी मां क्या कर रही है..' सारख्या पुनरुक्तीही खटकतात.
मुख्य भूमिकेत 'प्रभास' खूप सहज वावरतो. त्यात वारंवार सुपरस्टार 'नागार्जुना'चा आभास होत राहतो. त्याची एनर्जी केवळ अप्रतिम आहे. काही अमानवी दृश्यं तो त्याच्या पिळदार देहयष्टी व आश्वासक शारीर अभिनयाने विश्वसनीय करवतो आणि त्याच वेळी 'अवंतिका' (तमन्ना) चा प्रेमिक म्हणून हळुवार अभिनयसुद्धा चांगलाच करतो.
त्याच्या विरुद्ध भूमिकेतल्या 'राणा दग्गुबती'ला आपण 'दम मारो दम' मध्ये बऱ्यापैकी मोठ्या आणि 'बेबी' व 'यह जवानी है दिवानी' मध्ये छोट्या भूमिकांत पाहिलं आहे. त्याची धिप्पाड देहयष्टी त्याचं इथलं काम आपोआपच करून जाते. माजलेल्या रानटी सांडाशी झुंजण्याचा प्रसंग असो की एका साम्राज्याचा अधिपती म्हणून मिरवणं असो, त्याला शोभून दिसतं.
तमन्नाच्या अंगावर एका दृश्यात असंख्य फुलपाखरं बसलेली दाखवले आहे, ते जराही अतिशयोक्त वाटू नये इतकी ती फुलासारखी सुंदर दिसली आहे. सुंदरीच्या वेशभूषेत नाजूक आणि एका लढवय्यीच्या भूमिकेत राकट दिसणं तिने चांगलं निभावून नेलं आहे.
राम्या कृष्णनने दिलेलं काम चोख केलं आहे आणि अनुष्का शेट्टीला ह्या भागात तरी विशेष काम नाहीच, कदाचित ती पुढच्या भागात जास्त दिसेल.
इतर सहाय्यक भूमिकांत सत्यराज (ज्याला आपण 'चेन्नई एक्स्प्रेस'मध्ये दीपिकाच्या वडिलांच्या भूमिकेत पाहिलं होतं) आणि नासर लक्षात राहतातच. खासकरून सत्यराजचा 'कट्टप्पा' जबरदस्त !
रहमान आणि एम एम करीम, हे इलय्या राजांनंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीने हिंदीला दिलेले हल्लीचे अनमोल संगीतकार आहेत. करीमच्या क्रिमिनल, जिस्म, जख्म, सूर अश्या अनेक चित्रपटांच्या संगीताची मोहिनी रसिक श्रोत्यांच्या मनावरून सहजासहजी उतरणारी नाही. इथेही करीम उत्कृष्ट मेलोडी देतात. खासकरून 'पंछी बोले..' हे गाणं तर संपूच नये असं वाटावं, इतकं गोड आहे !
सेंथिल कुमार ह्यांचं छायाचित्रण आणि मनू जगध ह्यांचं कलादिग्दर्शन निश्चितच दाद देण्यायोग्य आहे. माहिष्मतीचा राजमहाल, अद्भुतरम्य निसर्ग, प्रत्येक दृश्यात जपलेली भव्यता केवळ अप्रतिम !
राजामाउलींचं अभिनंदन आधीच करून झालं आहे. तरी एक कहाणी सांगायला सात तासांची आवश्यकता भासणं, हे बरोबर आहे की नाही हे दुसरा भाग पाहिल्यावरच नेमकं कळेल. पण ह्या पहिल्या भागाची कहाणीसुद्धा आटोपशीर करायला हवीच होती. केवळ भव्यतेच्या ध्यासापोटी इतर काही ठिकाणी थोडी डोळेझाक केली असावी की काय असं वाटतं. अनावश्यक प्रसंग, लांबण, गोष्टीवेल्हाळपणा थोडा टाळायला हवा होता.
मात्र ह्या सगळ्याला सहन करून 'बाहुबली' एकदा तरी पाहावा असाच आहे. कारण अथक धावणाऱ्या हॉलीवूड अॅथलीटाचा जोडीने आपला नवखा भारतीय मित्र जिद्दीने धावायला उतरला आहे. कौतुक वाटायलाच हवं !
वन स्टार फॉर द एफर्ट.
रेटिंग - * * *
http://www.ranjeetparadkar.com/2015/07/movie-review-bahubali-beginning.html
हे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये आज १२ जुलै २०१५ रोजी प्रकाशित झाले आहे :-
काही आठवड्यांपुर्वी
काही आठवड्यांपुर्वी थिएटरमध्ये पाहिला. माझ्या इकडच्या एका तेलगु कलिगने फारच आग्रह करून ठेवला होता आणि दोघांनी एकत्र सिनेमा पाहायचा चान्स पण मिळत नाही. मी तर आधीच झोपायची तयारी ठेवली होती पण नंतर नवराही कंटाळला जनरली त्याचा पेशन्स जास्त आहे. दुसरा भाग टोटल बोअररिंग. भव्य दिव्यपणा आहे पण त्यासाठी इतके तास (आणि पैसे) मोजायची माझी तयारी नाही. दुसरा भाग घरीच बघु असं आधीच ठरलं आहे. (अवांतर आम्ही घरी वेळ मिळाल्यास नेफिवरचे कुठचेही चित्रपट पाहू शकतो..)
रसप, हे तुमचं परिक्षण १००% सही लिहिलं आहे.
प्रभास जेव्हा महिश्मवती मध्ये
प्रभास जेव्हा महिश्मवती मध्ये येतो तेव्हा पुतळा खेचणारा मजूर त्याला एका सेकेंडआत ओळखतो, आणी सगळे बहुबली चा घोष करायला लागतात .
पण आपली हेरौइन ती तर छुपी रेज़िस्टेंट फायटर असते. हे लोक बहुबली ल मानणारे असतात. तिने ओरिजिनल बाहुबली चा फोटो पुतळा काहीतरी पहिला असणार ,तरी ती नव्या प्रभासचे बाहुबली राजा बरोबरचे साम्य ओळखू शकत नाही का ?
१. तो मजुर म्हातारा दाखवलाय, तो स्मरणातुन बाहुबलीचा चेहरा ओळखतो. बाकी त्या राज्यामध्ये बाहुबलीचे नाव काढायला बंदी असते, त्याचा पुतळा कोण कुठुन पाहणार? आधी एका संवादात म्हटलेय की इथे बाहुबलीची आठवण काढणारे फक्त दोघेच आहेत. एक त्याची बायको देवसेना आणि दुसरा भल्लाळ् देव. बाहुबलीचे नावही ऐकलेले नसावे तरुण पिढीने. त्याला प्रत्यक्ष पाहणारी पिढी देवसेनेच्या वयाची किंवा तिच्याहुन मोठी.
२. छुपे फायटर बाहुबलीवाले नसतात तर देवसेनावाले असतात. बहुतेक देवसेना त्या जंगलातल्या लोकांची राजकन्या वगैरे काहीतरी असणार, जिच्या प्रेमात भल्लाळ व बाहुबली दोघेही पडतात आणि ती बाहुबलीच्या. त्या ज्ण्गली लोकांना देवसेनेला सोडवुन आणायचे असते. बाकी कशात त्यांना रस नसतो. म्हणुनतर शिवाडु मी आणतो देवसेनेला म्हटल्यावर ते लगेच तयार होतात. उगीच "तु कोण" वगैरे भानगडीत पडत नाहीत.
खरेतर त्यांच्या प्रमुखाने शिवाडूला ओळखायला हवे होते. त्याने तरुणपणी बाहुबलीला पाहिलेले असणार.
ओह ..मला ते लोक बाहुबलिशी
ओह ..मला ते लोक बाहुबलिशी एकनिष्ठ असलेल्या लोकांचे सैन्य वाटत होते. तसे असेल तर त्यांच्याकडे बाहुबलीचे चित्र असायला हवे .
वरती हा शिवाडु गळ्यात bआहुबलिचे चिन्ह असलेले (घोड्याचे चित्रवाले )लॉकेंट घालून फिरत असतो.
रहमान आणि एम एम करीम, हे
रहमान आणि एम एम करीम, हे इलय्या राजांनंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीने हिंदीला दिलेले हल्लीचे अनमोल संगीतकार आहेत. करीमच्या क्रिमिनल, जिस्म, जख्म, सूर अश्या अनेक चित्रपटांच्या संगीताची मोहिनी रसिक श्रोत्यांच्या मनावरून सहजासहजी उतरणारी नाही. इथेही करीम उत्कृष्ट मेलोडी देतात. खासकरून 'पंछी बोले..' हे गाणं तर संपूच नये असं वाटावं, इतकं गोड आहे !
=चित्रपटाचे संगीत खरोखरच खुप सुंदर आहे. कौन है वो कौन है गाण्यातले शिव तांडव स्त्रोत्र अगदी ऐकण्यालायक आहे.
ज्वारीचा दाणा मोत्यासारखा
ज्वारीचा दाणा मोत्यासारखा चमकत असेल तर त्याची चमक मूठभर धान्यातही जाणवतेच, त्यासाठी गोदामात शिरून पोते फाडायची गरज नसते.
उपमा चांगली आहे , पण अस्थायी आहे, भव्य कॅनव्हासवरच्या चित्राची सर त्याच्या मोबाईल वॉलपेपरमध्ये येणार नाही.
खुद्द जेम्स कॅमरून सुद्धा अवतार साठी खूप वर्ष थांबला होता.
Avatar in 1995 and announced in 1996 that he would make the film after completing Titanic. In December 2006, Cameron explained that the delay in producing the film since the 1990s had been to wait until the technology necessary to create his project was advanced enough..
ऋन्मेऽऽष एवढा चिवाट्ट पणा नाहीये त्यामुळे हेमावैम
सिनेमाघरातही ह्याची भव्यता
सिनेमाघरातही ह्याची भव्यता खोटी वाटते. आणि अवतारशी या साउथ इंडीयन मसालापटाची तुलना करु नका. असो
सिनेमाघरातही ह्याची भव्यता
सिनेमाघरातही ह्याची भव्यता खोटी वाटते.
>
सिनेमाघरात उलट खोट्या गोष्टी आणखी सहज उघड पडतात.
असो, भव्यता वा स्पेशल इफेक्ट किती छान जमलेत हा एक वेगळा भाग झाला. त्याची मजा नक्कीच छोट्या आणि मोठ्या स्क्रीनवर वेगवेगळी येणारच. त्यासाठीच तर तसे पैसे मोजले जातात.
पण माझा मुद्दा कल्पकतेअभावी झालेल्या भव्यतेच्या नाशाडीबद्दल होता.
समजा तुम्हाला जगातल्या एका नावाजलेल्या चित्रकाराकडून एक चित्र काढून घ्यायचे आहे. चित्र काढायला तुम्हाला भलामोठा कॅनव्हास, दर्जेदार ब्रश वगैरे साहित्य, सोबत आकर्षक आणि मोहक रंग पुरवले....
आणि त्यानंतर तुम्ही त्या चित्रकाराकडून नेहमीचे आपले डोंगरामागून सुर्य उगवतोय, खालून नदी वाहतेय, नदीकाठी एक बगळा चोचीत मासा पकडून उभा आहे, बाजूला एक पर्णकुटी आणि त्याच्यासमोर एक पिपळाचे झाड आहे असे चित्र काढून घेतले.... तर ती तुम्हाला उपलब्ध असलेल्या भव्यदिव्य रिसोर्सेसची नासाडीच आहे
आता पुन्हा मी वर दिलेली उपमा याच्याशी ताडून बघा, कदाचित अस्थायी नाही वाटणार
एकच सुचना. ते नासाडी असे
एकच सुचना. ते नासाडी असे आहे, नाशाडी नाही. बाकी पसंद अपनी अपनी.
मी अवतारबद्दल ढिगाने वाचुनही जेव्हा तो इथे २ड आणि ३डी मध्ये रिलिज झाला "इतर चार सायन्स फिक्शनसारखा" म्हणुन दुर्लक्ष केले. नंतर जेव्हा टीवीवर २डी मध्ये पाहिला तेव्हा इतका उत्तम चित्रपट, जो कथा आणि तंत्र दोन्हीमध्ये टॉप क्लास होता, त्याला मी मोठ्या पडद्यावर ३डीत पाहायची संधी गमावली म्हणुन खुप शोक केला.
इथे कुठेही अवतार आणि बाहुबलीची तुलना नाहीय तर एक उदाहरण म्हणुन अवतारचा उल्लेख केलाय.
आजवर आलेल्या भारतीय भव्यपटांमध्ये बाहुबली खुप उजवा आहे. मलाही आधी त्याच्या भव्यतेबद्दल आणि पडद्यावर खोटे दिसण्याबद्दल शंका आलेली, मी वर ल्लिहिलेय ही. पण प्रत्यक्ष मोठ्या पडद्यावर गुहेवरचे दगड खोटे वाटले, शिवलिंग खोटे वाटले. बाकीची सगळी ड्रुश्ये खुप खरी वाटतात. इतका प्रचंड धबधबा खरा वाटतो. (प्रत्यक्षात तो इतका मोठा नाहीय) राजवड्याचे शहर खोटे वाटेल असे ट्रेलर पाहुन वाटलेले. पण प्रत्यक्षात ब-यापैकी चांगले वाटले.
बाहुबली चित्रपटात युद्धाच्या
बाहुबली चित्रपटात युद्धाच्या तयारीच्या प्रसंगात काल्केयाची सेना १ लाख असल्याची सांगितली आहे, आणि महिष्मतीची सेना २०-२५ हजार (नक्की आकडा आठवत नाही). त्यानुसार काल्केय हा त्याचा सेनेच्या शेवटी राहून युद्धात भाग घेतो. त्याच्यापर्यंत पर्यंत पोहोचाण्यास बाहुबली आणि भल्लालदेवला कमीतकमी १ प्रहर (८ प्रहरांचा १ दिवस होतो. त्यामुळे प्रत्येक प्रहर ३ तासांचा होतो - संदर्भ विकिपीडिया) लागणार असतो. शिवगामी, बिज्वलदेव आणि इतर मंत्रीगण हे युद्ध बघत असतात, एका उंच टेकाडावर, जेथे कालीमातेसमोर बळी दिला जातो. हि जागा नगरच्या तटबंदीच्या आसपास परंतु महिष्मती सेनेच्या घेरेच्या आत असावी. चित्रपटात दाखवल्याप्रमाणे ज्या वेगाने दोघे वीर युद्ध करत काल्केय पाशी पोहचतात ते अंतर नक्कीच ५-६ किलोमीटर असावे. इतक्या लांबून चालणारे युद्ध हे टेकडीवर उभे राहीलेल्या व्यक्तींना बरोबर दिसते, अगदी हावाभावासहित.
जेव्हा काल्केय महिष्मतीच्या सामान्य नागरिकांना युद्धात सामोरे करतो आणि भल्लालदेवाकडून ते ठार मारल्या जातात बिज्वलदेव म्हणतो की युद्धात सामान्य नागरिक मेले तरी चालतात.
आता इतक्या लांबून युद्धात घडण्यारया गोष्टी दिसायल्या यांच्या डोळ्यातच दुर्बीण बसवलेली असली पाहिजे किंवा महाभारतातील संजयसारखी दिव्यदृष्टी तरी हवी.
चित्रपटाच्या सुरुवातीला शिवगामी एका हाताने बाळाला धरते.
" त्या बाळाची मान लचकेल ना.... " इति चिरंजीव
http://www.maayboli.com/node/17790?page=11
अहो हा साउथी चित्रपट आहे.
अहो हा साउथी चित्रपट आहे. अस्ले दोष काढत बसलात तर कसे व्हायचे? तरी बरे, १०० फुटांवरुन रोज खाली पडुनही हिरोला साधे खरचटत नाही, तो जिवंत कसा राहतो हा प्रश्न तुम्हाला पडला नाही.
साऊथी चित्रपटात आजच्या युगातले हिरोही गुरुत्वाकर्षणविरुद्ध उड्या मारत व्हिलनला लाथा हाणतात. हा तर चांदोबामधला चित्रपट..
तो पूर्ण नाही, हाफ मॅरेथॉन
>> असं सगळं मी आधीच लिहून झालं आहे. तरीही तेच ते का उगाळत आहात ऋन्मेष व कं ?
All said and done,
हेही पटत नाही का ?
रसप यांच्या सर्व मुद्द्यांशी
रसप यांच्या सर्व मुद्द्यांशी सहमत .......
मात्र ह्या सगळ्याला सहन करून
मात्र ह्या सगळ्याला सहन करून 'बाहुबली' एकदा तरी पाहावा असाच आहे. कारण अथक धावणाऱ्या हॉलीवूड अॅथलीटाचा जोडीने आपला नवखा भारतीय मित्र जिद्दीने धावायला उतरला आहे. कौतुक वाटायलाच हवं !
BTW have you seen Welcome Back? How is it? Nana after long time..
वन स्टार फॉर द एफर्ट.
हेही पटत नाही का ?>>> No. Pasand apni apni. We can agree to disagree and go ahead.
कारण अथक धावणाऱ्या हॉलीवूड
कारण अथक धावणाऱ्या हॉलीवूड अॅथलीटाचा जोडीने आपला नवखा भारतीय मित्र जिद्दीने धावायला उतरला आहे. कौतुक वाटायलाच हवं !
अगदी परफेक्ट शब्दात सांगितला आहे .
पण ऋ व कं. ला दुसर्यांचा काही पटत नाही त्याला तुम्ही - आम्ही काय करणार
रसप तुमच्या स्पष्टीकरणामागचा
रसप तुमच्या स्पष्टीकरणामागचा हेतू समजला नाही.
हे असे वाटतेय की बाहुबली हे तुमचे होम प्रॉडक्शन आहे आणि त्याच्याबद्दल तुम्ही चार शब्द सांगितले आहेत, ज्यावर मी वा ईतर कोणी आक्षेप घेत आहोत.
पण तसे नसून मी फक्त पाहिलेल्या चित्रपटाबद्दल माझे मत व्यक्त करतोय. तु
तसेच तुमच्या परीक्षणाबद्दल सुद्ध टिप्पणी केली नाहीये, कारण ते मी तेव्हा वाचलेले, आणि त्यात तुम्ही काय लिहिले होते हे आता विसरलोय देखील.
कारण अथक धावणाऱ्या हॉलीवूड
कारण अथक धावणाऱ्या हॉलीवूड अॅथलीटाचा जोडीने आपला नवखा भारतीय मित्र जिद्दीने धावायला उतरला आहे. कौतुक वाटायलाच हवं !
>>>
याबाबत मात्र आपण वेगळे मत राखून आहोत.
कदाचित माझ्या भारतीयांकडून अपेक्षा जास्त असतील, ज्या तुमच्या तितक्या नसाव्यात, म्हणून उत्तेजनार्थ बक्षीसातही समाधान मानत आहात
काल पाहिला पुर्ण आणि
काल पाहिला पुर्ण आणि आवडला.
बाकी, सर्व प्रतिसाद वाचून, रसप, रिया, साधना ही मंडळी रुण्मेस सारख्या (सतत आपली टांग वर, उचकव्णार्या आणि नोनसेन्स पोस्ट्स, वाद घालायला कयम तत्पर आणि अतिरेक पकाव) वर आपली शाब्दिक आणि भावनिक एनर्जी खर्च करताना पाहून यातना झाल्यात!
Pages