वकीलाचा संदर्भ हवा आहे.

Submitted by गिरीकंद on 11 July, 2015 - 01:58

मित्रहो, मला एक मदत हवी आहे.
दोन वर्षापुर्वी नोकरीत बदल करुन पुण्यातील एका नविन कुंपणीत रुजु झालो होतो परंतु आर्थिक कारणांमुळे ती कंपनी बंद झाली. गेले दोन वर्षे सतत पाठपुरावा करुन सुद्धा त्या कंपनीने अजुन उरलेला हिशेब चुकता केला नाहीये. दुर्दैवाने आता वकीली सल्ला घेण्याशिवाय दुसरा उपाय उरला नाहीये. मी त्या कंपनीत व्यवस्थापकीय पदावर असल्यामुळे मला कामगार न्यायालयाच्या कक्षेतील वकीलाकडे न जाता दिवाणी वकीलाकडे जावे लागेल.
तर कृपया मला कोणी पुण्यातील वकील सुचवु शकाल का? तसे तर मी इकडुन तिकडुन वकील गाठला असता पण आजपर्यत कोर्टाची पायरी चढायची कधी वेळ आली नसल्यामुळे ओळखीतला वकील असेल तर जरा धीर येईल.
सर्वांना आगावु धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोन वर्ष झाली तरी कंपनीने अजून हिशोब चुकता केला नाही.:(

गिरीदा, तुला कोणत्या दिवाणी न्यायालयात दाद मागायची आहे ते सुध्दा लिही. म्हणजे जाणकार त्याबद्दल वकील सुचवू शकतात. मुंबईत असतं तर मी वकील सुचवू शकलो असतो. न्यायालयीन लढाईसाठी शुभेच्छा.

नरेश, लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. Happy
कंपनी आणी मी दोघेही पुण्यातीलच असल्यामुळे साहजिकच पुण्यातील वकील हवाय.

गिरीकंद ती कंपनी बिझिनेस एण्टिटी म्हणून आस्तित्वात आहे का? कंपनी बंद झाली असेल किंवा दिवाळखोरी घोषित केलेली असेल तर देणेकर्‍यांबद्दल एक अग्रक्रम असतो. वकील ते सांगेलच. कोणी माहितीत असेल तर कळवतो. कंपनी सध्या "आर्थिक अक्षमता" कारण देत आहे का?

फारेन्डा, माझ्या ऐकीव माहीतीप्रमाणे कंपनीने दिवाळखोरी अजुन घोषित केली नाहीये, पण फॅक्टरी बिल्डिंग, मशिनरी वगैरे देणेकरी बँकेने ताब्यात घेतलीय.
अजुन एक अडचण म्ह्णजे मुख्य प्रवर्तकांच्या बाकीच्या कंपन्या पण याच कारणामुळे डबघाईला आल्या आहेत.
कंपनी सध्या "आर्थिक अक्षमता" वगैरे काय, कुठलेच उत्तर देत नाहीये. १५ दिवसांनी काहीतरी करु, पुढच्या महिन्यात काहितरी होईल अश्या प्रकारे टाळाटाळ केली जातेय, ईमेल ला कसल्याच प्रकारे उत्तर दिले गेले नाहीये.
आणी ती कंपनी बिझिनेस एण्टिटी म्हणून अजुन अस्तित्वात आहे का हे मलाही पहावे लागेल.
खरे तर मी ज्या कंपनीत होतो ती ५०:५० भागिदारी होती एका भारतीय (पुण्यातील) व एक पोर्तुगीज कंपनीची.

ओके मी ही लीगल एक्स्पर्ट वगैरे नाही, पण एक दोन गोष्टी सुचवतो - पैशाची मागणी लेखी कर शक्यतो, ते ही रजिस्टर पोस्टाने, ज्यात त्यांना ते पत्र मिळाल्याचे कन्फर्मेशन द्यावेच लागते. कदाचित ते उत्तरही द्यायला बांधील असू शकतात - आणि हे सगळे पुढे केस केलीच तर वापरता येइल. फोन व इमेल कितपत वापरता येइल माहीत नाही.

कंपनीचे सध्याचे आस्तित्व व दिवाळखोरी याबद्दलही माहिती काढता आली तर पाहा - कंपनी जर पब्लिक स्टॉक्स असलेली (लिस्टेड) असेल तर ही माहितीसुद्धा जनरल पब्लिक ला उपलब्ध असते (सेबी कडून मिळेल बहुधा). मात्र तशी नसेल (प्रायव्हेट इन्व्हेस्टमेण्ट मधून उभी राहिलेली असेल) तर ती माहिती कोठे मिळते माहीत नाही.

वकील शोधताना एका बाजूने ही माहिती मिळाली तर वकिलाशी बोलतानाही त्याचा फायदा होईल. more meaningful discussion.

लिमिटेड कंपनी असेल तर रजिस्ट्रार ऑफ कंपनीकडून माहिती मिळवा. प्रत्येक लिमिटेड कंपनीला वार्षिक अहवाल इथे सादर करावाच लागतो. त्यात आर्थिक ताळेबंद या शिवाय सध्याचे डायरेक्टर कोण आहेत वगैरे तपशील दिलेला असतो. हे पब्लिक ऑफिस असते आणि हि माहिती कुणालाही उपलब्ध होऊ शकते.

तूमचे साधारण किती देणे लागते ते एकदा हिशोब करून बघा. त्यावर २ वर्षाचे व्याजही लावा. तूमचा दावा तेवढ्या किमतीचा हवा. असा हिशोब करून कंपनीच्या रजिस्टर्ड ऑफिसकडे, कंपनी सेक्रेटरीकडे, ऑडीटर्स कडे पाठवा. या सगळ्या कागदपत्रांसह वकिलाला भेटा. ( शक्य असेल तर ही पत्रे पाठवायलाही वकिलाची मदत मिळवू शकाल. )

एक लक्षात ठेवा, पब्लिक लिमिटेड कंपन्यांमधे भागधारकांची लायबिलिटी त्यांनी घेतलेल्या शेअर्स च्या किमतीपैकी जी किम्मत भरायची राहिलेली असते, तेवढ्यापुरतीच मर्यादीत असते. बँका किंवा इतर संस्था अश्या केसेस मधे डायरेक्टर्स कडून वैयक्तीक गॅरंटी घेतात, त्यामूळे त्यांची देणी सुरक्षित असतात. दिवाळखोरीत निघालेल्या कंपनीची मालमत्ता विकून कुणाची देणी अग्रकमाने द्यायची त्याचेही नियम आहेत.

तूम्ही कंपनीत भागिदारी असे म्हणता आहात, ते तितकेसे क्लीयर नाही. कंपनीत केवळ भागधारकच असतात. भागिदारी ( पार्टनरशिप ) वेगळी. तिचे कायदेही वेगळे.