आयोडाईज्ड मीठ

Submitted by हर्ट on 8 July, 2015 - 02:28

रोजच्या जेवणात नक्की कुठले मीठ वापरावे ह्याबद्दल कुणी माहिती मिळेल का? मी आयोडाईज्ड मीठ वापरुण पाहिले पण मला त्याची एकतर चव फारशी आवडली नाही आणि कितीही टाकले तरी ती किंचित खारट चव लागत नाही.

धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आयोडीनच्या कमतरतेमुळे 'गलगंड' होतो ना? शिवाय बालकांमध्ये आयोडीनच्या कमतरतेमुळे मतिमंदपणा येऊ शकतो. मुले, गर्भवतींना पुरेसा आयोडीनचा पुरवठा न झाल्यास बालकांमध्ये शारीरिक व मानसिक दोष उद्‌भवू शकतात किंवा उपजत मृत्यू देखील घडतात.

या गोष्टी कशा टाळाव्यात?

हर्पेन, हो हा स्वाध्याय करुन तुलाही सांगेल. धन्यवाद.

प्रशू,

गुगलवर तुला हव्या त्या पाककृती मिळतील. एक नाही अनेक मिळतील. तरी इथे 'पाककृती आणि आहारशास्त्र" ह्या विभागात शेकडोनी धागे आहेत. का आहेत? ही लोक गुगल करुन धागे उघडतात का? बहुतेक नाही. मला काही गोष्टी माबोवरच लिहायला, वाचायला आणि विचारायला आवडतात म्हणून मी इथे लिहितो, वाचतो आणि विचारतो. ह्यापलिकडे जाऊन अजून दुसरा विचार मी करत नाही.

केपी, तू इथे मुद्दाम माझे अनुकरण करतो आहे. पण जी बरीवाईट गोष्ट माझ्या निसर्गत: आहे ती तुझ्यात नाही. तेंव्हा माझे अनुकरण करु नकोस. तुझे वरचे सर्व पोस्ट तू त्या कासव्याच्या धाग्याशी संबंधीत आहे. आता ह्या नंतर तू काहीही लिहिले तरी मी उत्तर देणार नाही. आणि इतरांनाही नम्र विनंती की अशा कुठल्याच पोस्टला उत्तर देऊ नका ज्यामुळे त्या त्या धाग्याची वाट लागेल. धन्यवद केपी तुला आणि माझे ऐकणार्‍यांही.

बी,
मला फारसा अंदाज नाही, पण बहुतांश packaged मीठ हे आयोडाईज्ड असतेच असते, मला फक्त हे माहिती आहे की शक्य असल्यास low-sodium मीठ वापरावे, ते तुलनेने कमी खारट असते, त्या मुळे वापरताना अंदाज चुकण्याचे चान्सेस जास्त असतात, पण हे मीठ तब्येती साठी चांगले असे म्हणतात. इतरांनी कृपया मार्गदर्शन करावे. वर बर्याच प्रतीसादांमध्ये म्हण्टल्या प्रमाणे जर खडे मीठ उपलब्ध असेल तर ते जरुर वापरावे.

जी बरीवाईट गोष्ट माझ्या निसर्गत: आहे ती तुझ्यात नाही. तेंव्हा माझे अनुकरण करु नकोस.>> खरच तुझ्यासारखा तूच.

>>> http://www.maayboli.com/node/54558 <<<
या लिंकवरील माझ्या प्रश्नासही जाणकार/तज्ञ कृपया उत्तर देतील काय?

मी जिथे राहतो. म्हणजे पालघरला तिथे "मिठागरे" भरपूर आहेत. मिठागरे म्हणजे समुद्राच्या पाण्यापासून जेथे मीठ बनविले जाते. आमच्या येथे कॅप्टन कुक हि मिठाची प्रसिद्ध कंपनी हि आहे. ते याच मिठागरातील मीठ कारखान्यात नेऊन जाड्या मिठाचे बारीक मीठ केले जाते. अशुद्ध मीठ शुद्ध केले जाते , आयोडीन मिसळले जाते आणि प्याक केले जाते. यात फार काही वेगळे नाही. मात्र १ रु मीठ जाहिरात बाजी करून १० रु विकले जाते.
समुद्रा जवळ राहणाऱ्यांना मासे, वनस्पती ह्यातून आयोडीन मिळतेच म्हणून समुद्राजवळ राहणाऱ्या माणसाना आयोडीन युक्त मिठाची गरज नाही. मात्र डोंगराळ भागात जमिनीत आयोडीनचे प्रमाण कमी असते तेथे राहणाऱ्या माणसांमध्ये आयोडीन कमतरता भासते आणि म्हणून तेथील माणसांनी आयोडीन युक्त मीठ खायला हवे.

low-sodium मीठ?

>>

हे केमिकली कस शक्य आहे? सोडीअम क्लोराईड म्हणजे मीठ, अस लहानपणी शिकलो होतो. आता त्यात लो सोडीअम केला तर ते मीठ; मीठ राहील का?

http://www.todayifoundout.com/index.php/2012/06/why-iodine-is-added-to-s...

बी, वर दिलेल्या लिंकमधे आयोडीनची शरीराला आवश्यकता का असते यावर माहिती मिळेल. छोटं आर्टिकल आहे, सगळं वाच.

तुझ्या दुसर्‍या प्रश्नाचं उत्तर यात नाहीये, की त्यामुळे मीठाचा खारटपणा कमी होतो का. वरती दिनेशदांनी सांगितल्याप्रमाणे ते भुरभुरणारं होण्यासाठी (त्यातील पाण्याचा अंश काढून घेऊन) , स्टार्च मिसळ्ल्यामुळे खारटपणा कमी होत असावा.

low-sodium मीठ?>>>>> टाटा लाईट हे मीठ,प्लेन टाटा मीठापेक्षा कमी खारट असते.

Pages