चामडी कडक्क नव्या बुटांना नरम कसे करावे?

Submitted by limbutimbu on 8 July, 2015 - 07:13

नुकतेच माझ्या मित्राने मला एक मिलिटरी टाईप चामड्याच्या बुटांची जोडी भेट दिली आहे.
घालुन बघता असे लक्षात आले की या बुटांचे चामडे खुपच जाड व कडक आहे.
त्यामुळे बुट पायाला चावतो. (म्हणजे त्यास दात/तोंड नसते पण कातडीला घासून घासुन जखमा होतात).
असे कोणते उपाय आहेत की ज्यामुळे चामडे कायमस्वरुपी नरम पडून बुट घालणे/वापरणे सुखकारक होईल?
पाणी वापरले असता (जसे न्हावी दाढी/कटिंग करायचे आधी लावतो) चामडे नरम पडते आहे, पण तात्पुरते. पाणी वाळून गेल्यावर जसेच्या तसे कडक होते.
तेल वापरावे असे वाटते, पण कोणते तेल जास्त उपयोगी होईल? स्व:स्त अन मस्त उपाय हवाय.
बुट कोणत्या प्राण्याच्या कातड्यापासून बनविलेला आहे व कोणत्या प्राण्याच्या कातड्यावर तो चढविला जाणार आहे त्यावरही कडक/नरमपणा अवलंबुन असतो का?
कृपया जाणकार/तज्ञांनी सल्ला द्यावा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लिंब्या पाणाने चामडे खराब होते. त्यापेक्षा बोरीक पावडर किंवा फेसपावडर लाव. (तोंडाला नाही बुट जिथे काचतो तिथे) एकदम हुकमी उपाय आहे.

कान्द्या, बुटाचे आत घामजन्य बुरशीमुळे बुटाला व मोजांना घाण वास येऊ नये म्हणून मी गेली कित्येक वर्षे बुटाचे आत बोरीक पावडर वापरतोच.
पण त्यामुळे जाड चामडे (अंदाजे दोन पेक्षा जास्त एमएम) नरम/मऊ होत नाही.
मोहरीचे तेल वापरुन बघेन. (पण ते खूपच महाग असते ना?). ते कसे लावावे?

बायदिवे, आपण प्राणीजन्य चामड्याचे बुट वापरतो म्हणजे आपण निसर्गनियमांच्या विरुद्ध तर जात नाही ना?
बाकी प्राणी बघा, त्यांना असतात का चपला नि बुट? त्या प्राण्यांना जन्मतः कळते की पाय कुठे ठेवावा अन कुठे नाही... नैतर पाय घसरेल.
तर बूट घालणे म्हणजे आपण काही चूकिचे तर करीत नाही ना? तसे असेल तर सांगा. म्हणजे मी व माझे समविचारी बुट घालणे बंद करतील.

लिंबू, शनिदेव ( का सुर्यदेव ) आपल्याकडे इराणमधून आलाय. तिथे त्याच्या पायात बूट असतात. पण आपल्याकडे बूट असलेला देव चालणार ( ?? ) नाही म्हणून तो नेहमी रथात दाखवतात !

खालील प्रयोग बांधून घेतलेल्या चामड्याच्या चपलांवर यशस्वी होतो. बुटांवर कधी केला नाही. बुटांकरताही यशस्वी व्हावा पण खात्री नाही.

कोमट पाण्यात भिजवा आणि निथळत ठेवा. सगळे पाणी निथळल्यावर ओलसरपणा सुकायच्या आत कपड्याच्या बोळ्याने शेंगदाण्याचे तेल गरगरीत लावा आणि तेल जिरायला बूट तसाच ठेवून द्या. पुन्हा दोनेक दिवसांच्या अंतरावर पुन्हा तेल लावा. चामडे नरम पडावे.

जेम्स बॉन्ड, मी पण ऐकलेले आहे, पण ते कच्चे ताजे चामडे कमविताना वापरतात.
मी देखिल वापरुन बघायला हरकत नाही, फक्त दह्या ऐवजी ताक वापरेन (सपे इफेक्ट).

दिनेश. तो सूर्यदेव. आपल्याकडे सूर्याची स्वतंत्र मूर्ति मिळत नाही. असली तर ती रथात मांडी घालून बसलेली असते. याची कारणे तुम्ही म्हणता तशी असतील वा नसतीलही.

गजाभौ. सुरवातीला पाण्यात भिजवुन मगच वापरले.
आता तुम्ही म्हणता तसे भिजवुन मग लगेच खोबरेल किंवा मोहरीचे तेल लावून बघतो. Happy

>>> पुन्हा दोनेक दिवसांच्या अंतरावर पुन्हा तेल लावा. चामडे नरम पडावे. <<<
>>> चामडे नरम पडावे<<< असे साकडेही घालायचे का?

आतून आयोडाईज्ड मीठ चोळा आणि बाहेरुन खडे मीठ चोळा. बाष्पीभवनाने खडे मीठ उडून बाहेरुन बुटाला तकाकी येईल. आणि आतल्या बाजूने आयोडाईज्ड मीठाला घाम आल्याने ओलसर पणा येऊन बूट नरम होऊन चावणार नाहीत. या उपायाने काहीच नाही झालं, तर पायाची कातडी गेंड्याच्या कातडीसारखी टणक करा, चामड्याचेच काय लोखंडाचे जोडे घातले तरी चावणार नाहीत.

>>> चामडे नरम पडावे<<< असे साकडेही घालायचे का?>> Rofl

व्हॅसलिन लावुन पहा.>> जोड्याला की पायाला?

लिंबूकाका तुम्ही पण! Lol

भ्रमा, व्हॅसलिन बरे पडेल असे वाटते. फक्त तेला पेक्षा जास्त वेळ चोळून चोळून जिरवायला लागेल.

झगड्या, तुमचे मुद्देही विचारात घेतलेत. आयोडाईज्ड मीठाकरता चांगला ब्रॅण्ड (कंपनी) कोणता?
पिंपरीचिंचवडात पेटत्या चितेमधे टाकण्यासाठी फक्त स्मशानाबाहेरच्या टपरी दुकानातूनच खडेमीठ मिळताना बघितले आहे. ते चालेल का? स्मशानाबाहेरच विकत घेतले म्हणुन काही आधीदैविक्/आधीभौतिक दोष लागणार नाही ना?
आदीदैविक की आधीदैविक? आदीभौतिक की आधीभौतिक?
माझे भाषाविषय कायमच कच्चे आहेत त्यामुळे मला असे प्रश्न पडतात. कृपया सगळ्यांनी समजुन घ्यावे व समजावुन सांगावे.

जरा जाड कापडाचे मोजे वापरल्याने फरक पडेल काय? २ ३ महिन्यात जोडे आपोआपच नरम होतील?

अनिरुद्ध, साध्या म्हणजे बाटा वगैरे कंपनीचे पात्तळ चामड्याचे बुट असते तर तुम्ही म्हणता तेच होते.
पण हे बूट मिलिटरी हेवीड्यूटी आहेत. उन, वारा, पाऊस, बर्फ, आग (निखारे), काटेकुटे, काचा, लोखंडी बर, कशाकशातही घालुन गेले तरी लौकर खराब होत नाहीत.

गोडेतेल चिंधीत भिजवून ४-५ वेळा तरी लावा. चांभाराकडून चपला बांधून घेतल्यावर आम्ही तेच करायचो.

घाटपांडे सरजी, गोडेतेल म्हणजे कोणते?
पूर्वी आम्ही शेंगदाणा तेल वापरायचो त्यालाच गोडेतेल म्हणायचो. बाकिची तेले त्या त्या नावाने आणायचे जसे की सरकीचे तेल, तीळाचे तेल इत्यादी. हल्ली आम्ही सूर्यफुलाचे तेल वापरतो. ते गोडेतेल आहे का?
गोडेतेल चवीलाही गोडच लागते का?
गोडेतेल चवीला गोडच लागत असेल तर मग भाजीआमटीत चिंचेबरोबर गुळ घालायची गरज उरत नसेल ना?
हल्लीच गोडेतेलाचा वापर बंद का झाला?

लिंब्या,

ईतके वेगवेगळे उपाय सांगीतलेत लोकांनी ते करताना दोन्ही पायाच्या बुटांना एकाच प्रकारचे उपाय कर हो !
नाहीतर बुट नरम व्हायच्या ऐवजी दोन्ही बुट वेगवेगळे दिसायला लागतील !!

अतिशय मनोरंजक प्रतिसाद. Rofl
भ्रमरला विनोद करता येतात हे नव्हतं माहिती Wink

लिंबू कोल्हापूरी चपला पण खूप लागतात नव्या असताना. एक तर ताबडतोबिचा उपाय म्हणजे अख्ख्या चप्पलवर मेणबत्ती घासणे.
लाँगटर्म उपाय म्हणजे सुट्टं खाण्याचं तेल कापडाने चांगलं चोपडायचं आतून बाहेरून आणि कडक उन्हात वाळवायचं. पुर्ण वाळलं की पुन्हा चोपडायचं... आपोआप नरम पडतं. तरिही लागलं तर घालूनच सवय करून घ्यायची. पण सलग २-३ वेळा तेल चोपडलं की लागत नाही शक्यतो.

लिंब्या,
खिश्यात बँडेजेस ठेवायच्या. जिथे जिथे बुट चावेल तिथे तिथे बँडेज लावायच. पायाला. बुटाला नाही. Happy
थोड्याच दिवसात बुट चावायचा थांबतो.

मेणबत्ती पेटवून मग घासायची की तशीच ?
पेटवूनच घासायची असणार, म्हणजे मेणाचा १-१ गरम ठिपका बूटाच्या आत पसरुन नरमपणाचे एक आवरण बूटाच्या आत तयार होत असणार!

Pages