अडै / अडाई

Submitted by दिनेश. on 29 June, 2015 - 04:11
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
४ ते ६ अडै होतील
अधिक टिपा: 

डाळींची निवड व प्रमाण आवडीप्रमाणे घ्या.

माहितीचा स्रोत: 
पारंपरीक दाक्षिणात्य पदार्थ आहे.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आरती., कांदा घातला नसेल तर यापेक्षा पातळ करतात का ? मग मला वाटते तो जास्त क्रिस्पी होत असेल. वरच्या अंजलीच्या फोटोतला तसाच असणार बहुतेक.

वाह रे वा या कार्यक्रमात, कांदा असल्यामूळे पातळ पसरता येत नाही, असे तो शेफ म्हणालाय.

दिनेशदा, अंजलीचा साधा डोसासारखा दिसतो. अडाई जाडसरच असते. आणि त्यात लसूण पेस्ट नाही घालत.

आरती, पातळ पीठ पसरणे हा माझा वैयक्तिक प्रेफरन्स आहे. माझा दोसा यापेक्षा पातळ होतो. शिवाय आताशा ब्राऊन राईस, सालीसकट डाळी, ओटस, किन्वा वगैरे घेत असल्याने चवीला लसूण घालते. माझ्या सासूबाई नुसत्या डाळी-तांदूळ आणि लाल मिरच्या घालून करतात. तेही छान लागते.

यात गाजर किसुन, दुधी किसुन,मटार वाफवुन घालता येतात आणि घरच्या छोट्या गनिमा ना फसवता येत.smiley2.gif

अंजली, ब्राउन राइस कुठला वापरतेस? माझ्या विपुत लिहिलंस तरी चालेल. मला इडली/दोसा हे सगळेच सौदी प्रकार ब्राउन राइस/सालवाल्या डाळी वापरून करायचे आहेत पण दोसा वगळता काही नीट सूत जमत नाहीये. आभार्स.

छान प्रकार आहे. मुख्य म्हणजे पीठ आंबवण्याची गरज नाही. यात थोडी टोमॅटो ची प्युरे करून टाकली तर कसं लागेल?

मला इडली/दोसा हे सगळेच सौदी प्रकार <<< दोन क्षण आं!!!!! असं झालं. अरब लोकं कधीपासून इडली डोसा बनवायला लागले! Light 1

आज मी बनविले अडै पण थोडे कोरडे वाटतायत त्यामुळे नवर्‍याला नाही आवडले Sad तसं त्याने आवडले नाही असे सांगायची हिम्मत नाही केली Wink पण एकच खाल्ला त्यामुळे समजले मला. खुप खोदुन खोदुन विचारल्यावर कोरडे लागतात म्हणुन सांगितले.

रात्री उशिराने बेत केला की सकाळी नाश्त्याला बनवायचे त्यामुळे दही आणायला जमले नाही. दही घातले नाही म्हणुन कोरडे वाटतात म्हणुन मी टॉमॅटो चिरुन घातला तरीही फरक नाही. मस्त जाळीदार आणि कलरफुल झालेत पण कोरडे लागतात. सोबत नारळाची चटणी आहे त्यामुळे मलातरी काही फरक नाही पडत पण अहोंनी मनापासुन नाही खाल्ले म्हणुन वाईट वाटतय. तर कशामुळे असं झालं असेल की चणाडाळ असल्यामुळे असेच लागतात.

असो, तर अजुन पीठ उरलयं, त्याचं काय करु? संध्याकाळी घरी जाईपर्यंत पीठ आंबुन जाईल. ईडली होईल का? फक्त पीठच आहे, कांदा-मसाले नाहीयेत त्यात.

मी दही घालण्याबाबत कुठे वाचले नव्हते तरी घातले, त्यामूळे असेल पण मी केलेले कोरडे लागत नव्हते.
त्याचे डोसेच करून सोबत नारळाची चटणी किंवा सांबार करता येईल.

अरे वा! लगेच उत्तर. धन्यवाद दिनेशदा, मंजुडी.

मी इडली करायचा बेत केला होता म्हणुन उरलेल्या पीठात पोहे भिजवुन वाटले होते पण दोघांचाही कल डोसे करण्याकडेच आहे म्हणजे इडल्या कशा होतील याची गॅरंटी नाहीये वाटतं. चालेल डोसे विथ सांबर-चटणी.

मी देखील मिनीच्या रेसीपीने करते. अंजली ने फोटो टाकलात तसेच होतात. घरगुती, पारंपारिक चवीचे किंवा हॉटेलमधे कधी खाल्ले नाहियेत त्यामुळे जे होतात तेच अडइ म्हणून खातो. Happy आता या कृतीप्रमाणे करुन पाहीन.

आज नाश्त्याला हे केले होते. मस्त लागतात. डाळी आणि तांदूळ काल रात्री भिजत घातले.
तव्यावर पीठ टाकलं की थोड्याच वेळात कढीपत्त्याचा मस्त दरवळ पसरतो.

मी पण शुक्रवारी केले होते, मस्त झाले. तांदूळ फक्त एक चमचा घातले पण निर्लेपवर सुटून येण्यास काहीच त्रास झाला नाही. अतिशय चविष्ट झाले होते, धन्स दिनेशजी.

Pages